आज संविधान दिन ! भारतीय पुरोगामीवादाचा त्यातील सुधारणावादी व रोमँटिक अशा दोन नवंतांनी उभ्या केलेल्या राजकीय आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यलढयांनी परंपरावादी शोषणग्रस्त व्यवस्थेवर मिळवलेल्या विजयाला अधिकृत कायदेशीर संहिता दिल्याचा हा दिवस ! भारतीय पुरोगामीवादाचे ज्यांना सर्वोच्च शिखर म्हणता येईल अशा बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान दिले 


ह्या संविधानाने पुरोगामीवादाच्या पायाभूत अशा दोन गोष्टी अधोरेखित केल्या पहिली सांसदीय लोकशाही ही राजकीय व्यवस्था व स्वातंत्र्य समता बंधुता ह्या तत्वांना बांधणारी मानणारी सामाजिक व्यवस्था व ही समता प्रस्थापित करण्यासाठी निर्माण केली गेली आरक्षणव्यवस्था ! पुढे इंदिरा गांधींच्या काळात समाजवाद हीही आर्थिक व्यवस्था म्हणून स्वीकारली गेली प्रत्यक्षात मूळ अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था होती पण ती अंतिम म्हणून स्वीकारली गेली नाही १९६० सालानंतर जी साठोत्तरी समाजवादी पिढी उदयाला आली तिने भारतीय संविधानाला समाजवाद स्वीकारायला लावला 


आज आपण असं म्हणू शकतो कि १९७७ पर्यंत संविधानवाद हाच आता परंपरा म्हणून प्रस्थापितता म्हणून प्रस्थापित झाला 


ह्या संविधानाविरुद्ध दोन शक्ती ठाकल्या 


१ हिंदुत्ववाद : ह्याने कधीही भारतीय संविधान स्वीकारले नाही पण पर्याय म्हणूनही काही नवे सुचवले नाही हे एका अर्थाने प्रतिगामी लोकांचे प्रतिगामी विरोध होते 


२ ओशोंवाद : ओशो रजनीश हे मात्र ठामपणे संविधानातल्या अनेक गोष्टींविरुद्ध उभे ठाकले गांधीवाद व समाजवाद हा संविधानाचा कणा होता ओशोंनी त्यांच्यावर प्रचंड हल्ले केले हे पुरोगामीविरुद्ध उत्तराधुनिक बंड होते वास्तविक हिंदुत्ववाद्यांनी ओशोंना डोक्यावर घ्यायला हवे होते कारण हिंदुत्ववाद्यांना आवडणाऱ्या सर्व परंपरांचे ते पुनर्जीवन करत होते आणि हिंदुत्ववाद्यांचा आर्यवाद त्यांनी कधीही सोडला नाही तरीही १९८० पर्यंत हिंदुत्ववाद्यांना ओशोंवाद झेपला नाही नंतर आलेल्या नवहिंदुत्ववादी पिढीने मात्र हळूहळू ओशोंवाद स्वीकारायला सुरवात केली मात्र आजही हा ओशोंवाद झेपलाय असं वाटत नाही ओशोंनी मोक्षाचा जो फिल्मी drama उभा केला त्याला तर तोड न्हवती साहजिकच हिंदू संस्कार मानणाऱ्यांना ओशोंच्यात एक नवा प्रेषित सापडला आज ओशोंचे वैचारिक वर्चस्व प्रचंड प्रमाणात विस्तारले आहे 


भारताचे एक वैशिष्ट्य आहे इथे नवतेलाही परंपरेचा आधार द्यावा लागतो त्यामुळे बंडखोर लोकही वेद उपनिषद गीता ह्यांचा आधार घेऊन बोलायला लागतात संपूर्ण पुरोगामीवादाचं हे वैशिष्ट्य होतं म्हणजे युरोपियन पुरोगामीही टेस्टामेन्ट , प्लेटो आणि ऍरिस्टोटल ह्यांचा आधार घेऊनच सुरवात करताना दिसतात ओशोंना ह्याची जाणीव होती त्यामुळे त्यांनी बुद्ध महावीर उपनिषद बायबल सुफी कथा झेन व भक्ती संत ह्यांचा आधार घेत त्यांनी मांडणी केली आधुनिकतेने जी परंपरा धुडकावली ती उत्तराधुनिकतेनं पुन्हा नव्याने सादर केली ओशो रजनीश हे भारतीय उत्तराधुनिकतेचं उत्तम उदाहरण होय 


१९९० नंतर हिंदुत्ववाद सत्तेवर यायला सुरवात केली साहजिकच संविधानाला असलेला त्यांचा विरोध माहीत असल्याने पुरोगामी लोक हळूहळू चिंतेत पडायला लागले हिंदुत्ववादी जर स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक राहिले तर आज ना उद्या हे संविधान धुडकावणार हे उघड आहे प्रश्न आहे नव्या संविधानाची दिशा काय असणार आहे प्रतिगामी कि गतिगामी ? प्रतिगामी पुनर्जिवनवादी संविधानामुळं पाकिस्तानचे अफगाणिस्तानचे काय हाल झाले ते आपल्यासमोर आहेत त्यामुळं संविधानातील बदल गतिगामी असणार असतील तरच ते भारताला पुढे न्हेतील समान नागरी कायदा हे त्यासाठीचे पहिले पाऊल आहे सद्यातरी ह्या पावलांची हवा आहे पण प्रत्यक्षात त्यादृष्टीने पाऊल टाकणे राजकारणामुळे अडले आहे म्हणजेच समान नागरी कायद्यामुळं आपण इलेक्शन जिंकू कि हरू हे हिंदुत्ववाद्यांना सद्या कळत नाहीये 


दुसरी गोष्ट पर्यायी संविधानाची कसलीही बौद्धिक व्यवस्था हिंदुत्ववाद्यांच्याकडे नाहीये काही लोक तर चक्क मनुस्मृतिवादी आहेत हे लोक जर आवाजी होत गेले तर हिंदुत्ववाद्यांचा पराभव अटळ आहे हिंदुत्ववाद्यांच्यातच प्रतिगामी हिंदुत्ववादी व गतिगामी नवहिंदुत्ववादी असे दोन गट पडलेले दिसतात मोदी गतिगामी हिंदुत्ववादी असल्याने सद्या प्रतिगामी हिंदुत्ववादी गप्प आहेत पण ते अशेच राहणार आहेत का 


हल्ली आयडियालॉजी इज डेड म्हणणाऱ्या उत्तराधुनिक महाभागांची संख्या वाढतीये मन्या जोशी ह्याने कवितेत ही घोषणा अमेयुरोपमधून आयात केली होती तेव्हा मी त्याला दणकून विरोध केला होता फिक्शनमध्ये जगणाऱ्यांना असले चाळे सुचतात ज्यांना ह्या देशाची ग्राउंड रियालिटी माहीत आहे त्यांना ह्या देशात आयडियालॉजीतल्या काही गोष्टींची किती गरज आहे हे नीट माहीत आहे ह्या अंगाने मी एक इन्टर्व्युही दिला होता आयडियालॉजीवाल्यांना चौथ्या नवतेत आणलं पाहिजे हे खरं पण हे करतांना आयडियालॉजीतल्या स्वातंत्र्य समता बंधुता लोकशाही सारख्या मूल्यांना नष्ट करता कामा नये असं माझं ठाम मत आहे 


हिंदुत्ववाद्यांचं संविधान स्वातंत्र्याचं काय करणार आहे ? ह्या देशातील ब्राह्मण्यवादानं इसवीसन १००० नंतर ब्राह्मणेत्तरांच स्वातंत्र्य धर्माकडे गहाण ठेवून घेतलं होतं शैव राजवटींनी ( शिवाजी महाराज ते होळकर शीख राजवटी )  ते वारंवार सोडवून आणलं म्हणून ते टिकलं पुन्हा जर का ते हिसकावलं गेलं तर शैवांनाच ते पुन्हा सोडवून आणावं लागेल त्यापेक्षा ते जाणारच नाही ह्याची काळजी घ्यावी हे उत्तम 


मला आशा आहे कि हिंदुत्ववादी प्रतिगामी दिशेकडे न जाता भविष्याच्या गतिमानी दिशेनं जातील गोळवलकर कि प्रमोद महाजन ह्यात प्रमोद महाजनांची निवड करावी लागणे अटळ आहे अन्यथा सद्या अल्पमतात असलेला ब्राम्हण्यवाद (हा फक्त ब्राम्हणांच्यात असतो असं नाही तो कुणातही असू शकतो अनेक ब्राम्हण ब्राह्मण्यवादापासून मुक्तही आहेत  ) प्रथम पाठीवर मग डोक्यात चढेल आणि मग डोक्यात जाईल ब्राम्हण्यवाद डोक्यात गेला कि तो आपोआपच इतरांना छाती पोट मांड्या म्हणत पायदळी तुडवतो हा इतिहास आहे 


स्वातंत्र्य चळवळीतून प्राप्त झालेल्या आपल्या संविधानाचा स्वातंत्र्य हा प्राण आहे तो जिवंत रसरसता व सळसळता राहिलाच पाहिजे 

======================================================

बाबासाहेब आंबेडकर , शैव व बौद्ध धर्म भाग १ लेखक : श्रीधर तिळवे नाईक 

GENERATION WITHOUT REVOLUTION

MEANS TREE WITHOUT A FLOWER AND FRUITS  

BUT IT ALSO MEANS THAT 

THE WHOLE GENERATION IS HAPPY WITH OLD WINES

SHRIDHAR TILVE NAIK

बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय प्रबोधनाचे शिखर ! “I like the religion that teaches liberty, equality, and fraternity.” असे ते म्हणतात तेव्हा ते प्रबोधनाचा अजेंडाच मांडत असतात युरोपच्या इतिहासात जे स्थान कार्ल मार्क्सचे आहे तेच भारताच्या इतिहासात बाबासाहेब आंबेडकरांचे आहे मात्र मार्क्सवादाची व मार्क्सची जशी चिकित्सा युरोपात झाली तशी चिकित्सा आंबेडकरांची झाली नाही किंबहुना त्यांना श्रद्धास्थान बनवून गिळंकृत करण्याचा पुरोहिती डाव आता यशस्वी होत चाललेला दिसतो त्यामुळे आंबेडकरवादाची वाढ आता खुंटणार का असा एक फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आंबेडकरांना श्रद्धा बनवायचं कि विचार बनवायचा हे आता ठरवण्याची वेळ आली आहे 

बुद्ध आणि आंबेडकर ह्यांचे संबंध तपासायचे असतील तर सर्वात प्रथम गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर मानवजातीच्या समग्र इतिहासात नेमके कुठे उभे आहेत ते पाहणे गरजेचे आहे 

कुठल्याही काळात माणूस भवंतालात जगत असतो बुद्ध आणि आंबेडकर त्याला अपवाद न्हवते म्हणून प्रथम आपण ह्या भवतालचा विचार चौथ्या नवतेच्या प्रकाशात करू 

माणसाचा भवताल हा सप्तलोकांनी बनलेला असतो 

१ असलोक शून्यातून निर्माण झालेले व असलेले शिवांड म्हणजे असलोक ! इथे जाण्याची असोशी त्याला कधी ना कधी लागतेच ह्याला अनेकदा शून्यात किंवा मुळात परतणे म्हंटले जाते माणसात असलेले शून्य म्हणजेच शिव त्याच्या देहात असतेच फक्त आता ते असून असते हे असलोक आजतरी फक्त मोक्ष वा निर्वाण वा कैवल्य ज्यांना प्राप्त होते त्यांनाच प्राप्त होतो विज्ञान आज ना उद्या पोहचेल अशी फक्त आशा करता येते आंबेडकरांचा असलोकावर विश्वास न्हवता मात्र बुद्धाचा शून्यावर विश्वास होता महावीराने शुन्याऐवजी कैवल्य शब्द वापरला आहे ब्रह्म म्हणजे असलोक का हा एक वादाचा प्रश्न आहे कारण शिव शून्य केवल निर्गुण निराकार आहेत ब्रह्मबाबत अनेकदा सगुण असल्याचा दावा केला जातो असो 

२ भवलोक मितिके तयार होण्याआधीची शिवांडस्थिती ही मितिशून्य असते तिचा अंदाज अजूनही आपल्याला येत नाहीये आंबेडकरांचा भवलोकावर विश्वास न्हवता कारण त्यांच्या काळात त्याचा विचारही करता येणे शक्य न्हवते हिला सायन्समध्ये बिग बॅंग होण्यापूर्वीची स्थिती मानले गेले आहे मात्र अलीकडे नोबल विजेते ब्रम्हाण्डविद जेम्स पिबल्स ह्यांनी AFP शी बोलतांना  "WE DON'T HAVE A STRONG TEST OF WHAT HAPPENED EARLIER IN TIME We don't have a strong test of what happened earlier in time,We have theories, but not tested." ." अशी कबुली दिली आहे त्यांच्या मते there's no good way to test whether such a thing actually happened — cosmologists have evidence of a rapid outward expansion, but not anything as discrete as a singular point that detonated to create everything in the universe."It's very unfortunate that one thinks of the beginning whereas in fact, we have no good theory of such a thing as the beginning," 

आंबेडकरांना बिग बॅंग थेरीविषयी काही कल्पना असणे शक्यच न्हवते कारण त्यांच्या काळात ती न्हवती पण आपणाला तिचा विचार करावा लागतो 

३ आंबेडकरांचा विश्वास सुरु होतो तो मितिलोकांपासून मितिलोकात  सर्व काही लांबी रुंदी खोली व काळ ह्या मितींनी बद्ध होते मितींनी बद्ध झालल्या शरीरस्थितीस मितिक म्हणतात मितिलोक अनंत विश्वांनी म्हणजे युनिव्हर्सेसनीं बनलेला असतो त्यातील प्रत्येक विश्वात अनंत कृष्णविवरे श्वेतविवरे आकाशगंगा असतात व त्यांचा अवकाश व काळ ह्यांनी गजबजलेला असतो हा निदान आपल्या टेलिस्कोपच्या दृश्यआवाक्यात आलाय १३. ५ म्हणजे साडेतेरा पॉईंट पाच बिलियन वर्षांपूर्वी मॅटर आणि एनर्जी अवतरले आणि ह्या लोकांची  सुरवात झाली असा तर्क आहे ह्याचवेळी अणुरेणुची निर्मिती झाली ह्यात मितींचा म्हणजे लांबी रुंदी खोली काळ व दिशा ह्या पाच मितींचा नेमका काय रोल होता हे अद्यापही अस्पष्ट आहे आंबेडकरांच्या काळात हे माहीत न्हवते पण  शक्ती जड व ऊर्जा अशा दोन्ही रूपात वावरायला लागली हे नक्की आंबेडकरांना माहित आहे आंबेडकर मार्क्सप्रमाणे जडवादी आहेत का ? नाही माणूस जडापेक्षा काही अधिक आहे ही त्यांची धारणा आहे 

४ संपूर्ण पृथ्वी हे एक कुटुंब म्हणून पाहता येणे शक्य आहे साधारण साडेचार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वी निर्माण झाली आणि ती मितिक आहे आणि आपण मानव तिच्या शरीराच्या अंगाखांद्यावरचे मितिक आहोत ती ज्या मितिलोकाचा भाग आहे तो मितिलोक व स्वतः पृथ्वी मितिकांना कधीच संपूर्ण प्रतित होत नाही निसर्गलोक म्हणजे ज्याला आपण निसर्ग किंवा कायनात वा नेचर म्हणतो तो मितिलोकाचा भाग असतो किंबहुना मितिलोकाचा मितिकांना प्रतित होणारा भाग म्हणजे निसर्गलोक  होय माणसाला १ टक्का तरी मितिलोक प्रतित होतो का असा प्रश्न आहे निसर्गलोकांत समुद्र वायू वनस्पती प्राणी व्हायरस वैग्रे सर्व असतात    

५ आंबेडकरांचा मुख्य कन्सर्न  जीवलोक आहे  विशेषतः जीवलोकातील मानवी समाज आहे त्या समाजातील माणूस आहे विज्ञान सांगते कि ३ अब्ज ८० करोड वर्षांपूर्वी पृथ्वीवरील जीवलोकांचा organisms चा जन्म झाला मीतिकांच्यातील प्राणबद्ध असलेल्या मितिकांना जीव व जीवांच्या भवस्थांनांना  जीवलोक म्हणतात मनुष्य हाही एक जीव आहे सगळ्या होमोनची कॉमन आजी ६० लाख वर्षांपूर्वी व ३० लाख वर्षांपूर्वी होमो व ३ लाख वर्षांपूर्वी आफ्रिका , दक्षिण आशिया व कदाचित दक्षिण अमेरिकेतही आजच्या होमो सेपियनचा म्हणजे मनुष्याचा जन्म झाला आंबेडकरांच्या काळात आऊट ऑफ आफ्रिका थेरी जन्मली न्हवती पण माणसाचे गोत्र एक असावे असे अनेकांना वाटत होते आंबेडकर त्याला अपवाद न्हवते 

६ आंबेडकरांच्या काळात  प्रतिलोक युरोपात स्थिर झाला होता मितीकांनी विशेषतः जीवांनी  स्वतःच्या देहातून निर्माण केलेल्या घनस्थितींना  प्रतिमितीक म्हणतात व त्यांच्या भवस्थानांना प्रतिलोक ! चिमण्यांनी तयार केलेल्या घरट्यांपासून ते माणसांच्या मशिन्सपर्यंत अनेक गोष्टी प्रतिमितिके म्हणून आपल्या आसपास वावरत असतात

माझ्या मते आऊट ऑफ आफ्रिका हा सिद्धांत अपुरा आहे कारण तो अर्धसत्य सांगतो मी ह्यावर इतरत्र लिहिले आहेच माझ्या मते व्दिस्थलांतरे झाली आऊट ऑफ आफ्रिका सिद्धांत सांगते तसे एकच स्थलांतर झालेले नाही आफ्रिका व दक्षिण आशिया विशेषतः भारत ह्या दोन्ही भूगोलात होमो सेपियन्सचे कॉमन पूर्वज होते व दोन्हीकडे स्वतंत्रपणे होमो सेपियन विकसित झाला  साधारण शेवटून दुसऱ्यांदा झालेल्या हिमयुगात आफ्रिकेतून युरेशियात पहिले स्थलांतर झाले दक्षिण आशियातून हिमालय ओलांडून युरेशियात स्थलांतर झाले तिथे त्यांच्यासोबत पशुही स्थलांतर करत असताना त्या पशूंना माणसाळवण्याचा शोध लागून पशुपालनाचा शोध लागला होता त्यांनी श्रद्धा संघटित करायला सुरवात केली हे युग संपले तेव्हा हे मूळचे आफ्रिकन काळे होमो युरेशियन व रंगाने गोरे झाले होते तर दक्षिण आशियायी सावळे मंगोलियन पिवळे झाले होते ह्यांना परतण्याचा वेध लागला माझ्या मते रशियातून ह्या काळात दक्षिण आशियायी लोक अमेरिकेत गेले असावेत एका अर्थाने मूळ अमेरिकन ज्यांना म्हंटलं जाते ते मूळचे साऊथ एशियनस असण्याची बरीच शक्यता आहे 

इकडे आफ्रिका पश्चिम आशियात  तोवर शेतीचा शोध लागला होता तर दक्षिण आशियात शेतीबरोबरच मोक्षाचा शोध लागला होता व तो लावणाऱ्या भगवान शंकरांनी जीवन जगण्याची मोक्ष शैली विकसित केली जी आजही टिकून आहे आंबेडकरांना भगवान शंकरांनी दिलेल्या तंत्राविषयी निश्चित माहिती आहे  त्यांच्या पहिल्या निबंधात ही जाणीव होती कि शैवांची तंत्रश्रुती वेगळी आहे त्यांनी वैदिक श्रुती व तंत्र श्रुती हा फरक स्वीकारलेला होता (१९१५)  कलेक्टेड व्हॉल्युम्स व्हॉल्युम नम्बर चार पान ६८ वर ते लिहितात ,"What is the relation of the Tantras to the Vedas ? Kalluka Bhatta the well known commentator of Manu Smriti has no hesitation in assertingthat Shruti is two-fold- Vaidik and Tantrik—which means that the Vedasand the Tantras stand on equal footing. While the Vaidik Brahmins like Kalluka Bhatta admitted the equality of the Tantras to the Vedas, the authors of the Tantras went much beyond. They claimed that the Vedas, the Shastras, and the Puranas are alike a common woman, but the Tantras are like a highborn woman conveying thereby that the Tantrasare superior to the Vedas."

'पुढेही ह्याच खंडात THE RIDDLE OF TRIMURTI पान १६३ ६४ मध्ये ते दक्षाची कथा  सांगतात आणि निष्कर्ष काढतात "This shows that there was a time when Brahmins refused to recognize Shiva as the God to be worshipped or it shows that Shiva was against the Yajna system of the Brahmanas."

मग ते पुढे म्हणतात,"The difference between the Aryans and the Non-Aryans was cultural and not racial. The cultural difference centered around two points. The Aryans believed in Chaturvarna. The Non-Aryans were opposed to it. The Aryans believed in the performance of Yajna as the essence of their religion. The Non-Aryans have opposed Yajna. Examining the story of Daksha’s Yajna in the light of these facts it is quite obvious that Shiva was a Non-Vedic and a Non-Aryan God. The question is why did the Brahmins, the pillars of Vedic culture, adopt Shiva as their God?

त्यानंतर मग ते पौराणिक त्रिमूर्तीवर भाष्य करत जातात पण शिव अवैदिक व वर्णविरोधी आहे ह्याची त्यांना जाण आहे हे वरील दोन परिच्छेदावरून स्पष्ट व्हावे हे लिखाण करताना ते भांडारकरांच्यावर अतिअवलंबून आहेत  व सिंधू संस्कृतीचा लागलेला शोध व त्यातील निष्कर्ष त्यांना उपलब्ध नसावेत अर्थात ही काळाची मर्यादा त्यांची न्हवे ! नंतर ते बौद्ध धम्माकडे खेचले गेले 

ह्याचा अर्थ इतकाच कि आंबेडकर शैवांच्याविषयी व शंकराविषयी जाणतात तो वेदाच्या आधी म्हणजेच बुद्धाच्याही आधीचा आहे हेही त्यांना मान्य आहे 

७ चिन्हलोक हा माणसाचा सर्वात अलीकडचा लोक आहे जेव्हा पशुपालन व श्रद्धा ह्यांच्याबरोबरच भाषा विकसित व्हायला लागल्या तेव्हा भारतात झाडांच्या पानांवर तर आफ्रिकेत टॅब्लेट्सवर लिहिण्याची लिपी विकसित झाली मोक्षामुळे भारतीयांना शून्याचा शोध लागल्याने भारतात १ ते दहाच्या आधारे अंकगणित व भूमिती विकसित झाली इसवीसनपूर्व १०००० पासून अनेक गणांनी मिळून जागा ,  जगा जगवा व जगू द्या ह्या सुत्राधारे एक महागणपद्धत विकसित केली जी आवाक्याने एखाद्या साम्राज्याएवढी होती पण विस्ताराने साम्राज्य न्हवती तर इसवीसनपूर्व ५००० मध्ये आफ्रिकेत मात्र जगण्यासाठी वाढा व विस्तार करा ह्या सुत्राधारे साम्राज्य पद्धत उदयाला आली इजिप्त इराण इराक अरबस्थान वैग्रे देश हे ह्या काळात सांस्कृतिक दृष्ट्या आफिकी होते हे आपण लक्ष्यात घेतले पाहिजे 

साधारण ३५०० वर्षांपूर्वी युरेशियन लोक भारतात आश्रयाला आले त्यांनी पशुपालनातून आलेला स्वतःचा वैदिक  धर्म सोबत आणला ३००० वर्षांपूर्वी युरेशियन लोकांनी कपिलच्या नेतृत्वाखाली मोक्षाचा स्वीकार केला आंबेडकर बुद्ध आणि त्याचा धम्म ह्या ग्रंथात कपिलचा उल्लेख बुद्धावर सर्वाधिक प्रभाव टाकणारी व्यक्ती म्हणून करतात चिन्हलोक व संहिता नसत्या तर हा प्रभाव बुद्धांपर्यंत पोचलाच नसता हे आपण लक्ष्यात घेतलं पाहिजे 

(क्रमशः )

लेखक : श्रीधर तिळवे नाईक 












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती भाग १ ते २२