विचाराने प्रश्न सुटत नाही प्रश्न सुटतो करुणेमुळे किमान ममतेमुळे किंवा किमान प्रेमामुळे आणि अतिकिमान आस्था व शांतीमुळे विचार फारातफार संयम निर्माण करतो किंवा भय किंवा दहशत किंवा नियंत्रण आपण सध्या सगळेच संयम , भय , दहशत किंवा नियंत्रण ह्यांची विचारांच्या साहाय्याने फॅक्टरी खोलून बसलो आहोत
माननीय गजू तायडे साहेब , हे मी तुमच्यासाठी लिहीत नाही तर तुम्हाला लाईक करणाऱ्या लोकांसाठी लिहितोय मी तुमच्या अघोर वा नागा साधुंच्यावरच्या पोस्ट आणि चेष्टा वाचतो अभिव्यक्तिस्वातंत्र्य मला मान्य असल्याने मी आक्षेप घेत नाही पण दुसरी बाजू येणे आवश्यक असल्याने हे लिहितोय भगवान शंकरांनी जी ११४ तंत्रे दिली त्यातील एक तंत्र अघोर तंत्र आहे हे तंत्र शिव तत्वाची उपासना अघोर तत्व म्हणून करते व भगवान शंकराची साधना अघोरनाथ म्हणून करते ज्याला हे दिले गेले त्याला नंतर अघोरी म्हंटले गेले व हा नाग वंशी होता त्यामुळे साहजिकच नागांच्यात तो लोकप्रिय झाला आणि अनुयायांना नागा साधक म्हंटले गेले जे कालांतराने नागा साधू झाले ज्या माणसांच्या आयुष्यांना भीती आणि चिंता व्यापून आहे त्यांच्यासाठी हे तंत्र आहे घोर म्हणजे समग्र भय व चिंता व ह्या घोरापासून मुक्त होण्यासाठी करावयाची साधना म्हणजे अघोर साधना ! ही साधना करतात ते साधक ज्या साधकांना ह्या तंत्राद्वारे सविकल्प समाधी मिळते ते अघोर साधू होय आणि जे निर्विकल्प समाधीला उपलब्ध होतात ते अघोर नाथ वा अघोर सिद्ध होय ७ व्या शतकापर्यंत हे तंत्...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा