माननीय गजू तायडे साहेब ,

हे मी तुमच्यासाठी लिहीत नाही तर तुम्हाला लाईक करणाऱ्या लोकांसाठी लिहितोय मी तुमच्या अघोर वा नागा साधुंच्यावरच्या पोस्ट आणि चेष्टा वाचतो अभिव्यक्तिस्वातंत्र्य मला मान्य असल्याने मी आक्षेप घेत नाही पण दुसरी बाजू येणे आवश्यक असल्याने हे लिहितोय 

भगवान शंकरांनी जी ११४ तंत्रे दिली त्यातील एक तंत्र अघोर तंत्र आहे हे तंत्र शिव तत्वाची उपासना अघोर तत्व  म्हणून करते व भगवान शंकराची साधना अघोरनाथ म्हणून करते ज्याला हे दिले गेले त्याला नंतर अघोरी म्हंटले गेले व हा नाग वंशी होता त्यामुळे साहजिकच नागांच्यात तो लोकप्रिय झाला आणि अनुयायांना नागा साधक म्हंटले गेले जे कालांतराने नागा साधू झाले 

ज्या माणसांच्या आयुष्यांना भीती आणि चिंता व्यापून आहे त्यांच्यासाठी हे तंत्र आहे घोर म्हणजे समग्र भय व चिंता व ह्या घोरापासून मुक्त होण्यासाठी करावयाची साधना म्हणजे अघोर साधना ! ही साधना करतात ते साधक ज्या साधकांना ह्या तंत्राद्वारे सविकल्प समाधी मिळते ते अघोर साधू होय आणि जे निर्विकल्प समाधीला उपलब्ध होतात ते अघोर नाथ वा अघोर सिद्ध होय 

७ व्या शतकापर्यंत हे तंत्र नीट चालले होते कारण ते फक्त शैवांच्यात होते पण नंतर त्यात युरेशियन लोक घुसले पुढे अघोर साधकांचा आखाडा स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी अनेक दंतकथा रचल्या गेल्या आणि हे तंत्र अधिकाधिक विकृत होत गेले मात्र प्रत्येक काळात त्याचे मूळ रूप जतन करणारे लोक होते व आत्ताही आहेत उदा ह्या तंत्रात मृत शरीराबरोबर राहणे आवश्यक मानले गेले आहे कारण माणसाला सर्वाधिक भय हे मृत्यूचे असते जर मृत शरीराबरोबर वा स्मशानात चितांच्या शेजारी तुम्ही राहिलात कि मृत्यूविषयीचा घोर निघून जातो मृत शरीराचे मांस खाणे वा मृत शरीराशी सेक्स करणे हे ह्या तंत्रात बसत नाही ही विकृती नंतर कुणी आणली व का आणली ह्याची मला नीट कल्पना आहे अनेकदा हिंदी चित्रपट लेखकांच्या विकृत कल्पनाशक्तीतून ह्या कल्पना जन्मलेल्या आहेत अशा व्यक्ती मला भेटलेल्या नाहीत ज्यांना भेटलेत त्यांनी पुरावे द्यावेत टाकावेत फिल्म सिरियल्समधले सीन्स पुरावे म्हणून टाकू नयेत 

मोक्ष ह्या संकल्पनेवर तुमचा विश्वास नसेल तर तो व्यक्त करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे पण मग सगळ्याच मोक्षवाद्यांच्याविरुद्ध ज्यात गौतम बुद्ध व महावीर येतात त्यांच्याविरुद्ध मोहिमा उघडा 

आता प्रश्न निर्वस्त्र असण्याचा ! तर फक्त नागा साधूंचे निर्वस्त्र असणेच तुम्हाला बोचते कि एकंदरच नग्नतेला तुमचा विरोध आहे ? कि अमुक प्रकारच्या नग्नतेला पाठींबा व तमुक प्रकारच्या नग्नतेला विरोध असा काही सिलेक्टिव्ह विचार तुमचा आहे ? उदा जेव्हा नाथ तंत्र देण्यात आले तेव्हा अनेक साधक नाथ मग ते जैन असोत कि अजैन वस्त्रांचा त्याग करत कारण वस्त्रे ही अनैसर्गिक असल्याने नैसर्गिक होण्यासाठी वस्त्रांचा त्याग व दिगंबर होणे अटळ मानले जाई गौतम बुद्धाने ह्या नग्नतेची कायमच चेष्टा केली कारण त्याला दिगबंरता एक्स्ट्रीम टोक वाटले आता असे वाटण्याचे बुद्धाचे स्वातंत्र्य मला मान्यच आहे पण वस्त्रता ही फक्त शारीरिक नसते तर मानसिकही असते आणि मानसिक नग्नतेसाठी शारीरिक नग्नता आवश्यक मानणाऱ्या महावीरवादी लोकांना दिगंबर असणे हे योग्य वाटत असेल तर त्याला तुमचा विरोध असणार का ?

बौद्धांनी दुसऱ्यांच्या साधना पद्धतीची जी टर उडवली तिचे बीज खुद्द बुद्धाच्याच उपदेशात आहे पण बौद्ध हा अनेकांपैकी एक ज्ञानोपाय आहे आणि स्वतः बुद्धाने हा माझा धम्म आहे म्हणत हे मान्यही केले आहे शैव हे कायमच बहुउपायी राहिलेत त्यामुळे आम्ही कुणाच्या उपायाची चेष्टा करत नाही जितकी शरीरे तितके पिंड असा आमचा सिद्धांतच आहे तुमचा पिंड कार्टूनिस्ट असेल तर तुम्ही चेष्टा करणारच तर उडवणारच आम्हाला हे मान्यच आहे पण जर एखादी व्यक्ती सातत्याने एका विषयावर व्यंगकारी करत असेल तर त्या विषयाबाबत गैरसमज पसरण्याची शक्यता असते असे गैरसमज पसरू नयेत म्हणून ही पोस्ट 

श्रीधर तिळवे नाईक 








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती भाग १ ते २२