पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
 आज संविधान दिन ! भारतीय पुरोगामीवादाचा त्यातील सुधारणावादी व रोमँटिक अशा दोन नवंतांनी उभ्या केलेल्या राजकीय आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यलढयांनी परंपरावादी शोषणग्रस्त व्यवस्थेवर मिळवलेल्या विजयाला अधिकृत कायदेशीर संहिता दिल्याचा हा दिवस ! भारतीय पुरोगामीवादाचे ज्यांना सर्वोच्च शिखर म्हणता येईल अशा बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान दिले  ह्या संविधानाने पुरोगामीवादाच्या पायाभूत अशा दोन गोष्टी अधोरेखित केल्या पहिली सांसदीय लोकशाही ही राजकीय व्यवस्था व स्वातंत्र्य समता बंधुता ह्या तत्वांना बांधणारी मानणारी सामाजिक व्यवस्था व ही समता प्रस्थापित करण्यासाठी निर्माण केली गेली आरक्षणव्यवस्था ! पुढे इंदिरा गांधींच्या काळात समाजवाद हीही आर्थिक व्यवस्था म्हणून स्वीकारली गेली प्रत्यक्षात मूळ अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था होती पण ती अंतिम म्हणून स्वीकारली गेली नाही १९६० सालानंतर जी साठोत्तरी समाजवादी पिढी उदयाला आली तिने भारतीय संविधानाला समाजवाद स्वीकारायला लावला  आज आपण असं म्हणू शकतो कि १९७७ पर्यंत संविधानवाद हाच आता परंपरा म्हणून प्रस्थापितता म्हणून प्रस्थापित झाला  ह्या संविधानाविरुद्ध दोन