राजा राम मोहन रॉय आदिम शैव ते आदिम हिंदू : हिंदुवादाची पहिली सांस्कृतिक उडी श्रीधर तिळवे नाईक
राजा राम मोहन रॉय आदिम शैव ते आदिम हिंदू : हिंदुवादाची पहिली सांस्कृतिक उडी श्रीधर तिळवे नाईक आज सर्व आर्य राजा राममोहन रॉय ह्यांना भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणत असले तरी प्रत्यक्षात राजा राम मोहन रॉय (१७७२ ते १८३३)ह्यांचे भारतीय संस्कृतीतील केऑटिक स्थान हे अजूनही विश्लेषणाच्या कक्षांत आलेलं नाही हिंदुइझम (म्हणजेच हिंदुवाद ) हा शब्द त्यांनी वापरला हेसुद्धा अनेकांना माहित नाही दुसऱ्या अकबराने त्यांना राजा हे टायटल दिले असल्याने हिंदुत्ववादी हल्ली ते वापरत नाहीत व विकिपिडीयावर त्यांचा उल्लेख राममोहन रॉय असा होतो सती व बालविवाह ह्यांना त्यांनी विरोध केला असे आपण आपल्या पाठ्यपुस्तकातून वाचत असतोच मात्र राममोहन रॉय ह्यांनी जातिव्यवस्थेला सुरवातीला कडक विरोध केला होता हे मात्र आपणाला सांगितलं जात नाही प्रत्यक्षात सांगितलं जातं त्यापेक्षा रॉय ह्यांचे व्यक्तिमत्व प्रत्यक्षात फार गुंतागुंतीचे होते रॉय ह्यांच्यानंतर अनेकांनी हिंदुइजम हा शब्द वापरला आणि त्याबद्दल सुरवातीच्या काळापासून कोलाहल होता उदाहरण म्हणून रा ना दांडेकर घेऊ रा ना द...