आपलं साहित्य संमेलन - मराठी भाषा साहित्याचं वर्तमान आणि भविष्य





आपलं मराठी साहित्य संमेलन विडिओ





सिंधूची बहीण ऑक्सअंद्रेनोवा   सभ्यता

जगाच्या इतिहासात कायमच खंडीय सभ्यता -संस्कृती उत्तर आणि दक्षिण अश्या दोन्ही भागात जन्म घेताना दिसतात निसर्ग- विश्वीय युगात दक्षिणेने बाजी मारलेली दिसते तर सृष्टीय प्रतिसृष्टीय युगात उत्तरेने ! चिन्हसृष्टीय युगात मात्र प्रथमच दोन्ही भाग एकमेकाला इक्वल होताना दिसतायत म्हणजे असे कि दक्षिणेत प्रथम आफ्रिकन भरभराट दिसते व नंतर युरोपियन उत्तरेत प्रगती करतात तर त्याचवेळी आशिया खंडाकडे इंडस चिनी बाजी मारतात तर युरेशियन ऑक्सअंद्रेनोवा  प्रगती करून नाहीसे होतात अमेरिका खंडात दक्षिण कडे माया इंका उदयाला येतात उत्तरेकडे फक्त ठीकठाक प्रगती होते पुढे सृष्टीय युगात उत्तरेकडे युरोप व रशिया बाजी मारतात तर आफ्रिका आशिया ढेपाळतात प्रतिसृष्टीय युगात यू एस ए कॅनडा यूरोप बाजी मारतात तर आशिया आफ्रिका दक्षिण लॅटिन अमेरिका ढेपाळतात हे असे का होते हा वेगळा विषय आहे फक्त एक स्पष्ट कारण मला दिसते ते इथे सांगतो ते म्हणजे उत्तरेकडे आपदग्रस्त काळात उत्तरेकडे सरकण्याची जागाच नाही कारण बर्फ तर दक्षिणेकडे मात्र दक्षिणेकडून आधिक दक्षिणेकडे सरकण्याचा चान्स आहे म्हणूनच दक्षिणेकडे संस्कृती टिकल्या व आपदा नाहीशी झाल्यावर मुळाकडे परतल्या असो इथे आपणाला चर्चा करायची आहे ती ऑक्स अंद्रेनोवा सभ्यतेची

व्हिक्तर श्रीयानिडी ह्यांनी जेव्हा १९७० साली ऑक्सस संस्कृतीचा शोध लावला तेव्हा त्यांना अंदाज आला होता कि आपला हा शोध अनेक भुगोलांच्या इतिहासावर दूरगामी परिणाम करणार आहे त्यामुळेच त्यांनी वेळोवेळी ह्या विषयावर अनेक पेपर्स सादर केले इसवीसनपूर्व २७०० ते १६०० ह्या काळात उत्तर अफगाणिस्तान दक्षिण रशिया म्हणजे आत्ताचा तुर्कमेनिस्तान इथे बहरलेल्या ह्या संस्कृतीचा उल्लेख आजही अनेक इतिहासकार व संस्कृतिकार करत नाहीत कारण अनेकांना ती अंद्रेनोवाचा पुढचा टप्पा वाटते किंवा अनेकांना तिची माहितीच नाही प्रत्यक्षात असे नाही हे स्पष्ट आहे कारण अंद्रेनोवाला  शेती व इरिगेशन माहित न्हवती इथे मात्र इरिगेशन आढळते शेती आढळते.

ही संस्कृती भारतीय इतिहासापुढे दोन मोठी प्रश्नचिन्हे निर्माण करते

१ पहिले आर्य बाहेरून आले होते तर ते ह्या संस्कृतीकडून शेती न शिकताच भारतात कसे आले ऋग्वेद अफगाणिस्तानात लिहिला गेला तर त्यात ह्या संस्कृतीचा उल्लेख सुद्धा कसा नाही आणि जर ऋग्वेद अफगाणिस्तानात लिहिला गेला असता तर इरिगेशनविषयी व  शेतीविषयी काहींना काही महत्वाचे उल्लेख ऋग्वेदात आले असते प्रत्यक्षात असे का घडलेले नाही ?

२ दुसरी महत्वाची गोष्ट उत्तर हिंदुस्तानातील इंडस आणि ही ऑक्सस ह्या दोन्ही संस्कृती नेमक्या इसवीसनपूर्व १६०० सालीच कशा काय नाहीश्या झाल्या नेमके असे काय घडले कि दोन्ही संस्कृतीधारकांना आपल्या शहरांचा त्याग करून स्थलांतर करावे लागले ?

ह्या दोन्ही संस्कृतीत आपापसात संबंध होते हे तर ऑक्सस मध्ये सापडलेल्या सिंधू मुद्रांच्यावरून स्पष्टच आहे पण हे फक्त व्यापारी संबंध होते कि ह्या दोन्ही संस्कृती मिळून एक विशाल संस्कृती होती हे अद्याप अस्पष्ट आहे . शक्यता हीच आहे कि सिंधू अधिक प्राचीन असल्याने तिचा हा विस्तार असावा वा सिंधू लोकांनी स्वतःचा विस्तार तिथपर्यंत न्हेला असावा व अंद्रेनोवाना सामावून घेतले असावे

म्हणजेच ऋग्वेद अफगाणिस्तानात नाही तर भारतातच लिहिला गेला असावा पर्याय दोनच उरतात
पंजाब हे सनातन उत्तर
दक्षिण हे नवे उत्तर

पुन्हा मग प्रश्न तोच येतो तो म्हणजे ऋग्वेदात गोंड शब्द येतात कुठून आणि तामिळ वा तत्सम व्याकरण कुठून येते ?ळ कुठून येतो ? अश्व कुठून येतात ?

ह्याचे समाधानकारक उत्तर हेच आहे कि सिंधूतले ऑक्सस व स्टेप्स आणि उत्तरेकडील सिंधू लोक  जेव्हा १६०० च्या आसपास दक्षिणेत स्थलांतरित झाले तेव्हा त्यातील मंत्र निर्माण करणे हेच ज्यांचे काम होते ( ब्राम्हण ह्या शब्दाचा अर्थच मुळी मंत्र रचणारा असा आहे ) त्या ब्राह्मण सूर लोकांनी महाराष्ट्र गुजरात कर्नाटकात ऋग्वेद निर्माण केला व पुढे उत्तरेत गेल्यांनतर इतर वेद निर्माण केले
(इंग्रजी प्रकरणाचे संक्षिप्तीकरण )

श्रीधर तिळवे नाईक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट