मोदी श्रीधर तिळवे नाईक मोदी , खोटे बोलणे आणि धर्मराज्यकारण श्रीधर तिळवे नाईक सध्या मोदींच्या खोटं बोलण्याविषयी बरीच चर्चा होते आहे ह्या अनुषंगाने काही मुद्दे मांडतो आहे अज्ञान , हितसंबंधपणा , अडाणीपणा आणि बढाईखोरपणा ह्यातून अनेक प्रकारचे खोटे जन्मत असते पुरोहीत आणि राजकारणी लोक अनेकदा ह्या चार अवगुणांचे सामुदायिक प्रदर्शन करत असतात त्यातूनच अनेक धार्मिक आणि राजकीय दंतकथांची निर्मिती होते स्वतःला देवाचा अवतार म्हणणारा राजकारणी आणि आम्हीच भूदेव म्हणणारे पुरोहीत हे सारख्याच मुशीचे असतात खोटेपणा हा अनेकदा दोघांच्या धंद्याचा भाग असतो जनता ह्यांच्यावर भाबडेपणाने का विश्वास ठेवते हे अगम्य कोडे आहे ह्या खोटेपणाचं काही प्रकार असतात १ गोष्टी फुगवून सांगणे ह्यात तथ्य अतिशयोक्ती करून सांगितले जाते उदा नेहरू घराण्याचा स्वातंत्र्य आंदोलनातील सहभाग विशेषतः इंदिरा गांधींच्या संदर्भात २ तथ्याला काल्पनिकतेचि जोड देणे ह्यात तथ्य थोडे असते पण त्याच्या आधारावर काल्पनिक गोष्ट सांगणे म्हणजे अटल बिहारी वाजपेयीनीं इंदिरा गांधींना दुर्गा म्हंटले प्रत्यक्षात...
पोस्ट्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वैचारिक बायोडाटा मी कम्म्युनिस्ट आहे का ? नसेन तर मग मी काय दृष्टीचा माणूस आहे ? श्रीधर तिळवे नाईक चं प्र देशपांडे ह्यांनी माझ्या एका पोस्टला कमेंट देतांना मुळात मी कम्म्युनिस्ट आहे असं तर उद्या तिळवे म्हणणार नाहीत ना अशी शंका व्यक्त केली आहे ते म्हणतात." Champra Deshpande : या मार्गाचे माझे कवडीचे वाचन वा ज्ञान नसल्याने, खरेच, काहीच कळले नाही -- पण एक सुप्त भीती निर्माण झाली की सालं मुळात मी एक कम्युनिस्ट आहे असे तर उद्या तिळवे म्हणणार नाहीत ? ! " ही शंका माझ्याबाबत अनेकदा अनेकांनी व्यक्त केलेली आहे म्हणून मी इथे त्याचे उत्तर देतो आहे. ह्या उत्तराआधी सर्वात प्रथम एक खुलासा मी संन्यासी आहे आणि भारतीय शैव परंपरेनुसार संन्याशाची बांधिलकी ही फक्त लोकांशी व लोककल्याणाशी असली पाहिजे राज्यकर्त्यांशी नाही मी ही गोष्ट मानतो त्यामुळेच कुठल्या वादाकडून आणि व्यक्तीकडून काय कामे झाली पाहिजेत ह्याचे सुस्पष्ट आकलन माझ्या डोक्यात असते आणि मी त्याप्रमाणे कार्य करतो आणि शक्य असेल तर करवून घेतो म्हणजे अगदी एखादे व्यक्तिमत्व साहित्य-संपादक असेल तर त्याच्य...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बुद्ध , आंबेडकर आणि निर्वाण श्रीधर तिळवे नाईक चं प्र देशपांडे ह्यांनी माझ्या कवितेच्या अंगाने उपस्थित केलेल्या प्रश्नानुसार मी हे लेखवजा टिपण लिहितोय देशपांडे म्हणतात चं प्र देशपांडे : Champra Deshpande ते भारताचे ठीक -- मुळात आंबेडकरांनी दिलेल्या बौद्ध धर्मात ' निर्वाण ' आहे का हीच मला उत्सुकता आहे. कुणीही यावर काही बोलत नाही ! श्रीधर तिळवे नाईक :सर्वात पहिली गोष्ट म्हणजे माझे निर्वाण मला १२ वीला प्राप्त झालेल्या आकस्मिक सविकल्प समाधीवर आधारित आहे बुद्ध वैग्रे नंतर आयुष्यात आलेत तेव्हा प्रत्यक्ष बुद्ध जरी मला म्हणाला असता निर्वाण वैग्रे मी काही सांगितलेलं नाही तर मी म्हणालो असतो ठीक आहे सर तुमचा अनुभव असेल पण माझा अनुभव असाच आहे कि निर्वाण आहे आंबेडकर काय म्हणतात ह्याचा ह्या कवितेशी काय संबंध ? तरीही कुणीही यावर काही बोलत नाही असं तुम्ही म्हणताय म्हणून माझ्या मर्यादित वाचनानुसार बोलतो बुद्ध आणि त्याचा धम्म ह्या ग्रंथात आंबेडकरांनी निर्वाण मान्य केले आहे असे दिसते मात्र बुद्धाची पुनर्जन्म व कर्मफलसिद्घान्त थेरी त्यांनी अमान्य के...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भालचंद्र नेमाडे आणि गौर बंजारा : शैवांचे चलवाणी श्रीधर तिळवे नाईक अलीकडे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात पिंपरी चिंचवडमधील भोसरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला गेला आहे. नेमाडे यांनी त्यांच्या ‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ या पुस्तकामध्ये बंजारा समाजाबाबात आक्षेपार्ह लिखाण केल्याचा हा आरोप आहे. अॅड. रमेश राठोड यांनी ही तक्रार दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . नेमाडे ह्यांच्यावर झालेल्या केसने सध्या गौर बंजारा समाज हा एकदम प्रकाशात आला आहे नेमाडे ह्यांची कुलदेवता शैव असली तरी सध्या अनेक शैव खत्तीयांच्याप्रमाणे त्यांनाही वैष्णव क्षत्रीयपण चढल्याने त्यांनाही त्याचा विसर पडलेला आहे साहजिकच हिंदूंमधील बंजारा सन्दर्भातील मजकूर हा थोडा गाफीलपणे आला आहे लोकशाहीत ह्या समाजाला अचानक खूपच महत्व प्राप्त झालेले आहे कारण ह्या समाजाची लोकसंख्या ! त्यांची संख्या साधारण पाच करोड असावी असा अंदाज आहे . मला स्वतःला ह्या समाजाविषयी पर्सनल जिव्हाळा आह...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मीडियालॉजी श्रीधर तिळवे नाईक मीडियालॉजी ही आजच्या जगाच्या जगाची एक दार्शनिक आवश्यकता आहे आणि ज्यांना आपण काय अपलोड करतोय , पोहचवतोय कसं केव्हा कुठे आणि कुणासाठी पोहचवतोय सादर करतोय आणि मेंदूत डाउनलोड करतोय ह्याविषयी थोडा कन्सर्न आहे त्यांच्यासाठी मीडियालॉजी अपरिहार्य आहे प्रतिसृष्टीत मिडिऑकर लोकांचा जसा सुळसुळाट होता तसाच सुळसुळाट आता मेडियॉकर लोकांच्यामुळे झाला आहे ज्यांना मिडिऑलॉजीशी काही देणेघेणे नाही आणि मीडिया हा ज्यांच्यासाठी फक्त धंदा आहे मीडिया हा एक व्रत असण्याचा प्रबोधनात्मक कालखंड लयाला गेला आहे कारण मीडिया हा आता प्रचंड भांडवली इन्व्हेस्टमेंट मागतो पण म्हणून धंदेवाईकच व्हायला हवं असं नाही व्यावसायिक होऊनही प्रॉफिट कमावता येतो पण दुर्देवाने आज हे पटण्याचा आणि पटवण्याचा काळही रसातळाला चाललाय आणि एकदा का रसाच्या तळाला तुम्ही गेला कि रसाची गुणवत्ता नाहीशी होते आणि अक्षस तापस सात्विक भाव पोकळ बनत जातात आणि बुद्धिमत्ता प्रयोग करायला प्रायोगिक बनायला घाबरायला लागते इनोव्हेशन्स थांबतात इन्व्हेन्शन्स पेन्शन घ्यायला लागतात आणि समांतरता बधिर व्हायला लागत...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शैव आणि बरंच काही श्रीधर तिळवे नाईक शैवांची अवतरणे आणि वैदिकांचे अवतार श्रीधर तिळवे नाईक गेली काही शतके ज्या काही गोष्टींचा प्रचार शिव धम्माबाबत होतो आहे त्यापैकी एक म्हणजे शैवांच्यात अवतार ही संकल्पना थेट प्राचीन काळापासून आहे वस्तुस्थिती काय आहे अवतरण ही संकल्पना शैवांना प्राचीन काळापासून माहीत आहे आणि गंगेचे अवतरण प्रसिद्धही आहे पण मूळात अवतरण ही संकल्पना काय आहे शैव अनेकदा मत्स्य ,कासव वा वराह ह्यांचे पूजन करत असल्याने हा गोंधळ झालेला आहे शैवांच्यात माणसाची आठ अवतरणे मानली आहेत माणूस गर्भात असतो तेव्हा माशासारखा गर्भात तरंगत असतो त्यामुळे मत्स्य हे पहिले अवतरण तो बाहेर आला कि कासवासारखा रांगायला लागतो पुढे थोडा तो वाढल्यावर डुकरासारखा कुठेही रांगत रांगत हुंदडायला लागतो मग तो सिंहासारखा दोन हात दोन पाय ह्यांचा परफेक्ट तोल सांभाळत रांगायला लागतो मग हळूहळू तो स्वतःच्या बळाने उभा राहतो आपण त्याला कौतुकाने बली म्हणतो मग तो हाताने वस्तू पकडायला शिकतो परसापर्यंत एकटाच जायला शिकतो म्हणून त्याला परश म्हणतात आणि मग हळूहळू तो आपल्या मागच्या पिढ्...
राजा राम मोहन रॉय आदिम शैव ते आदिम हिंदू : हिंदुवादाची पहिली सांस्कृतिक उडी श्रीधर तिळवे नाईक
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
राजा राम मोहन रॉय आदिम शैव ते आदिम हिंदू : हिंदुवादाची पहिली सांस्कृतिक उडी श्रीधर तिळवे नाईक आज सर्व आर्य राजा राममोहन रॉय ह्यांना भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणत असले तरी प्रत्यक्षात राजा राम मोहन रॉय (१७७२ ते १८३३)ह्यांचे भारतीय संस्कृतीतील केऑटिक स्थान हे अजूनही विश्लेषणाच्या कक्षांत आलेलं नाही हिंदुइझम (म्हणजेच हिंदुवाद ) हा शब्द त्यांनी वापरला हेसुद्धा अनेकांना माहित नाही दुसऱ्या अकबराने त्यांना राजा हे टायटल दिले असल्याने हिंदुत्ववादी हल्ली ते वापरत नाहीत व विकिपिडीयावर त्यांचा उल्लेख राममोहन रॉय असा होतो सती व बालविवाह ह्यांना त्यांनी विरोध केला असे आपण आपल्या पाठ्यपुस्तकातून वाचत असतोच मात्र राममोहन रॉय ह्यांनी जातिव्यवस्थेला सुरवातीला कडक विरोध केला होता हे मात्र आपणाला सांगितलं जात नाही प्रत्यक्षात सांगितलं जातं त्यापेक्षा रॉय ह्यांचे व्यक्तिमत्व प्रत्यक्षात फार गुंतागुंतीचे होते रॉय ह्यांच्यानंतर अनेकांनी हिंदुइजम हा शब्द वापरला आणि त्याबद्दल सुरवातीच्या काळापासून कोलाहल होता उदाहरण म्हणून रा ना दांडेकर घेऊ रा ना द...