पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
धर्मनिरपेक्षता ,  धर्ममुक्ती , नास्तिकता आणि कम्म्युनिझम १०   श्रीधर तिळवे नाईक धर्मनिरपेक्षतेत राज्यशासन धर्मनिरपेक्ष आणि नागरिक धर्मसापेक्ष अशी विषमता अपरिहार्यपणे निर्माण होते कारण धर्माबाबत काही कृती करण्याचा हक्क धार्मिक पातळीवर शासन गमावून बसते ह्या विरोधाभासाचे मूळ युरोपच्या इतिहासात आहे शासनाची पारलौकिकतेपासून काल्पनिक सुटका होते पण शासकीय अधिकारी स्वर्गनरकावर विश्वास ठेवतात ह्यामागे कळत नकळत माणूस मशीन समजण्याची प्रबोधनाची युक्ती असते फ्रान्सिस बेकनने धार्मिक ज्ञान व वैज्ञानिक ज्ञान ह्या दोन भिन्न कॅटेगरीज केल्या कारण त्याकाळात विज्ञान कुठवर मजल मारेल ह्याचा अंदाज कुणालाच आलेला न्हवता बेकन एक स्वतःच व्हिलन टाईप मनुष्य होता ज्याने आपल्या गरिबीत आपला मेंटॉर असलेल्या उमरावाचा काटा काढला होता तर आयुष्यभर भ्रष्टाचार करून वयाच्या साठाव्या वर्षी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून जेव्हा अटक झाली तेव्हा  सर्वच भ्रष्टाचार करतात मी  केला तर काय बिघडले असे उद्गार काढले होते त्याच्या ह्या चारित्र्यहीनतेमुळेच आधुनिक तत्वज्ञानाचा जनक हा मान त्याला देण्याऐवजी देकार्त ला दिला जात असे कारण तत्त्

कुरुन्दकर आणि धर्मनिरपेक्षता श्रीधर तिळवे नाईक

कुरुन्दकर आणि धर्मनिरपेक्षता  श्रीधर तिळवे नाईक कुरुन्दकर आणि धर्मनिरपेक्षता  १ श्रीधर तिळवे नाईक कुरुंदकरांचे मनुस्मृतीविषयीचे विचार तपासल्यानंतर  आपण तपासासाठी कुरुंदकरांच्या धर्मनिरपेक्षतेकडे सहज वळू शकतो कुरुंदकरांच्या जागर वाटा तुझ्या माझ्या भजन आकलन शिवरात्र निवडक पत्रे व अन्वय ह्या पुस्तकांत धर्मनिरपेक्षतेची मीमांसा येते कुरुंदकर गांधी नेहरूंची बाजू सतत मांडताना दिसतात कारण धर्मनिरपेक्षतेविषयीची मते ह्या काँग्रेसच्या नेत्याभवती त्यांच्या काळात फिरत होती कुरुंदकरांच्या माध्यमातून मला काय वाटते तेही मी सांगणार आहे शेषराव मोरेंसारखे लेखक विचारवंतही आपल्या धर्मनिरपेक्षतेविषयीच्या विचाराची प्रेरणा म्हणून कुरुंदकरांचे नाव घेत असल्याने हे विचार अधिकच वादळी बनलेले असतात खरेतर धर्मनिरपेक्षतेचा पहिला पराभव भारत स्वतंत्र झाला तेव्हाच फाळणीच्या रूपाने झाला भारतीय संविधान हा दुसरा पराभव कारण त्यात समान नागरी कायदा न्हवता तिसरा पराभव हा शाहबानो प्रकरणात झाला आणि चौथा बाबरी मस्जिद पाडली गेली तेव्हा झाला मग आता धर्मनिरपेक्षतेचा विचार करायचा म्हणजे करायचं तरी काय ? अल्पसंख्याक अ