भालचंद्र नेमाडे आणि गौर बंजारा : शैवांचे चलवाणी श्रीधर तिळवे नाईक 

अलीकडे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात पिंपरी चिंचवडमधील भोसरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला गेला आहे.  नेमाडे यांनी त्यांच्या ‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ या पुस्तकामध्ये बंजारा समाजाबाबात आक्षेपार्ह लिखाण केल्याचा हा आरोप आहे. अॅड. रमेश राठोड यांनी ही तक्रार दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .नेमाडे ह्यांच्यावर झालेल्या केसने सध्या गौर बंजारा समाज हा एकदम प्रकाशात आला आहे नेमाडे ह्यांची कुलदेवता शैव असली तरी सध्या अनेक शैव खत्तीयांच्याप्रमाणे त्यांनाही वैष्णव क्षत्रीयपण चढल्याने त्यांनाही त्याचा विसर पडलेला आहे साहजिकच हिंदूंमधील बंजारा सन्दर्भातील मजकूर हा थोडा गाफीलपणे आला आहे 

लोकशाहीत ह्या समाजाला अचानक खूपच महत्व प्राप्त झालेले आहे कारण ह्या समाजाची लोकसंख्या ! त्यांची संख्या साधारण पाच करोड असावी असा अंदाज आहे . 

मला स्वतःला ह्या समाजाविषयी पर्सनल जिव्हाळा आहे कारण माझ्या आईचे शिक्षण पूर्ण होण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे माझ्या आईला शालेय शिक्षणासाठी तिच्या सावंत मावशीकडे पाठवण्यात आले होते ते बंजारांच्या भरवश्यावर माझ्या आज्याला "नाईक , तुझ्या पोरीचे नखही दुखावले जाणार नाही" ह्याची गॅरेंटी बंजाऱ्यांनी दिली होती आणि पुढची काही वर्षे त्यांनी ही गॅरंटी सांभाळली त्यांच्या तांड्यात माझी आई सुरक्षित वावरली इतकी कि त्यांची ती लेकच झाली 

पुढे मुंबईत आल्यावर माझ्या आयुष्यात एक बंजारा मुलगी आली ती मुंबईत आली होती वेटलिफ्टिंगमध्ये करियर करायला ! दुर्देवाने अचानक आजारी पडली आणि तिच्याजवळ उपचारासाठी पैसे न्हवते नेमक्या ह्याचवेळी माझ्याकडे पैसे आले आणि मी माझ्याजवळ खर्चाला ठेऊन उरलेले तिला देऊन टाकले ती बरी झाली आणि मैत्री बहरली ती आजही टिकून आहे आणि जिव्हाळा वाढला आहे 

गौर बंजारा समाजाबद्दल अनेक थेरीज प्रचलित आहेत त्यातील हिंदुत्ववादी थेरी पॉप्युलर करण्याचा अथक प्रयत्न चाललेले असतात हिंदुत्ववाद्यांच्या मते बंजारा हा शब्द वनचर ह्या संस्कृत शब्दापासून बनचर व बनचर पासून बंजारा असा आला आहे इरफान हबीब ह्यांच्या मते बंजारा शब्द वाणी वाणिज्य बाणीज्य व बंजारा असा उत्क्रांत होत गेला आहे मी त्यांच्याशी सहमत आहे मुळात गोर ह्या शब्दाचा अर्थच शेती करण्यासाठी व बैलगाडीला जोडण्यासाठी योग्य झालेला बैल असा होतो महाराष्ट्रात त्याला गोरा असेही म्हंटले जाते गोराशंकर ह्याचा अर्थ जो बैलावर गोरावर बसून येतो तो शंकर असा आहे आणि त्याचा गोऱ्या रंगाशी काडीचाही संबंध नाही वैदिकांनी त्याचा गौरीशंकर केला ह्या गोरच्या सहाय्याने बैलगाड्याद्वारे वाणिज्य काम करणारे  ते गोर बंजारा होत . बैलगाड्यांच्यावर माल लादून जगभर भटकणारे हे शैव वाणी व्यापारी वर्णव्यवस्था न मानणारे असल्याने  वैदिकांच्या राजवटीतून भटके म्हणून हाकलून दिले गेले आणि मुस्लिम राजवटीत अरबी व मुस्लिम व्याप्याऱ्यांना स्पर्धा नको म्हणून वर्तुळाबाहेर हाकलले जाऊन जिप्सी झाले मात्र शैव राजवटींशी त्यांचे नाते कायमच जिव्हाळ्याचे राहिले ह्याचे कारण ह्या समाजाची उत्पत्ती ही गौरीशंकरापासून झाली असे हा समाज मानतो प्राचीन काळात ते मेन शैव स्ट्रीमचा भाग होते आणि लवकरच ते गेलेले स्थान पुन्हा मिळवतील असा माझा अंदाज आहे 

ह्या समाजात सर्वात आदरणीय उपसमाज होता तो लमाण कारण त्याकाळात मीठ ही दुर्मिळ गोष्ट होती आणि लवण म्हणजे मीठ विकून हे लोक श्रीमंत झाले होते 

१००० नंतर ग्रामव्यवस्थेत तथाकथित स्वयंपूर्णता आली आणि बैलगाडी विकण्याची ह्यांची सद्दी संपली मात्र तरीही बाकी व्यापार चालूच राहिला ह्या समाजाला घरघर लागली ती ब्रिटिशांच्या काळात रेल्वे आल्याने मालाच्या दळणवळणाच्या पारंपरिक शक्यता कालबाह्य झाल्या आणि ह्या समाजाची उरलीसुरली श्रीमंती संपली नेमाडे ह्यांच्या कादंबरीतील ह्या समाजाची पात्रे ही संपलेल्या श्रीमंतीची धूळ आहे नेमाडे त्यामागच्या कारणांच्या खोलीत जात नाही कारण त्यांचा वास्तववादी दृष्टिकोन माझ्या अनुभवाला जे आलं तेच मी कलेत ओतणार ह्या स्वकेंद्री अनुभवविश्ववादी दृष्टिकोनाला प्राधान्य देतो साहजिकच शैव लैंगिक मुक्ततेचा गहन अर्थ वैष्णव नेमाडेंना कळलेला नाही प्रा. श्याम मुडे, सत्यशोध शिक्षक सभा श्री. सुदाम नारायण राठोड ऍड.निहालसिंग राठोड ह्यांनी नेमाडे ह्यांना लिहलेल्या खुल्या पत्रात  ते पुढीलप्रमाणे अधोरेखित केले आहे 

"मुळात गोर बंजारा हा आदिम मातृपुजक गण समाज आहे. श्लील-अश्लील, नैतिक-अनैतिक, धर्म-अधर्म अशा ब्राम्हणी पितृसत्ताक धारणांपासून कोसो मैल दूर रानावनात उन्मुक्तपणे जगत होता. लेंगी गीतातून त्याच्या प्रच्छन्न शृंगाराचा आविष्कार पहायला मिळतो. ब्राम्हणी शास्त्रात ‘कामा’ ला षडविकारांपैकी एक विकार मानून त्याज्य मानलेले आहे. केवळ प्रजोत्पादन हेच त्याचे प्रयोजन मानले गेले. परंतु गोर बंजारा समाजाची उत्त्पतीच अवैदिक गौरीशंकरापासून झालेली असल्याने शैव तथा शाक्त परंपरेतील उन्मुक्त कामक्रीडा त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग राहिलेली आहे. अखिल मानव जातीसाठी नैसर्गिक आनंदाचा स्त्रोत म्हणून कामशास्त्र आकाराला आणण्याचे श्रेय बंजारा स्त्रियांकडे जात असेल तर तो सन्मानच समजला गेला पाहिजे. कामाशास्त्रात निपुण असणे ही काही लाजिरवाणी गोष्ट नाही. लाज तर लैंगिकता आणि नैतिकता यांची सांगड घालणाऱ्या ब्राम्हणी विचार परंपरेची वाटली पाहिजे. आपल्या व्यवस्थात्मक दुःखांची आणि अभावांची वाटली पाहिजे. परंतु तसे न वाटता काही लोकांना गोर बंजारा स्त्रिया प्राचीनकाळापासून वेश्याव्यवसाय करत आल्याच्या तुमच्या कादंबरीतल्या उल्लेखाने दुःख होते आहे. अर्थात हे दुःख होणेही स्वाभाविक आहे. कारण प्रस्थापित नीतिमत्तेच्या चौकटींमध्ये स्त्रियांच्या शरीरावर जातसमंत पुरुषांची मालकीच फक्त पवित्र मानली जाते. त्याव्यतिरीक्त ती व्यभिचारी किंवा वेश्या ठरवली जाते आणि वेश्या कधीही पवित्र असू शकत नाही अशी इथल्या एकूणच समाजाची धारणा आहे. बंजारा समाजही त्याला अपवाद नाही. केवळ बंजाराच नाही, तर जगातल्या कुठल्याही स्त्रियांवर आपल्या मर्जी विरुद्ध शरीर विकण्याची वेळ येऊ नये असे आम्हाला वाटते. मात्र तुमच्या कादंबरीतील या उल्लेखाने दुखावलेल्या लोकांनी कुणी वेश्याव्यवसाय करू नये यासाठी आजपर्यंत नेमकं काय काम केलेलं आहे हे आम्हाला माहिती नाही. त्यासाठी कुठला कृतीकार्यक्रम आखलेला आहे का याचीही आम्हाला कल्पना नाहीलागते . मात्र आताच काही दिवसांपूर्वी चळवळीतले कार्यकर्ते एड. निहालसिंग राठोड यांनी नागपूरच्या एका मोठ्या वेश्यावस्तीतून बंजारा समाजातील दोन मुलींची सुटका केली आहे. या दोन मुली म्हणजे संपूर्ण बंजारा समाजातील स्त्रिया आहेत असे समजण्याची चूक आम्ही कधीही करणार नाहीत.'

मला वाटतं ह्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही गेली कित्येक वर्षे मी नेमाडेंच्या आडव्या अक्षाला व त्यातून आधार मिळणाऱ्या जातीवादाला विरोध करतोय प्रा. श्याम मुडे, सत्यशोध शिक्षक सभा ,श्री. सुदाम नारायण राठोड ,ऍड.निहालसिंग राठोड ह्यासंदर्भात नेमाडेंना लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हणतात ,". तुम्ही देशीवादाच्या नावाखाली ज्या जातीव्यवस्थेचे समर्थन केलेले आहे त्याचेच फळ म्हणून एक अजातीय सांस्कृतिक समूह आज जातीय अस्मितेसाठी तुमच्या विरोधात एकत्र येत आहे, हा काळाने तुमच्यावर उगवलेला सूड आहे असे आम्हाला वाटते." मी ह्या मुद्द्याशी सहमत आहे 

चौथी नवता ही मार्गी देशी बरोबरच पोटी जमातीच्या सम्यक भानाची आवश्यकता प्रकट करते वैदिक धर्म ,ब्राह्मणधर्म ,वैष्णव धर्म व वैष्णवकेंद्री हिंदू धर्म हा ह्या सम्यक भानाच्या विरोधात काम करतो म्हणूनच त्याविरोधी काम करावे लागते आणि शैव बौद्ध जैन धम्माने दिलेल्या सम्यक भानाचा जागर जागता ठेवावा लागतो आणि हिंदुपणावर शैव बौद्ध जैन दबाव निर्माण करावा लागतो सुदाम राठोड ह्यांची मांडणी ह्या जागराला जागे ठेवते म्हणून तिचे स्वागत ! ही मांडणी नेमाडेंचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य मान्य करते आणि त्यांच्या उणीवांच्यावर बोटही ठेवते ह्यातून तिची परिपक्वता दर्शवते सुभाष अवचटांसारख्यांचे आत्मभान सुटत असताना सुदाम राठोड ह्यांचे हे टिकलेले आत्मभान पुढची दिशा दाखवणारे आहे 

श्रीधर तिळवे नाईक 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट