दाक्षिणात्य वेद १ श्रीधर तिळवे नाईक
दाक्षिणात्य वेद १ श्रीधर तिळवे नाईक
एकदा वेद भारतातच निर्माण झाले आणि ते वैदिक व वैदिक झालेल्या शैव ब्राम्हणांनी जन्माला घातले हे मान्य केले कि प्रश्न सरस्वतीचा उरतो. ही सरस्वती नेमकी काय आहे ?
गणेश विद्या ह्या पुस्तकात वाकणकरांनी म्हंटले आहे कि कावेरीकाठच्या महेश्वरी लिपीतून प्रथम पाणिनिमुळे देवनागरी लिपी निर्माण झाली मात्र वाकणकरांच्या मते वेद प्रलयानंतर दक्षिणेतून स्थलांतरित झालेल्या दाक्षिणात्य लोकांनी उत्तरेत लिहिले आणि ऋग्वेद आता हरवलेल्या सरस्वती काठीच निर्माण झाला म्हणजेच निर्माणकर्ते दाक्षिणात्य आणि जागा उत्तरी असा त्यांचा सिद्धांत आहे कदाचित त्यामुळेच स्वामी विवेकानंद तामिळ संस्कृतीला आई आणि आर्य संस्कृतीला आपले पिता म्हणत खुद्द भारताचा एक आद्य इतिहासकार विन्सन्ट स्मिथ ही इंडियाचा खरा प्राचीन इतिहास दक्षिण भारतात लपलाय पण तो एक्स्प्लोर करायची वेळ आलेली नाही असं म्हणे माझ्या मते ही वेळ आता आलीये . दक्षिण अस्तित्वात नाही असे मानून इंडियाचा इतिहास उत्तरेपासून सुरु करण्याची उत्तरी खोड मुळांकडे तोंड फिरवून फक्त फळे मोजण्यात बिझी झाली तरी आपण आपली जगभरातली मुळे गोळा करताना दक्षिणेकडे पाठ फिरवू नये हे उत्तम ! अन्यथा आज ना उद्या दक्षिण भारत स्वतंत्र राष्ट्र करण्याची चळवळ सुरु करेल हे नक्की आणि मग महाराष्ट्राला दक्षिण किंवा उत्तर निवडायची वेळ येईल हेही नक्की ! हे होऊ नये असे वाटत असेल तर दक्षिणेकडे केलेली पाठ आता पुन्हा उत्तरेकडे करून महाराष्ट्राने आपले मुख दक्षिणेकडे वळवावे . त्याने सांस्कृतिक मुखशुध्दीही होईल आणि आत्मभानही येईल .
पृथ्वी स्थिर नाही आणि तिला मुळे नाहीत पृथ्वीवरचे खंडही स्थिर नाहीत सतत बदलतायत ग्रॅनाईट आणि बेसाल्ट हे दोन पृथ्वीवरचे दोन मुख्य खडक आश्चर्यकारकरीत्या भारत हा एक स्पेशल शिल्ड एरिया आहे प्लेट टेक्टॉनिक सिद्धांतानुसार इंडोआफ़्रिकन गोंडवनखंड सुरवातीला एक होता आणि मग तो ड्रिफ्ट होत विखंडित झाला पेनीसुलर इंडिया युरेशियन प्लेटमध्ये घुसून हिमालय निर्माण झाला त्यातून इंडियाचे तीन भाग झाले
१ हिमालयन इंडिया
२ गंगायमुना खोरे इंडिया
३ साऊथ इंडिया ज्यात महाराष्ट्रही येतो
ह्यात दक्षिण भारत हा सर्वात जुना आहे
पूर्वी आसाम आणि ब्रह्मदेश एकच होते पण ते वेगळे झाले
वाकणकरांच्या मते नंतर कुमारीखंडंम बुडाला आणि ह्या खंडातील तामिळ लोकांना आत्ताच्या तामिळ प्रदेशात स्थलांतरित व्हावे लागले वाकणकरांनी कुमारी खंडम सिद्धांताला पाठिंबा दिला असला तरी आणि काही हिंदुत्ववादी तारे तोडले असले तरी मी तो पाठिंबा देत नाही कारण अजूनही पुरावा उपलब्ध नाही आणि हिंदुत्ववाद्यांच्या भाकडकथात मला रस नाही पण एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे तामिळ भाषा ही भारतातील सर्वात जुनी भाषा आहे आणि महाराष्टी हीही संस्कृतपेक्षा अधिक प्राचीन आहे संस्कृत ही अनेक प्राकृतांना एकत्र आणून तयार केलेली संवादभाषा आहे आणि शक्यता हीही आहे कि आत्ताची संस्कृत ही प्रथम लिखित होती आणि मग मौखिक झाली म्हणजे प्रथम पाणिनीने तिचे व्याकरण तयार केले आणि मग ती आत्ताच्या स्वरूपात आणली गेली व्यासांनी बहुदा वेद देवनागरी संस्कृतमध्ये आणले
पण तरीही ळ चा प्रश्न उरतो वाकणकरांच्या मते ळ जिथे जिथे आहे ती ऋचा दाक्षिणात्य ऋषींची आहे विश्वामित्र स्कूल भारद्वाज स्कूल कण्व स्कूल अत्रि स्कूल अंगिरस स्कूल मधले ऋषी हे साधारणपणे दाक्षिणात्य आहेत अशी मांडणी ते करतात आणि दाक्षिणात्य ऋषी सत्ता संघर्षात भाग घेत नाहीत असे ते म्हणतात ह्यातील सर्वात गुंतागुंतीची केस अगस्तीची आहे ज्याच्यावर विनोबा भावेनी फार प्रेमाने लिहिले आहे हे गुंतागुंतीचे ह्यासाठी आहेत कारण त्यांचा उल्लेख वैदिक आणि संगम अशा दोन्ही परंपरात आढळतो ते शिवाबरोबर जे सात ऋषी गेले त्यापैकी एक होते पुढे ते दक्षिणेत विदर्भद्वारा परतले त्यांनी विदर्भची राजकन्या लोपामुद्राशी विवाह केला आणि पुढे आंध्रमार्गाने तामिळनाडूत जाऊन तामिळ संगमचे अध्यक्षपदही भूषवले त्यांच्या रचना वेदात आहेत आणि दक्षिणेत तामिळचा पहिला व्याकरणकार अशी त्यांची नोंद आहे
( इंग्लिश प्रकरणाचे संक्षिप्तीकरण )
श्रीधर तिळवे नाईक

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा