पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ६८ ते ८२ श्रीधर तिळवे नाईक

आद्यहिंदूहृदयसम्राट  लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ६८ ते ८२ श्रीधर तिळवे नाईक  आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ६८ श्रीधर तिळवे नाईक  टिळक आणि आर्यांचे मूळ वसतिस्थान : भरतवाक्य  २१ आर्य म्हणजे काय , आर्य सिद्धांत शाप कि वरदान व आर्य सिद्धांतामुळे ब्राम्हण एकटे पडलेत काय  ? प्रत्येक शोषक राज्यकर्त्याला शोषितांनी आपल्या शोषणाविरुद्ध बंड करू नये म्हणून प्रचंड प्रयत्न करायला लागतात आणि त्यासाठी शोषितांना मी तुमच्याच कुळीचा आहे हे पटवण्यासाठी काही वैचारिक क्लुप्त्या रचाव्या लागतात . इंग्रज ह्याला अपवाद न्हवते युरोपियन लोकांच्या सुदैवाने ह्याच वेळी इंडोयुरोपियन भाषेचा सिद्धांत जन्माला आला आणि ह्या भाषा बोलणारे एकाच कुळीचे असावेत असा विचारही उदयाला आला ह्या कुळीला सर्वांनी आर्य असे म्हंटले मात्र ही एकच वंशीय होती कि अनेक वंशीय होती हे गुलदस्त्यातच राहिले भारतात मात्र ती एक वंशीय असल्याचा अट्टाहास ब्राम्हणांनी व ब्राम्हण इतिहासकारांनी धरला आणि त्यातूनच आर्य वंशाची कल्पना जन्माला आली हे आर्य म्हणजे फार प्रागतिक दिसायला देखणे घोड्यावर बसणारे द्रविड बायका ज्