नास्तिकवाद , निरीश्वरवाद , निनिर्मिकवाद , निधर्मीवाद , धर्मनिरपेक्षवाद आणि लोकायतवाद श्रीधर तिळवे नाईक लोकायत ह्या दर्शनाविषयी भारतात अनेकदा बोललं जात पण अनेकदा घोळही घातले जातात त्यामुळे लोकायतांच्याविषयी थोडक्यात चर्चा आवश्यक आहे भारतात लोकायतवादी लोक नास्तिक असतात असा समज आहे पण हे चुकीचे आहे कारण भारतात नास्तिक ह्या शब्दाचा अर्थ वेद न मानणारे असा होतो आणि वेद न मानणारे सर्वच नास्तिक होतात लोकायत फक्त नास्तिक नाहीत ते आणखी काही आहेत भारतात लोकायतवादी निरीश्वरवादी असतात असा समज आहे मुळात ईश्वर ह्या शब्दाचा अर्थच भारतात वेगवेगळा आहे शैव धारेनुसार ईश्वर म्हणजे विश्वाचा प्राण व असा प्राण असतो हे न मानणे म्हणजे निरीश्वरवाद होय तर भक्ती धारेनुसार ईश्वर म्हणजे सतत अविरत अखंड अमर सर्वत्र असलेले सगुण अस्तित्व म्हणजे ईश्वर आणि ह्याला दिलेला नकार म्हणजे निरीश्वरवाद ! लोकायतवादी नास्तिक तर आहेतच पण ते निरीश्वरवादीही आहेत भारतात लोकायतवादी निनिर्मिकवादी आहेत असा समज आहे मुळात निर्मिक म्हणजे निर्माण करणारा ज्याने हे ब्रम्हांड निर्माण केले असा ! हिंदू धर्मातील शैव पंथानुस...