पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शबरमल मंदिर , महावीर आणि ब्रम्हचर्य लेखक श्रीधर तिळवे नाईक

शबरमल मंदिर , महावीर आणि ब्रम्हचर्य   लेखक श्रीधर तिळवे नाईक गेली  काही वर्षे सबरमलचा प्रश्न दक्षिणेत धुमसत आहे आणि अलीकडे तो पुन्हा उफाळला आहे वास्तविक  एकदा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर हा प्रश्न संपायला हवा  होता पण तो संपलेला नाही असे दिसते प्रथमच स्पष्ट करतो कि  माझे स्वतःचे स्पष्ट मत आहे कि सर्व शैव मंदिरे वर्ण जात वर्ग लिंग धर्म प्राणिजाती वैग्रे कसलेही भेद न करता सर्वांनाच खुली असायला हवीतच . शैव दर्शन सर्व भेदांना ठाम विरोध करते आणि जे कोणी  शिव पार्वती गणेश स्कंद नंदी सूर्यनारायण ह्यांचे भक्त आहेत त्यांनी ठामपणे सर्वच प्रकारच्या उच्चनिच्च भेदाला ठाम विरोध केला पाहिजे वैदिकांच्या आणि ब्राह्मण्याच्या नादाला लागून आपले शैव दर्शन बिघडवून घ्यायचे काहीही गरज नाही शनी काय किंवा शबरमल काय सर्वच मंदिरे सर्व स्त्रीपुरुषांना खुली झाली पाहिजेत पण सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरही हा प्रश्न संपणे तर दूर उलट तो वाढत चाललाय  आणि ज्यांनी हा प्रश्न निर्माण केलाय ते वारंवार ब्रम्हचर्याची दुहाई देतायत म्हणूनच ह्या ब्रम्हचर्याच्या प्रश्नात खोलवर जाणे गरजेचे आहे अनेकांचा असा गैरसमज आ