पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
 मायग्रेशन व साईडइफेक्ट्स श्रीधर तिळवे नाईक  भारतीय प्रबोधनाची सर्वात मोठी शोकांतिका जर कुठली असेल तर ती म्हणजे ते स्वकीयांशी खोलात जाऊन लढलेच नाही आणि ह्याचे कारण ब्रिटिश राजवट ! भारतीय प्रबोधनाची सगळी ताकत ब्रिटिशांशी लढण्यात खर्च पडली फुले आगरकर आंबेडकरांनी ब्रिटिशांशी लढायचे टाळले कारण त्यांना स्वकियांशी लढायचे होते त्यामुळे ब्रिटिशांना हाकलून देण्यात त्यांना फारसे स्वारस्य न्हवते ह्याउलट टिळक गांधी ह्यांना परकीयांशी लढायचे होते त्यामुळे स्वकीयांची युती आणि एकात्मता त्यांना महत्वाची वाटायला लागली  हळूहळू ह्या देशातल्या ब्राम्हण व क्षत्रियांना नेमकं काय घडतंय ह्याचा अंदाज यायला लागला ब्रिटिश गेले तर पुढील लढाई ही आपल्याविरोधात लढली जाणार हे स्पष्ट झाले साहजिकच दोन पर्याय उरले आपल्या हितसंबंधांचा त्याग करणे नेहरूंच्यापासून अनेक कम्युनिस्टांपर्यंत अनेकांनी आपल्या हितसंबंधांचा त्याग केला मात्र ह्यांचे प्रमाण फक्त १० टक्के होते उरलेले ९० टक्के स्वातंत्र्योत्तर काळात आपले हितसंबंध कसे राखायचे ह्या दिशेने विचार करायला सुरवात केली काहीजण परदेशात गेले व जातांना त्यांची सारी संपत्ती सोबत घेऊ
 विवेकानंद स्मृतीच्या निमित्ताने श्रीधर तिळवे नाईक  चार जुलै ही स्वामी विवेकानंदांची पुण्यतिथी ह्या निमित्ताने विवेकानंद स्मृती येणार आहे ह्याची कल्पना होती खरेतर ती आधीच यायला हवी होती असो  माझ्या गुरुस्थानी मला जे काही विचारवंत आहेत त्यात स्वामी विवेकानंद मला नेहमीच महत्वाचे वाटत आले आहेत साहजिकच ह्या ग्रंथाविषयी उत्सुकता होती  भारतात आद्य शंकराचार्यांनी हिंदू धर्माची स्थापना केली त्यातून एक प्रोटेस्टंट हिंदुधर्म जन्मणे प्रबोधनाच्या काळात अटळ होते आणि एक आयडियालॉजीही ! राजाराम मोहन रॉय ह्यांनी प्रथम हिंदुइजम HINDUISM ही टर्म कॉईन करून त्याची सुरवात केली आणि त्याला शह म्हणून दयानंद सरस्वती व विष्णुशास्त्री चिपळूणकर ह्यांनी हिंदुत्ववाद आणला हिंदुवादाचा दुसरा टप्पा हा विवेकानंदानी मांडला आणि त्यात शाहू महाराज व सयाजीराव गायकवाड ह्यांनी भर घातली ह्याला मी क्षात्र हिंदुवाद म्हणतो पुढे महात्मा गांधी ह्यांनी विश्य हिंदुवाद मांडला जो बहुजनांचा हिंदुवाद होता व त्याची बीजे स्वामी विवेकानंदांच्यात होती  हिंदुधर्मात वेदांत हा आद्य मानला जातो व त्याची प्रस्थानत्रयी उपनिषदे(ह्यात गीतोपनिषदही जिला