पोस्ट्स

मार्च, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सावरकर

स्वातंत्रवीर सावरकर फिक्शन आणि वास्तव आरंभ भारतीयांसारखे भ्रष्ट आणि व्यवहारी लोक जगाच्या पाठीवर कुठं नसतील मात्र ह्या लोकांना तत्वज्ञ मात्र आदर्शवादी तत्वज्ञान सांगणारा लागतो बहुदा त्यामुळेच सावरकरांसारखा प्रॅक्टिकल तत्वज्ञ भारतीयांना पचनी पडत नाही सावरकर ना धर्माची गोळी देतात ना अहिंसेची बढाई मारतात ते जग नालायक असं स्पष्ट सांगतात आणि अशा जगात शस्त्रसज्ज असाल तरच वाचाल असं ते सांगतात ते उघड उघड भारताने अणुबॉम्ब बनवला पाहिजे असं सांगतात भारतीयांना शांतीचा संदेश देत अणुबॉम्ब बनवणाऱ्या इंदिरा गांधी चालतात पण अणुबॉम्ब बनवा असं थेट बोलणारा चालत नाही पाकिस्तान आणि चीन आपले शत्रू आहेत आणि ते भारतावर हल्ला करणारच असं स्पष्ट सांगणारे सावरकर आपणाला चालत नाहीत पण चायनाच्या घशात तिबेट घालणारे नेहरू मात्र आपणाला महान वाटतात सावरकरांशी माझे मतभेद आहेत पण सावरकरांना मान न देणारे लोक मला उथळ वाटतात . सावरकरांचं स्वतःच एक प्रॅगमॅटिक व्हिजन आहे ते किमान समजून घेणे आवश्यक आहे 

इतिहासाचे मूळ रूप आणि हिंदुत्ववाद

इतिहासाचे मूळ रूप हे कल्पइतिहासाचे आहे आणि रामायण महाभारत पुराणे हे सर्व कल्पइतिहास आहेत आणि कल्पनेच्या साहाय्याने रचलेले आहेत भारतीय मानसिकता कधीही कल्पइतिहासातून बाहेर पडली नाही पुढे तर्कशास्त्राचा उदय झाल्यावर तर्कइतिहासाचा उदय झाला ज्याला आज आपण इतिहास म्हणतो ह्यात कल्पना आणि तर्क ह्या दोन्हींचा वावर असला तरी भर तर्कावर होता पुढे आधुनिकचा उदय झाल्यावर इतिहासविज्ञानाचा उदय झाला आणि वैज्ञानिक प्रमाणे प्रमाण मानून प्रत्यक्ष पुराव्याच्या आधारे इतिहास लिहिला गेला हा दावा खोडून काढला तो पोस्टमॉडर्न इतिहासमीमांसेने ! इतिहास ऑब्जेक्टिवली लिहिण्याची अशक्यता ह्या प्रतिइतिहासांनी सिद्ध केली आणि आज अवस्था अशी आहे कि भारतातले सर्व इतिहास हे स्वतःचे स्वतःच्या वर्णाचे स्वतःच्या समूहाचे स्वतःच्या वर्गाचे हितसंबंध प्रमोट करणारे होते हे आता स्पष्ट होत चालले आहे हे इतिहास रचणारे लोक समाजात आदराचे स्थान पटकावून बसल्याने त्यांच्याविरुद्ध अवाक्षरही न काढण्याची रूढी आता रूढ झाली आहे भारतीय प्रबोधनात लिहिले गेलेले सर्व इतिहास हे प्रामुख्याने स्ववर्णीय वा मित्रवर्णीय हितसंबंध सांभाळत लिहिले गेल्याने सर्वच
हिंदुत्ववादाचा तिसरा चेहरा ठाकरेंचा वैष्णव हिंदुत्ववाद आणि सावरकरांचा वैदिक हिंदुत्ववाद ह्यांच्यानंतर मी आता हिंदुत्ववादाच्या तिसऱ्या चेहऱ्याकडे वळतोय हा चेहरा आहे शाक्त वैष्णव हिंदुत्ववादाचा ! १९१९ साली तो मुखर्जी ह्यांनी मांडला  त्यांचा हिंदुत्ववाद हा बुद्ध आणि महावीरांना मानसन्मान देणारा आहे आणि वैष्णवांना आरोपांच्या पिंजऱ्यात उभा करणारा आहे जे अनेकांना हिंदुत्ववादात बसेल असे वाटत नाही पण जे शैव आहेत त्यांना ह्याचे आश्चर्य वाटणार नाही तर ऐका शाक्त हिंदुत्ववादावरचे पहिले व्याख्यान श्रीधर तिळवे नाईक ज्योतिबा फुले आणि आंबेडकर ह्यांच्या दरम्यानची मिसिंग लिंक म्हणजे मुखर्जींसाब ! ब्राह्मण्यवादावर ते जोरदार हल्ला करतात ब्राह्मण्यवादावर टीका करतांना त्यांनी जे पाच सिद्धांत मांडलेत नेमके तेच पुढे आंबेडकरांनी मानलेत ह्यातच त्यांची थोरवी सामावलेली आहे त्यांच्या शाक्त हिंदुत्ववादावरचे हे दुसरे व्याख्यान श्रीधर तिळवे नाईक मुखर्जी धर्म आणि अर्थ ह्यांच्याऐवजी काम ह्या पुरुषार्थाला महत्व देतात हे एक त्यांच्या हिंदुत्ववादाचे वैशिष्ट्य म्हणूनच ते आपले अंतिम स्वगत कालीमातेच्या मुखात देतात त्य
राजकारणात विचारवंताचा रोल काय हा एक कळीचा प्रश्न आहे आणि त्याची चर्चा प्राचीन काळापासून आपल्याकडे झाली आहे ह्याच प्रश्नाचा अधिक व्यापक भाग म्हणून राज्यकारणात मुमुक्षु आणि मुक्षु ह्यांचा रोल काय असा प्रश्न निर्माण होतो हा प्रश्न प्रथम शैवांनीच निर्माण करून त्याचे उत्तर मोक्षुने राजगुरू व्हावे असे दिले होते त्यामुळेच विष्णुगुप्त जो मुमुक्षु आहे धनानंद आणि पुढे चंद्रगुप्त मौर्य ह्या दोघांचाही राजगुरू बनून काम करतो ( चाणक्य आणि विष्णुगुप्त हे दोन वेगळे पुरुष आहेत ) राजगुरूंची ह्याबाबतीतली भूमिका स्पष्ट होती समग्र जनतेला अध्यात्म शिकवायचे असेल तर प्रथम राजालाच अध्यात्मिक बनवावं जेणेकरून जनता राजाची गोष्ट मानत असल्याने राजाच अध्यात्मिक झाला तर जनताही अध्यात्मिक होईल जर राजाच साधक झाला तर जनताही साधक होईल म्हणूनच सिद्ध लोकांनी राजगुरू होणे स्वीकारले सत्य अहिंसा अपरिग्रह संयमित काम आणि अचौर्य ह्याचा आधार समाजगाड्याला प्राप्त व्हावा अशी ह्यामागे कळकळ होती वैदिकांनी ह्याला छेद देत दोन संकल्पना  निर्माण केल्या १ राजर्षी २ राजपुरोहित राजर्षी म्हणजे मोक्षाची साधना करणारा पण प्रत्यक्षात राजका

हिंदुत्व ,

हिंदुत्व १ माझे स्वतःचे एक धोरण असे कि आधी कोणी त्या विषयावर काम करतं का त्याची वाट पाहायची आणि जर कोणी आपणाला अभिप्रेत काम करत नसेल तर स्वतः करून टाकायचं . चौथी नवता असो शैव धम्म असो आगमवाद असो इतिहास असो मी कायमच कुणी काम करतं का ह्याची वाट पाहात आलोय आणि जेव्हा ही कामं झाली नाहीत तेव्हा मी ती स्वतःच केलीत गेली २ वर्षे मोदींच्या अर्थशास्त्रावर नीट समजून घेऊन कोणी त्याची खोल चिकित्सा करेल म्हणून वाट बघत होतो पण कुणीही हे काम केले नाही म्हणून साधारण ४० -४५ मिनिटांची सात व्याख्याने मी गुगल प्लस वर टाकली १९८० नंतर ज्याला अर्थशास्त्रात बिग हाऊस इकॉनॉमी म्हणतात तिची स्थापना करायचा प्रयत्न मोदींनी चालवला भारतीय मातीत व अवकाशात हा मूर्खपणा होता आणि तो नीट उत्खनन करून दाखवणे गरजेचे होते म्हणून मी कधी न्हवे ते अर्थशास्त्रावर व्याख्याने दिली नितीन वाघांचा अपवाद बघता कोणी गूगल प्लस वर फिरकलेही नाही अर्थात माझे लिखाण कधीच वाचकांच्यावर मी अवलंबून ठेवलेले नाही आता मी हिंदुत्वादाची सविस्तर चिकित्सा करावयाचे ठरवले आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे करणे आवश्यक आहे मोक्षु व मुमुक्षुने सत्यवादी असा

मनोहर पर्रीकर गेले होते मनोहर तरी श्रीधर तिळवे नाईक

होते मनोहर तरी श्रीधर तिळवे नाईक मनोहर पर्रीकर गेले ज्या प्रकारची माणसे राजकारणात आवश्यक आहेत असं मला वाटतं त्या प्रकारात मोडणारा राजकारणी गेला . १९८० नंतर अविनाश धर्माधिकारी आणि मनोहर पर्रीकर ही हिंदुत्ववादी गटातील दोन अशी माणसे उदयाला आली होती जी राजधर्माला जाणणारी आणि जपणारी होती त्यातील अविनाश धर्माधिकारिंच्या पोटेंशियलचा  सत्यानाश मराठीच्या करंट्या राजकारणाने केला सुदैवाने आम्हां गोवेकरांनी पर्रीकरांचा अविनाश धर्माधिकारी होऊ दिला नाही मी पर्रीकरांच्याविषयी प्रथम सविस्तर ऐकलं ते माझे मामा माजी आमदार रोहिदास नाईक ह्यांच्याकडून ! त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राजकारणात भाग घ्यायला सुरवात केली तेव्हा ! अत्यंत स्वच्छ चारित्र्याचा तरुण नेता अशी त्यांची त्याकाळात इमेज होती प्लेन बुशशर्ट , ट्राउझर आणि सॅन्डल  ह्या वेषात हिंडणारी त्यांची मूर्ती गोवेकरांना आपलीशी वाटली बायसिकलवरून विधानसभेत जाणारा आणि पब्लिक ट्रान्सपोर्टमधून हिंडणारा उच्च विद्याभूषित असा हा नेता लवकरच गोवेकरांचा लाडका झाला १९९४ ला त्यांनी पहिली विधानसभा जिंकली आणि अपेक्षेप्रमाणे ते पुढे मुख्यमंत्रीही झाले गोव्यातल्
जगण्याचे दोन मार्ग असतात मोक्षिक आणि ऐहिक मोक्षिक मार्गाने जगणार असशील तर क्षमा करून पुढे निघून ये मी स्वतः अनेक क्रेडिट्स सोडलेली आहेत हे तू जाणतोसच पण जर ऐहिक मार्गाने जगणार असशील तर क्रेडिट अजिबात सोडू नकोस वेळप्रसंगी कोर्टात जा जे योग्य आहे त्यासाठी लढावंच लागतं लढ पण प्रथम समजावून सांगण्याचा आटोकाट प्रयत्न कर मनोविकासचे लोक चांगले आहेत ते तुझी बाजू ऐकतील असं मला वाटतं बाकी तुझी मर्जी लिखाण अजिबात सोडू नकोस आपलं लेखन हे प्रथम आपणासाठी असतं समकालीन सर्वकालीन वैग्रे नंतर लिहीत राहा जे वाटते ते लिहीत रहा 
नितीन वाघ अंगुलीनिर्देश धारणा न्हवे अंगुलीनिर्देश शून्यातून जन्मतो तो ज्या भाषेतून जन्मतो ती भाषा म्हणजे सामाजिक धारणा असते त्यामुळे अंगुलीनिर्देश धारणा वाटतो आणि कालांतराने बनतोही बुद्ध जेव्हा पाली भाषेत बोलतो तेव्हा तो शून्यातून आलेला असतो म्हणूनच तो पाली भाषेतून अनेक भाषांत भाषांतरित होतो अंगुलीनिर्देश हा नेहमी बोलणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्याच्या भाषांतून जन्मतो कारण तो कळावा म्हणून तशी योजना असते त्यामुळेच बुद्ध इंग्लिश किंवा मराठी भाषेतून अंगुलीनिर्देश करत नाही आता तो संस्कृतमधून अंगुलीनिर्देश करत न्हवता म्हणून त्याला मोक्ष प्राप्त न्हवता असे समजणारे पंडित असतातच कि ! पंडितांना बौद्धिक अहंकाराच्या साहाय्याने समोरच्याची कोंडी करायची असते कारण त्यांना त्यातून अहंकार शांत होतो पण बुद्धांना अंगुलीनिर्देश करायचे असल्याने ते समोरच्या माणसांनुसारच अंगुलीनिर्देश करतात हे अंगुलीनिर्देश धारणा नसतात म्हणूनच त्यांचे भाषांतर शक्य होते पण ते ज्या भाषेतून होतात ती भाषा धारणा असते आणि पंडित ह्या अंगुलीनिर्देशांची धारणा बनवतात आणि त्यातूनच पुरोहितगिरी जन्मते  पंडित मोक्षांचीही धारणा बनवतात पण ती धा
१ नितीन चांदोरकर ही २०१३ ची कविता आहे निर्वाण किंवा मोक्ष हा जोवर तुम्ही निर्वाणीला पोहचत नाही तोवर प्राप्त होत नाही जो मरायला तयार होत नाही त्याला निर्वाण प्राप्त होत नाही ह्या काळात मी निर्वाण or डेथ ह्या इंटेंसिटीत मी होतो त्या इंटेन्सिटीची ही कविता आहे २ सतीश तांबे नितीन वाघ ह्यांनी योग्य ते स्पष्टीकरण दिले आहेच मी माझ्या कविता चार सिरीजमध्ये विभागल्या आहेत कोल्हापुरातील १९८२ ते ८६ अपवादात्मक ८७/८८ ह्या डेकॅथलॉन सिरीजमध्ये कोल्हापूर व प्रामुख्याने मुंबईतील १९८७ ते २००६ -७ ह्या दरम्यानच्या कविता चॅनेल सिरींजमध्ये फिल्म इंडस्ट्रीत  २४ तास दाखल झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये असतांना लिहिलेल्या कविता २००७ /८ ते २०१३ ह्या दरम्यानच्या कविता नेट सिरीजमध्ये आणि २०१३ ते सद्याच्या करंट कालखंडातल्या कविता ज्यावेळी निर्वाण वा मोक्ष हाच माझ्या जगण्याचा पूर्णच केंद्र झाला आहे त्या कालखंडातल्या कविता निर्वाण सिरीज मध्ये हे सर्व कालखंड त्यातल्या थीम्सच्या वा आशयाच्या आधारे वेगवेगळ्या फायलीत वा काव्यसंग्रहात क्लासिफाय केलेत . हे करतांना एक गोष्ट जी माझ्याही लक्ष्यात आली न्हवती ती तुम्ही  अधिक ठाशीव
इतिहास , निवडणूक  आणि आत्ताचा काळ श्रीधर तिळवे नाईक इतिहास हा नेहमीच उपलब्ध साधन सामुग्रीवर अवलंबून असतो आणि इतिहासकार हा नेहमीच काळाने जखडलेला असतो तो म्हातारा नसतो पण जख्ख असतो माझ्या आयुष्यात मी २०१० पर्यंत इतिहासाची साधना केली आणि त्यातून दोन इतिहास लिहिले पहिला चिन्हकीचा  जो माझ्या चौथ्या नवतेच्या संकल्पनेचा विस्तार होता जो १९९० ते १९९४ पर्यंत उपलब्ध असलेल्या रिसोर्सवर अवलंबून होता हा इतिहास इतिहास न्हवता तर चिन्हकीचा अभ्यास होता पण तो सादर करतांना त्याला इतिहासाचे स्वरूप आपोआप आले दुसरा २००५ मधल्या माझ्या जेएनयू मधल्या निबंधसादरीकरणाने सुरु झालेल्या शैव पॅरॅडाईम्स अँड युरोपियन पॅरॅडाईम्स ह्याने सुरु झालेला जो २०१० पर्यंतच्या साधनसामुग्रीवर अवलंबून होता आणि ज्याचा मूळ फोकस शैव धम्म होता आता मी तिसराही इतिहास लिहावा अशी अपेक्षा काही लोक व्यक्त करतायत ही अपेक्षा योग्य आहे पण हे शक्य नाही कारण २०१० पासून माझे सर्व लक्ष्य मोक्षावर केंद्रित आहे आणि मोक्षात इतिहासाला जागा नसते किंबहुना मोक्ष म्हणजे इतिहासाचा अंत आणि स्मृतींचा केवळ टेक्निकल वापर करण्याची क्षमता नवीन पिढीत नितीन