पोस्ट्स

एप्रिल, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
प्रिय आशुतोष आपण दोघेही वाकणकरांच्यावर प्रेम करतो हे तर उघडच आहे तू अक्षरचित्रकार आहेस त्यामुळे तुझे लिपीवरचे प्रेम मी समजू शकतो पण इतिहास ही वेगळी गोष्ट आहे ती पुरावा मागते आणि निसर्गयुगाबाबत सर्वात मोठा प्रॉब्लेम विशेषतः भारतात पुराव्याचाच आहे ह्या काळापुरते तरी आपण अगतिकच ज्यादा आहोत आणि म्हणूनच कल्पनाविलासाला सर्वाधिक वाव ह्याच युगात मिळतो वाकणकर हे पक्के वैदिक होते आणि दाक्षिणात्य स्कूल मध्ये ह्या वैदिक कुळात ब्राम्हणी जाणिवेचा धुमाकूळ जोरदार आहे(खरेतर तो प्रत्येक स्कूलमध्ये  आहे ) माझे स्वतःचे धोरण असे कि एखादा इतिहासकार ब्राम्हणी जाणिवेचा असेल तर त्याची ब्राम्हणी जाणीव बाजूला काढून तो जे म्हणतोय त्यातला सत्यांश तपासणे हीच गोष्ट मी ब्राह्मणेतर इतिहासकाराबाबत करतो (ह्याचा वर्णाशी संबंध नाही म्हणजे राजारामशास्त्री भागवतांना मी ब्राह्मणेतर जाणिवेचा मानतो तर नरेंद्र मोदी ब्राम्हणेतर असले तरी पक्के ब्राम्हणी जाणिवेचे आहेत असे माझे मत आहे ) आता तुझे एकेक विधान तपासत जाऊ आशुतोष आपटे : १.ऋग्वेद काळात लिखित भाषा -लिपी नव्हती असे म्हणता येणार नाही. ( वाकणकर तर स्पष्टपणे म्हणत की लिपी
भारतीय इतिहासाची चार स्कूले , वेदनिर्माण आणि आउट ऑफ साऊथ इंडिया थेरी श्रीधर तिळवे नाईक वेद कुठे निर्माण झाले आणि सिंधू संस्कृती कुणाची हे प्राचीन भारतातील असे काही प्रश्न आहेत कि ज्यांच्यावर तत्कालीन राजकारणाची छाया पडलेली असते किंबहुना वैदिकांच्या राजकारणानुसार वैदिकांचे मूळ स्थान बदलत असते म्हणजे इंग्रज बाहेरून बर्फातून आले तेव्हा वैदिकही थेट अर्टिक्ट  बर्फातून किंवा कोकशेस मधून येतात इंग्लिश गेल्यानंतर ब्राम्हणांना आपली मुळे इंडियन दाखवणे गरजेचे झाले आणि आपोआप आर्य कसे भारतातलेच हे सांगण्यात आले आणि आता ब्राम्हण अमेरिकेत सेटल झाले कि ब्राम्हण कसे अमेरिकन होते हे सांगण्याचा खटाटोप सुरु होईल  असे मी उपहासाने जेव्हा अभिधानानंतरला दहा वर्षे पूर्ण झाली तेव्हा दिलेल्या व्याख्यानात म्हणालो तेव्हा अनेकांच्या कपाळी आठ्या पडल्या होत्या बलवान राज्यकर्त्यांशी आपली नाळ जोडायची किंवा आपण बलवान झालो कि सगळे कसे आपल्याच नाळेतून जन्मलो ते सांगत सुटायचे असं हे राजकारण असते त्याला एन्काऊंटर करायचे म्हणून ब्राम्हणेतरांनी ब्राम्हणांना जास्तीत जास्त विदेशी ठरवून तुम्ही ह्या देशातले नाही आहात ह्याची
वेद गुजरात महाराष्ट्रात कसे निर्माण झाले श्रीधर तिळवे नाईक शैव सिंधू समाज नेमका कसा होता हा एक यक्षप्रश्न बनून आहे मुळात ही संस्कृती अफगाणिस्तान ते गुजरात ह्या एरियात मर्यादित होती असा एक गोंडस गैरसमज अनेकांचा झालाय प्रत्यक्षात झालं असं कि जेव्हा काही कारणांनी ह्या प्रदेशातील लोकांनी स्थलांतर केले तेव्हा हा मागे उरलेला भाग ओसाड झाला आणि हळूहळू गाडला गेला ज्याचे आपण उत्खनन करतो जो सेफ राहिला तो संगम संस्कृती , द्रविड संस्कृती व नाग संस्कृती म्हणून डेव्हलप होत राहिला आणि आपलं शैवपंणही मिरवत राहिला ह्या गाडल्या गेलेल्या भागालाच सिंधू सभ्यता म्हणणे व ती नाहीशी झाली असं म्हणणं हा आर्कियॉलॉजिकल आचरटपणा आहे आणि त्याला अकादमीक सपोर्ट आहे असो प्रश्न असा आहे कि गुरव आणि ब्राह्मण हे जसे  दोघेही शैव संस्कृतीचे भाग होते व ब्राह्मणत्व हे सुरासुरांना सामावून घेण्यासाठीच निर्माण करण्यात आलं होतं आणि त्यातून पुढे फुटून जाऊन काही मूळ अशैव असलेल्या  देशीवादी ब्राम्हणांनी जर वैदिक धर्म निर्माण केला तर त्यावेळी असुर काय करत होते ? त्यांनी अथर्ववेद कसा निर्माण केला आणि सुरांनी आपले तीन वेद कुठे निर्मा
भारतीय असुरांचा प्रश्न आणि देशीवादी वैदिक तत्वे श्रीधर तिळवे नाईक बळिवंशाची चर्चा कायमच कृषी समाजाला असुरांचा विचार करायला भाग पाडते महात्मा फुले असुरांच्या प्रश्नात का घुसले नाहीत हा एक प्रश्न आहे ज्या वैदिक समाजाची चर्चा आपण वारंवार करतो तो मुळात असुरांचा समाज होता हेही अनेकांना माहित नाही खुद्द ऋग्वेदच देवाव असुरा म्हणजे देव असुर होते असं म्हणतो इतकेच न्हवे तर ज्यांना आज आपण वैदिक देवता म्हणतो त्या सुरवातीला सर्व असुरच होत्या असे वेदच म्हणतात अगदी देवाचा राजा इंद्रही असुर होता अशी ग्वाही ऋग्वेद होतो म्हणजे सुरासुर हा भेद देव दानव भेद नंतर निर्माण झाला हे तर उघड आहे ते बाहेरून आले कि इथलेच ह्यावरून वाद होऊ शकतो पण ते शैवांच्यापासून सुरवातीला स्वतंत्र होते हे नक्की ते सुरवातीला पशुपालक होते हे नक्की प्राचीन जगात ज्यांना cradle ऑफ सिव्हिलायझेशन म्हंटले जाते त्यांच्या आसपास अनेकदा असे पशुपालक समाज आढळतात आणि ते ह्या सभ्यतांच्यावर हल्लेही करतात आणि मग सामावले जातात असे दिसते पुढे पितृसत्ताक धार्मिक समाजाचा उदय झाल्यावर ज्या पितृसत्ताक राजवटी येतात त्या मग मातृसत्ताक सभ्यतांच्यावर हल्
ज्योतिबा फुले ओबीसींचा आद्य इतिहासकार आणि देशी इतिहासाचा  प्रवर्तक  श्रीधर तिळवे नाईक प्रश्न असा आहे कि ज्योतिबा बळिवशाने इतके झपाटले का गेलेत तर ह्यामागे त्यांची शेतकरी व माळ्यांविषयीची कळकळ आहे बळी राजा हा जो शेतसारा घेई तो अतिशय योग्य असे हा वंश होता तोवर शेतकरीमाळी सुखात होते ही त्यांची श्रद्धा होती हा वंश शेतकऱ्यांसाठी लढला हा त्यांचा फील होता साहजिकच ह्या वंशाला देवांनी भटांनी नष्ट केले म्हणून ते भटाविषयी इतका तळतळाट करतात इंग्रजांचे राज्य जाऊन पुन्हा भटांचेंच राज्य येईल अशी त्यांना भीती आहे भटांच्या चळवळीकडे ते त्यामुळेच संशयाने पाहतात इंग्रजांचे राज्य हा त्यांच्या दृष्टीने अधिक सेफ गेम आहे तत्कालीन इंग्रज हे वैश्य व्यापारी होते ह्या गोष्टीकडे ते लक्ष्य देत नाहीत कारण  राज्य करतो तो इंग्रज ते क्षत्रिय म्हणून पाहतात त्यामुळेच इंग्रजांनी चालवलेले शोषण त्यांना दिसत नाही त्यांना ओबीसीतीलही शेतकरी (कुणबी )माळी जमाती आधी दिसतात महारमांगांच्याकडे ते महा अरी म्हणजे भटांचे आर्यांचे महान शत्रू म्हणून पाहतात बळीचे सैनिक म्हणून पाहतात साहजिकच ब्राम्हणांचे कसब कुणबी माळी महार मांग ह्य
ज्योतिबा फुले ओबीसींचा आद्य इतिहासकार आणि शैवीझम १ श्रीधर तिळवे नाईक मी ह्यापूर्वीच सावित्रीबाई फुले ह्या कशा शैव कवयित्री होत्या ते सिद्ध केले आहेच (फेसबुकवर हा लेख आला होता )आता महात्मा फुलेंचे इतिहासकार म्हणून काय योगदान आहे ते पहावयाचे आहे शैवांच्यावर पितृपूजेचा प्रचंड प्रभाव आहे  त्याचा प्रथम आपण विचार करू शैवांची पितृपूजा , गुरुपूजा आणि वळी शैवांच्यात ज्या काही महत्वाच्या कर्मकांडीक गोष्टी आहेत त्यातील एक म्हणजे पितृपूजा पितरांची पूजा ! जगातल्या अनेक आदिवासी जमातीत ती आहे रामनवमी हा सणच मुळात ह्या पितृ पुजेशी संबंधित आहे रामचा अर्थच मूळ !रामपुरुष म्हणजे मूळपुरुष! नवीन वर्षाच्या स्वागतानंतर पितरांची आठवण हेही नैसर्गिक एका अर्थाने वर्तमानाच्या आरंभानंतर भूतकाळाविषयीची कृतज्ञता ! ह्या मूळपुरुषापासून स्वतःच्या वंशावळीची सुरवात करून ती जतन करणे आणि पित्याच्या श्राद्धाला त्या सर्वांची आठवण काढणे हे एक रुटीन पण ह्या रुटीनमधूनच आपणाला अनेक वंशावळ्या आणि राजवळ्या मिळतात अन्यथा अनेक राजघराण्यांचे इतिहास हाती लागले नसते पूर्वी अस्थिविसर्जनाला गेलो कि गुरव वा ब्राह्मण आपली अख्खी वंशाव
इतिहासाचे ब्राम्हनायझेशन , बौद्धायझेशन  आणि संस्कृतायझेशन १ श्रीधर तिळवे नाईक इतिहासाचे ब्राम्हनायझेशन , बौद्धायझेशन आणि संस्कृतायझेशन हा भारतीय भूतकाळाच्या आकलनातील फार मोठा अडथळा आहे त्यामुळे सुरवातीला फक्त संस्कृतमध्ये जी साधने आहेत तीच प्रमाण मानणे जगभर बौद्ध धर्म पसरलाय म्हणून भारतातही बौद्ध धर्म पसरला होता असे गृहीत धरून जैन आणि शैवांचे अस्तित्वच नाकारणे जे जे मुस्लिम , ख्रिश्चन , बौद्ध ह्या  जागतिक धर्मांना धरून नाही ते ते हिंदू बँनरखाली बॅनराईझ करणे असे अनेक उद्योग आपल्या इतिहासकारांनी केलेले दिसतात त्यातूनच तुर्किश मुघल आणि अफगाणी रिसोर्सेसकडे दुर्लक्ष्य करून भारतीय इस्लामचे अस्तित्वच नाकारणे जैन आणि शैवांचे ग्रंथ दुर्लक्षित करून जास्तीत जास्त श्रेय गौतम बुद्धाला आणि बौद्धांना देणे हेही त्यातूनच उद्भवले त्याला एन्काउंटर म्हणून सेक्युलर इतिहासकारांनी इस्लामचा इतिहास ग्लोरिफाय केला पण त्यांनीही इमानइतबारे शैवांना साईडलाईनच केले ब्राह्मण क्षत्रियांना हिंदू आयडेंटिटी सामर्थ्य पुरवत राहिली तर दलितांना बौद्ध पण लोच्या झाला तो वैश्य आणि शूद्रांचा हे क्षत्रियांनी स्पॉन्सर केलेल्
एक काळ असा होता कि कुणाला पंतप्रधान करायचं असा पेच होता आता पेंच असा आहे कि कुणाला पंतप्रधान करायचं नाहीये 
बलात्कार आणि संयमाचे महत्व श्रीधर तिळवे नाईक बलात्कारामागे दोनच मूलभूत कारणे असतात १ शरीर सहवासाची भूक तृष्णा आणि निकड २ सत्तेचा अनियंत्रित उन्माद आणि त्याद्वारे स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याचा विकृत मार्ग ह्या दोन्हींना आटोक्यात आणण्याचे मार्ग बलात्कार थांबवू शकतात ह्यातील एक मार्ग विधायक असतो तर दुसरा विधायक मार्ग माणसाच्या आतल्या उन्मादक पशूला नियंत्रित करण्यात अपयशी ठरतो म्हणून व्यवहारी म्हणून नाईलाजाने अंमलात आणावा लागतो विधायक मार्ग म्हणजे भूक तृष्णा आणि निकड ह्यांचा अंत !हा अध्यात्मिक मोक्षिक मार्ग असतो हा हल्ली जवळ जवळ अशक्य झालाय मोक्षावर कुणाचाच विश्वास नाहीये त्यामुळे भूक तृष्णा वा निकड ह्यांचा अंत करण्याची गरजच कुणाला भासत नाही व्यवहारी मार्ग म्हणजे संयमाचे शिक्षण आणि कायद्याचे भय ! चिन्हसृष्टीय उत्पादकतेने स्वतःचे उत्पादन खपवण्यासाठी संयम हाच गुन्हा ठरवून लालसा आणि चंगळ ह्यांचेच प्रमोशन चालू केले एकदा दाग अच्छे हैं म्हंटलं कि दाग लावायला आपोआप सगळे मोकाट स्वच्छता अध्यात्मिक शारीरिक  आणि कापडीक  आवश्यक पण जेव्हा संस्कृती दागच ग्लोरिफाय करायला लागते तेव्हा बलात्कार
शैव ब्राह्मण व गुरव प्रबोधनात  कुठे होते ? श्रीधर तिळवे नाईक माझे वडील कट्टर नास्तिक आणि काहीसे मार्क्सवादी ( ते मामा वरेरकरांच्याकडे त्यांच्या संघर्षाच्या काळात काही महिने घरगडी होते त्याचा हा परिणाम ) समाजवादी गांधीवादी मात्र जेव्हा म्हातारपणात त्यांना मी तुम्ही पुन्हा चित्रकलेकडे वा मूर्तिकलेकडे वळा असे सांगितले तेव्हा त्यांनी पहिली मूर्ती बनवली ती शंकराचार्यांची ! आणि त्यातून आम्हा बापलेकांचे भांडण पुन्हा सुरु झाले मी गावात गेलो कि त्यांनी बनवलेली शंकराचार्यांची मूर्ती घराबाहेर न्हेऊन ठेवायचो आणि मी गाव सोडले कि ते ती मूर्ती घरात न्हेऊन ठेवायचे (आजही तुम्ही माझ्या गावात घरी आलात तर माझ्या घराबाहेर अंगणात ती मूर्ती भिंतीला पाठ लावून आहे कारण तिला घरात घेऊन जाणारा माझा  बाप आता ह्या जगात नाहीये ) मृत्यूनंतर कसलेही विधी करू नका हे लिहून ठेवणारा माझा हा बाप शंकराचार्य हे निर्दोष होते हे आग्रहाने सांगत राहिला त्याच्या मते शंकराचार्यांनी फक्त एकच ग्रंथ लिहिला तो म्हणजे विवेकचूडामणी बाकीचे सगळे ग्रंथ ह्या  वैदिक  ब्राम्हणांनी शंकराचार्यांच्या नावाने लिहिलेल्या भाकडकथा आहेत त्यांचे दुसर
वर्णव्यवस्था आणि प्रबोधनाची चुकलेली वाट श्रीधर तिळवे नाईक भारतीय प्रबोधनाचे सार काढायचे ठरवले तर ते पाच  प्रश्नात सामावले आहे १ वर्ण कसे निर्माण झाले ?वर्णव्यवस्था कशी निर्माण झाली ?आणि तिचे स्वरूप काय ? २ जातीव्यवस्था म्हणजे काय ?तिचे निर्मूलन कसे करायचे ?तिची वैशिष्ट्ये काय ? ३वर्ग कसे निर्माण झाले ?वर्गव्यवस्थेचे स्वरूप काय आणि वर्गव्यवस्था कशी नष्ट करायची ? ४ ब्रिटिश साम्राज्य कसे निर्माण झाले ? त्याचे स्वरूप काय ?ते कसे नष्ट करायचे ? ५ राष्ट्र कसे निर्माण झाले ?राष्ट्र कसे निर्माण करायचे ? राष्ट्राचे स्वरूप काय ? ह्यातील वर्ण कसे निर्माण झाले ह्याचे उत्तर ऋग्वेदात पुरुषसुक्तात दिले गेले असल्याने हा प्रश्न सोपा झाला आणि वेद ब्राह्मणांनी लिहिल्याने ब्राह्मणेतरांत एक प्रक्षुब्धपणा निर्माण झाला ह्या व्यवस्थेत ब्राह्मणांनी १००० नंतर ब्राह्मण आणि क्षुद्र असे दोनच वर्ण ठेवल्याने ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर ही मांडणी अधिकच शास्त्रीय झाली केरळासारख्या ठिकाणी तर ह्या वादाचे प्रत्यक्षदर्शी पुरावेच उपलब्ध होते त्यामुळे केरळातून आलेले शंकराचार्य ब्राह्मणेतरांच्या बाजूविरुद्धचे मुख्य
पंचम , अस्पृश्य वा दलित समुदाय श्रीधर तिळवे नाईक ह्यापुढील प्रश्न असा आहे कि निसर्गयुगात हा पंचम समुदाय नेमके काय काम करत होता ? शैव इंडियात पुरोहित , शासक , व्यापारी , शेतकरी , शेतकरी , पशुपालक , श्रमिक आणि कारागीर असे अनेक समुदाय वावरत होते ह्याच समुदायात पंचमही वावरत होते आणि हा समुदाय जसा नागरी होता तसाच गावकरीही होता सिंधू संस्कृतीत ह्याचे स्पष्ट पुरावे मिळतात शैव राज्ये ही प्रामुख्याने स्त्रीराज्ये वा गणराज्ये वा स्त्रीगणराज्ये होती आणि ह्यातील कित्येक राज्ये ही पंचम समुदायातील राजे चालवत होते बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे हा समुदाय मूळचा राज्यकर्ता समुदायही होता ह्या राज्यात मार्गी रचना ही नगरात होती तर जमाती रचना गावात होती आणि गावात प्रामुख्याने पशुपालन हा मुख्य आणि शेती हा अनुषंगिक व्यवसाय होता साहजिकच पशूंचे आणि शेतमालाचे रक्षण जितके गरजेचे होते तितकेच हे व्यवसाय हे ज्या पाण्यावर चालत त्यांचेही रक्षण होणे गरजेचे होते आक्रमणाची भीती असल्याने गावाच्या शिवेचे आणि शेतांच्या आणि कुरणांच्या शिवेंचेही रक्षण होणे गरजेचे होते रक्षणासाठी शस्त्रांच्या रक्षणाची जितकी गरज हो
सिंधू सभ्यता आणि दलित , अस्पृश्य वा पंचम समुदाय पंचम समुदाय आणि निसर्गयुग पंचम समुदाय हा विसाव्या शतकात घमासान वादाचा विषय बनला असला तरी आणि हा समुदाय सध्याचा सर्वाधिक जागृत समुदाय म्हणून वाटचाल करत असला तरी सर्वच विचारवंतांच्या दृष्टिकोनात एकमत आढळते ते म्हणजे निसर्गयुगात हा समुदाय अस्तित्वात न्हवता तो अस्तित्वात आला तो निसर्गयुगानंतर !कपिल , महावीर , बुद्ध ह्यांनी सुरु केलेल्या विश्वीय युगात व युगानंतर !प्रश्न असा आहे कि सत्य काय आहे ? आणि ह्या सत्याची चर्चा का टाळण्यात येते ? माझ्या मते हा समुदाय फार प्राचीन काळापासून शैवांच्यात उपस्थित होता  पण  मुळात शैवांचे अस्तित्वच अमान्य करण्याच्या आगमिक व नैगमिक प्रवृत्तीतून हे घडले आहे आणि ह्याला जबाबदार खुद्द शैव आहेत बहुतांशी ओबीसी असलेला हा समुदाय अजूनही पुरता जागा झालेला नाही अर्थात अपवाद महात्मा फुलेंमुळे जागृत झालेला  माळी समाज आणि होळकरांच्यामुळे जागृत झालेला धनगर समाज  उरलेला  अद्याप स्वतःचेच विश्लेषण करत नाही तिथे इतर समाजाची चिकित्सा काय करणार ? दुसरी गोष्ट खुद्द पंचम समुदायाला आपली मूळ ओळख माहित नाही आणि जी ओळख माहित आहे
लिखित आणि मौखिक श्रीधर तिळवे नाईक भारतीय इतिहासाची साधने हा एक कायमच गोंधळाचा विषय आहे ह्याला जबाबदार लिखित पुराव्याचा शैवांच्याबाबतीतला दुष्काळ ! शैव समाजरचनेचा आणि पूजाविधींचा सर्वात घातक परिणाम जर कुठला असेल तर तो म्हणजे लिखित लिपीला दिलेला नकार आणि मौखिकतेचा केलेला पुरस्कार ह्याला दोन गोष्टी जबाबदार असतात १ केंद्रीय राज्यशासन तेही घराणेशाहीवादी स्वतःची सत्ता मजबूत करण्यासाठी स्वतःच्या कथा लिखित करते स्वतःचे घराणे लिखितद्वारा ग्लॅमरस करते त्यामुळे लिखित संहिता ह्या अनेकदा सत्तेचे सातत्य निर्माण करण्याच्या राजकारणाच्या भाग असतात उदाहरणार्थ ईजिप्तमधील फराहो   २ कट्टर जमातवाद स्वतःच्या परंपरा , ज्ञान आणि अनुभव ह्यांचा मागमूस इतरांना लागू नये म्हणून सर्व काही पाठांतर पद्धतीने जतन करते उदाहरणार्थ वैदिक  शैवांच्यात ह्या दोन्ही गोष्टींचा अभाव त्यामुळे आगमांचे वैदिकांप्रमाणे पाठांतर नाही आणि शैव राज्यात ती प्रामुख्याने गणराज्ये असल्याने ना राज्याने ना लोकांनी लिखिताची उपासना केली ना जोपासना त्यामुळे मेसोपोटोमियन वा सुमेरियन संस्कृतीचे जसे टॅब्लेट्स मिळतात तशे टॅब्लेट्स इंडस व्हॅल