पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ८३ ते ९५ श्रीधर तिळवे नाईक

आद्यहिंदूहृदयसम्राट   लोकमान्य   टिळक  :  फिक्शन   व   वस्तुस्थिती  ८३ ते ९३ श्रीधर तिळवे नाईक ५ आद्यहिंदूहृदयसम्राट   लोकमान्य   टिळक  :  फिक्शन   व   वस्तुस्थिती  ८३ टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप ११ श्रीधर तिळवे नाईक  पुढे जातांना आता पुन्हा एकदा थोडी उजळणी करूया  १ आपण पाहिले कि भारतीय संस्कृती ही  अ आर्य संस्कृती  ब शैव संस्कृती  अशा दोन संस्कृतीपासून बनली आहे आणि ह्या दोन संस्कृतीतील संघर्ष हा भारतीय संस्कृतीतील मुख्य संघर्ष आहे ह्यातील आर्य संस्कृतीत देवसूर आणि असुर अशा दोन उपसंस्कृती आहेत तर शैव संस्कृतीत १ नाग २ द्रविड अशा दोन उपसंस्कृती आहेत  २ आर्य संस्कृतीतील देवसुर संस्कृतीने  १ वैदिक  २ ब्राम्हणी  ३ वैष्णव  ४ हिंदू  असे चार धर्म जन्माला घातले तर असुर संस्कृतीने  १ पारशी उर्फ झरथूष्टी  २ सांख्य  ३ जैन  व  ४ बौद्ध  असे चार धर्म जन्माला घातले आहेत भारतीय राष्ट्रवादावर आर्य संस्कृतीचा जबरदस्त प्रभाव पडलेला  असून हा राष्ट्रवाद हा आर्य राष्ट्रवाद आहे  शैव संस्कृतीने  १ आदीशैव  २ विश्वशैव ह्यात पाशुपतपासून  काश्मिरी शैवागमपर्यंत सर्व दर्शने व तंत्र ,