पोस्ट्स

जुलै, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती भाग १ ते २२

लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती भाग १ ते २२ श्रीधर तिळवे नाईक आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती लेखक : श्रीधर तिळवे -नाईक प्रस्तावना इतिहास हा गेली अनेक सहस्रके पौराणिक , वृत्तांतिक अशी वाटचाल करत आधुनिक झाला आधुनिकने वैज्ञानिक बुद्धिप्रामाण्यवादी इतिहास जसा लिहिला तास रोमँटिक भावनाशील इतिहासही लिहिला पुढे आधुनिकता आली तिने तंत्रज्ञानिक वस्तुनिष्ठ इतिहास लिहण्याचा प्रयत्न केला पण तो अशक्य बनत गेला आणि उत्तराधुनिकतेने इतिहास रचला जातो निर्माण केला जातो प्रॉडक्ट म्हणून कल्चरल इंडस्ट्रीत मॅनुफॅक्चर केला जातो अशी इतिहासाबाबत खरीखुर्री भूमिका मांडली वास्तविक उत्तरआधुनिक इतिहासाचा वापर करून १८३० ते १९६० पर्यंत जो इतिहास रचला गेला त्याची सालटी सोलून काढायला हवी होती पण हा इतिहास रचणारे लोक राजकीय असल्याने त्यांच्याशी पंगा घेणे टाळले गेले एकमेकांच्या महापुरुषांच्याविषयी अफवा पेरत त्यांची बदनामी करणे एव्हढाच उत्तराधुनिक इतिहास आपल्याकडे झाला वा चाललाय इंग्रजांनी कसा आपला खोटा इतिहास रचला हे दाखवून देण्याचे काम आपल्याकडच्या अनेक पोस्टकलोनियल अकादमीक इतिहासका