पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
 भालचंद्र नेमाडे आणि गौर बंजारा : शैवांचे चलवाणी श्रीधर तिळवे नाईक  अलीकडे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात पिंपरी चिंचवडमधील भोसरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला गेला आहे.  नेमाडे यांनी त्यांच्या ‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ या पुस्तकामध्ये बंजारा समाजाबाबात आक्षेपार्ह लिखाण केल्याचा हा आरोप आहे. अॅड. रमेश राठोड यांनी ही तक्रार दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  . नेमाडे ह्यांच्यावर झालेल्या केसने सध्या गौर बंजारा समाज हा एकदम प्रकाशात आला आहे नेमाडे ह्यांची कुलदेवता शैव असली तरी सध्या अनेक शैव खत्तीयांच्याप्रमाणे त्यांनाही वैष्णव क्षत्रीयपण चढल्याने त्यांनाही त्याचा विसर पडलेला आहे साहजिकच हिंदूंमधील बंजारा सन्दर्भातील मजकूर हा थोडा गाफीलपणे आला आहे  लोकशाहीत ह्या समाजाला अचानक खूपच महत्व प्राप्त झालेले आहे कारण ह्या समाजाची लोकसंख्या ! त्यांची संख्या साधारण पाच करोड असावी असा अंदाज आहे .  मला स्वतःला ह्या समाजाविषयी पर्सनल जिव्हाळा आहे कारण माझ्या आईचे शिक्षण पूर्ण होण्यात त्यांचा महत्वाचा वा