विवेकानंद स्मृतीच्या निमित्ताने श्रीधर तिळवे नाईक 

चार जुलै ही स्वामी विवेकानंदांची पुण्यतिथी ह्या निमित्ताने विवेकानंद स्मृती येणार आहे ह्याची कल्पना होती खरेतर ती आधीच यायला हवी होती असो 

माझ्या गुरुस्थानी मला जे काही विचारवंत आहेत त्यात स्वामी विवेकानंद मला नेहमीच महत्वाचे वाटत आले आहेत साहजिकच ह्या ग्रंथाविषयी उत्सुकता होती 

भारतात आद्य शंकराचार्यांनी हिंदू धर्माची स्थापना केली त्यातून एक प्रोटेस्टंट हिंदुधर्म जन्मणे प्रबोधनाच्या काळात अटळ होते आणि एक आयडियालॉजीही ! राजाराम मोहन रॉय ह्यांनी प्रथम हिंदुइजम HINDUISM ही टर्म कॉईन करून त्याची सुरवात केली आणि त्याला शह म्हणून दयानंद सरस्वती व विष्णुशास्त्री चिपळूणकर ह्यांनी हिंदुत्ववाद आणला हिंदुवादाचा दुसरा टप्पा हा विवेकानंदानी मांडला आणि त्यात शाहू महाराज व सयाजीराव गायकवाड ह्यांनी भर घातली ह्याला मी क्षात्र हिंदुवाद म्हणतो पुढे महात्मा गांधी ह्यांनी विश्य हिंदुवाद मांडला जो बहुजनांचा हिंदुवाद होता व त्याची बीजे स्वामी विवेकानंदांच्यात होती 

हिंदुधर्मात वेदांत हा आद्य मानला जातो व त्याची प्रस्थानत्रयी उपनिषदे(ह्यात गीतोपनिषदही जिला गीता म्हंटले जाते ते  येते ) , वेदांत व  संतवाङ्मय ही आहे हिंदुवाद ह्या त्रयीला स्वीकारतो . महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांनी हिंदू धर्म स्थापन केला आणि नामदेव , तुकाराम , एकनाथांनी तो वाढवला अलीकडे नेमाडेंच्यासारखे क्षात्र हिंदूवादी हे श्रेय ज्ञानेश्वरांच्याऐवजी नामदेवांनाही देत आहेत 

स्वामी विवेकानंद हे त्यांच्या काळाच्या मानाने फार पुढे होते व स्वातंत्र्य ,समता , बंधुता मानणारे होते बुद्धाची करुणा , महम्मदांचे बुद्धत्व , हिंदूंचे अध्यात्म्य एकत्र करून एक नवा हिंदुवाद त्यांनी निर्माण केला आणि विवेकानंद स्मृती ही त्याचा अविष्कार आहे अलीकडे भाजपने स्वामी विवेकानंदांच्यावर हक्क सांगायला सुरवात केल्याने पुरोगामी लोकांना विवेकानंद भाजपपासून वाचवले पाहिजेत असं वाटतं ह्या विवेकानंद स्मृतीने भाजपची पंचाईत होणार आहे एकतर त्यांना विवेकानंदांचे पुरोगामीत्व पूर्ण स्वीकारावे लागेल किंवा विवेकानंद आमचे नाहीत असं म्हणावं लागेल जर भाजपने ही स्मृती पॉझिटिव्हली घेतली तर राजकीय नैतिकता म्हणून काय करायचे ह्याचे स्पष्ट आचारआदेश त्यांना ह्यातून मिळेल  नवबौद्धाना ह्या स्मृतीला स्मृती म्हंटल्याने प्रॉब्लेम वाटेल पण त्यांनी आतला आशय वाचला तर कदाचित त्यांना ती विचारयोग्य वाटेल 

ह्या स्मृतीत रामकृष्ण मिशनची त्रयी स्पष्टपणे अधोरेखित केली आहे रामकृष्ण परमहंस , माता शारदादेवी व स्वामी विवेकानंद अशी ही त्रयी आहे हिंदुवाद काळानुरूप नवी स्मृती निर्माण व्हायला हवी असे म्हणतो त्याच हेतूने ही स्मृती निर्माण झाली आहे तिच्यात भर टाकायला वा तिच्यात सुधार करायला वाव आहे 

भाजपने संविधानाला भीमस्मृती म्हंटल्यावर अनेक विचारवंतांनी त्याला आक्षेप घेतला होता रामकृष्ण मिशनला संविधानाला आव्हान द्यायचे नाही त्यामुळे विवेकानंद संविधान म्हंटले असते तर हे संविधान भारतीय संविधानाला समांतर म्हणून आणले आहे काय असा आक्षेप आला असता स्मृती म्हंटल्याने असा समज होणार नाही पण स्मृती ह्या शब्दाने ब्राह्मणवादाची ही नवी स्मृती आहे काय अशीही शंका येणे अटळ आहे प्रत्यक्ष विवेकानंद स्मृतीत असे काहीही नाही मात्र परंपरेशी सांगड घालणे मात्र सोडलेले नाही 

ह्या स्मृतीसाठी योजलेल्या दोन्ही भाषा मार्गी आहेत संस्कृत आणि इंग्रजी ! भारताचे संविधान इंग्लिशमध्ये असल्याने ह्यावर आक्षेप घेता येणे शक्य नाही आपला प्रबोधनाचा सगळा प्रोजेक्ट इंग्लिशधार्जिणा होता त्यामुळे हे अटळच होते 

ह्या ग्रंथांचे स्वागत करतानाच त्यावर साधकबाधक चर्चा होईल अशी मी अपेक्षा करतो 

श्रीधर तिळवे नाईक 


दही आणि ताकावर जीएसटी ? कठीण आहे अतिरेकी उजवं आर्थिक धोरण किती ताणवायचं ह्याला मर्यादा असतात 

श्रीधर तिळवे नाईक 






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती भाग १ ते २२