पोस्ट्स

भाजप लेबलसह पोस्ट दाखवत आहे

notes d

हिंदुत्ववादाचे चार चेहरे श्रीधर तिळवे नाईक अंतिमतः हिंदुत्ववाद हा निगमीं आहे आणि निगमवादाचे चार चेहरे हिंदुत्ववादात आहे १ वैदिक हिंदुत्ववाद जो आर्य समाजाने मांडला  २ ब्राम्हणी हिंदुत्ववाद जो विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी अंकुरित केला व लोकमान्य टिळकांनी ज्याला आइडिओलॉजीचे प्रारूप दिले  ३ वैष्णव हिंदुत्ववाद जो प्रबोधनकार टिळकांनी मांडला  ४ शैव हिंदुत्ववाद जो साठोत्तरीतल्या काही शैव धर्मियांनी मांडला व जो अलीकडे मोदींच्यामुळे राजकीय वस्तुस्थिती बनला सावरकर हे वैदिक हिंदुत्ववादी आहेत तर टिळक ब्राम्हणी हिंदुत्ववाद मांडतात प्रबोधनकार ठाकरे क्षात्र वैष्णव हिंदुत्ववाद मांडतात तर मुखर्जी शाक्त हिंदुत्ववाद मांडतात शाक्त हिंदुत्ववादाला काडीचाही प्रतिसाद मिळणे शक्य न्हवते कारण शैव निगमांच्यात फिट्ट बसूच शकत नाही अनेक शैव विचारवंत स्वतःला हिंदू आदिम हिंदू वैग्रे म्हणवून घेतात तेव्हा आपण हिंदूपणात फिट बसू अशी त्यांना आशा असते मुखर्जीनांही ही  आशा होती पण प्रत्यक्षात ती फळली नाही कारण अंतिमतः वैष्णव व हिंदू धर्म ही निगमांची निर्मिती आहे ती शेवटी ब्राह्मणवादा...