नास्तिकवाद , निरीश्वरवाद , निनिर्मिकवाद , निधर्मीवाद , धर्मनिरपेक्षवाद आणि लोकायतवाद

नास्तिकवाद , निरीश्वरवाद , निनिर्मिकवाद  , निधर्मीवाद , धर्मनिरपेक्षवाद आणि लोकायतवाद श्रीधर तिळवे नाईक

लोकायत ह्या दर्शनाविषयी भारतात अनेकदा बोललं जात पण अनेकदा घोळही घातले जातात त्यामुळे लोकायतांच्याविषयी थोडक्यात चर्चा आवश्यक आहे

भारतात लोकायतवादी लोक नास्तिक असतात असा समज आहे पण हे चुकीचे आहे कारण भारतात नास्तिक ह्या शब्दाचा अर्थ वेद न मानणारे असा होतो आणि वेद न मानणारे सर्वच नास्तिक होतात लोकायत फक्त नास्तिक नाहीत ते आणखी  काही आहेत

भारतात लोकायतवादी निरीश्वरवादी असतात असा समज आहे मुळात ईश्वर ह्या शब्दाचा अर्थच भारतात वेगवेगळा आहे शैव धारेनुसार ईश्वर म्हणजे विश्वाचा प्राण व असा प्राण असतो हे न मानणे म्हणजे निरीश्वरवाद होय तर भक्ती धारेनुसार ईश्वर म्हणजे सतत अविरत अखंड अमर सर्वत्र असलेले सगुण अस्तित्व म्हणजे ईश्वर आणि ह्याला दिलेला नकार म्हणजे निरीश्वरवाद ! लोकायतवादी नास्तिक तर आहेतच पण ते निरीश्वरवादीही आहेत

भारतात लोकायतवादी निनिर्मिकवादी आहेत असा समज आहे मुळात निर्मिक म्हणजे निर्माण करणारा ज्याने हे ब्रम्हांड निर्माण केले असा ! हिंदू धर्मातील शैव पंथानुसार  ह्या जगाचे निर्माण शिवाने केले आहे तर हिंदू धर्मातील शाक्त पंथानुसार शक्तीने ब्रह्मांड निर्माण केले आहे ज्यू ख्रिश्चनांच्या मते गॉड इस्लामनुसार अल्ला हिंदू धर्मातील वैष्णव पंथानुसार विष्णू कृष्ण पंथानुसार कृष्ण ईश्वर पंथानुसार ईश्वर ह्यांनी हे जग निर्माण केले आहे ईश्वरवाद व निर्मिकवाद ह्यांच्यातील फरक असा कि ईश्वर अमर आहे अजन्मा आहे आणि त्याने ब्रह्मांड निर्माण केले नसून तेही अमर व अजन्मा आहे ह्याउलट निर्मिकवादानुसार निर्मिकाने हे विश्व निर्माण केले आहे निर्मिक क्रियेटर आहे पाश्चात्य तत्वज्ञानात अथेनिस्ट म्हणजे कधी कधी निर्मिक न मानणारे असाही होतो लोकायतवादी निनिर्मिकवादीही आहेत

भारतात लोकायतवादी निधर्मीवादी आहेत असाही समज आहे निधर्मी म्हणजे धर्म , ईश्वर , निर्मिक , धार्मिक तत्वज्ञान वा दर्शन ह्याला ठाम नकार देणे आपण जेव्हा निधर्मी शासन हवे असे म्हणतो तेव्हा कुठलाही धर्म  , ईश्वर , निर्मिक , धार्मिक तत्वज्ञान वा दर्शन ह्याला ठाम नकार देणारे शासन हवे असे म्हणतो फक्त कम्युनिस्ट राजवटीतच असे शासन काहीकाळ अवतरले होते पण नंतर त्यांनाही काही काळाने तडजोड करावी लागली लोकायतवादी निधर्मीवादी आहेत ते निधर्मी शासन मागतात

भारतात लोकायतवादी धर्मनिरपेक्षवादी  आहेत असा गैरसमज आहे धर्मनिरपेक्षवादी सार्वजनिक जीवनात धर्म , ईश्वर , निर्मिक , धार्मिक तत्वज्ञान वा दर्शन ह्याला ठाम नकार देतात पण घरात व सार्वजनिक धर्मस्थळी वैयक्तिक आयुष्यात हे सर्व पाळायला अनुमती देतात  आपण जेव्हा निधर्मी शासन हवे असे म्हणतो तेव्हा कुठलाही धर्म  , ईश्वर , निर्मिक , धार्मिक तत्वज्ञान वा दर्शन ह्याला ठाम नकार देणारे शासन हवे असे म्हणतो पण जेव्हा आपण धर्मनिरपेक्ष शासन हवे असे मानतो तेव्हा सार्वजनिक जीवनात व शासकीय स्थानात कुठलाही धर्म  , ईश्वर , निर्मिक , धार्मिक तत्वज्ञान वा दर्शन ह्याला ठाम नकार देणारे शासन हवे असे मानतो शासनाच्या जागेत गणपतीउत्सव साजरा करणारे आणि बुद्ध जयंती साजरे करणारे दोघेही धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन करत असतात
काही लोकायतवादी नंतर धर्मनिरपेक्षवादी झाले असले तरी ती तडजोड आहे तत्वज्ञान नाही

पण लोकायतवादी फक्त नास्तिक , निरीश्वरवादी , निधर्मीवादी नाहीत तर ते ह्यापेक्षाही अधिक काही आहेत हे अधिक काही पाश्चात्य धर्मात अस्तित्वातच नसल्याने त्याचा प्रश्न येत नाही ते आहे मोक्ष म्हणजेच  कैवल्यप्राप्ती वा निर्वाण ! फक्त भारतीय धर्मातच मोक्ष अस्तित्वात असल्याने लोकायतवादी मोक्षालाही ठाम नकार देतात आणि इथेच भगवान शिव भगवान बुद्ध आणि भगवान महावीर ह्यांच्यापेक्षा वेगळे होतात शैव , बौद्ध व जैन ह्यांचा मोक्ष निर्वाण कैवल्यप्राप्ती ह्यावर ठाम विश्वास आहे हे तिघेही नास्तिक आहेत निधर्मी आहेत पण मोक्षी आहेत लोकायत मोक्षी नाहीत ते निमोक्षीवादी आहेत त्यामुळेच ते केवळ धर्माला नकार देऊन थांबत नाहीत ते मोक्षालाही(कैवल्यप्राप्ती वा निर्वाण ) ठाम नकार देतात

तेव्हा भारतात तुम्हाला तत्वज्ञान मांडायचे असेल तर नुसते अथेईस्ट वा नास्तिक वा निरीश्वरवादी वा निधर्मीवादी म्हणवून घेऊन चालणार नाही तर स्वतःला लोकायतवादी म्हणवून घेणे आवश्यक आहे अनेक पुरोगामी लोक हे करत नाहीत म्हणून मी हे लिहिले मी १२वीत सुरवातीला  लोकायतवादी होतो आणि मी एक ग्रंथही लिहिला होता माझे वडील लोकायतवादी आणि गांधीवादी ह्यांचे अजिबोगरीब मिस्चर होते मला सर्वात प्रथम ते जेव्हा अंबाबाईच्या देवळात घेऊन गेले तेव्हा त्यांनी मला मंदिराच्या गाभाऱ्यात नमस्कार करायला न्हेले न्हवते तर अंबाबाईचे आर्किटेक्चर कसे आहे ते दाखवायला न्हेले होते मात्र सार्वजनिक जीवनात नैतिक मूल्ये कशी प्रस्थापित करायची हा पेच सुटत नसल्याने ते गांधीवादी झाले होते आजही लोकायतवाद्यांपुढचा  हा पेच सुटलाय असं मला वाटत नाही जेपीसारखे अनेकजण का गांधीवादी बनले ह्या प्रश्नाचे उत्तरही ह्या पेचात आहे

लोकायतवादी अर्थ आणि काम हे दोनच पुरुषार्थ मानतात ह्यातील शैवांच्या मते अर्थमध्ये समाजकारण , राजकारण आणि अर्थकारण येते तर काममध्ये सेक्स फॅमिली नातेवाईक नातेवाईकांचा गोतावळा आणि कला येते लोकायतवाद्यांना हा अर्थ अपेक्षित होता का ? सांगणे कठीण आहे आपणाला फक्त त्यांचा अर्थ व काम ह्या पुरूषार्थावर विश्वास होता एव्हढंच माहित आहे

( शैव पॅरेडाईम्स अँड यूरोअमेरिकन पॅरेडाईम्स ह्या ग्रंथाच्या एका प्रकरणातील काही भागांचे  संक्षिप्तीकरण )

श्रीधर तिळवे नाईक 



रामकृष्ण परमहंस ह्यांनी चार  गोष्टी केल्या

१ काली भक्तीने साधनेची सुरवात पण शेवटचा पडावं बाकी त्यासाठी सर्व मार्गाने साधना
२ तंत्र मार्गाने मोक्ष प्राप्ती
३ सर्वधर्मसमभाव ही संकल्पना मांडली
४ सर्व धर्माच्या प्रार्थना म्हंटल्या

विवेकानंदानी दरिद्रीनारायण हा शब्द वापरला

सर्वधर्मसमभाव व दरिद्रीनारायण हे शब्

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट