अक्षयकुमार, मोदी आणि विश्व हिंदू फिलिंग - श्रीधर तिळवे नाईक
मोदींची अक्षयकुमारने मुलाखत घेतली तिचे कौतुक आणि चेष्टा दोन्ही झाली अक्षयकुमार कॅनेडियन नागरिक झाल्यापासून त्यावरून त्याची चेष्टा खूप होतीये आणि ते स्वाभाविक आहे कारण करणी आणि कथनी ह्यांचा मेळ इथे बसत नाहीये बॉलीवूडला हे नवीन नाही बॉलिवूडमधले अनेक देशभक्त आपल्या मुलांना अंतिमतः अमेरिका यूरोप आणि साऊथ आफ्रिकेत सेटल व्हायला पाठवून द्यायचे आता स्वतःच सेटल होतायत
जगभर पसरत चाललेल्या ह्या डायस्पोरिक आणि डेस्परेट विश्व हिंदू लोकांना अलीकडे एक इन्सिक्युरिटी निर्माण झालीये ती म्हणजे आपण ज्या देशात सेटल झालोय त्या देशांनी आपणाला हाकलून लावलं तर काय ?
ईदी अमिनच्या राजवटीने हे करायला सुरवात केली तेव्हापासून हा प्रश्न निर्माण झाला हिंदू हाकलले जाऊ शकतात हे कळल्याने साहजिकच यदाकदाचित हिंदू म्हणून आपण हाकलले गेलो तर परतावे असे स्थान कोणते असा प्रश्न निर्माण झाला आणि ह्या प्रश्नाचे उत्तर हिंदुस्थान यानेके भारत असे मिळाले ह्यातूनच हिंदू धर्मियांचे हक्काचे राष्ट्र हवे ही पूर्वीपासून असलेली संकल्पना नव्याने बोकाळायला सुरवात झाली
जगभरच्या हिंदूंची असुरक्षितता समजून घेण्याचा कसलाही प्रयत्न ना काँग्रेसने केला ना इतरांनी ह्याचा पुरेपूर फायदा हिंदुत्ववाद्यांनी घेतला आणि त्यांनी ही गॅरेंटी दिली कि आम्ही तुम्हाला आश्रय देऊ बर्फाची सवय झालेल्या ह्या लोकांना राहण्यासाठी सर्वात उत्तम प्रदेश अर्थातच काश्मीर आहे आणि त्यामुळेच व इतर राष्ट्रीय कारणांसाठी हिंदुत्ववाद्यांना काश्मीर भारतातच हवे आहे आणि तेही खुले ! शिवाय काश्मीरच्या मूळ समस्येचे मूळ तिथे मुस्लिम बहुसंख्याक आहे हे भाजपला कळून चुकले आहे त्यामुळे तिथे हिंदू वाढवणे हाच खरा उपाय आहे हेही त्यांना कळून चुकले आहे त्यामुळेही काश्मीर सर्वधमीय बनवणे आवश्यक बनत चालले आहे
जगभरातल्या हिंदूंच्यात हळूहळू ही भावना बळावत चाललीये कि भारत फक्त हिंदूंचा होणे हे आवश्यक आहे हे लोक मुस्लिमांच्या विरोधी नाहीत पण हिंदुस्तानवरचा हक्क त्यांना सोडावयाचा नाही हे लोक त्यामुळेच हिंदुस्तानात पैसे टाकायलाही तयार आहेत आणि हिंदुस्थान सशक्त व्हावा अशी त्यांची मनापासून इच्छा आहे अक्षयकुमार हा ह्या विश्व हिंदू फिलिंगचा प्रतिनिधी आहे त्याची बीजे तो बँकॉकला होता तेव्हापासूनच पडलेली होती पैश्यासाठी दाही दिशा सर करायला तयार असणारा हा व्यापारी समुदायाची मानसिकता असलेला समाज अंतिमतः आतून हिंदू असतो कारण परदेशात हिंदू ही आयडेंटिटी त्याला ओळख प्राप्त करून देत असते साहजिकच त्याचा कल भाजप आहे
अक्षयकुमार हिंदुत्ववादी असणे आपण ह्या पार्श्वभूमीवर समजून घ्यायला हवे
दुसरी गोष्ट अर्थातच कर योजना आहे आपण भरलेला कर सत्कारणी लागावा अशी प्रत्येक करदात्याची इच्छा असते कुठलाही पक्ष आला तरी आपण दिलेला कर हा अंतिमतः भारतीय सरकारी बाबूंच्या खिश्यात जातो हे आता भारतातल्या प्रत्येक धनवान माणसाच्या लक्ष्यात यायला लागले आहे किंबहुना आजच्या घडीला सर्व व्यापारी समुदायात ह्याची चर्चा आहे आपण प्रचंड काबाडकष्ट करून मिळवलेला पैसा जर सरकारी लोकांच्या पगारात आणि नंतर विविध योजनांच्याद्वारे भ्रष्ट अमंलबजावणीद्वारे सरकारी नोकरांच्या खिश्यातच जाणार असेल तर सरकारला पैसे द्याच का असा हा प्रश्न आहे
ह्यावर व्यापारी व उद्योगपतींनी काढलेला तोडगा हा परदेशी नागरिक बनणे हा आहे हा तोडगा भयावह आहे कारण जर का ह्या लोकांनी करच भरला नाही तर सरकारला पैसा मिळणार कोठून ? त्यामुळे उत्तरोत्तर इन्डायरेक्ट करवाढीकडे सरकार लक्ष्य देणे अपरिहार्य आहे
पण ह्या व्यापारी समुदायाला त्याच्याशी देणेघेणे नाही भारताला कर द्यायचा नाही मात्र कृतज्ञता म्हणून विविध सामाजिक कार्याद्वारे भारतीय लोकांना पैसे पुरवायचे अशी ही योजना आहे अक्षयकुमार हा ह्या लोकांचा प्रतिनिधी आहे थोडक्यात देश नकोसे झालेले पण आणीबाणीला हाच देश आश्रयस्थान बनू शकतो हे कळून चुकलेले हे लोक आहेत
आधीच्या प्रकरणात मी बाय ऍड्रेसिंग चा सिद्धांत मांडला होता तोच इथे लागू होतो मोदींना जे काही म्हणावयाचे आहे ते ते इलेक्शन प्रचारात म्हणून गेलेत आता विश्व हिंदू नागरिकांना ऍड्रेस करण्याची त्यांची ही पद्धत म्हणजे अक्षयकुमारने त्यांची घेतलेली मुलाखत आहे .
मनकि बात फॉर विश्व हिंदू नागरिक !
आपल्याकडच्या विचारवंतांना हिंदुत्ववाद हा जगात कसा ऑपरेट होतो आहे तेच कळेनासं झालंय त्यामुळं बहुतेक विचारवंत आंब्यात अडकले काही विचारवंतांना मोदी मूर्ख वाटतात गुजरातचे तीन वेळा मुख्यमंत्री आणि देशाची पंतप्रधान असणारी व्यक्ती काही विचारवंतांना मूर्ख वाटावी ह्यात खरे मूर्ख कोण स्पष्ट व्हावे डोन्ट अंडरएस्टीमेट असे ह्यांना सांगितले तरी ह्यांना हे पटावे का ? सत्यनारायणाची पूजा सांगणारा भट रॅशनल लोकांना मूर्ख वाटला तरी प्रत्यक्षात त्याला त्याचा धंदा नीट माहित असतो मोदी त्या भटासारखे आहेत
प्रत्यक्षात ते फार धूर्त राजकारणी आहेत जशा इंदिरा गांधी होत्या नेहरू आणि इंदिरा गांधी ह्यांच्यात जो फरक आहे तोच फरक अटलबिहारी वाजपेयी आणि मोदी ह्यांच्यात आहे फक्त मोदींनी आणीबाणी थेट आणली नाही एव्हढच बाकी शैली सारखीच आहे इंदिराजींनी समाजवादाचे कार्ड वापरले मोदी हिंदुत्वाचे वापरतायत इंदिराजींनी बँकांचे राष्ट्रीयकरण सारखे काही धाडसी निर्णय घेतले मोदींनी डिमॉनिटायझेशन आणि जीएसटी सारखे ! इंदिराजी नाटकी होत्या मोदी फुल टु फिल्मी आहेत आणि कधीकधी सांस भी कभी बहू थी सारखे सोप ओपेरिक मेलो ड्रॅमेटिक ! दोघांनाही युद्धाची भीती वाटत नाही दोघेही नृशंस आहेत दोघेही उत्तम वक्ते आहेत
इंदिरा गांधींच्या प्रमाणे मोदीही विचारवंतांना पुन्हा पुन्हा चकवे देतायत आणि विचारवंत पुन्हा पुन्हा त्यांच्या चकव्यात फसतायत त्यामुळे आता भरवसा फक्त इथल्या शहाण्या मतदारांवर !
प्रॉब्लेम पुन्हा तोच आहे त्यावेळचा जनता पक्ष आणि आजची काँग्रेसआघाडी ह्यात फारसा फरक नाही मोरारजी देसाई आणि राहुल गांधी ह्यांची पंतप्रधान म्हणून समान लायकी आहे दोघेही सारखेच केअरलेस आणि चालतंय ते चालू द्या अटीट्युड वाले ! द्विसदस्यसारख्या फालतू मुद्द्यावर सरकार पाडणारे समाजवादी आणि आत्ताचे बहुजन आघाडीवाले वंचित आघाडीवाले साम्यवादी समाजवादी मुलायमवाले राष्ट्रवादीवाले काँग्रेस आघाडीचे सरकार आले तरी एखाद्या फालतू मुद्यावरून पाडणार नाहीत ह्याची कसलीही खात्री नाही
फरक फक्त एकच आहे इंदिराजींना रशियाचा पाठिंबा होता तर मोदींना आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू फिलिंगचा पाठिंबा आहे अक्षयकुमारचा अत्यंत लाईट मुडमधला इंटरव्यू त्याचा द्योतक होता इंदिरा गांधींनी समाजवादी शब्द घटनेत घातला मोदी निवडून आले तर हिंदुत्ववादी किंवा हिंदू हा शब्द घालतील कारण प्रेशर सारखेच आहे .
( शैव पॅरेडाईम्स अँड यूरोअमेरिकन पॅरेडाईम्स ह्या ग्रंथातील एका प्रकरणातील मुद्यांचे संक्षिप्तीकरण करून त्याचा आत्ताच्या पार्श्वभूमीवर केलेला विकास )
श्रीधर तिळवे नाईक
काही विचारवंतांना मोदी मूर्ख वाटतात गुजरातचे तीन वेळा मुख्यमंत्री आणि देशाची पंतप्रधान असणारी व्यक्ती काही विचारवंतांना मूर्ख वाटावी ह्यात खरे मूर्ख कोण स्पष्ट व्हावे डोन्ट अंडरएस्टीमेट असे ह्यांना सांगितले तरी ह्यांना हे पटावे का ? सत्यनारायणाची पूजा सांगणारा भट रॅशनल लोकांना मूर्ख वाटला तरी प्रत्यक्षात त्याला त्याचा धंदा नीट माहित असतो मोदी त्या भटासारखे आहेत
तू अक्कल हा शब्द कोणत्या अर्थाने वापरतोस त्यावर ही चर्चा अवलंबून आहे तू जर हा शब्द प्रज्ञा ह्या अर्थाने वापरत असशील तर ती ना इंदिरा गांधींच्याकडे होती ना मोदींच्याकडे आहे डिक्शनरीत अक्कल ह्या शब्दाचा अर्थ बुद्धिमत्ता आहे आणि त्याच अर्थाने तो प्रचलित आहे आणि वादासाठी वाद असेल तर त्यात मला रस नाही

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा