मोदी श्रीधर तिळवे नाईक 

मोदी , खोटे बोलणे आणि धर्मराज्यकारण श्रीधर तिळवे नाईक 

सध्या मोदींच्या खोटं बोलण्याविषयी बरीच चर्चा होते आहे ह्या अनुषंगाने काही मुद्दे मांडतो आहे 

अज्ञान , हितसंबंधपणा , अडाणीपणा आणि बढाईखोरपणा ह्यातून अनेक प्रकारचे खोटे जन्मत असते पुरोहीत आणि राजकारणी लोक अनेकदा ह्या चार अवगुणांचे सामुदायिक प्रदर्शन करत असतात त्यातूनच अनेक धार्मिक आणि राजकीय दंतकथांची निर्मिती होते स्वतःला देवाचा अवतार म्हणणारा राजकारणी आणि आम्हीच भूदेव म्हणणारे पुरोहीत हे सारख्याच मुशीचे असतात खोटेपणा हा अनेकदा दोघांच्या धंद्याचा भाग असतो जनता ह्यांच्यावर भाबडेपणाने का विश्वास ठेवते हे अगम्य कोडे आहे ह्या खोटेपणाचं  काही प्रकार असतात 

१ गोष्टी फुगवून सांगणे ह्यात तथ्य अतिशयोक्ती करून सांगितले जाते उदा नेहरू घराण्याचा स्वातंत्र्य आंदोलनातील सहभाग विशेषतः इंदिरा गांधींच्या संदर्भात 

२ तथ्याला काल्पनिकतेचि जोड देणे ह्यात तथ्य थोडे असते पण त्याच्या आधारावर काल्पनिक गोष्ट सांगणे म्हणजे अटल बिहारी वाजपेयीनीं इंदिरा गांधींना दुर्गा म्हंटले प्रत्यक्षात वाजपेयीनीं कौतुक केले हे तथ्य आहे पण त्याच्या आधारे पुढे काल्पनिक विस्तार केला गेला आहे 

३ कल्पित गोष्टी रचणे ह्यात न घडलेल्या गोष्टी कल्पनेच्या साहाय्याने रचून सांगितल्या जातात भारतीय इतिहासात नरेंद्र मोदींच्याबाबत हे घडताना दिसते ह्यामध्ये पाच कारणांच्या शक्यता आहेत 

१ मोदी स्वतः डिंगमारू आहेत त्यातून बोलताना ते वहावत जात असावेत 

२ मोदी पंतप्रधान असल्याने त्यांची भाषणे लिहून देणारी टीम असावी ती टीम डिंगमारू आहे आणि ती हे सर्व करते आहे 

३ प्रत्यक्षात जे घडते आहे त्याकडे लक्ष्य जाऊ नये म्हणून अत्यंत जाणीवपूर्वक मोदी अशी विधाने करतायत 

४ प्रत्यक्षात जे घडते आहे त्याकडे लक्ष्य जाऊ नये म्हणून अत्यंत जाणीवपूर्वक मोदींची भाषणे लिहून देणारी टीम हे करते आहे 

५ पाचव्या शक्यतेचा विचार होत नाही म्हणून ती थोडी तपशीलवार देतो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात इमोशनल बॉण्ड निर्माण होणे फार आवश्यक मानले जाते आणि त्यासाठी किंचित खोटेपणा करावा लागला तर ती संबंधनीती मानली जाते मोदी संबंधनीती म्हणून खोटं बोलत असावेत का ? म्हणजे बांग्लादेशासाठी झालेल्या सत्याग्रहात मी भाग घेतला होता असं म्हंटल कि समोरच्या ऐकणाऱ्याच्या मनात वक्त्यांबरोबर एक इमोशनल बॉन्ड निर्माण होतो माझ्या मते ह्या कारणाचा मोदींच्या खोटं बोलण्यात नक्कीच वाटा आहे दुर्देवाने पंतप्रधान ह्या पोस्टसाठी हे साजेसे नाही आणि म्हणूनच ते खटकत राहते मोदींच्यासमोरचा प्रॉब्लेम असा आहे कि मग बॉण्ड निर्माण कसा करायचा ऐतिहासिक पातळीवर काँग्रेसजवळ अनेक स्पेशल घटना त्याही खऱ्याखुऱ्या असल्याने त्यांच्या नेत्यांच्यावर ही पाळी येत नाही उदाहरणार्थ उद्या राहुल गांधी पंतप्रधान झाले तर त्यांना सांगण्यायोग्य अनेक गोष्टी आहेत उदा त्यांच्या आजीचे बांग्लादेशनिर्मितीमागचे योगदान ! मोदींच्या पार्टीजवळ अशा जिव्हाळ्याच्या घटना नाहीत आणि त्यातून त्यांची गोची झालेली स्पष्ट दिसते मग ह्या बांगला देश युद्धाच्या वेळी संघाने केलेल्या निदर्शनाचा ते आधार घेतात वास्तविक भाजपला हे सर्व करण्याची गरज नाही जेव्हा आपल्याजवळ इतिहास नसतो तेव्हा समोरच्याच्या इतिहासाचे कोडकौतुक करून हा इमोशनल बॉण्ड बनवता येतो पण अहंकार ही अशी गोष्ट आहे कि तो आंधळा होतो आणि हा मार्ग दिसायचा बंद होतो सर्वच गोष्टी स्वतःशी जोडून घेण्याची खोड ही माणसाला नार्सिसिस्ट बनवते मोदींच्या बाबतीत ही प्रक्रिया सुरु झालेली आहे लोकांना मोदींचा हा नार्सिसिझम आवडतो तोवर हे निवडणुकीसाठी फायद्याचे आहे पण दिसते असे कि लोकांना ह्या आत्मप्रेमाचा आता कंटाळा आलाय त्यातलं नावीन्य संपलं आहे त्यामुळे साहजिकच लोकांची एन्टरटेनमेन्ट करण्याची त्यांची क्षमता ढिली पडायला लागलीये त्यामुळेच लोकांनी गर्दी करणे कमी केले आहे दुर्देव असे कि विरोधकांच्याजवळ मोदींच्या तुलनेत एकमताने उभे राहू शकेल असे नेतृत्वच नाही माझं स्वतःचं स्पष्ट मत असं आहे कि शशी थरूर किंवा अरविंद केजरीवाल ह्यांना पंतप्रधान व राष्ट्रीय नेतृत्व म्हणून विरोधकांनी उभं करावं व शरद पवार व मनमोहनसिंग ह्यांना भीष्माचार्य म्हणून सादर करत  गृहमंत्री व अर्थमंत्री म्हणून भारतभर फिरवावे राहुल गांधी ही आजही रिस्कच आहे ती येत्या निवडणुकीत घेऊ नये २०२५ नंतर राहुल गांधींचा नव्याने विचार करावा तरच मोदींच्या अशा बोलण्याला छेद बसेल अन्यथा मोदी जर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर पंतप्रधान ह्या पदाची शान धोखाक्षेत्रात वावरत राहील आणि ह्या चर्चा पुन्हा पुन्हा कराव्या लागतील 

मला असेही वाटते कि जसा राजा तशी भाषणे लिहून देणारी टीम असे अनेकदा घडते मोदींच्याबाबत असे घडत असेल तर त्यात आश्चर्य नाही 

मी वर दिलेल्या पाच शक्यतांपैकी मला स्वतःला दुसरी शक्यता प्रचंड प्रमाणात शक्य आहे असे वाटते कारण बहुतांशी पंतप्रधानपदाची भाषणे ही लिखित स्वरूपात दिली जातात प्रश्न इतकाच आहे कि अतिशयोक्तीचा व काल्पनिकतेचा फ्लेवर मोदी स्वतः ऍड करतात कि तो मूळ भाषणातच असतो ? ह्यासंदर्भातले सत्य सद्या कळणे अशक्य आहे जोपर्यंत ही टीम किंवा मोदी ह्यासंदर्भात काही खुलासा करत नाही 

दुसरी गोष्ट धर्म ही गोष्टच मुळी काल्पनिक गृहीतकांच्या व कथांच्या आधारे उभी असते आणि लोक ह्या काल्पनिक गोष्टींच्यावर श्रद्धा ठेवत असल्याने श्रद्धेच्या क्षेत्रात हे प्रश्न न्हेऊन धर्मराज्ये त्यांना अबाधितपणाचा दर्जा देतात पुढे पुढे धार्मिक लोकांना ह्या श्रद्धेय गोष्टींची इतकी सवय होऊन जाते कि काल्पनिक आणि वास्तविक ह्यांच्यातील अंतर लोप पावते हा अंतरलोप मोक्षाच्या मार्गावरचा सर्वात मोठा अडथळा असतो त्यामुळेच गौतम बुद्धाने कलेवर बंदी घातली होती कला ही ह्या थापेबाजीचे मूळ असल्याने कलाच उखडली कि ह्या असत्याच्या फांद्या आपोआप गळून पडतील असे त्याला वाटत होते व्यवहारात मात्र जैन बौद्ध धर्मानी इतकी थापेबाजी केली कि स्वर्ग किती नरक किती ह्यासारखे फालतू वाद ह्या दोन्ही धर्मात बोकाळले पुरोहितांच्याबरोबर  राजकारणी लोकांनाही  थापेबाजीसाठी अनेकदा धर्म आवश्यक वाटू शकतो जगातल्या सर्वच धर्मराज्यांचा आधार थापेबाजी असतो अनेकदा ही थापेबाजी अधिकृत धोरण बनते आणि मग ज्याला धर्माने कलियुग म्हंटले आहे ते अवतरते 

शैवांच्यात पाचही युगे ही अंतर्गत असतात पुढे ती बहिर्गतात प्रवेश करतात असं मानलं जातं पंचयुगात वा शिवयुगात सत्य अहिंसा अचौर्य सुयोग्य कामवासना व अपरिग्रह हे पाचही खांब मजबूत असतात चतुर्थयुगात वा सत्ययुगात सत्य अहिंसा अचौर्य सुयोग्य कामवासना शाबूत राहतात व अपरिग्रह कोसळते टोळ्या साठवायला शिकतात कारण दुष्काळ पुढे त्रियुगात सत्य अहिंसा  सुयोग्य कामवासना शाबूत राहतात आणि टोळ्या एकमेकांच्या अन्नधान्याची चौर्यचोरी करायला लागतात एकमेकांच्या क्षेत्रावर आक्रमण करायला लागतात  पुढे द्वियुगात सत्य अहिंसा  ही दोनच टिकतात व टोळ्या एकमेकांच्या स्त्रिया पळवायला लागतात कारण लढण्यासाठी आणि शेतीच्या कामासाठी अधिकाधिक लोकसंख्या आवश्यक बनते सुयोग्य कामवासना लोप पावते जिंकलेल्या स्त्रियांना गुलाम बनवले जाते पुढे एकयुगात फक्त सत्य टिकते आणि अहिंसेचा लोप होऊन हिंसा रोजची घटना बनते प्रत्येक गोष्टीवरून आपापसात मारामाऱ्या व्हायला लागतात भावंडे एकमेकांची शत्रू बनतात कलियुगात सत्यही टिकत नाही सगळे एकमेकांशी खोटं बोलायला लागतात पंतप्रधान खोटं बोलायला लागणे हे घोर कलियुग आहे असे मानावयाचे काय ?मीडिया खोटं बोलायला लागलाय हेही घोर कलीयुगाचे लक्षण मानायचे काय ? शैवांच्यात दंडनीती करणाऱ्याने पंचयुग आणण्याचा प्रयत्न करायला हवा अशी स्पष्ट धारणा आहे जर दंडनीती करणारा हे करणार नसेल तर त्या त्या गणाच्या गणपतीविरुद्ध (गणपती ह्याचा शैव अर्थ गणाचा प्रमुख असा आहे )   दंडपतीविरुद्ध अधिपतीविरुद्ध उभे ठाकण्याचा स्पष्ट उपदेश आहे 

ह्यापुढचा प्रश्न असा कि हा खोटं बोलण्याचा फिनॉमिनो फक्त मोदींच्यापर्यंत आहे कि तो आपणा सर्वांच्यात आहे? आपण किती आणि कसे आणि का खोटं बोलतो ? बढाईखोरपणा हा आपल्या स्वभावाचाही भाग नाही का ? धर्म , वर्ण आणि जात ह्या काल्पनिक गोष्टींना आपण का केंद्रीय स्थान देतो ?

जोपर्यंत आपण स्वतः ह्याबाबत बदलत नाही तोवर समाज बदलेल वा राजकारण बदलेल अशी अपेक्षा करणे हीही एक बढाई आहे राजकारणी शेवटी आपल्यातूनच निर्माण होत असतात 

श्रीधर तिळवे नाईक 










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट