मीडियालॉजी श्रीधर तिळवे नाईक
मीडियालॉजी ही आजच्या जगाच्या जगाची एक दार्शनिक आवश्यकता आहे आणि ज्यांना आपण काय अपलोड करतोय , पोहचवतोय कसं केव्हा कुठे आणि कुणासाठी पोहचवतोय सादर करतोय आणि मेंदूत डाउनलोड करतोय ह्याविषयी थोडा कन्सर्न आहे त्यांच्यासाठी मीडियालॉजी अपरिहार्य आहे प्रतिसृष्टीत मिडिऑकर लोकांचा जसा सुळसुळाट होता तसाच सुळसुळाट आता मेडियॉकर लोकांच्यामुळे झाला आहे ज्यांना मिडिऑलॉजीशी काही देणेघेणे नाही आणि मीडिया हा ज्यांच्यासाठी फक्त धंदा आहे मीडिया हा एक व्रत असण्याचा प्रबोधनात्मक कालखंड लयाला गेला आहे कारण मीडिया हा आता प्रचंड भांडवली इन्व्हेस्टमेंट मागतो पण म्हणून धंदेवाईकच व्हायला हवं असं नाही व्यावसायिक होऊनही प्रॉफिट कमावता येतो पण दुर्देवाने आज हे पटण्याचा आणि पटवण्याचा काळही रसातळाला चाललाय आणि एकदा का रसाच्या तळाला तुम्ही गेला कि रसाची गुणवत्ता नाहीशी होते आणि अक्षस तापस सात्विक भाव पोकळ बनत जातात आणि बुद्धिमत्ता प्रयोग करायला प्रायोगिक बनायला घाबरायला लागते इनोव्हेशन्स थांबतात इन्व्हेन्शन्स पेन्शन घ्यायला लागतात आणि समांतरता बधिर व्हायला लागते लडाई उरते ती व्यावसायिक आणि धंदेवाईक ह्यांच्यात ! आणि ह्या लढाईत जेव्हा व्यावसायिक नीतिमत्ताही हरायला लागते तेव्हा पेड न्यूज स्पॉन्सर्ड न्यूज फेक न्यूज ह्यांचा उदय होऊन सर्वत्र त्यांचाच गवगवा व्हायला लागतो आणि पोस्ट्रुथ युगाचा आरंभ होतो
अशावेळी मीडियाला एका नीतिमत्तेच्या दालनात आणून सत्याग्रहाची चळवळ उभी करायला लागते प्रत्येक चॅनेलची एक लिखित वा अलिखित मीडियालॉजी असतेच पण ती नेमकी काय आहे तिचे स्वरूप काय आहे ती सत्याग्रही आहे कि फेकॉलॉजीची गटारगंगा आहे हे तपासायला लागते मीडियालॉजी हे काम करते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा