कर्नाटक निमित्त चार बोल श्रीधर तिळवे नाईक
कर्नाटक निमित्त चार बोल श्रीधर तिळवे नाईक मी उत्तर प्रदेश निवडणुकीवेळी जे म्हणालो होतो तेच पुन्हा म्हणतोय फेसबुकवरील विचारवंत आणि कलावंतांचा सामान्य जनतेशी काहीही संबंध राहिलेला नाही . स्वतःचे हस्तिदंती टॉवर्स दिसत नाहीत ह्याचं दुःखं नाही तर आपला स्यूडोपणा ह्यांना दिसत नाही ह्याचं दुःख आहे ह्यातल्या कित्येकजणांना आपण भारतात राहतो ह्याचाच विसर पडलाय . नेहरू निवडून आले होते ते महात्मा गांधींच्या पुण्याईवर ही पुण्याई सम्पली काँग्रेस सम्पली सुदैवाने नंतर मनमोहन तगडे नैतिक व्यक्तिमत्व घेऊन आले आणि काँग्रेसची वापसी झाली मोदींच्याबद्दल ते एक नैतिक नेतृत्व आहे अशी सामान्य माणसाची खात्री आहे आणि ते ओबीसी आहेत ह्याचाही त्यांना प्रचंड फायदा मिळतोय ते शैव आहेत आणि अनेक सामान्य शैवांना ते आपला चेहरा वाटतात प्रत्यक्षात त्यांचा शंकराचार्य होणारच नाही ह्याची कसलीही खात्री नाही त्यांची स्वतःची ३५% अशी खात्रीची मते आहेत ती हालत नाहीत हे काहीसे काँग्रेसचेही होते प्रॉब्लेम काँग्रेसची हलणारी ५ % मते आणि उरलेली ३०% सैरभैर मते ही कशीही फिरतायत मोदींच्या ३५ % हुकमी मतांना भारत हे हिंदू राष्ट्र म्हणून ह...