पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
 मीडियालॉजी श्रीधर तिळवे नाईक  मीडियालॉजी ही आजच्या जगाच्या जगाची एक दार्शनिक आवश्यकता आहे आणि ज्यांना आपण काय अपलोड करतोय , पोहचवतोय कसं केव्हा कुठे आणि कुणासाठी पोहचवतोय सादर करतोय आणि मेंदूत डाउनलोड करतोय ह्याविषयी थोडा कन्सर्न आहे त्यांच्यासाठी मीडियालॉजी अपरिहार्य आहे प्रतिसृष्टीत मिडिऑकर लोकांचा जसा सुळसुळाट होता तसाच सुळसुळाट आता मेडियॉकर लोकांच्यामुळे झाला आहे ज्यांना मिडिऑलॉजीशी काही देणेघेणे नाही आणि मीडिया हा ज्यांच्यासाठी फक्त धंदा आहे मीडिया हा एक व्रत असण्याचा प्रबोधनात्मक कालखंड लयाला गेला आहे कारण मीडिया हा आता प्रचंड भांडवली इन्व्हेस्टमेंट मागतो पण म्हणून धंदेवाईकच व्हायला हवं असं नाही व्यावसायिक होऊनही प्रॉफिट कमावता येतो पण दुर्देवाने आज हे पटण्याचा आणि पटवण्याचा काळही रसातळाला चाललाय आणि एकदा का रसाच्या तळाला तुम्ही गेला कि रसाची गुणवत्ता नाहीशी होते आणि अक्षस तापस सात्विक भाव पोकळ बनत जातात आणि बुद्धिमत्ता प्रयोग करायला प्रायोगिक बनायला घाबरायला लागते इनोव्हेशन्स थांबतात इन्व्हेन्शन्स पेन्शन घ्यायला लागतात आणि समांतरता बधिर व्हायला लागते लडाई उरते ती व्यावसायिक आणि
 शैव आणि बरंच काही श्रीधर तिळवे नाईक  शैवांची अवतरणे आणि वैदिकांचे अवतार श्रीधर तिळवे नाईक  गेली काही शतके ज्या काही गोष्टींचा प्रचार शिव धम्माबाबत होतो आहे त्यापैकी एक म्हणजे शैवांच्यात अवतार ही संकल्पना थेट प्राचीन काळापासून आहे वस्तुस्थिती काय आहे अवतरण ही संकल्पना शैवांना प्राचीन काळापासून माहीत आहे आणि गंगेचे अवतरण प्रसिद्धही आहे पण मूळात अवतरण ही संकल्पना काय आहे शैव अनेकदा मत्स्य ,कासव वा वराह ह्यांचे पूजन करत असल्याने हा गोंधळ झालेला आहे  शैवांच्यात माणसाची आठ अवतरणे मानली आहेत माणूस गर्भात असतो तेव्हा माशासारखा गर्भात तरंगत असतो त्यामुळे मत्स्य हे पहिले अवतरण तो बाहेर आला कि कासवासारखा रांगायला लागतो पुढे थोडा तो वाढल्यावर डुकरासारखा कुठेही रांगत रांगत हुंदडायला लागतो मग तो सिंहासारखा दोन हात दोन पाय ह्यांचा परफेक्ट तोल सांभाळत रांगायला लागतो मग हळूहळू तो स्वतःच्या बळाने उभा राहतो आपण त्याला कौतुकाने बली म्हणतो मग तो हाताने वस्तू पकडायला शिकतो परसापर्यंत एकटाच जायला शिकतो म्हणून त्याला परश म्हणतात आणि मग हळूहळू तो आपल्या मागच्या पिढ्यातील स्त्री अथवा पुरुष ह्यांची लक्षणे दाखवा