पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

RAHUL GANDHI CONGRESS लोकशाही समाजवाद , उदारमतवाद

लोकशाही समाजवाद , उदारमतवाद    राहुल गांधी ह्यांची यात्रा श्रीधर तिळवे नाईक  राहुल गांधी ह्यांची भारत जोडो यात्रा ही चर्चेचा विषय बनवण्यात आलीये किंवा बनलीये ह्याचे कारण विपक्षांकडे पंतप्रधानपदासाठी फक्त तीनच पर्याय आहेत  १ केजरीवाल  २ राहुल गांधी  ३ शशी थरूर  शरद पवार व नितीशकुमार ह्यांचे चान्सेस कमी आहेत म्हणून त्यांची नावे घेत नाहीये ह्यातील शशी थरूर ह्यांना गांधी परिवार कितपत संधी देईल हा प्रश्नच आहे कारण ह्या परिवाराला राहुललाच पीएमसाठी आणायचे आहे आणि ही यात्रा ह्या स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे राहुलचा निरागस चेहरा व निर्मळ हात मान्य करूनही त्यामागे राजकारण नाही असे समजणे हे राजकीय अक्कल रोमँटिक ढगात गेल्याचे लक्षण आहे  राहुल गांधींनी पंतप्रधानपदासाठी प्रयत्न करायला हरकत नाही पण ह्या प्रयत्नाला मास बेस देणे व घेणे गरजेचे आहे १९७७ नंतर निवडणूक हरल्यानंतरही इंदिरा गांधींनी आपला मास बेस तगडा असल्याचे सिद्ध करायला सुरवात केली होती राहुल गांधींना मास बेस आहे कि नाही हे चेक करण्यासाठी व दाखवण्यासाठी ही यात्रा आहे त्यामुळे शशी थरूर साईडलाईन काहीकाळ होतील पण त्यांनी ह्या यात्रेनंतर हा मास बेस