कर्नाटक निमित्त चार बोल श्रीधर तिळवे नाईक

कर्नाटक निमित्त चार बोल श्रीधर तिळवे नाईक

मी उत्तर प्रदेश निवडणुकीवेळी जे म्हणालो होतो तेच पुन्हा म्हणतोय फेसबुकवरील विचारवंत आणि कलावंतांचा सामान्य जनतेशी काहीही संबंध राहिलेला नाही . स्वतःचे हस्तिदंती टॉवर्स दिसत नाहीत ह्याचं दुःखं नाही तर आपला स्यूडोपणा ह्यांना दिसत नाही ह्याचं दुःख आहे ह्यातल्या कित्येकजणांना आपण भारतात राहतो ह्याचाच विसर पडलाय . नेहरू निवडून आले होते ते महात्मा गांधींच्या पुण्याईवर ही पुण्याई सम्पली काँग्रेस सम्पली सुदैवाने नंतर मनमोहन तगडे नैतिक व्यक्तिमत्व घेऊन आले आणि काँग्रेसची वापसी झाली मोदींच्याबद्दल ते एक नैतिक नेतृत्व आहे अशी सामान्य माणसाची खात्री आहे आणि ते ओबीसी आहेत ह्याचाही त्यांना प्रचंड फायदा मिळतोय ते शैव आहेत आणि अनेक सामान्य शैवांना ते आपला चेहरा वाटतात प्रत्यक्षात त्यांचा शंकराचार्य होणारच नाही ह्याची कसलीही खात्री नाही त्यांची स्वतःची ३५% अशी खात्रीची मते आहेत ती हालत नाहीत हे काहीसे काँग्रेसचेही होते प्रॉब्लेम काँग्रेसची हलणारी ५ % मते आणि उरलेली ३०% सैरभैर मते ही कशीही फिरतायत मोदींच्या ३५ % हुकमी मतांना भारत हे हिंदू राष्ट्र म्हणून हवे आहे पण ह्या हिंदुराष्ट्राचे कसलेही डिझाईन भाजप दाखवत नाहीये साधा समान नागरी कायदा सुद्धा भाजपने आणलेला नाही त्यामुळे पुन्हा एकदा हिंदुत्वाचे भगवे गाजर दाखवून पाठीमागून वर्णव्यवस्था आणलीच जाणार नाही ह्याची काय खात्री ? मोदी ह्याविषयी काहीही ठामपणे सांगत नाहीत . दुसरीकडे राहुल गांधी अजूनही बाळ वाटतात त्यांना राजकारणात खरोखर रस आहे का असाच प्रश्न अनेकदा पडतो . अनेकदा केवळ खानदानी जबाबदारी ते वहातायत कि काय अशी शंका येते . अकाली थकलेले बाळ असते तसे ते दिसतात त्यामुळे विरोधी पक्ष नेतृत्वहीन दिसायला लागलाय एक काळ असा होता कि काँग्रेसपुढे तगडा विरोधी पक्ष असावा म्हणून लोक प्रार्थना करायचे त्यावेळी कुणालाही वाटले नसेल कि जनसंघाचे बाळ राजपुत्र होईल सर्वांनाच वाटायचे कि समाजवादी किंवा साम्यवादीच प्रबळ विरोधी पक्ष बनतील प्रत्यक्षात असे झाले नाही खरेतर आप पक्षाला चांगला चान्स होता पण अण्णांनी कचखाऊ राजकारण करून सशक्त विरोधी पर्याय निर्माण होण्याची शक्यताच खुरटवली अण्णांचा भीषण इगो राष्ट्राचा बळी कसा देतो त्याचे हे उदाहरण त्यांनी जर आपली सगळी ताकद अरविंद केजरीवालांच्या मागे उभी केली असती तर एक प्रबळ विरोधी पक्ष निर्माण झाला असता  आणि आपापसातील भांडणे मिटतील असा आपमध्ये एक फ्लॅटफॉर्मही तयार झाला असता  गांधीवादाचा अर्धवट शहाणपणा हा असा कधी कधी अव्यवहारी वागतो
भाजपच्या मागे आरएसएस तसे आपमागे अण्णांचा स्वयंसेवक संघ उभा राहिला असता तर आजचे चित्र इतके भीषण झाले नसते

केवळ पक्षाच्या  आधारे निवडणुका जिंकता येत नाहीत त्यासाठी त्या पक्षामागे कार्यकर्त्यांचे कॅडर लागते सध्यातरी असे कॅडर फक्त भाजपामागे आहे काँग्रेसमागे कधीकाळी होते पण घराणेशाहीने ते पूर्ण संपवले आहे भाजपाचे अडवाणी वाजपेयी प्रमोद महाजन आणि नरेंद्र मोदी हे सारे पंतप्रधानपदाचे दावेदार प्रथम कार्यकर्ते होते त्याउलट नरसिंहराव सोडले तर काँग्रेसने कुठला सामान्य कार्यकर्त्याचा चेहरा पंतप्रधानपदी दाखवला आहे ? नरसिंहरावांची जी कोंडी सोनियांनी केली ती बघता सामान्य कार्यकर्ते हे एकंदरच गांधीशाहीला मानवत नाहीत असे दिसते पुढे पवारांचा तर काटाच काढला तोही त्यांच्याचकडून मनमोहनांविषयी आदर ठेवूनही ते कार्यकर्ते न्हवते हे मान्य करायला लागते म्हणजेच काँग्रेस एक एलीटशाही राबवून आहे आणि लोकशाहीचे बदलते रूप ही एलीटशाही स्विकारण्याच्या मूडमध्ये नाहीये . भाजपने नेमकं काय केलंय ? तर भाजपने एक पूर्णपणे कार्यकर्ताकेंद्री लोकशाही पक्षात आणली आहे आणि कर्नाटकात तिनेच त्यांना हात दिला आहे आजही सामान्य कार्यकर्त्याची सत्तेची भूक भाजपमध्ये भागवली जाण्याची शक्यता जागृत आहे शिवाय आरसेसचे धार्मिक क्रुसिडिक कार्यकर्ते आहेतच ज्यांना मनापासून हिंदू राष्ट्र आणायचे आहे भाजप दोघांनाही सांभाळत वाटचाल करतोय

आणखी एक गोष्ट अशी कि सामान्य माणसाचा सेक्युलॅरिझमवरचा  विश्वास उडत चाललाय पुरोगामी विचारवंत स्युडोसेक्युलर आहेत अशी त्याची खात्री पटत चाललीये आणि ट्रोलिंग तर आता दोन्ही बाजूंनी चाललंय . म्हणजेच येऊ घातलेले हिंदुराष्ट्र कसे असणार ते स्पष्टपणे हिंदुत्ववादी आपणाला सांगत नाहीत आणि हिंदुराष्ट्र बनण्यापासून देशाला वाचवायचे असेल तर त्याचाही काही धड प्लॅन तयार आहे असे दिसत नाही मोदींच्या नावाने बोंबा मारणे एव्हढाच एक कलमी कार्यक्रम सध्या चालू आहे

अशावेळी सामान्य माणसाने करायचे काय तर त्याने निसर्गात पोकळी रहात नाही ह्या सिद्धांतावर विश्वास ठेवून वाट पाहायची . आज ना उद्या भाजपाला सशक्त पर्याय येईलच ह्या पर्यायाने स्वरूप काय असेल ते हळूहळू स्पष्ट होईल

श्रीधर तिळवे नाईक












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट