पोस्ट्स

RAHUL GANDHI CONGRESS लोकशाही समाजवाद , उदारमतवाद

लोकशाही समाजवाद , उदारमतवाद    राहुल गांधी ह्यांची यात्रा श्रीधर तिळवे नाईक  राहुल गांधी ह्यांची भारत जोडो यात्रा ही चर्चेचा विषय बनवण्यात आलीये किंवा बनलीये ह्याचे कारण विपक्षांकडे पंतप्रधानपदासाठी फक्त तीनच पर्याय आहेत  १ केजरीवाल  २ राहुल गांधी  ३ शशी थरूर  शरद पवार व नितीशकुमार ह्यांचे चान्सेस कमी आहेत म्हणून त्यांची नावे घेत नाहीये ह्यातील शशी थरूर ह्यांना गांधी परिवार कितपत संधी देईल हा प्रश्नच आहे कारण ह्या परिवाराला राहुललाच पीएमसाठी आणायचे आहे आणि ही यात्रा ह्या स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे राहुलचा निरागस चेहरा व निर्मळ हात मान्य करूनही त्यामागे राजकारण नाही असे समजणे हे राजकीय अक्कल रोमँटिक ढगात गेल्याचे लक्षण आहे  राहुल गांधींनी पंतप्रधानपदासाठी प्रयत्न करायला हरकत नाही पण ह्या प्रयत्नाला मास बेस देणे व घेणे गरजेचे आहे १९७७ नंतर निवडणूक हरल्यानंतरही इंदिरा गांधींनी आपला मास बेस तगडा असल्याचे सिद्ध करायला सुरवात केली होती राहुल गांधींना मास बेस आहे कि नाही हे चेक करण्यासाठी व दाखवण्यासाठी ही यात्रा आहे त्यामुळे शशी थरूर साईडलाईन काहीकाळ ...
 मायग्रेशन व साईडइफेक्ट्स श्रीधर तिळवे नाईक  भारतीय प्रबोधनाची सर्वात मोठी शोकांतिका जर कुठली असेल तर ती म्हणजे ते स्वकीयांशी खोलात जाऊन लढलेच नाही आणि ह्याचे कारण ब्रिटिश राजवट ! भारतीय प्रबोधनाची सगळी ताकत ब्रिटिशांशी लढण्यात खर्च पडली फुले आगरकर आंबेडकरांनी ब्रिटिशांशी लढायचे टाळले कारण त्यांना स्वकियांशी लढायचे होते त्यामुळे ब्रिटिशांना हाकलून देण्यात त्यांना फारसे स्वारस्य न्हवते ह्याउलट टिळक गांधी ह्यांना परकीयांशी लढायचे होते त्यामुळे स्वकीयांची युती आणि एकात्मता त्यांना महत्वाची वाटायला लागली  हळूहळू ह्या देशातल्या ब्राम्हण व क्षत्रियांना नेमकं काय घडतंय ह्याचा अंदाज यायला लागला ब्रिटिश गेले तर पुढील लढाई ही आपल्याविरोधात लढली जाणार हे स्पष्ट झाले साहजिकच दोन पर्याय उरले आपल्या हितसंबंधांचा त्याग करणे नेहरूंच्यापासून अनेक कम्युनिस्टांपर्यंत अनेकांनी आपल्या हितसंबंधांचा त्याग केला मात्र ह्यांचे प्रमाण फक्त १० टक्के होते उरलेले ९० टक्के स्वातंत्र्योत्तर काळात आपले हितसंबंध कसे राखायचे ह्या दिशेने विचार करायला सुरवात केली काहीजण परदेशात गेले व जातांना त्यांची सा...
 विवेकानंद स्मृतीच्या निमित्ताने श्रीधर तिळवे नाईक  चार जुलै ही स्वामी विवेकानंदांची पुण्यतिथी ह्या निमित्ताने विवेकानंद स्मृती येणार आहे ह्याची कल्पना होती खरेतर ती आधीच यायला हवी होती असो  माझ्या गुरुस्थानी मला जे काही विचारवंत आहेत त्यात स्वामी विवेकानंद मला नेहमीच महत्वाचे वाटत आले आहेत साहजिकच ह्या ग्रंथाविषयी उत्सुकता होती  भारतात आद्य शंकराचार्यांनी हिंदू धर्माची स्थापना केली त्यातून एक प्रोटेस्टंट हिंदुधर्म जन्मणे प्रबोधनाच्या काळात अटळ होते आणि एक आयडियालॉजीही ! राजाराम मोहन रॉय ह्यांनी प्रथम हिंदुइजम HINDUISM ही टर्म कॉईन करून त्याची सुरवात केली आणि त्याला शह म्हणून दयानंद सरस्वती व विष्णुशास्त्री चिपळूणकर ह्यांनी हिंदुत्ववाद आणला हिंदुवादाचा दुसरा टप्पा हा विवेकानंदानी मांडला आणि त्यात शाहू महाराज व सयाजीराव गायकवाड ह्यांनी भर घातली ह्याला मी क्षात्र हिंदुवाद म्हणतो पुढे महात्मा गांधी ह्यांनी विश्य हिंदुवाद मांडला जो बहुजनांचा हिंदुवाद होता व त्याची बीजे स्वामी विवेकानंदांच्यात होती  हिंदुधर्मात वेदांत हा आद्य मानला जातो व त्याची प्रस्थानत्रयी उप...
उद्धव ठाकरे ह्यांचा राजीनामा आणि पुढे श्रीधर तिळवे नाईक  संन्याशाला  सगळी घरं जशी सारखी तसे सगळे पक्षही सारखेच ! त्याची कमिटमेंट फक्त लोककल्याणाशी ! सिद्ध हा मोक्षाचे शरीर , द्वादशशीलता ही त्वचा , सभ्यता ही मोक्षाचा अलंकार असेल तर सुसंस्कृतपणा हा मोक्षाचा वाचा आहे उद्धव ठाकरे ह्यांची वाचा व वाणी ही माझ्या कायमच आदराचा विषय राहिली आहे आजचे त्यांचे भाषण हे सभ्य वाचेचे सुसंस्कृत सादरीकरण होते . वाचाळांच्या जगात हे अतिशय दुर्मिळ ! न्यायालयाचा निकाल , त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा व विधानपरिषदेचा राजीनामा हे सर्व अपेक्षित होते मात्र जाताना त्यांनी जनतेचे डोळे ओले केले हे निश्चित ! पुढची इलेक्शन भाजपला त्यामुळे जड जाणार हे निश्चित ! शेवटच्या बैठकीत त्यांच्यासोबत फक्त चारजण असावेत ह्या घटनेतून हा राजीनामा आलेला असावा अन्यथा फ्लोर टेस्टपर्यंत हे सर्व गेले असते अशोकरावांनी आम्ही बाहेरून पाठिंबा देतो हे केलेले सूतोवाच अखेरचे प्रयत्न होतं . आता प्रश्न असा कि भाजपशी युती झाल्यावर शिंदे सेना काय करणार ? अहंकार ही अशी गोष्ट आहे कि ती शिंदे ह्यांना मातोश्रीवर जाण्यापासून थांबवणार म्हणज...
 फुटलेल्या अंड्यांचे प्रकाशन श्रीधर तिळवे नाईक  दिलीप विठ्ठलराव जगताप ह्यांची नाटके कॉपर कॉईन तर्फे येतायत ही एक आनंदाची बातमी ! साठोत्तरी नाटककारांच्यानंतर मराठीत सत्तरोत्तर नाटककारांची एक पिढीचं पुढे आली ज्यांनी विजय तेंडुलकर , चि त्र्य खानोलकर , ह्यांच्यानंतर मराठी नाटकाचा वारसा पुढं न्हेला त्यात वृंदावन दंडवते , महेश एलकुंचवार , सतीश आळेकर , अच्युत वझे ह्यांच्या तोडीस तोड काम केले होते ते दिलीप जगताप ह्यांनी ! त्यांच्या संहिता उपलब्ध नसणं हा एक अभ्यासकांसाठी फार मोठा घोळ असे पण आता त्यांची नाटकं छापील स्वरूपात येतायत .  दिलीप जगतापांचं एक अंडं फुटलंपासून सुरु झालेला प्रवास एका अंड्यातून अनेक कोंबड्याना जन्म देता झाला जवळजवळ पन्नासेक नाटकांचा हा संभार आहे अस्सल ग्रामीण इथॉसला सहज पेलत , अस्तित्ववादाला इंडियन सिच्युएशनची ऍब्सर्डिटी पुरवत त्यांची झालेली वाटचाल हा सृजनशीलतेचा एक उत्कट सोहळा होता आणि आहे प्लॉटविरहित बांधणी हे अब्सर्ड नाटकाचे वैशिष्ट्य त्यांच्या नाटकांत अनेकदा प्रकटत राहिलं तेंडुलकरांना प्लॉटला कधीच पूर्ण तिलांजली देता आली नाही काहीवेळा तर आळ...
मोदी श्रीधर तिळवे नाईक  मोदी , खोटे बोलणे आणि धर्मराज्यकारण श्रीधर तिळवे नाईक  सध्या मोदींच्या खोटं बोलण्याविषयी बरीच चर्चा होते आहे ह्या अनुषंगाने काही मुद्दे मांडतो आहे  अज्ञान , हितसंबंधपणा , अडाणीपणा आणि बढाईखोरपणा ह्यातून अनेक प्रकारचे खोटे जन्मत असते पुरोहीत आणि राजकारणी लोक अनेकदा ह्या चार अवगुणांचे सामुदायिक प्रदर्शन करत असतात त्यातूनच अनेक धार्मिक आणि राजकीय दंतकथांची निर्मिती होते स्वतःला देवाचा अवतार म्हणणारा राजकारणी आणि आम्हीच भूदेव म्हणणारे पुरोहीत हे सारख्याच मुशीचे असतात खोटेपणा हा अनेकदा दोघांच्या धंद्याचा भाग असतो जनता ह्यांच्यावर भाबडेपणाने का विश्वास ठेवते हे अगम्य कोडे आहे ह्या खोटेपणाचं  काही प्रकार असतात  १ गोष्टी फुगवून सांगणे ह्यात तथ्य अतिशयोक्ती करून सांगितले जाते उदा नेहरू घराण्याचा स्वातंत्र्य आंदोलनातील सहभाग विशेषतः इंदिरा गांधींच्या संदर्भात  २ तथ्याला काल्पनिकतेचि जोड देणे ह्यात तथ्य थोडे असते पण त्याच्या आधारावर काल्पनिक गोष्ट सांगणे म्हणजे अटल बिहारी वाजपेयीनीं इंदिरा गांधींना दुर्गा म्हंटले प्रत्यक्षात...
इमेज
 वैचारिक बायोडाटा मी कम्म्युनिस्ट आहे का ? नसेन तर मग मी काय दृष्टीचा माणूस आहे ? श्रीधर तिळवे नाईक  चं प्र देशपांडे ह्यांनी माझ्या एका पोस्टला कमेंट देतांना मुळात मी कम्म्युनिस्ट आहे असं तर उद्या तिळवे म्हणणार  नाहीत  ना अशी शंका व्यक्त केली आहे ते म्हणतात."  Champra Deshpande : या मार्गाचे माझे कवडीचे वाचन वा ज्ञान नसल्याने, खरेच, काहीच कळले नाही -- पण एक सुप्त भीती निर्माण झाली की सालं मुळात मी एक कम्युनिस्ट आहे असे तर उद्या तिळवे म्हणणार नाहीत ? ! " ही शंका माझ्याबाबत अनेकदा अनेकांनी व्यक्त केलेली आहे म्हणून मी इथे त्याचे उत्तर देतो आहे.  ह्या उत्तराआधी सर्वात प्रथम एक खुलासा मी संन्यासी आहे आणि भारतीय शैव परंपरेनुसार संन्याशाची बांधिलकी ही फक्त लोकांशी व लोककल्याणाशी असली पाहिजे राज्यकर्त्यांशी नाही मी ही गोष्ट मानतो त्यामुळेच कुठल्या वादाकडून आणि व्यक्तीकडून काय कामे झाली पाहिजेत ह्याचे सुस्पष्ट आकलन माझ्या डोक्यात असते आणि मी त्याप्रमाणे कार्य करतो आणि शक्य असेल तर करवून घेतो म्हणजे अगदी एखादे व्यक्तिमत्व साहित्य-संपादक असेल तर त्याच्य...