फुटलेल्या अंड्यांचे प्रकाशन श्रीधर तिळवे नाईक
दिलीप विठ्ठलराव जगताप ह्यांची नाटके कॉपर कॉईन तर्फे येतायत ही एक आनंदाची बातमी ! साठोत्तरी नाटककारांच्यानंतर मराठीत सत्तरोत्तर नाटककारांची एक पिढीचं पुढे आली ज्यांनी विजय तेंडुलकर , चि त्र्य खानोलकर , ह्यांच्यानंतर मराठी नाटकाचा वारसा पुढं न्हेला त्यात वृंदावन दंडवते , महेश एलकुंचवार , सतीश आळेकर , अच्युत वझे ह्यांच्या तोडीस तोड काम केले होते ते दिलीप जगताप ह्यांनी ! त्यांच्या संहिता उपलब्ध नसणं हा एक अभ्यासकांसाठी फार मोठा घोळ असे पण आता त्यांची नाटकं छापील स्वरूपात येतायत .
दिलीप जगतापांचं एक अंडं फुटलंपासून सुरु झालेला प्रवास एका अंड्यातून अनेक कोंबड्याना जन्म देता झाला जवळजवळ पन्नासेक नाटकांचा हा संभार आहे अस्सल ग्रामीण इथॉसला सहज पेलत , अस्तित्ववादाला इंडियन सिच्युएशनची ऍब्सर्डिटी पुरवत त्यांची झालेली वाटचाल हा सृजनशीलतेचा एक उत्कट सोहळा होता आणि आहे प्लॉटविरहित बांधणी हे अब्सर्ड नाटकाचे वैशिष्ट्य त्यांच्या नाटकांत अनेकदा प्रकटत राहिलं तेंडुलकरांना प्लॉटला कधीच पूर्ण तिलांजली देता आली नाही काहीवेळा तर आळेकरही प्लॉटबद्ध लिहीत राहिले पण जगतापांनी मात्र त्यावर मात करण्याचा जेन्युईन प्रयत्न केला कधी तो प्रचंड यशस्वी झाला तर कधी गरगरला दुर्देवाने मराठीतील अकादमीक लोकांना त्यांची अचिव्हमेंट दिसली नाही त्यांच्या नाटकातील देशीयता किमान देशीवाद्यांना नीट दिसेल असं वाटलं होतं पण तेही झालं नाही ते आणि वृंदावन दंडवते दोघेही मराठी नाटकातील देशीवादाचे उत्तम उदाहरण होते ह्या देशीवादाला अस्तित्वकेंदी देशीवाद म्हणतो आणि त्याची सुरवात चित्रे कोल्हटकर ह्यांच्या कविता आणि नेमाडेंची कोसला व भाऊ पाध्येंची वासूनाका आणि तेंडुलकरांचे घाशीराम कोतवालपासून होते पुढे नेमाडे वास्तववादाकडे वळल्याने समस्त देशीवादी चळवळ वास्तववादी होत गेली आणि अस्तित्वकेंदी देशीवाद मागे पडला त्याचा फटका विलास सारंग , दिलीप जगताप आणि वृंदावन देशपांडे ह्यांना पडला असो
देर आये दुरुस्त आये म्हणून आता जे येतंय त्याचे स्वागत ! निदान आतातरी जगतापांना न्याय मिळेल ही अपेक्षा !
श्रीधर तिळवे नाईक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा