notes d

हिंदुत्ववादाचे चार चेहरे श्रीधर तिळवे नाईक

अंतिमतः हिंदुत्ववाद हा निगमीं आहे आणि निगमवादाचे चार चेहरे हिंदुत्ववादात आहे १ वैदिक हिंदुत्ववाद जो आर्य समाजाने मांडला  २ ब्राम्हणी हिंदुत्ववाद जो विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी अंकुरित केला व लोकमान्य टिळकांनी ज्याला आइडिओलॉजीचे प्रारूप दिले  ३ वैष्णव हिंदुत्ववाद जो प्रबोधनकार टिळकांनी मांडला  ४ शैव हिंदुत्ववाद जो साठोत्तरीतल्या काही शैव धर्मियांनी मांडला व जो अलीकडे मोदींच्यामुळे राजकीय वस्तुस्थिती बनला

सावरकर हे वैदिक हिंदुत्ववादी आहेत तर टिळक ब्राम्हणी हिंदुत्ववाद मांडतात प्रबोधनकार ठाकरे क्षात्र वैष्णव हिंदुत्ववाद मांडतात तर मुखर्जी शाक्त हिंदुत्ववाद मांडतात शाक्त हिंदुत्ववादाला काडीचाही प्रतिसाद मिळणे शक्य न्हवते कारण शैव निगमांच्यात फिट्ट बसूच शकत नाही अनेक शैव विचारवंत स्वतःला हिंदू आदिम हिंदू वैग्रे म्हणवून घेतात तेव्हा आपण हिंदूपणात फिट बसू अशी त्यांना आशा असते मुखर्जीनांही ही  आशा होती पण प्रत्यक्षात ती फळली नाही कारण अंतिमतः वैष्णव व हिंदू धर्म ही निगमांची निर्मिती आहे ती शेवटी ब्राह्मणवादाचेच पाय पकडते असो  सावरकर ज्या एका विशिष्ट जनेसिस मधून हिंदुत्व मांडतात त्या जेनेसिसचा घेतलेला हा आढावा भाजपमध्ये साधू आणि साधव्या अटळ का आहेत ? श्रीधर तिळवे नाईक
----------------------------------------------------------------------------------------------------------

जेव्हा एखादी विचारप्रणाली एखादा विचारप्रणालीकार मांडतो तेव्हा त्याला केवळ प्रॉब्लेम मांडून चालत नाही तर त्या प्रॉब्लेमचे सोलुशनही द्यावे लागते एकदा पुण्यभूची मांडणी केल्यानंतर साहजिकच सावरकरांच्या सांस्कृतिक राष्ट्रवादातून पारशी ज्यू ख्रिस्चन आणि मुस्लिम आउटसायडर होतात आणि त्यांचे काय करायचे हा प्रश्न निर्माण होतो हिंदू वेदांती शैव लिंगायत जैन बौद्ध वैदिक वैष्णव शीख वैग्रे भारतात जन्मलेले सर्वच धर्म सावरकर हिंदू मानतात आणि हिंदुस्तानात न जन्मलेले अहिंदू ! साहजिकच ह्या अहिंदू धर्मियांचे करायचे काय हा प्रश्न येतो सावरकर ह्या प्रश्नाचे उत्तर घरवापसी आंदोलन असं देतात हे धर्मांतरित झालेले सर्व लोक मूळचे हिंदूच असल्याने त्यांना पुन्हा धर्मात आणावे असे ते सुचवतात साहजिकच हे करायला हिंदुत्ववाद्यांना कट्टर साध्वी आणि साधू लोक हवेतच जे हे घरवापसी आंदोलन जोमाने चालवतील त्यामुळेच भाजप सर्व साधू साध्वी बापू ह्यांचा ताफा बाळगतो मात्र ह्या घरवापसी आंदोलनाला काडीचंही यश मिळालेले नाही भाजपच्या लोकांना सर्वच आघाडीवर अपयश मिळालं तेच इथेही !


सावरकरांनी मांडलेली ही घरवापसीची संकल्पना योगी आदित्यनाथ जोरदारपणे मांडत असले तरी अमंलबजावणीच्या पातळीवर मिळालेलं यश नगण्य आहे मुळात अशा कामांना जबरदस्त मिशनरी कामाची गरज लागते दुसरे एक हिंदुत्ववादी ह्यांनी प्रबोधनकार ठाकरे ह्यांनीही त्यादृष्टीने हिंदू मिशनरी संघ नावाची संस्था चालवली होती मुळात मिशनरी कामाची सुरवात ही स्वामी दयानंद सरस्वतींनी केली होती आणि वैदिक हिंदुत्ववादाची सुरवातही त्यांनीच केली होती पण आरएसएस ला आर्य समाजाइतके यश का मिळाले नाही हिंदुत्ववाद्यांनी मिशनरी स्कूल्स आणि कॉलेजीस मोठ्या प्रमाणावर का चालू केली नाहीत ? ह्याबाबत जे यश गांधीजींना मिळाले ते सावरकर आणि आंबेडकर ह्यांना का मिळाले नाही ? उत्तर एकच ह्यांचे बहुतांशी अनुयायी मिशनरी कामाबाबत कामचोर होते बौद्धिक चर्चा करण्यातच ह्यांना अधिक रस होता ह्यातून एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे रॅशनॅलिस्ट लोकांचे  अनुयायी मिशनरी कामाला नालायक असतात काय ? जे यश बुद्ध , झिझस किंवा गांधी ह्यांना मिळाले ते इतरांना का मिळू नये ?

मिशनरी कामासाठी करुणा किंवा भक्ती मुळात नेत्याच्या अंतकरणात असावी लागते नाहीतर फेकू नेते तयार होतात आणि फेकू लोकांचे फेकू भक्तही मिशनरी कामही फेकायला लागतात सावरकरांना काही जाज्वल भक्त लाभले खरे पण त्यातून गांधिजिंच्याप्रमाणे जो एक कार्यकर्त्यांचा मोहोळ निर्माण व्हायला हवा होता तो निर्माण झाला नाही त्यांची ही उणीव संघाने भरून काढली संघाचे कार्यकर्ते हे जबरदस्त आहेत पण त्यातून घरवापसीचे प्रचंड मोठे आंदोलन का निर्माण झाले नाही जर तुमच्या नेत्याने तुम्हाला एक कार्यक्रम दिलेला आहे तर तो तुम्ही तो सर्वस्व पणाला लावून अंमलात का आणला नाही ? सावरकरांनी वर्ण आणि जात ठामपणे नाकारलेत कारण घरवापसी सिद्ध करायची असेल तर वर्णजात पाळणे अशक्य आहे हे त्यांना माहित होते सावरकरांच्या इतकी ठामपणे वर्णजात नाकारणे संघाला अशक्य होते आहे का ?

घरवापसी हा भाजपचा सैद्धांतिक अजेंडा आहे मग ते काहीही म्हणोत ह्या अजेंड्याला तात्विक विरोध करणे अशक्य आहे कारण धर्मांतर हा बौद्ध , इस्लाम व ख्रिश्चन धर्माचा अजेंडा आहे ही लढाई धार्मिक स्पेस कुणी किती बळकावयाची त्याची आहे आणि ती सर्वांनाच लढायची आहे बौद्धांना सर्व भारत बौद्ध करायचा आहे मुस्लिमांना मुस्लिम तर ख्रिश्चनांना ख्रिश्चन ह्याला उत्तर म्हणून हिंदू ह्या लढाईत उतरलेले आहेत आणि साध्वी आणि साधू त्यासाठी हवे आहेत त्यामुळे विचारवंतांनी कितीही बोंबा मारल्या तरी साधू आणि साधव्या ह्या भाजपमध्ये अटळ आहेत यूरोपमध्ये ख्रिश्चन पुरोहित राजकारणात मोठ्या प्रमाणात आहेत मुस्लिम कन्ट्रीतही मुस्लिम पुरोहित आहेतच म्हणूनच मी म्हणतो जोवर सर्व धर्म लय पावत नाहीत तोवर हे अटळ आहे

श्रीधर तिळवे नाईक












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट