दाक्षिणात्य वेद २ श्रीधर तिळवे नाईक

दाक्षिणात्य वेद २ श्रीधर तिळवे नाईक

वाकणकर ''वेद ही  दक्षिणेत गेलेल्या दक्षिणात्यांची उत्तरेत सरस्वतीकाठी झालेली निर्मिती असून वेदातील ळ हा फक्त दाक्षिणात्य ऋषी जेव्हा ऋचा निर्माण करतात तेव्हाच येतो आणि अगस्तीसारखे ऋषी उत्तरं व दक्षिण अशा दोन्ही परंपरात येतात '' असे म्हणत पुढे सरकतात आणि वैदिक देवांच्याकडे येतात ते संध्येचा उल्लेख करतात आणि उत्तर आणि दक्षिण दिशेचा व सर्वच देवांचा कसा उल्लेख येतो ते सांगतात त्यांच्या मते द्रविड आणि आर्य ह्या दोन्ही आयडेंटीटीज काल्पनिक आहेत आणि त्यातून सर्वांनी बाहेर पडणे त्यांना अभिप्रेत आहे ह्यातील आर्य ही काल्पनिक ओळख आहे असे माझेही मत आहे द्रविडांच्याबाबत अद्याप स्पष्टता नाही . त्यामुळेच वेद व संध्या ह्या दोन्ही संपूर्ण भारतीयांची निर्मिती आहे असा त्यांचा दावा आहे त्यामुळेच संध्या हीही समस्त भारतीयांची म्हणून ते प्रोजेक्ट करतात फक्त हे सांगताना वाकणकर हे सांगत नाहीत कि संध्या ही मुळात सर्वांना त्यांच्या त्यांच्या मातृभाषेत करता येण्याजोगी शैव  कल्पना आहे आणि वैदिक संस्कृत संध्या करण्याचा अधिकार फक्त उच्च वर्णियांना आहे भगवान शिवांनी दक्षिण स्कंदला ,पश्चिम गणपतीला ,उत्तर नंदीला , वायव्य दक्षाला (पुढे वैदिकांनी ती इंद्राला दिली ) आणि पूर्व व कैलास रांग पार्वतीला दिली होती आजही शिव अनेकदा एकटा नसतो जवळच कुठेतरी गणपती नंदी पार्वती असतात फक्त स्कंद हा योद्धा असल्याने उत्तरेत तो जाणीवपूर्वक हटवला गेलाय . किंवा त्याच्या जागी विष्णू आणला गेलाय दक्षिणेत मात्र तो खंडोबा , कार्तिकेय व मुरुगन ह्या रूपात शाबूत आहे . असो ह्या दिशा वाटणीचे  रूपांतर पुढे शिव संध्या वंदनात झाले वैदिकांनी ह्या साध्या संध्येचे रूपांतर अत्यंत गुंतागुंतीच्या कर्मकांडात करून तिची रयाच घालवली वाकणकरांनी ह्या कर्मकांडाचा संबंध वाऱ्याशी जोडलाय पण तो दूरुनचा वाटतो

पुरंदर आणि इंद्र हे त्यांच्या मते एकच आहेत  माझ्या मते पाऊस पडणारा इंद्र वेगळा आणि महेश्वर , बृहस्पती व पुरंदर ह्या पहिल्या तीन व्याकरणकारातला पुरंदर वेगळा वैदिक इंद्र पुरे फोडतो तर दाक्षिणात्य पुरंदर हा पुरांचा राजाप्रमाणे सांभाळ करतो खुद्द पाणिनी हा चौथा पण उत्तरेकडील पहिलाच व्याकरणकार हा महेश्वराकडून सर्व मूलभूत व्याकरण शिकतो आणि नंतर अष्टाध्यायी लिहितो हे वाकणकरांचे म्हणणे खरे पण पहिले तिघेही व्याकरणकार दाक्षिणात्य होते तर वेद उत्तरेकडे कसे काय निर्माण झाले ह्या प्रश्नाचे ते उत्तर देत नाहीत किंबहुना हा प्रश्नही त्यांना पडत नाही ह्यातील तिघांची व्याकरणे आता नष्ट झाली असली तरी tholkappiyam मध्ये तामिळ पासून जे  मूळ संस्कृत ध्वनी विकसित झाले त्यांचा आकार शाबूत आहे असे ते म्हणतात ह्याचा अर्थ तामीळमधून संस्कृत उदभवली हे त्यांना मान्य आहे गणपती परंपरेतून माहेश्वरी आणि महेश्वरीतून पुढे देवनागरी अशी ते मांडणी करतात आणि पद्मावतीचा गुप्त राजा गणेंद्र नागाचे योगदान ते मान्य करतात पण हे मान्य करताना ते एक गोष्ट विसरतात कि ह्याचा एक अर्थ गुप्त काळात संस्कृत तयार होत होती असा होतो आणि संस्कृत शिलालेखांची सणावळी पाहिली तर संस्कृत ही खूप नंतरची भाषा आहे हे स्पष्टच होते संस्कृतचे पहिले लिखित हे विमा किडपसिस ह्याच्या एका नाण्यावर सापडते ज्याच्यावर भगवान शिवांची प्रतिमा आहे हे नाणे इसवीसन ११२ तले आहे आणि त्यावरची लिपी खरोष्टी आहे हा काळ संस्कृतच्या उदयानंतरचा काळ आहे पुढे गुप्त काळात संस्कृत प्रस्थापित झाली ह्या नाण्याचा अर्थ स्पष्ट आहे संस्कृत माहित असणाऱ्या शैवांच्यासाठी हे नाणे काढण्यात आलंय वैदिकांसाठी नाही ह्याचा अर्थ संस्कृत ही सुरवातीला शैवांची भाषा होती संस्कृतचे चारी व्याकरणकार अगदी पाणीनीही शैव होते कालिदास हा संस्कृतचा श्रेष्ठ कवी नाटककार हा तर नावापासूनच कविता व नाटकातल्या आशयापर्यंत शैव आहे

थोडक्यात वेद हे शैवांच्या विरोधी पण शैवांच्या संस्कृतीत वाढलेल्या देशी व सूर ब्राम्हणांनी गुजरात महाराष्ट्र आदी प्रदेशातील दक्षिणेकडे ऋग्वेद वअर्धा अथर्ववेद  व उत्तरेकडे बाकी अडीच वेद जन्माला घातले

खुद्द वाकणकरांनी ब्राह्मीपूर्व अशोकपूर्व ब्राम्ही लिपी जगापुढे आणली हे त्यांचे योगदान मान्यच करायला हवे भारतात लिप्यांचा विकास हा युरोपियन भोंगळ लिप्यांच्यापेक्षा अधिक शास्त्रशुद्धपणे झाला हे त्यांचे म्हणणे मान्यच करायला हवे उच्चार आणि आकार ह्यांच्यातील अद्वैत हे  तर देवनागरी लिपीचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे . हे वैशिष्ट्यच बुडवायला काही करंटे निघाले असले तरी अशा ब्राम्हणद्वेष्ट्यांकडे दुर्लक्ष्यच केलेले बरे ! बोलीभाषेचा मीही समर्थक आहे पण ही बोली शास्त्रशुद्ध पद्धतीने लिखित स्वरूपात आणायची असेल तर उच्चार आणि आकार ह्यांच्यातील अद्वैत हे   देवनागरी लिपीचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य आपणाला अधिकच उपयोगी आहे ह्याचे भान आपण जितके ठेवू तितके ते आपल्याला फायदेशीरच आहे .

शिवाचे साम्राज्य हे हिमालयापर्यंत होते आणि पुढे दक्षशिलेचा (तक्षशिलेचा ) राजा दक्ष ह्याच्याशी त्याची टक्कर झाली शिवपार्वती विवाह हा शैव आणि सुरासुर संस्कृतींचा विवाह होता जिच्यामुळे सुरासुर शैव झाले पुढे तिबेट मार्फत रशियन धडकले आणि एका नव्या संस्कृती संगमाची सुरवात झाली .

(माझ्या इंग्रजी ग्रंथातील एका प्रकरणाचे संक्षिप्तीकरण )

श्रीधर तिळवे नाईक




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट