पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
 फ्रांस , मुस्लिम आणि सेक्युलॅरिझम श्रीधर तिळवे नाईक  कार्टून हे मध्ययुगीन हॅपनिंग असले तरी त्याला मुख्य भरभराट लाभली ती औद्योगिक आधुनिक काळात जेव्हा पारंपरिक छपाईकडून आधुनिक छपाईकडे माणसाची वाटचाल झाली १८५० नंतर कार्टून्स वाढत गेली व प्रत्येक मासिक व वर्तमानपत्राची शान झाली नेमका ह्याचवेळी सेक्युलॅरिझम आला आणि अधूनमधून कार्टुनिस्टांनी कोपरखळ्या मारायला सुरुवात केली ह्या काळात निर्देववाद अथेइझम   एक आयडियालॉजी  म्हणून समाजवादामुळे मार्क्सवादामुळे सेटल झाला साहजिकच नास्तिक कार्टुनिस्टांनी धर्माची टीका व टवाळी करण्यासाठी कार्टून वापरायला सुरवात केली  १८५० ते १९२० ह्या काळात  १ बहुदेववाद  २ एकदेववाद  ३ निर्देववाद  ह्यांच्यात एक तुंबळ वैचारिक वाद सुरु झाला कारण धर्मप्रसारासाठी ख्रिश्चन पाद्रयांनी बहुदेववादावर घणाघाती टीका करायला सुरवात केली एकमेकाला समजून घेण्याऐवजी एकमेकांशी भांडणे धर्मप्रसारासाठी आवश्यक असल्याने ख्रिश्चन व मुस्लिम ह्या ज्युडायिक धर्मानी भारतीय बहुदेववाद काय आहे किंवा मोक्ष ही संकल्पना काय आहे किंवा धर्म आणि  धम्म ह्यांच्यात काय फरक आहे  हे समजून घेण्याऐवजी स्वतःच्या डोक्

आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १६१ ते १७०: श्रीधर तिळवे नाईक

  आद्यहिंदूहृदयसम्राट   लोकमान्य   टिळक  :  फिक्शन   व   वस्तुस्थिती  १६१ ते १७०गीतारहस्य : गीतेतील कर्म ह्या शब्दाची व्याप्ती श्रीधर तिळवे नाईक  यज्ञकर्म , ब्रम्हकर्म व भक्तीकर्म ह्यांचा विचार आपण केला तसाच कर्म म्हणजे ब्राह्मणधर्मानुसार १ नित्य २ नैमित्यिक ३ काम्य व ४ निषिद्ध अशी कर्मे होतात हेही  आपण पाहिले ब्राह्मणधर्मानुसार दुसरे प्रकारची कर्म हे वर्ण्य कर्म होय ब्राम्हण क्षत्रिय वैश्य व शूद्र ह्यांना  मनुस्मृतीनुसार जी वाटून दिलेली कर्मे आहेत त्यांना वर्ण्य कर्मे म्हणतात ह्या सर्व कर्मांचे तीन उपप्रकार होतात  १   सात्विक कर्म हे कर्म मनातल्या मनात घडते म्हणजे विचार करणे फील करणे मनन करणे चिंतन करणे  २ वाचिक कर्म इथे कर्म वाचेद्वारा व्यक्त होते बोलणे हुंकाराने  ३ आंगिक कर्म इथे हात पाय इत्यादी अवयवांच्याद्वारा कर्म होते उदा खाणे पिणे चालणे उठणे बसणे हसणे वैग्रे  ह्या तिन्ही प्रकारच्या कर्मांना गीता लागू आहे  गीतेत कर्म हा शब्द अशा सर्व कर्मांना उद्देशून वापरला गेला आहे ह्याशिवाय ही सृष्टी ज्या अवाढव्य व्यापाराच्या आधारे चालते त्या व्यापारालाही कर्म हा शब्द लागू होतो  टिळक यज्ञकर्म