पोस्ट्स

सप्टेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ४२ ते ५० लेखक : श्रीधर तिळवे -नाईक

रँडचा खून ,  मीडियायुद्ध आणि पहिला बळी : लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती ४२ श्रीधर तिळवे नाईक दिल्लीकरांची चाटणाऱ्या मराठी माणसांना अधिकाधिक प्रोत्साहन देणे व न चाटणाऱ्या   व राष्ट्रीय नेता बनू पाहणाऱ्या   मराठी माणसाची राजकीय शिकार करणे हा   इंग्रजी वर्तमानपत्रांचा   उद्योग टिळकांच्यापासून सुरु होतो   शरद पवार हे अलीकडचे बळी सद्या कोणी राष्ट्रीय पातळीवर मुख्य नेता नसल्याने नितीन गडकरींच्याबाबत आपले कर्तव्य पार पाडून हा मीडियाउद्योग   थांबला आहे लोकमान्य टिळकांच्या मराठाची लोकप्रियता वाढत गेली तशी एक अस्वस्थतेची कळ टाइम्स व इतर वर्तमानपत्रात पसरत गेली आंग्लशिक्षित वाचक हा ह्या दैनिकांचा टीआरपी होता आणि टिळकांच्या मराठा वर्तमानपत्राने त्याला आव्हान देण्यास सुरवात केली टिळकांना थेट शांत बसवणे शक्य न्हवते एकीकडे टिळकांचा हिंदुत्ववाद हा ह्या हिंदुविरोधी वर्तमानपत्रांना पसंद न्हवता तर दुसरीकडे मराठा व केसरीची लोकप्रियताही त्यांना सहन होत न्हवती