पोस्ट्स

मे, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
अक्षयकुमार, मोदी आणि विश्व हिंदू फिलिंग - श्रीधर तिळवे नाईक मोदींची अक्षयकुमारने मुलाखत घेतली तिचे कौतुक आणि चेष्टा दोन्ही झाली अक्षयकुमार कॅनेडियन नागरिक झाल्यापासून त्यावरून त्याची चेष्टा खूप होतीये आणि ते स्वाभाविक आहे कारण करणी आणि कथनी ह्यांचा मेळ इथे बसत नाहीये बॉलीवूडला हे नवीन नाही बॉलिवूडमधले अनेक देशभक्त आपल्या मुलांना अंतिमतः अमेरिका यूरोप आणि साऊथ आफ्रिकेत  सेटल व्हायला पाठवून द्यायचे आता स्वतःच सेटल होतायत जगभर पसरत चाललेल्या ह्या डायस्पोरिक आणि डेस्परेट विश्व हिंदू लोकांना अलीकडे एक इन्सिक्युरिटी निर्माण झालीये ती म्हणजे आपण ज्या देशात सेटल झालोय त्या देशांनी आपणाला हाकलून लावलं तर काय ? ईदी अमिनच्या राजवटीने हे करायला सुरवात केली तेव्हापासून हा प्रश्न निर्माण झाला हिंदू हाकलले जाऊ शकतात हे कळल्याने साहजिकच यदाकदाचित हिंदू म्हणून आपण हाकलले गेलो  तर  परतावे असे स्थान कोणते असा प्रश्न निर्माण झाला आणि ह्या प्रश्नाचे उत्तर हिंदुस्थान यानेके भारत असे मिळाले ह्यातूनच हिंदू धर्मियांचे हक्काचे राष्ट्र हवे ही पूर्वीपासून असलेली संकल्पना नव्याने बोकाळायला सुरवात झाली जग
विचाराने प्रश्न सुटत नाही प्रश्न सुटतो करुणेमुळे किमान ममतेमुळे किंवा किमान प्रेमामुळे आणि अतिकिमान आस्था व शांतीमुळे विचार फारातफार संयम निर्माण करतो किंवा भय किंवा दहशत किंवा नियंत्रण आपण सध्या सगळेच संयम , भय , दहशत किंवा नियंत्रण ह्यांची विचारांच्या साहाय्याने फॅक्टरी खोलून बसलो आहोत