RAHUL GANDHI CONGRESS लोकशाही समाजवाद , उदारमतवाद

लोकशाही समाजवाद , उदारमतवाद  

 राहुल गांधी ह्यांची यात्रा श्रीधर तिळवे नाईक 

राहुल गांधी ह्यांची भारत जोडो यात्रा ही चर्चेचा विषय बनवण्यात आलीये किंवा बनलीये ह्याचे कारण विपक्षांकडे पंतप्रधानपदासाठी फक्त तीनच पर्याय आहेत 

१ केजरीवाल 

२ राहुल गांधी 

३ शशी थरूर 

शरद पवार व नितीशकुमार ह्यांचे चान्सेस कमी आहेत म्हणून त्यांची नावे घेत नाहीये ह्यातील शशी थरूर ह्यांना गांधी परिवार कितपत संधी देईल हा प्रश्नच आहे कारण ह्या परिवाराला राहुललाच पीएमसाठी आणायचे आहे आणि ही यात्रा ह्या स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे राहुलचा निरागस चेहरा व निर्मळ हात मान्य करूनही त्यामागे राजकारण नाही असे समजणे हे राजकीय अक्कल रोमँटिक ढगात गेल्याचे लक्षण आहे 

राहुल गांधींनी पंतप्रधानपदासाठी प्रयत्न करायला हरकत नाही पण ह्या प्रयत्नाला मास बेस देणे व घेणे गरजेचे आहे १९७७ नंतर निवडणूक हरल्यानंतरही इंदिरा गांधींनी आपला मास बेस तगडा असल्याचे सिद्ध करायला सुरवात केली होती राहुल गांधींना मास बेस आहे कि नाही हे चेक करण्यासाठी व दाखवण्यासाठी ही यात्रा आहे त्यामुळे शशी थरूर साईडलाईन काहीकाळ होतील पण त्यांनी ह्या यात्रेनंतर हा मास बेस आपल्यामागे आहे हे दुसरी यात्रा काढून सिद्ध करणे आवश्यक आहे  

ह्या यात्रेला दिलेले नाव भारत जोडो असं आहे ह्याचा अर्थ भारत तोडो हे भाजपचे धोरण यशस्वी झाले असून भाजपने तोडलेला भारत आपण पुन्हा जोडतोय असा आहे प्रत्यक्षात भाजपने भारत तोडलाय का ? उलट काश्मीर जोडो कायदा बदलून यशस्वी करण्याचा प्रयत्न चालू आहे मग भाजप भारत तोडण्यात यशस्वी झालाय म्हणजे काय ? राहुल गांधींच्या पहिल्या सेंटीमेंटल सिम्बॉलिक भाषणातून ते स्पष्ट झालेलं नाही भारतीय झेंड्याचे ब्रिटिशकाळात असलेले अपील आत्ताही शाबूत आहे असं त्यांनी गृहीत धरलंय असं दिसतंय मला ह्याबद्दल शंका आहे त्याऐवजी आपण दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई लढतोय (प्रत्यक्षात तिसऱ्या म्हणायला हवं कारण जयप्रकाश नारायण ह्यांनी इंदिरा गांधींच्या आणिबाणीविरुद्ध दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची वार्ता केली होती ) अशी मांडणी करून मग झेंडावंदन केले असते तर ते प्रभावी झाले असते अद्यापही वेळ गेलेली नाही असो 

प्रश्न असा आहे कि मग भारत जोडो कशासाठी ? कदाचित भाजपने हिंदू आणि हिंदुतर अशी तोडातोडी केली आहे त्याविरुद्ध हे भारत जोडो असावे ह्यात प्रॉब्लेम असा आहे कि हिंदुतर म्हणजे नेमके कोण हेच अद्याप स्पष्ट नाही कारण हिंदू म्हणजे काय हेच अद्याप स्पष्ट नाही भाजपची ह्याबाबतीतली भूमिका गोलमटोल आहे सावरकरांनी हिंदू म्हणजे भारतात जन्मलेले सर्व धर्म हिंदू ह्या कॅटेगरीत टाकले होते आणि आंबेडकरांनी हिंदू कायदा बनवतांना हिंदू म्हणजे हिंदुस्थानात जन्मलेले सर्व धर्म असेच गृहीत धरलेले दिसते सर्वोच्च न्यायालयाने हीच भूमिका स्वीकारलेली दिसते त्यामुळेच जैन , बौद्ध , लिंगायत व शीख धर्मीय घटनेनुसार हिंदू होतात प्रत्यक्षात मात्र ह्यांना मायनॉरिटी धर्माचा दर्जा हवा असतो व आहे भाजपने ह्यांना हिंदूंच्यापासून वेगळे काढलेले दिसत नाही मात्र ह्यांच्या तत्वज्ञानांविषयी वेगवेगळे अस्वीकार नोंदवलेले आहेत विशेषतः बौद्ध धर्माबाबतचे अस्वीकार अतिशय तीव्र आहेत पण तरीही शेवटी हे सर्व हिंदू आहेत हे भाजपला मान्य आहे ह्याउलट ज्यू , ख्रिश्चन व इस्लाम हे मात्र गैरहिंदू धर्म आहेत अशी भाजपची मांडणी आहे आणि ह्यातील इस्लामचा ते तीव्रतेने विरोध करत आहेत राहुल गांधी ह्या गैरहिंदू धर्मांना हिंदू धर्मांशी जोडणार आहेत का ? हे धर्म पूर्वी एकमेकांशी जोडले गेले आहेत हे ते कसे सिद्ध करणार आहेत ?

भाजप प्रचारयंत्रणेने नेहरू गांधी घराण्याला ज्या एका मुद्द्यावरून कॉर्नर केले आहे तो मुद्दा अनेकदा अनेकांच्या लक्ष्यात येत नाही तो म्हणजे आत्ताच्या गांधी फॅमिलीचा धर्म कोणता ? ह्यावर इमोशनल भाषणे फारशी कामाची नाहीत कारण ह्या मुद्द्याचा भाजप जिंकण्यात मोठा वाटा आहे इंदिरा गांधींनी शीख असलेल्या सुनेला घरातून बाहेर काढले व ख्रिश्चन असलेल्या सुनेला घरात ठेवले तेव्हापासूनच ह्या चर्चेची सुरवात झाली होती पुढे इंदिरा गांधींनी एका मौलवीच्या आदेशावरून मुस्लिम रिवाज पाळून निवडून आल्यानंतर नमाज पढण्याचे कबूल केले व पुढे पढलाही त्यातूनच इंदिरा गांधी गैरहिंदूप्रोन आहेत असा मेसेज त्यांच्या मृत्यूनंतर पसरायला लागला पुढे शाहबानो प्रकरणात राजीव गांधींनी कच खाल्ली आणि अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली ह्यात प्रियांका गांधींनी ख्रिश्चन वाड्राशी लग्न करत्या झाल्या एका सामान्य घराण्याने हे केले असते तर त्याचा गवगवा झाला नसता पण गांधी घराणे हे भारताचे राजघराणे होते सून ख्रिश्चन हे स्वीकारणीय होते पण नातंही ख्रिश्चन फॅमिलीत दिली जाणार असेल तर त्याचा अर्थ तुमची हिंदू धर्मांशी काडीचीही बांधिलकी नाही असा संशय येणारच हा संशय दूर करण्याचा एकच उपाय होता तो म्हणजे राहुल गांधी ह्यांनी आपल्या पित्याचा हिंदू धर्मच स्वीकारला आहे हे सिद्ध करणे राहुल गांधींनी हे सिद्ध करण्याचा प्रयत्नच केलेला नाही ह्याचा पुरेपूर फायदा घेऊन भाजपने ( सुब्रमण्यम/न  स्वामी ) त्यांची इंग्लंडमधली शैक्षणिक कागदपत्रे सादर करून राहुल गांधी हे ख्रिश्चन असल्याचे सिद्ध केले आता ही कागदपत्रे खोटी असल्याची सिद्ध करण्याची जबाबदारी काँग्रेसवर पडते पण असे काही ठोसपणे काँग्रेसकडून झालेले नाही मला स्वतःला ते ख्रिश्चन आहेत कि हिंदू ह्याने फरक पडत नाही पण ह्या देशातल्या किमान ६० टक्के हिंदूंना आता बदललेल्या परिस्थितीमुळे फरक पडतो राहुल गांधींना हे लक्ष्यात का घ्यावेसे वाटत नाही ? कि ते ख्रिश्चन आहेत ? ते ख्रिश्चन असतील तर त्यांनी तसे जाहीर करायला हवे आणि हिंदू असतील तर मग ठोसपणे तसे सांगण्याची गरज आहे ते ख्रिश्चन असतील तर त्यांना पंतप्रधानपद मिळणे आताच्या परिस्थितीत शक्य नाही पण हिंदू असतील तर बऱ्याच शंका कुशंका मिटून त्यांचा मार्ग सुकर होईल 

ह्यापुढचा प्रश्न ते गैरहिंदूंना हिंदूंशी कसे जोडणार आहेत ? सेक्युलर तत्वज्ञान सांगून ? ते समान नागरी कायदा व लोकसंख्या नियंत्रण कायदा आणणार आहेत कि पित्याप्रमाणे शाहबानो प्रकरणासारखी घुमवाघुमव करणार आहेत ? प्रश्नांना काँग्रेसी बगल देण्याचे दिवस संपले आहेत . उत्तरे द्या मते मिळवा 

आर्थिक प्रश्न केंद्रस्थानी आणून ह्या देशातल्या धार्मिक व वर्णजातीय प्रश्नांना बगल देणे ही काँग्रेसची राजनीती आता पुन्हा ह्या यात्रेच्या निमित्ताने सुरु झालीये असं समजायचं का ? जुनी दारू नवी बॉटल ?

ह्या देशातील हिंदूंच्यात हजार वर्षात आपण मुस्लिम व ख्रिश्चन धर्मियांच्याकडून मूर्खांसारखे पराजित झालो ही भावना प्रचंड खदखदते आहे मात्र त्याची खरी कारणे शोधण्याऐवजी खोटा इतिहास रचणे व खोटी कारणे शोधणे असा भलताच पलायनवादी मार्ग सध्या काही हिंदुत्ववाद्यांनी अवलंबला आहे ह्याने काय साधणार ? खोटा इतिहास रचणारे नवा इतिहास रचू शकत नाहीत ते फक्त दंतकथा व मिथ्स ह्यांच्या नशेत झिंगत राहतात 

राहुल गांधी भाजपशी लढताना नव्या दंतकथा रचणार आहेत कि भाजपला कठोर वास्तवाचे आरसे दाखवत ही यात्रा पार पाडणार आहेत ? ते गैरहिंदूंशी सलगी दाखवत मुख्य हिंदू प्रवाहाच्या विरुद्ध जाणार आहेत कि सलगी दाखवत पण गैरहिंदू हिंदूंशी नव्याने सलग करून दाखवणार आहेत ?

मोदींच्या प्रतिमाखेळाला चॅलेंज करू शकतील असे सध्या फक्त अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी असे दोनच आहेत राहुल गांधी आपशी युती करायला तयार आहेत का ? युती झाली तर पंतप्रधान कोण होणार ? येत्या  निवडणुकीआधी राहुल गांधींना ह्याची स्पष्ट उत्तरे द्यावी लागतील 

नाहीतर टाळाटाळीत काँग्रेस प्रवीण आहेच आय होप कि ही प्रवीणता राहुल गांधींनी अद्याप मास्टर केलेली नाही 

आणि जर मोदी ,केजरीवाल व राहुल गांधी ह्यांच्यात तिरंगी सामना होणार असेल तर मोदींना हरवणे कठीण आहे 

राहुल गांधींनी भारत जोडो नंतर सब विरोधी पक्ष जोडो अशी मोहीम हाती घेणे अत्यंत आवश्यक आहे द्विध्रुवीय लढतच मोदींना हरवू शकते भारत जोडोने ह्या दुसऱ्या ध्रुवाचे ध्रुवीकरण सुरु केले तरी खूप झाले अन्यथा फाटाफूटवादात मोदी शहां सगळ्यांचे बाप आहेत हे सिद्ध झालेले आहेच 

श्रीधर तिळवे नाईक 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती भाग १ ते २२