पोस्ट्स

AMBEDKAR लेबलसह पोस्ट दाखवत आहे
आंबेडकर जयंतीनिमित्त श्रीधर तिळवे नाईक हिंदुत्ववादी राष्ट्रवाद , वैष्णववादी काँग्रेसी राष्ट्रवाद , मुस्लिम लीगचा इस्लामिक राष्ट्रवाद ह्या तीन पर्यायांपैकी मुस्लिम लीगमुळे पाकिस्तान आणि बांगला देश निर्माण झाले आहेत आता मारामारी सुरु आहे ती हिंदुत्ववादी राष्ट्रवाद  आणि  वैष्णववादी काँग्रेसी राष्ट्रवाद ह्यांच्यात ! गोखले रानडे टिळक गांधी ह्या सर्व डेमोक्रेटिक वैष्णवांनी  वैष्णवांचा धर्मग्रंथ "गीता "ही समस्त हिंदूंच्या डोक्यावर आणि डोक्यात हिंदूंचा धर्मग्रंथ म्हणून ठेवली हिंदूंच्यातही शैव हिंदू आणि शाक्त हिंदू नावाचे वैष्णवांच्याइतकेच मेजर सम्प्रदाय आहेत हे सोयीस्कररीत्या विसरून ! त्यातून वर्णजातीवाद उफाळणे अटळ होते पुढे काँग्रेसचे सगळे राजकारणच नेहरूंचा लोकायतवादी नास्तिक कालखंड वगळता वर्णजातिनिष्ठ मतांच्या आकडेवारीवर बेतलेले झाले अशावेळी सर्वाधिक आवश्यकता होती ती आगमनिष्ठ राष्ट्रवादाची असा राष्ट्रवाद समग्रपणे मांडण्याची ताकद त्या काळात फक्त एकाच विचारवंतात होती तो विचारवंत  म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ! भारतीय प्रबोधनाची सुरवात बसवेश्वरांच्या पासून झाली आणि...