पोस्ट्स

जानेवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गांधी shridhar tilve

गांधी सर्वात प्रथम मुमुक्षु होते मोक्ष हा केवळ त्यांचा ध्यास न्हवता तर श्वास होता गांधी वैष्णव होते आणि सर्वच वैष्णवांच्याप्रमाणे गीता हा त्यांचा मुख्य धर्मग्रंथ होता ह्या धर्मग्रंथानुसार  गांधी वैश्य होते वर्णव्यवस्थेच्या मध्यभागी होते आणि त्यांना वर्णव्यवस्था व आश्रमव्यवस्था मान्य होती गीतेनुसार राजयोग , ज्ञानयोग , भक्तियोग आणि कर्मयोग हे मोक्षाचे चार मार्ग आहेत गांधींनी त्यांच्या कलानुसार कर्मयोग निवडला कर्मयोग्याला सत्य , अहिंसा , अपरिग्रह , अचौर्य आणि ब्रम्हचर्य ह्या पाच यमाचे व स्वच्छता वैग्रे नियमांचे पालन करणे अत्यावश्यक गांधींनी हे करून दाखवलं ज्ञानयोगी आणि कर्मयोगी ह्यांना आश्रम काढणे आवश्यक गांधींनी आश्रम काढला गांधींनी हे सर्व केलं म्हणून ते मोठे नाही झाले तर ह्यापुढे जाऊन त्यांनी जे केलं ते महत्वाचे गांधींचा मोठेपणा त्यांच्या मुमुक्षु असण्यात नाही तर त्या मुमुक्षुपणाला भारतीय स्वातंत्र्याशी जोडण्यात आहे मुमुक्षु होण्याची पहिली अट स्वातंत्र्य आहे ते नसेल तर तुम्ही मोक्षाची साधना करूच शकत नाही जर एखाद्या राजाने तुम्हाला ठारच मारायचे ठरवले तर तुम्ही साधना करणार कशी ? म्