पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजा राम मोहन रॉय आदिम शैव ते आदिम हिंदू : हिंदुवादाची पहिली सांस्कृतिक उडी श्रीधर तिळवे नाईक

 राजा राम मोहन रॉय आदिम शैव ते आदिम हिंदू  : हिंदुवादाची पहिली सांस्कृतिक उडी श्रीधर तिळवे नाईक  आज सर्व आर्य राजा राममोहन रॉय ह्यांना भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणत असले तरी प्रत्यक्षात राजा राम मोहन रॉय (१७७२ ते १८३३)ह्यांचे भारतीय संस्कृतीतील केऑटिक स्थान हे अजूनही विश्लेषणाच्या कक्षांत आलेलं नाही  हिंदुइझम (म्हणजेच हिंदुवाद ) हा शब्द त्यांनी वापरला हेसुद्धा अनेकांना माहित नाही दुसऱ्या अकबराने त्यांना राजा हे टायटल दिले असल्याने हिंदुत्ववादी हल्ली ते वापरत नाहीत व विकिपिडीयावर त्यांचा उल्लेख राममोहन रॉय असा होतो सती व बालविवाह ह्यांना त्यांनी विरोध केला असे आपण आपल्या पाठ्यपुस्तकातून वाचत असतोच मात्र राममोहन रॉय ह्यांनी जातिव्यवस्थेला सुरवातीला कडक विरोध केला होता हे मात्र आपणाला सांगितलं जात नाही प्रत्यक्षात सांगितलं जातं त्यापेक्षा रॉय ह्यांचे व्यक्तिमत्व प्रत्यक्षात फार गुंतागुंतीचे होते रॉय ह्यांच्यानंतर अनेकांनी हिंदुइजम हा शब्द वापरला आणि त्याबद्दल सुरवातीच्या काळापासून कोलाहल होता उदाहरण म्हणून रा ना दांडेकर घेऊ  रा ना दांडेकर ह्यांनी हिंदुवादाबद्दल जे म्हंटल होतं ते आजही विचार

आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १७१ ते १८० श्रीधर तिळवे नाईक

आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती  १७१ ते १८० श्रीधर तिळवे नाईक  आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती  १७१ कर्मयोग खुदिराम बोस ह्यांचा व कर्मयोग नथुराम गोडसे ह्यांचा श्रीधर तिळवे नाईक  गीतेत कर्मयोग हा फळापेक्षावरून ठरतो हे पाहिल्यानंतर प्रत्यक्षात त्याच्या ऍप्लिकेशनमधले प्रॉब्लेम काय आहेत हे पाहायला हरकत नाही . ह्या संदर्भात भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक चाफेकर बंधू ,खुदिराम बोस मदनलाल धिंग्रा आणि गांधीहत्या करणारा नथुराम गोडसे ह्यांचे उदाहरण पाहण्यासारखे आहे एका हातात गीता आणि दुसऱ्या हातात फाशीचा दोर घेऊन फाशी जाणाऱ्यात पहिले नाव चाफेकर व नंतर खुदिराम बोस ह्यांचे आहे आणि गीतारहस्य लिहिण्याची एक प्रेरणा खुदिराम बोसही असावा कारण खुदिरामच्या हातात फाशीपूर्वी गीता होती ही बातमी त्यावेळी पसरली होती खुदिरामाला कर्मयोगाने प्रेरणा दिली होती  खुद्द लाला लजपत राय ह्यांनीही १९०७ साली त्यांना शिक्षा झाली तेव्हा गीतेवर लिखाण केले होते जे बहुदा टिळकांच्या आधीचे लिखाण आहे  भक्तियोग व ज्ञानयोग बाजूला सारून गीतेतील कर्मयोग स्वीकारून फाशी जाणारे पह
 मंडलीकरण , ओबीसीकरण आणि शैविकरण भाग १ श्रीधर तिळवे नाईक  नव्वोदत्तर पिढीत अनेक पातळ्यांवर क्रांतिकारी बदल झाले आणि त्या बदलांना सामोरे जाण्याची जबाबदारी आमच्या पिढीवर आली  त्यातील एक बदल म्हणजे मंडल आयोगाने ओबीसींना दिलेले आरक्षण ! इंदिरा गांधींच्यापर्यंत जो प्रश्न काँग्रेसी राजवटीने चालढकल करत टाळला होता तो प्रश्न इंदिरा गांधी पायउतार झाल्यावर धसास लागायला सुरवात झाली . जनता पक्ष सरकारने आर्टिकल ३१४ नुसार दिलेल्या कायदेशीर तरतुदीनुसार १ जानेवारी १९७९ ला बिंदेश्वरी प्रसाद मंडल ह्यांच्या अध्यक्षतेखाली सेकण्ड बॅकवर्ड क्लास मिशन हा आयोग नेमला तत्पूर्वी काका कालेलकरांनी ऑब्जेक्टिव्ह कॅटेगरीज नाही म्हणत टाईमपास केला होता मंडल ह्यांनी असा टाईमपास न करता ११ कॅटेगरीज निश्चित करून काम केले व डिसेम्बर १९८० ला आपला रिपोर्ट सबमिट केला कमिशनने १९३१ चा जनगणना रिपोर्ट वापरून जवळ जवळ ५२ टक्के लोक ओबीसी कॅटेगरीत मोडतात असे दाखवून दिले व त्यांच्यासाठी २७ टक्के जागा राखीव ठेवाव्यात अशी शिफारस केली त्यामुळे आरक्षित जागांचे प्रमाण ४९ ते ५० टक्क्यापर्यंत जाणार होते ८० टक्के जनतेला ५० टक्के जागा असे हे समीक