मायग्रेशन व साईडइफेक्ट्स श्रीधर तिळवे नाईक 

भारतीय प्रबोधनाची सर्वात मोठी शोकांतिका जर कुठली असेल तर ती म्हणजे ते स्वकीयांशी खोलात जाऊन लढलेच नाही आणि ह्याचे कारण ब्रिटिश राजवट ! भारतीय प्रबोधनाची सगळी ताकत ब्रिटिशांशी लढण्यात खर्च पडली फुले आगरकर आंबेडकरांनी ब्रिटिशांशी लढायचे टाळले कारण त्यांना स्वकियांशी लढायचे होते त्यामुळे ब्रिटिशांना हाकलून देण्यात त्यांना फारसे स्वारस्य न्हवते ह्याउलट टिळक गांधी ह्यांना परकीयांशी लढायचे होते त्यामुळे स्वकीयांची युती आणि एकात्मता त्यांना महत्वाची वाटायला लागली 

हळूहळू ह्या देशातल्या ब्राम्हण व क्षत्रियांना नेमकं काय घडतंय ह्याचा अंदाज यायला लागला ब्रिटिश गेले तर पुढील लढाई ही आपल्याविरोधात लढली जाणार हे स्पष्ट झाले साहजिकच दोन पर्याय उरले आपल्या हितसंबंधांचा त्याग करणे नेहरूंच्यापासून अनेक कम्युनिस्टांपर्यंत अनेकांनी आपल्या हितसंबंधांचा त्याग केला मात्र ह्यांचे प्रमाण फक्त १० टक्के होते उरलेले ९० टक्के स्वातंत्र्योत्तर काळात आपले हितसंबंध कसे राखायचे ह्या दिशेने विचार करायला सुरवात केली काहीजण परदेशात गेले व जातांना त्यांची सारी संपत्ती सोबत घेऊन पळाले परदेशी बँकांना त्यांचा पैसा हवाच होता राजवाडे आणि हवेल्या पशु आणि घोडे घेऊन पळून जाणे शक्यच न्हवते म्हणून त्या मागे उरल्या भारत सरकारने त्या ताब्यात घेतल्या नाहीत कारण त्यामुळे अंतर्गत छोटी छोटी युद्धे होतील असे त्यांना भय होते कारण भारतात एव्हढी संस्थाने होती एकाचवेळी शेकडो संस्थाने बंडाला उभी ठाकली तर त्यांना हाताळणे अवघड होईल असं त्यांना वाटत होते परदेशात सेटल झालेल्या संस्थानिकांच्या पोरंपोरींची संख्या एकदा कुणीतरी मोजायला हवी मी फ्यूचरॉलॉजिस्ट म्हणून काहींना भेटलोय म्हणून हे सांगतोय 

गांधींनी मात्र सगळ्या वैश्यांना आश्वस्त केलं होतं कि कम्युनिस्ट राजवट येणार नाही आणि वैश्यांना मुख्य धोखा कम्युनिस्टांचा वाटत होता साहजिकच हे वैश्य भारतीय स्वातंत्र्य चळवळीला फन्डीन्ग देत होते त्याकाळात हा पैसा आवश्यक वाटत होता भारतीय स्वातंत्र्य चळवळ यशस्वी होणं म्हणजे इंग्लिश प्रबोधनात्मक क्रांती यशस्वी होणं होतं साहजिकच नेहरूंच्यावर १ प्रबोधनाचा प्रोजेक्ट कम्प्लिट करणं २ आधुनिक मूल्ये रुजवून भारतीय अर्थव्यवस्था आधुनिक करणे अशा दोन्ही जबाबदाऱ्या पडल्या ह्यातून त्यांचा गोंधळ उडाला आणि काँग्रेसची केऑटिक राजवट जन्मली फ्रेंच राज्यक्रांतीनंतरची पन्नास वर्षे आणि भारतातील हा कालखंड ह्यांच्यात विलक्षण साम्य आहे फक्त नेपोलियनच्या जागी नेहरू आहेत आणि जग जिंकण्याची फँटसी सेम पण मार्ग वेगळे आहेत नेहरूंना समस्त थर्ड वर्ल्डचे नेपोलियन बनायचे होते जे नेपोलियनप्रमाणेच बारगळत गेले फक्त इथे नेपोलियनला पराभूत करणारा चायना होता नेपोलियन थेट कैदेद्वारा एकांतात गेला नेहरू स्वतःहून एकांतात गेले आणि धक्क्यातून उठलेच नाहीत 

कुठल्याही देशाचा राष्ट्रवाद हा त्या देशातल्या ज्ञानी व क्षात्र लोकांच्या जाज्वल राष्ट्रनिष्ठेवर अवलंबून असतो भारतात वर्णव्यवस्थेमुळे ह्याची जबाबदारी ब्राम्हण व क्षत्रियांच्यावर होती पण दुर्देवाने ९० टक्के ब्राम्हण क्षत्रियांच्यात जाज्वलता टिकलीच नाही आणि भारतात ह्या वर्गातील जो तो परदेशांत सेटल होण्याचे स्वप्न बघायला लागला आपली मुलं परदेशात सेटल आहेत हा भारतात चक्क अभिमानाचा विषय बनला परदेशातल्या वाङ्मयात कलात रस घेणारे इंग्लिशवर मास्टरी असणारे लोक विद्वान वाटायला लागले कुठल्याही क्षणी स्वतः किंवा आपली मुले ह्यांना परदेशात सेटल करण्याची आतुरतेने वाट पाहणारे हे लोक भारतीयांचे वैचारिक नेते बनल्यावर काय घंटा राष्ट्राभिमान निर्माण होणार ?

ह्याचा परिणाम जो व्हायचा तो झाला आहे ह्यांना आदर्श मानणारे बहुजनही आता असेच पोकळ बनले आहेत परिणामी जेव्हा कॅनडा वैग्रे देशांनी आपले नागरिकत्व विकायला काढलं तेव्हा त्यांच्या दारी रांगा लागल्या आणि आज अवस्था अशी आहे कि भारतातला ९० टक्के श्रीमंत वर्ग हळूहळू मायग्रेट होतोय त्यातच मोदी सरकारने आणलेला किचकट आणि व्यवहारात दर दोन महिन्याला स्ट्रक्चर बदलणारा जी एस टी व त्यामुळं उडालेला गोंधळ मोठ्या व छोट्या उद्योजककांच्या गळ्याशी आलाय 

ह्याचा परिणाम म्हणून भारतात फक्त ज्यांना परदेशी नागरिकत्व मिळालेले नाही पण जे वाट पाहतायत असे वेल टू डू लोक , गरीब व निम्न मध्यमवर्गीय लोक , आदिवासी व आमच्यासारखे संन्यासी शिल्लक राहतील अशी चिन्हे दिसतायत ह्या मायग्रेशनमुळे पैसाही मायग्रेट होऊन बँक व्यवस्था घसरणीला लागताना दिसतीये जगाच्या इतिहासात कुठल्याही देशाची अशा तऱ्हेने घसरगुंडी झालेली आढळणार नाहीये 

मोदींना ह्याची जाणीव नाही असं नाही पण हे थांबवायचं कसं हे कुणालाच कळत नाहीये बँकांची प्रचंड वसूल न झालेली थकबाकी हा महाप्रचंड राक्षस आहे हा सामान्य माणसांचा बँकात ठेवलेला पैसा आहे आणि तो जवळजवळ बुडलाय कि काय अशी शंका आहे 

उद्या समजा मोदी गेले तरी हा प्रश्न जसाच्या तसा नव्या पंतप्रधानापुढे ठाकणार आहे हे पाप सगळ्याच पक्षांचे असल्याने एकमेकांवर टीका करूनही फायदा नाही पुन्हा उपाययोजना करूनही बुडत्याचा पाय खोलात गेला तर हा प्रश्न आहेच काहीजणांच्या परदेशवेडामागे त्यांच्यावर असलेली कर्जेही आहेत 

अशा ह्या क्रायसिसमध्ये इलेक्शन लढवायला लागणारा पैसा फक्त भाजपकडेच असणार आहे आणि इतर पक्षाच्याकडेच पैसाच येणार नाही भाजपाकडे जी गमनहुल्लड उडालेली आहे त्यामागचे एक कारण हेही आहे 

आपचा अपवाद वगळता एकही विरोधी पक्ष पुरोगामीवादाच्या पलीकडे पाऊल टाकून आधुनिक व्हायला तयार नाहीये काँग्रेस संपलेली नाहीये पण पुरोगामीवादात अडकलेली आहे आणि जातीपातीचे राजकारण खेळून तिनेच देशकारण जेरीस आणले सेक्युलर राष्ट्रवादाची जी पडझड झाली त्याला काँग्रेसचे जातकारणच जबाबदार आहे कारण जातीयता अंतिमतः हिंदुत्ववादी होते 

दुर्देवाची गोष्ट अशी कि भाजप हाही आता जातीपातीचे राजकारण खेळणार अशी चिन्हे दिसायला लागलेत झारखंडमध्ये जे घडले आहे त्याचा हा दुष्परिणाम आहे महाराष्ट्रातही ब्राह्मणांची ४ टक्के मते ही मराठ्यांच्या ३३ टक्के मतांपुढे हलकी ठरल्यानेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत जातशाहीच्या ह्या पुनरागमनाचे करायचे काय हाच प्रश्न आहे कारण हिंदुत्व हे धर्मकेंद्री असते ते जर जातकेंद्री होणार असेल तर संपूर्ण भारतीय राजकारण हेच जातकेंद्री होणे अटळ आहे ह्यात धर्मकेंद्री राष्ट्रवादाचे हिंदुत्व काय रूप धारण करणार हा हिंदुत्वापुढंचा खरा प्रश्न आहे 

श्रीधर तिळवे नाईक 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती भाग १ ते २२