मंडलीकरण , ओबीसीकरण आणि शैविकरण भाग १ श्रीधर तिळवे नाईक 

नव्वोदत्तर पिढीत अनेक पातळ्यांवर क्रांतिकारी बदल झाले आणि त्या बदलांना सामोरे जाण्याची जबाबदारी आमच्या पिढीवर आली  त्यातील एक बदल म्हणजे मंडल आयोगाने ओबीसींना दिलेले आरक्षण ! इंदिरा गांधींच्यापर्यंत जो प्रश्न काँग्रेसी राजवटीने चालढकल करत टाळला होता तो प्रश्न इंदिरा गांधी पायउतार झाल्यावर धसास लागायला सुरवात झाली . जनता पक्ष सरकारने आर्टिकल ३१४ नुसार दिलेल्या कायदेशीर तरतुदीनुसार १ जानेवारी १९७९ ला बिंदेश्वरी प्रसाद मंडल ह्यांच्या अध्यक्षतेखाली सेकण्ड बॅकवर्ड क्लास मिशन हा आयोग नेमला तत्पूर्वी काका कालेलकरांनी ऑब्जेक्टिव्ह कॅटेगरीज नाही म्हणत टाईमपास केला होता मंडल ह्यांनी असा टाईमपास न करता ११ कॅटेगरीज निश्चित करून काम केले व डिसेम्बर १९८० ला आपला रिपोर्ट सबमिट केला कमिशनने १९३१ चा जनगणना रिपोर्ट वापरून जवळ जवळ ५२ टक्के लोक ओबीसी कॅटेगरीत मोडतात असे दाखवून दिले व त्यांच्यासाठी २७ टक्के जागा राखीव ठेवाव्यात अशी शिफारस केली त्यामुळे आरक्षित जागांचे प्रमाण ४९ ते ५० टक्क्यापर्यंत जाणार होते ८० टक्के जनतेला ५० टक्के जागा असे हे समीकरण असल्याने मोजके अपवाद वगळता ह्याला फारसा विरोध झाला नाही कारण २० टक्के जनतेला ५० टक्के जागा तरीही खुल्याच होत्या ओबीसींच्यात फक्त शूद्र न्हवते तर त्यात वैश्य आणि क्षत्रिय वर्णातीलही काही जातींना आरक्षण होते ह्यामुळे क्षत्रिय व वैश्य वर्णात आरक्षित आणि अनारक्षित अशी फूट पडणे अटळ होते आणि तशी ती पडली उदा ९६ कुळी मराठा अनारक्षित तर कुणबी मराठा आरक्षित शैव ब्राम्हण , लिंगायत ब्राम्हण अनारक्षित तर वैश्य व क्षत्रिय गुरव आरक्षित पुढे जनता पक्षाचे सरकार कोसळले आणि इंदिरा गांधी व पुढे राजीव गांधी सत्तेवर आले व त्यांनी पुन्हा एकदा टिपिकल काँग्रेसी चालढकल करायला सुरवात केली पुढे व्ही पी सिंग ह्यांचे सरकार आल्यावर पुन्हा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला १९८९ ला ह्या सरकारने हा प्रश्न टेबलवर घेतला ह्याविरोधात निदर्शने सुरु झाली आणि प्रोरिजर्वेशनवादी व अँटीरिजर्वेशनवादी असे दोन कॅम्प तयार झाले शाहबानो आणि राम जन्मभूमी ह्या प्रश्नांनी प्रोसेक्युलॅरिज्म व अँटीसेक्युलॅरिज्म अशी धार्मिक फूट पडली होती मंडल आयोगामुळे प्रोरिजर्वेशनवादी व अँटीरिजर्वेशनवादी अशी सामाजिक फूट पडली आणि पुढचे राजकारण ह्या दोन फुटींच्याभवती फिरणार हे स्पष्ट झाले 

प्रबोधनाच्या प्रोजेक्टने 

१ ब्राम्हण विरुद्ध ब्राम्हणेतरवाद 

२ समाजकारणवाद विरुद्ध राजकारणवाद 

३ ब्रिटिशवाद विरुद्ध स्वातंत्र्यवाद 

४ सेक्युलरॅलिझम विरुद्ध धर्मवाद 

असे वाद समोर आणले 

साठोत्तरी चळवळीने 

१ मार्गीवाद विरुद्ध देशीवाद 

२ स्त्रीवाद विरुद्ध पुरुषसत्ताकवाद 

३ दलितवाद विरुद्ध अदलितवाद 

४ राष्ट्रवाद विरुद्ध प्रदेशवाद 

असे वाद समोर आणले 

नव्वदोत्तर चळवळीने 

१ सेक्युलरवाद विरुद्ध हिंदुत्ववाद 

२ नवबहुजनवाद  विरुद्ध नवअभिजनवाद 

३ जागतिकीकरणवाद विरुद्ध जागतिकीकरणविरोधीवाद 

४ तिसरी नवता विरुद्ध चौथी नवता 

असे चार वाद जन्माला घातले त्यातील दुसऱ्या वादाला  ओबीसी आरक्षण व मंडल आयोग जबाबदार होते  ज्यांना आरक्षण मिळाले ते सर्व नवबहुजनवादी होत ह्यातील काहींनी आरक्षण नाकारले असले तरी हा नकार वैयक्तिकच राहिला त्याला सार्वजनिक धोरण म्हणून मान्यता मिळाली नाही भारताच्या सामाजिक इतिहासात १८५० नंतर प्रथमच ओबीसी समूह एकत्र आला आणि त्याने स्वतःच्या आरक्षणाचे जोरदार समर्थन करायला सुरवात केली “Indians do not cast their votes, they vote their castes” हे निवडणूक राजकारणाचे घोषवाक्य झाले  नवअभिजन म्हणजे ज्यांना आरक्षण नाही असे सर्व लोक व जातसमूह ! ह्यातून एक प्रचंड विरोधाभास तयार झाला तो म्हणजे वर्णवर्चस्वाचे वर्चस्व संपले व जातीवर्चस्वाचे वर्चस्व वाढले त्यामुळे ज्या जातींची लोकसंख्या अधिक त्यांचे महत्व अधिक हे समीकरण अचानक वाढले काँग्रेस ही ओबीसी आरक्षणाच्या विरोधी असल्याचा इतिहास जाणीवपूर्वक आणला गेला आणि त्यामुळे ती अचानक नवअभिजनांची संघटना बनली नेमकी ह्याचवेळी सेक्युलरवाद विरुद्ध हिंदुत्ववाद ही दुफळी समोर आल्याने हे नवअभिजन भाजपकडे गेले तर नवबहुजन बी एस पी जनता दल शिवसेना वैग्रे अनेक पार्ट्यांकडे ! काँग्रेसने नवबहुजन व नवअभिजन असे दोन्ही वर्ग गमावल्याने तिचा पराभव अटळ बनला आणि व्याप्तीने वाढतही गेला जिथे  बी एस पी जनता दल शिवसेना थर्ड फ्रंट वैग्रे पक्ष सशक्त न्हवते तिथे त्याचा फायदा भाजपला मिळाला त्यातच ओबीसींच्यात शैव भावना जागृत करण्यात व त्यांचे हिंदुत्वकरण करण्यात भाजपला जसे जसे वाढते यश मिळू लागले तसे तसे ओबीसी आरक्षणाने सशक्त झालेला हा नवबहुजनवादी वर्ग हिंदुत्वाकडे सरकायला लागला वास्तविक व्ही पी सिंग हेही काँग्रेसचेच पुढारी होते आणि ते वारंवार ओबीसी घटकांकडे लक्ष्य वळवू पाहात होते पण काँग्रेसला गांधी घराण्याखेरीज काही दिसत नसल्याने ते बाहेर पडले पुढे शरद पवार ममता बॅनर्जी वैग्रे असेच बाहेर पडले आजही काँग्रेसला ह्या नवबहुजनवादी घटकाशी काही फार देणे घेणे आहे असं वाटत नाही आणि ह्याची किंमत काँग्रेस मोजत आहे 


प्रश्न असा आहे कि महाराष्ट्रात महात्मा फुले निर्माण होऊनही ओबीसी नवबहुजनवादी राजकारणाचे केंद्र महाराष्ट्रातून का निर्माण झाले नाही ? वास्तविक सगळे यादव स्वतःला क्षत्रियच समजतात पण त्यांना नवबहुजनवादी लोकांना आकर्षित करण्यात जे उत्तर भारतात यश मिळाले तसे इथे का झाले नाही ?  कि ९६ कुळी आत्मकेंद्रितपणा नडला ? कि शिवसेनेने हिंदुत्वाच्या व मराठीवादाच्या नावाखाली ह्याला आपल्या पंखाखाली घेतला ? हिंदुत्ववाद्यांनी ओबीसी आरक्षणाला पाठिंबा दिल्याने हे घडले का ? नंतर तर मायावतींच्यामागेही हे नवअभिजनवादी गेले पण महाराष्ट्रात वंचित आघाडीच्या मागे गेले नाहीत !  का ? बाबासाहेबांनी केलेल्या धर्मांतराचा ह्या मागे मोठा वाटा आहे मायावतींनी अजूनही धर्मांतर केलेलं नाही ते त्यामुळेच कारण धर्मांतर केले तर आपण ओबीसी मते गमावू अशी सार्थ भीती त्यांना वाटते मग ओबीसी हा कट्टर हिंदू आहे असा निष्कर्ष काढायचा का ?आणि हा ओबीसी असा असेल तर त्याला बदलायचे कसे ? माझं स्वतःचं मत असं कि ह्या नवअभिजनवर्गाला बदलायचे असेल तर त्याच्याच घरात असलेल्या मूळ शैव धम्माची आठवण करून देणे हाच ह्यावरचा उपाय आहे पण वंचित आघाडी इतकी ओबीसीपासून तुटलेली कि त्यांनी वैष्णव धर्माच्या विठ्ठलाला कवटाळले त्यामुळे हा नवअभिजन वर्ग बदलणे शक्य आहे का ? विठ्ठल हा कितीही शैव होता तरी आता तो पूर्ण वैष्णव बनला आहे आणि वैष्णव वर्णजात आणि अस्पृश्यता पाळतात ज्या गोष्टींच्याविरुद्ध बाबासाहेबांनी लढा दिला त्याच गोष्टींना सपोर्ट देणाऱ्या धर्माकडे जाणे ही राजकीय आत्महत्या आहे पण प्रकाश आंबेडकरांना हे सांगणार कोण ? ज्योतिबा फुले काय खंडोबा आणि ज्योतिबाची पाठराखण करायला उगाच निघाले होते का ? फुलेंनी विष्णूच्या अवतारांची जी झडती घेतलीये ती उगाच का ? कि प्रकाश आंबेडकरांनी महात्मा फुले वाचलेले नाहीत ?

बिहारची निवडणूक आली कि नेहमीच पिछडोंका पॉलिटिक्स ह्यावर चर्चा सुरु होते आणि ती ह्या नवअभिजन नवबहुजन वर्गांना धरून होते नितीशकुमार ह्यांचे नेतृत्व तिकडच्या नवबहुजनवादी कुणबी कुर्मी जातीतून आलेले !त्यांनी नवअभिजनवादी यादवांच्याकडून सत्ता खेचून घेतली खरी पण ह्या निवडणुकीत ते पराभूत होतील असा अंदाज सर्वच व्यक्त करताहेत कदाचित असे घडेलही पण हे सहजासहजी घडेल असे वाटत नाही कारण मोदी व ते हे दोघेही नवबहुजनवादी वर्गातून आलेत जर का पुन्हा जातीनिहाय व्होटिंग झाले तर नितीशकुमार पुन्हा सत्तेवर येणे अटळ आहे पण जर हा नवबहुजनवादी वर्ग जातीबाहेर येऊन केवळ परफॉर्मन्सच्या आधारे व्होटिंग करेल तर नितीशकुमार मोदी हरतील ज्या नवबहुजनवादी समूहाने मोदींना सत्तेवर आणले तो नेमका काय विचार करतोय हे ह्या निमित्ताने कळणार आहे प्रश्न असा आहे कि नवबहुजन वर्ग आरक्षणाच्या बाहेर जाऊन जातीच्या बाहेर जाऊन हिंदुत्वाच्या बाहेर जाऊन मतदान करणार का ?


श्रीधर तिळवे नाईक 



 मंडलीकरण , ओबीसीकरण आणि शैविकरण भाग २ श्रीधर तिळवे नाईक 

पहिल्या भागात मंडल आयोगामुळे संघटित होऊन तयार झालेल्या नवबहुजन वर्गाची सत्तेत असलेल्या भूमिकेची चर्चा केली होती आणि हा वर्ग मोदी व नितीशकुमार ह्यांना जवळजवळ एकगठ्ठा मतदान करतोय हे सांगितले होते जे निकाल आले ते अपेक्षित होते फुगा कितीही तेजस्वी असला तरी तो मोठा होण्यावर बंधने आहेत लालूप्रसाद यादव ह्यांना न वापरणे फायदेशीर होते कारण लालुजिंनि आपली इमेज नक्कीच तेव्हढी खराब केली आहे मात्र एक तरुण नेता आला हे निश्चितच छान झाले भारतात मवाळ सेक्युलर डाव्या विचारावरचा काँग्रेसचा होल्ड संपत चाललाय आणि हिंदुत्ववादाचा मोदी इफेक्ट आटत चाललाय दोन्हीकडून लॉस असला तरी  प्रादेशिक डाव्या  पक्षांना त्याचा फायदा उठवणे जमलेलं नाही केरळात ख्रिश्चन विरुद्ध हिंदू असं ध्रुवीकरण नसतं आणि इतर प्रदेशाप्रमाणं तिथे नवबहुजनवादी संघटित झाले असते तर तिथेही कम्म्युनिस्ट पराभूत झाले असते 

बिहारमधील भाजप आघाडीचा विजय हा नवबहुजनवादी लोकांनी ओबीसी नेत्यांना दिलेल्या मतांचा परिणाम आहे हे नेते खरोखर नवबहुजनवादी लोकांसाठी काही करतात का हा खरेतर मिलियन डॉलर प्रश्न आहे नितीशकुमारांना मागील दोन वर्षात तो परफॉर्मन्स देता आलेला नाही जो त्यापूर्वी त्यांनी दिला होता त्यांना मुख्यमंत्रीपद दिले नाही तर ते फुटून इतरांच्याकडे जातील व महाराष्ट्र फॉर्म्युला रिपीट होईल ह्या भयाने भाजप त्यांना मुख्यमंत्री करेल हे खरं पण लोकांनी नितीशकुमारांना मुख्यमंत्री म्हणून कौल दिलेला नाही ही वस्तुस्थिती आहे आता नितीशकुमारांना जनाची लाज वाटून त्यांनी मुख्यमंत्रीपद नाकारले तर गोष्ट वेगळी पण त्यासाठी मनाचीही लाज असावी लागते भारतीय राजकारणात ती कुणाकडेच नाही त्यामुळे नितीशकुमार मुख्यमंत्री होतील पण पूर्वीचे स्वातंत्र्य त्यांना मिळणे शक्य नाही तेजस्वीकडे ते गेले तरी तिथेही हे स्वातंत्र्य मिळणे शक्य नाही त्यामुळे प्रेशर कुणाचे झेलायचे एव्हढाच प्रश्न आहे ह्यातील भाजपचे प्रेशर कॅल्क्युलेट करता येण्याजोगे आहे तेजस्वी कॅल्क्युलेशनबाबत अनपेक्षित धडे देऊ शकतो त्यामुळे ओळखीचा कधीही परवडतो ह्या न्यायाने नितीशकुमार भाजपबरोबर जाण्याची शक्यता जास्त आहे 

त्यामुळे मजबुरीका नाम महायुती म्हणत मागील पानावरुन पुढे चालू अटळ आहे 

प्रश्न नवबहुजन समाजाचा आहे ह्या समाजाने २१ व्या शतकात चौथी नवता स्वीकारून स्वतःचा विकास करावा असं माझं स्पष्ट मत आहे जातीपातीची राजकारणं सत्ता देतील पण विकास देणार नाहीत विकासासाठी अद्ययावत होत राहणे गरजेचे असते करवा चौथपेक्षा आपल्या पोरी चंद्रावर कधी लॅण्ड होतील ते पाहणं अधिक गरजेचं आहे ब्राम्हणांना सध्या १० व्या शतकात जायचे डोहाळे लागलेत किंवा अमेरिकेला नवबहुजन समाजाने भारताला अमेरिकासारखे पण अध्यात्मिक महासत्ता  बनवण्याचे स्वप्न पाहावे शैव संस्कृती -सिंधू संस्कृतीपासूनच आपला वारसा अधिकाधिक अडवान्स होण्याचा आहे आर्यांच्या नादाला लागून आपण तो टाकून दिला आता पुन्हा उभारी घेण्याचा चान्स आहे वारश्याचा अभिमान असावा पण त्यात अडकून पडू नये आणि खोट्या दंतकथांच्यात व पुराणांच्यात तर आपण अजिबात अडकून पडू नये विज्ञान तंत्रज्ञानाची चिन्हविज्ञान चिन्हतंत्रज्ञानांची कास धरावी आणि जे नेते ह्यात अडथळा आणतील त्यांचा त्याग करावा ह्यासाठी हजार वर्षाच्या लागलेल्या घाण सवयी सोडून द्याव्यात समुद्र पहावा जातींची डबकी नाही शिव संपूर्ण ब्रह्मांड आहे कुठं डबक्यात पोहताय मित्रांनो ?


श्रीधर तिळवे नाईक 








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट