आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १७१ ते १८० श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १७१ ते १८० श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १७१ कर्मयोग खुदिराम बोस ह्यांचा व कर्मयोग नथुराम गोडसे ह्यांचा श्रीधर तिळवे नाईक
गीतेत कर्मयोग हा फळापेक्षावरून ठरतो हे पाहिल्यानंतर प्रत्यक्षात त्याच्या ऍप्लिकेशनमधले प्रॉब्लेम काय आहेत हे पाहायला हरकत नाही . ह्या संदर्भात भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक चाफेकर बंधू ,खुदिराम बोस मदनलाल धिंग्रा आणि गांधीहत्या करणारा नथुराम गोडसे ह्यांचे उदाहरण पाहण्यासारखे आहे एका हातात गीता आणि दुसऱ्या हातात फाशीचा दोर घेऊन फाशी जाणाऱ्यात पहिले नाव चाफेकर व नंतर खुदिराम बोस ह्यांचे आहे आणि गीतारहस्य लिहिण्याची एक प्रेरणा खुदिराम बोसही असावा कारण खुदिरामच्या हातात फाशीपूर्वी गीता होती ही बातमी त्यावेळी पसरली होती खुदिरामाला कर्मयोगाने प्रेरणा दिली होती खुद्द लाला लजपत राय ह्यांनीही १९०७ साली त्यांना शिक्षा झाली तेव्हा गीतेवर लिखाण केले होते जे बहुदा टिळकांच्या आधीचे लिखाण आहे
भक्तियोग व ज्ञानयोग बाजूला सारून गीतेतील कर्मयोग स्वीकारून फाशी जाणारे पहिले चाफेकर होते मग खुदिराम बोस ! टिळकांनी ह्यांचा आदर्श मानला असावा खुद्द वंदे मातरम लिहिणाऱ्या बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी कृष्ण चरीत लिहिले होतेच पुढेही गांधींनी गुजराती भाषेतील गीतारहस्य वाचून लिहिले होते,“I went reverentially through the Gujrati translation of the Lokamanya’s great work. The reading whetted my appetite for more and I glanced through several works on Gita” पुढे मदनलाल धिंग्रानेही एका हातात फाशी जाण्यापूर्वी गीताचं घेतली होती
एकीकडे हे महान क्रांतिकारक असतानाच दुसरीकडे नथुराम गोडसेही आहे त्याच्याही एका हातात गीता आणि दुसऱ्या हातात फाशीचा दोर होता ह्यावरून हे उघडच आहे गोडसेचाही अविर्भाव हा कर्मयोग्याचा आहे आपण जे काही करतोय त्यात पुष्कळांचे पुष्कळ सुख आहे ह्याची खात्रीच गोडसेला पटली होती असे त्याच्या लिखाणावरून वाटते गीतेला कर्मयोग असेल तर हिंसा हा प्रॉब्लेम वाटत नाही कारण गीतेच्या दृष्टीने कर्मापेक्षा त्याचे स्वरूप सकाम आहे कि निष्काम हे अधिक महत्वाचे आहे गोडसेने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही कारण तो स्वतःला अर्जुन व गांधींना भीष्म व द्रोण समजत होता जो चुकीच्या बाजूने उभा आहे असे त्याला वाटत होते त्यामुळेच गांधींची हत्या केल्यानंतरही गोडसे गांधींचा उल्लेख आदरणीय असाच करतो ही स्टाईल पांडवांची आहे हत्या करावयाची आणि पुढे आदरणीयही म्हणावयाचे इतकेच नाही तर पितामह भीष्माकडून उपदेशही घ्यायचा
क्रांतिकारक इंग्रजांचा उल्लेख आदरणीय म्हणून करत नाहीत ते थेटच इंग्रजांना शत्रू मानतात कारण स्वातंत्र्ययुद्धात ब्रिटिश हे स्पष्ट शत्रू आहेत पण जे मवाळ आहेत त्यांना ते आदरणीय आहेत जहाल आणि मवाळ ह्यांच्यात जो फरक आहे तो हाच आहे जहालांना ब्रिटिश आदरणीय वाटत नाहीत पण मवाळांना ते भीष्माचार्य द्रोणांच्याप्रमाणे आदरणीय वाटतात म्हणूनच गोखलेपासून गांधींच्यापर्यंत सर्वांना गीता आवडते
नथुराम गोडसे इंग्रज आणि महात्मा गांधी ह्यांच्यात फरक करत नाहीत वास्तविक हत्याच करावयाची होती तर जीनांची करावयाची होती पण गोडसेंना जीना शत्रू वाटत नाही गांधी शत्रू वाटतो ह्यामागचे गौडबंगाल काहीकेल्या उलगडत नाही जिना का नाही आणि गांधी का हा नथुराम गोडसेबाबत सर्वात कळीचा प्रश्न आहे फाळणी हा एक प्रचंड केऑस म्हणजे कोलाहल होता आणि कोलाहलात गोडसेला बहुदा आपला शत्रू स्पष्ट दिसला नाही आणि मग संदिग्धतेतील निश्चितता ही अनेकदा चुकीची असते ह्या न्यायाने त्याने ही कृती केली गोडसे कायमच गांधीवध हा शब्द वापरतो कारण भीष्म द्रोण ह्यांचे महाभारतात वध झालेत
ह्यातून प्रश्न निर्माण होतो कि गीता ही हिंसेला पूरक आहे का ? क्रांतिकारकांनी केलेल्या हत्येलाही गीतेने समर्थनच पुरवले आहे असे स्पष्ट दिसते मात्र इथे कोलाहल होत नाही कारण जो दुसरा आहे तो परका आहे गांधींच्याबाबत असे होत नाही गांधी हा आपला आहे आणि तरीही त्या संतांवर गोळ्या झाडल्या गेल्या आहेत गांधींच्या जिवंत असण्यामुळे हिंदूंच्या हत्या होत राहतील कारण गांधींचं ऐकून हिंदू हत्यार खाली ठेवतील पण मुस्लिम हत्यार खाली ठेवणार नाहीत आणि मग ही लढाई एकतर्फी होऊन हिंदूंची फक्त कत्तलच होत राहील हे थांबवायचे असेल तर गांधी जिवंत राहता कामा नयेत असा काहीतरी विचार गोडसेंच्या आत चालला होता ह्याशिवाय गांधीजींनी पाकिस्तानला पैसे दिले व गांधीजींनी देशाची फाळणी केली हे गैरसमज ! प्रत्यक्षात फाळणीला मुख्य जबाबदार व्यक्ती महम्मद अली जिना होती पण जिनांना मारणे सोपे न्हवते पोलीस बंदोबस्त न घ्यायला ते काही गांधी न्हवते जिनांच्यापर्यंत पोहचणेच शक्य न्हवते पण गांधींच्याबाबत ते सहज शक्य होते अर्जुनाने श्रीकृष्णाला सतत प्रश्न विचारून मग एक उत्तर घेतले तसे गोडसेचे झालेले दिसत नाही त्याने जर का स्वतःच्या श्रीकृष्णाला म्हणजे सावरकरांना अर्जुनासारखे प्रश्न विचारले असते तर कदाचित त्याच्या हातून ही हत्या झाली नसती पण इथे अर्जुनाने कुठल्याही कृष्णाला न विचारता स्वतःच पितामह भीष्माची हत्या केली आणि हा एक सपशेल चुकीचा निर्णय होता तो अंमलात कितीही अचूकपणे आणला गेला असला तरी ! मुळात गांधी द्रोणाप्रमाणे निःशस्त्र होते त्यामुळे मारण्यात कसलेही शौर्य न्हवते ह्याचा अर्थ नथुराम गोडसेने आपण ज्या कारणांसाठी मारतोय त्यांची सत्यअसत्यता नीट पडताळून पहायला हवी होती पण हे झालेले नाही मनात अढी आणि बायस ठेऊन केले गेलेले हे अमानुष कृत्य आहे आपण देशाच्या सर्वोच्च नेत्याला मारतोय ह्याचे भान कुठेही दिसत नाही गांधी आणि सावरकर ह्यांच्यातील लढा हा मुळात हिंसा विरुद्ध अहिंसा ह्या दोन मूल्यांच्यातील लढा आहे हेच नथुरामच्या लक्षात आलेले नाही जर हिंदू सावरकरांचे न ऐकता गांधींचे ऐकत असतील तर तो दोष कुणाचा ? हिंदूंचा ? सावरकरांचा ?कि गांधींचा ? जर खोलात जाऊन पाहिलं तर लक्ष्यात येते कि हा दोष ह्या तिघांचाही नाही हा दोष भगवद्गीतेचा व स्मृतींचा आहे ज्यांनी वर्णव्यवस्था निर्माण करून शस्त्र वापरण्याचा हक्क फक्त क्षत्रियांना दिला आणि आपद्धर्म म्हणून ब्राम्हणांना ! सावरकरांनी सगळे क्षत्रिय जमवायला हवे होते पण ते केले असते तर सावरकरांचे नेतृत्व टिकले असते ? क्षत्रियांनी नेतृत्व क्षत्रियाकडेच हवे आग्रह धरला नसता कशावरून ? मुळात सावरकरांचा प्रस्ताव क्षत्रियांनी स्वीकारला असता ? एकंदर बघता बहुतांशी क्षत्रिय व नवाब इंग्रजांच्या राजवटीत खुश होते असे दिसते कारण जबाबदाऱ्या न घेता आयते उपभोग मिळत होते कुठेतरी शाहू महाराज सयाजी महाराज अपवाद वास्तविक किमानपक्षी समतेचे समताकरण आपापल्या राज्यात तुम्ही पार पाडा आम्ही स्वातंत्र्याचे राजकारण बाहेर चालवतो अशी सन्माननीय जापनीज पद्धतीसारखी तडजोड ब्राम्हणांना व हिंदुत्ववाद्यांना काढता येणे सहज शक्य होती पण हिंदुत्ववादी ब्राम्हणांना ब्राम्हणी अधिकार सोडायचेच न्हवते आणि पुढेही त्यांनी ते सोडलेले नाहीतच त्यांना समताकारण नकोच होते ह्याचे कारण आपण सरकारी नोकऱ्या शिक्षण क्षेत्रातल्या नोकऱ्या व पौराहित्य सोडले तर दुसरे काही करू शकतो हा आत्मविश्वास अनेक ब्राम्हणांना न्हवता ब्राम्हणांना आपली पापे धुवायची ही एक संधी होती काही ब्राम्हणांनी ती साधली काहींनी भयापोटी ती गमावली टिळकांनी धाडसी ब्राम्हण व भयग्रस्त ब्राम्हण ह्या दोघांना सांभाळत कुशलतेने जशी वाट काढली तशी वाट काढणे सावरकरांना जमलेले दिसत नाही किंबहुना हिंदुत्ववाद्यांचा सर्वश्रेष्ठ नेता आजही टिळकच आहेत त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी
गांधींना आपला बहुतांशी समाज निशस्त्र आहे ह्याची जाणीव होती म्हणूनच त्यांनी निःशस्त्र प्रतिकाराची योजना केली टिळकांना गांधींच्याप्रमाणे हिंसेचे वावडे न्हवते पण क्षत्रिय समाज शस्त्र उचलणार नाही ह्याची त्यांना जाणीव होती त्यांना अपेक्षा होती ती ब्राम्हण समाजाकडून ! आणि त्याला बाजीप्रभू देशपांडे बाजीरावापासून परंपरा होती म्हणून त्यांनी ती शक्यता खुली ठेवली होती ह्या खुल्या ठेवलेल्या शक्यतेचेच फलित सावरकर होते दुर्देवाने त्यांना शिक्षा झाली त्यामुळे हिंदुत्ववाद टिळकांच्यानंतर हवा तसा वाढला नाही ह्याउलट राजाराम मोहन रायपासून सुरु झालेल्या हिंदुवादाला गांधीजींचे नेतृत्व लाभले जे अहिंसावादी होते आणि बहुतांशी हिंदू गांधींच्या मागे गेले . नथुरामला ह्याचा राग होता का ? त्याची सावरकरभक्ती लक्ष्यात घेता तो ह्या सिच्युएशनवर खुश नसावा असं दिसतं म्हणजेच ज्या परंपरेच्या नावाने हिंदुत्ववादी गळे काढतात ती परंपराच ह्याबाबत सावरकरांची शत्रू झाली असं दिसतं नथुरामाला हे का दिसलं नाही ?
गोपाळ गोडसे ह्यांनी मी गांधींचा वध का केला हे सांगतांना देशासाठी व जातीच्या भल्यासाठी असं म्हंटल आहे ह्यातील जात ह्या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा ? ब्राम्हण कि हिंदू ? ह्याचा अर्थ जर ब्राम्हण असेल तर ह्या हत्येची पार्श्वभूमी साफ बदलते गांधीजींच्यामुळे ब्राम्हणांच्या हातून नेतृत्व गेलं ही वस्तुस्थिती ! त्याचा सूड म्हणून हे कृत्य केले असेल तर मग हा एक जातीयवादी मर्डर ठरतो आणि फक्त हिंदुत्ववादी ब्राम्हणांसाठी अभिमानाचा विषय बनतो व बनू शकतो
मात्र गांधीहत्येनंतर सर्वच ब्राम्हणांना दोष देऊन जी जाळपोळ व अपवादात्मक ठिकाणी हत्याही झाली ती टिळक सोडा पण गांधीजींच्या कर्मयोगातही बसणारी न्हवती गांधींनी तिचा निषेधच केला असता
थोडक्यात काय गीतेतील कर्मयोग कर्माची रचना न बघता कर्मामागच्या हेतुशीलतेला जे महत्व देतो त्यामुळे गोडसेलाही आपण कर्मयोग पाळल्याचे कृतक समाधान मिळू शकते
माझ्या मते नथुराम गोडसे ह्याने गांधींची हत्या करून हिंदुत्ववाद किमान वीस वर्षे मागे न्हेला दुर्देवाने हिंदुत्ववाद्यांना हे पटत नाही आणि त्यातूनच गोडसेंचे समर्थन आजही उदभवत राहते .
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १७२ श्रीधर तिळवे नाईक
तृष्णाक्षयामुळे होणारे सुख हे इहलौकिक व पारलौकिक सुखापेक्षा उच्च दर्जाचे असते असे भीष्म शांतिपर्वात म्हणतात बुद्ध महाभारताच्या आधीचा मानणारे लोक हा श्लोक गौतम बुद्धाचा मानतात (उदान हा पाली ग्रंथ दुसरे प्रकरण )निर्वाणसुख मोक्षसुख हे उच्च दर्जाचे असते हे खरेच आहे खरेतर तिथे दर्जाचाही अंत असतो सृष्टीतील बाह्य पदार्थाला मात्रा असा एक शब्द आहे ह्या मात्रास्पर्शांनी सुखदुःख प्राप्त होते कर्कश आवाज असो कि आंब्याचा मधुर रस कि चांदण्याने भरलेले आकाश त्याचा नेत्रस्पर्श सर्व स्पर्शाने आपणाला प्राप्त होते प्रथम स्पर्श होतो मग कॉन्टॅक्ट मग कम्मुनिकेशन ! मात्रास्पर्श हा गीतेचा एक आवडता शब्द आहे म्हणून हे सांगितले
लहान मुलांना निखळ क्रियेतच मौज वाटते म्हणून ती सतत चालत बोलत राहतात एकदा ह्या क्रियांच्यातली मौज संपली कि मूलपण सरते आज आपण जिम करतो तेव्हा जर जिममध्ये आपण लहान मुलासारखी आपल्या क्रियांची मौज घेतली कि मजा येते अन्यथा व्यायाम म्हणजे कर्मकांड बनते
शरीर व त्याला होणारे मात्रास्पर्श हे स्वयंसिद्ध असतात असे गीता मानते मात्रास्पर्शाविषयी आवड व निवड असते ती जन्मसिद्ध असते का हा वादाचा विषय आहे माणसात इंनेट ज्याला म्हणतात असे जनेटिक कोड असते आणि त्याचा आवडीनिवडीवर परिणाम होत असतो हे आता सिद्धच आहे पण प्रमाण किती हे मात्र सिद्ध झालेले नाही ह्या आवडीनिवडीचा जो व्यापार आहे तो आत्मकल्याणकारक कसा होईल हे मात्र सर्वस्वी आपल्या हातात असते तो तसा आत्मकल्याणकारक करणे हे गीतेचे उद्दिष्ट आहे हे करायचे असेल तर इंद्रिये व मन ताब्यात ठेवा असे श्रीकृष्ण सांगतो व सात्विक कर्मवाढीचा सल्ला देतो म्हणजे काय तर
भगवद्गीता म्हणते
सत्त्वातसंजायते ज्ञानं रजसो लोभ एव च ।
प्रमादमोहौ तमसो भवतोऽज्ञानमेव च ।।१७ ।।
सत्वमुळे ज्ञान रजमुळे लोभ , मोह व प्रमाद व तममुळे अज्ञान प्राप्त होते
सर्वसामान्य मनुष्य एखादी गोष्ट दुःखकारक असेल तर तिचा त्याग करतो हा त्याग राजस आहे पण जर एखादी गोष्ट सुखकारक असली तरी अंतिमतः ती अकल्याणकारक आहे ह्या ज्ञानाच्या आधारे ती सुखदायक असेल तरीही तिचा त्याग करणे हा सात्विक त्याग झाला आणि जो तामस आहे त्याला कल्याण आणि अकल्याण ह्यांच्यातील फरक करणे हे जमतच नाही त्यामुळे तो त्याग करतच नाही
श्रीकृष्ण सात्विक त्यागाच्या बाजूने आहे आणि तो सुख आणि दुःख ह्या गोष्टी भिन्न मानतो
ह्या पुढचा प्रश्न सुख दुःख भिन्न असेल तर ह्यांच्यात फरक करायचा कसा ? अलीकडच्या काळात हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनलाय कारण परपीडेत आणि आत्मपीडेत सुख मानणारे काही महाभाग असतात असे आता पुढे आले आहे उच्चनीच्चतेत उच्च असतात त्यांच्यांपैकी काहींना परपीडेनेने आनंद प्राप्त होत असतो का आणि जे निच्च असतात त्यांच्यांपैकी काहींना आत्मपीडनेने सुख प्राप्त होत असते का हा एक अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न आजच्या काळात झाला आहे
आपल्याकडे एक बाळबोध समज म्हणजे दुःखाचा अभाव म्हणजे सुख !
श्रीमंतांना सुग्रास जेवणही पचत नाही आणि गरिबांना लाकडंही पचतात (महाभारत शांतिपर्व २८ २९) ह्या वचनाचा प्रत्यय आपणास येत असतोच म्हणजे श्रीमंत असला तरी सुग्रास जेवणाचे सुख मिळेलच असे नाही श्रीमंतांना जास्त चिंता असतात कधीकधी कारण कमावलेलं सांभाळायचं कसं आणि कुणाकुणाकडून हा प्रश्न असतोच पण तरीही ज्याला भाकरी मिळाली नाही त्याचे काय ? भाकरी न मिळण्याचे दुःख सुग्रास जेवणही पचत नाही ह्या दुःखापेक्षा भौतिक पातळीवर निश्चितच आधिक मूलभूत मानायला हवे अध्यात्मिक पातळीवर दोन्हीही दुःखे सारखी असली तरी !आधिदैविक गोष्टींच्यावर माझा विश्वास नाही टिळकांचा असला तरी ! मोक्षिक पातळीवर तुम्ही उपाशीपोटीही आनंदात राहता आणि गीतेचा ह्या पातळीशी फक्त वाचाळीक संबंध आहे
माझ्या मते
१ भौतिक रासायनिक
२ जैविक
३ शारीरिक
४ अंतःकरणात्मक (मन (मानसिक ), बुद्धी(बौद्धिक ) व अहम (अहंकारिक )
अशा चार पातळ्यांवर सुख दुःखे वावरत असतात मोक्षीक पातळीवर सुखदुःखाचा अंत होतो शारीरिक पातळीवर वेदना होतात पण त्यांचा संबंध सुखदुःखाशी रहात नाही
कालिदासाने मेघदूतात (११४ ) म्हंटल्याप्रमाणे नित्य सुख किंवा नित्य दुःख ही स्थिती कुणालाच प्राप्त होत नाही चाकाप्रमाणे सुख दुःख फिरते असते हे खरेच !
ह्यापुढचा प्रश्न संसारात सुख अधिक कि दुःख अधिक हा आहे
अधिभौतिकवादी लोक ज्याअर्थी लोक आत्महत्या करत नाहीत त्याअर्थी जगात दुःखापेक्षा सुख आधिक आहे असा निष्कर्ष काढतात टिळकांच्या मते आत्महत्येचा ह्या प्रश्नाशी संबंधच नाही टिळकांच्या मते मनुष्य म्हणून जन्माला येणे हेच सुखकारक मग टिळक त्यांच्या नेहमीच्या शैलीत मनुस्मृती काढतात आणि म्हणतात मनुस्मृतीप्रमाणे
भूतानां प्राणिनः श्रेष्ठाः प्राणिनां बुद्धिजीविनः ।
बुद्धिमत्सु नराः श्रेष्ठा नरेषु ब्राह्मणाः स्मृताः ॥ ९६ ॥
ब्राह्मणेषु च विद्वांसो विद्वत्सु कृतबुद्धयः ।
कृतबुद्धिषु कर्तारः कर्तृषु ब्रह्मवेदिनः ॥ ९७ ॥
म्हणजे सर्व भूतांच्यात प्राणी श्रेष्ठ प्राण्यांच्यात बुद्धीजीवी श्रेष्ठ
बुद्धिजीवींच्यात मनुष्य श्रेष्ठ आणि मनुष्यांच्यात ब्राम्हण श्रेष्ठ
ब्राम्हणांच्यात विद्वान ब्राम्हण श्रेष्ठ विद्वान ब्राम्हणांच्यात कृतिशील ब्राम्हण श्रेष्ठ
आणि कृतिशील ब्राम्हणांच्यात कर्ता म्हणजे प्रत्यक्ष कृती करणारा ब्राम्हण श्रेष्ठ आणि कर्ता ब्राम्हणांच्यात ज्याने ब्रम्ह जाणले आहे तो श्रेष्ठ
टिळक नेहमीप्रमाणे सोयीस्कररीत्या पुढचे श्लोक देत नाहीत पण आपण ते घ्यायला हवेत
उत्पत्तिरेव विप्रस्य मूर्तिर्धर्मस्य शाश्वती ।
स हि धर्मार्थमुत्पन्नो ब्रह्मभूयाय कल्पते ॥ ९८ ॥
ह्याचा अर्थ ब्राम्हणाची उत्पत्ती म्हणजे धर्ममूर्तीची शाश्वती वा धर्माच्या मूर्ततेचि शाश्वती
त्याचा जन्म धर्मासाठीच आणि ब्रम्हप्राप्तीसाठी
ब्राह्मणो जायमानो हि पृथिव्यामधिजायते ।
ईश्वरः सर्वभूतानां धर्मकोशस्य गुप्तये ॥ ९९ ॥
ईश्वरः सर्वभूतानां धर्मकोशस्य गुप्तये ॥ ९९ ॥
ह्याचा अर्थ ब्राम्हण जन्मताच तो पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ बनतो तो पृथ्वीवरील सर्व भूतांचा म्हणजेच सजीव निर्जीव आणि माणसांचा अधिपती बनतो ईश्वर बनतो आणि धर्मकोशाचा संरक्षक बनतो
सर्वं स्वं ब्राह्मणस्येदं यत् किं चित्जगतीगतम् ।
श्रैष्ठ्येनाभिजनेनेदं सर्वं वै ब्राह्मणोऽर्हति ॥ १०० ॥
ह्याचा अर्थ ह्या चितजगात जे जे आहे ती ब्राम्हणाची प्रॉपर्टी आहे स्वतःच्या सुपीरियर जन्मामुळेच तो ह्या सदगुणाला योग्य ठरतो
मेधातिथीनं बरीच चढाओढ करूनही ह्या श्लोकांचा मूळ अर्थ झाकला जात नाही कारण मनू ब्राम्हणांना सर्वश्रेष्ठ ठरवण्याकरताच मनुस्मृती लिहीत आहे ज्याला टिळक सुखदुःखविवेक म्हणतात तो ह्या श्लोकांत कुठे आहे ?
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १७३ सुख पाहता जवाएव्हढे दुःख पर्वताएव्हढेश्रीधर तिळवे नाईक
मराठीत मितींना विशेषतः अवकाशाला शब्द आहे पैस ह्या पैसात जे असते ते पसारा ! जो तो ह्या पसाऱ्यात पसरायला बघतो आणि ह्या पसारापासून दोन एकक तयार होतात १ पसा आणि २ पैसा ह्यातील पैसा सर्वांनाच हवासा वाटतो कारण पसाऱ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तो आवश्यक वाटतो आणि जेव्हा तुम्हाला मोक्ष मिळतो तेव्हा ह्या पसाऱ्याचा पिसारा होतो व तुम्ही मोरासारखे नाचू लागता
ह्या पसाऱ्याविषयी वासना निर्माण होत राहतात माणूस ऐसपैस पसरून गप्प रहात नाही त्याला अख्खा पसारा गिळायचा असतो पण हे शक्य नसते काही वासना पूर्ण होतात काही नाही वासनांच्या पूर्ततेवर व्यावहारिक यश आणि अपयश मोजलं जातं
टिळकांच्या मते ज्या सर्वांना प्राप्त होतात त्या प्राप्त होतात म्हणून आपल्याला त्या नित्य व्यवहारातल्या वाटतात आणि आपण त्यातील सुख विसरून जातो आणि ज्यांची गरज निर्माण होते त्यातील कोणत्या गरजांची पूर्ती होते त्यावरून संसारातील सुखदुःखाचा निर्णय आपण घेत असतो
आपले हे सुख वर्तमानातील आपल्या गरजांच्यावर ठरते भूतकाळावर न्हवे म्हणजे एकेकाळी आपण बैलगाडीत बसून प्रवास करत होतो आता आगगाडीत बसून प्रवास करतो आता आगगाडी नित्याची झाल्याने आपणाला त्यात फार सुख वाटत नाही उलट उशीर झाला कि असंतोष होतो म्हणजे काय सुखदुःख हे नित्यतेवरही अवलंबून असते
प्राचीन सम्राटांना रथात बसणे हे परमसुख असेल पण मर्सिडिझमध्ये बसणाऱ्याला ते तसं वाटेलच असं नाही
विषयवासनेबाबत तर स्थिती अशी आहे कि कितीही विषयोपभोग केला तरी कामवासना पूर्ण होत नाही उलट वाढत जाते ययातीचे उदाहरण ह्यासाठी टिळक देतात हजार वर्षे उपभोग घेऊनही जेव्हा विषयोपभोग शमेना तेव्हा त्याने विषयवासना वाढत जाते पण पूर्ण होत नाही असे उद्गार काढले टिळकांच्या भाषेत सांगायचे तर इंद्रियांची खवखव कधीही कमी होत नाही जिभेचे चोचले आणि लिंगाचे चोचले चालूच राहतात बौद्ध धर्मात मांधाता राजाची गोष्ट अशीच आहे कामवासना काहीकेल्या पूर्ण होत नाही असा बौध्दांचाही निष्कर्ष आहे (धम्मपद १८५ १८६) विषयपूर्ती वा आकांक्षापुर्ती होत नसल्यानेच माणसाला सतत मी दुःखी आहे असे वाटत राहते बाकी तुकाराम महाराजही म्हणून गेलेतच सुख पाहता जवाएव्हढे दुःख पर्वताएव्हढे !
जगाच्या इतिहासात जे काही मोजके चांगले मुस्लिम राजे झाले त्यात स्पेनच्या अब्दुल रहमानचे नाव टॉपवर आहे त्याच्या कारकिर्दीत सुखाचा हिशेब त्याने ठेवला होता जेव्हा चाळीस वर्षांनी त्याने हिशेब तपासला तेव्हा ४० वर्षात त्याला फक्त १५ दिवस असे सापडले ज्यादिवशी तो सुखी होता आता एका सम्राटाची ही अवस्था तर सामान्य माणसाचे काय ?
तृष्णेपासून असंतोष आणि असंतोषापासून दुःख ही महाभारताची उपपत्ती आहे टिळक तिचे समर्थन करतात आणि त्यांच्या नेहमीच्या सवयीनुसार ते संतोषला वर्णव्यवस्थेशी जोडतात ब्राम्हणाने ज्ञानाविषयी क्षत्रियाने ऐश्वर्याविषयी व वैश्याने संपत्तीबाबत संतोष बाळगायला सुरवात केली तर देश रसातळाला जाईल असे ते म्हणतात असंतोष हेच ज्ञानाचे उत्कर्षाचे प्रयत्नांचे आणि अगदी मोक्षाचेही बीज आहे असे टिळक म्हणतात म्हणून कल्याणकारक गोष्टीसाठी असंतोष हा भगवंतांनाही योग्य वाटतो असे ते म्हणतात खुद्द भर्तृहरीनेही गोडी यशाची असेल तर व्यसन विद्येचे ज्ञानाचे असेल तर ते योग्यच आहे असे म्हंटले आहे
केवळ इंद्रियव्यापाराने सुखदुःख प्राप्त होत नाही तर त्यास मनही जोडले गेलेले असते असे महाभारत म्हणते व्याकुळ मनाला डोळे उघडे असले तरी काहीवेळा दिसत नाही हे आपण जाणतोच माझे मन दुसरीकडे होते म्हणून मला ऐकू आले नाही वैग्रे अनुभव सगळयांना येतो म्हणजेच मन महत्वाचे ठरते ह्या मनामुळेच फलाशा निर्माण होते
गीता म्हणते
ध्यायतो विषयान्पुंस: सङ्गस्तेषूपजायते |
सङ्गात्सञ्जायते काम: कामात्क्रोधोऽभिजायते || ६२||
क्रोधाद्भवति सम्मोह: सम्मोहात्स्मृतिविभ्रम: |
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति || ६३||
विषयसंगामुळे काम कामामुळे क्रोध क्रोधामुळे मोह मोहापासून मनुष्याचा नाश होतो असे गीता त्यामुळेच म्हणते प्रत्यक्ष आयुष्यात हा क्रम विषयसंग विषयसंगामुळे काम कामामुळे मोह मोह तृप्त झाला तर संतोष व संतोषामुळे सुख मोह तृप्त झाला नाही तर असंतोष आणि असंतोषामुळे दुःख असंतोष वा दुःख सहन न झाल्यास क्रोध आणि क्रोधामुळे हिंसा व हिंसेमुळे नाश असा आहे विषयसंगात गुंतलेल्या माणसाला अनेकदा पुष्कळांचे पुष्कळ सुख ,सर्वभूतहीत मानव्याचा माणुसकीचा परम उत्कर्ष ह्या गोष्टी दिसत नाहीत आणि विषयसंगामुळे एकदा तृप्ती झाल्यावर पुन्हा पुन्हा विषयसंग करण्याची आसक्ती निर्माण झाली कि विषयसुख हे आसक्ती बनून जाते व त्यातूनच दुःख व सर्वनाश निर्माण होतो म्हणूनच शैव क्रियायोग हा केवळ वैयक्तिक वा केवळ सार्वजनिक अशी विभागणी करत नाही सदासर्वसुखी सिद्ध बुद्ध असतात पण उरलेले जग चांगले करावयाचे असेल तर गीतेचा केवळ आत्मप्रसादरूपी सुख व कर्त्यांची शुद्ध बुद्धी ह्या दोन गोष्टींच्या आधारावर उभा असलेला कर्मयोग स्वीकारता येत नाही त्याला पुष्कळांचे पुष्कळ सुख , सर्वभूतहीत आणि माणुसकीचा परम उत्कर्ष ह्यांची जोड द्यावीच लागते
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १७४ श्रीधर तिळवे नाईक
आपण गीतेचा व गीतारहस्याचा विचार हिंदुत्ववादासंदर्भात का करतो ?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातल्या सर्वच नेत्यांना भेटवस्तू म्हणून भगवद्गीता देत असतात आणि सुषमा स्वराज्य ह्यांनी गीतेला राष्ट्रीय स्क्रिप्चर म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी केली होती ह्यावरून हिंदुत्वांवर गीतेचा काय प्रभाव आहे हे स्पष्ट व्हावे.भारताचा पंतप्रधान भारताच्या वतीने जेव्हा एखादा ग्रंथ भेट देत असतो तेव्हा तो ह्या ग्रंथातील वैचारिक मांडणी ही आमच्या राष्ट्राची मांडणी आहे असा संदेश देत असतो साहजिकच हिंदुत्ववादाची गीता ही कणाग्रंथ आहे हे आपण लक्ष्यात घ्यायला हवे हिंदुत्ववादाची चिकित्सा करतांना गीता बाजूला काढून चर्चा करता येणे शक्य नाही एव्हढं जरी लक्ष्यात आलं तरी खूप झालं बायबलसारखी एखादी सर्वप्रचलित संहिता हिंदू धर्माला हवी होती आणि ती गरज गीता भागवते ज्यूंचे ओल्ड टेस्टामेन्ट ख्रिश्च्नांचे न्यू टेस्टामेन्ट इस्लामचे कुराण तशी हिंदूंची गीता हे ब्रिटिशांचे कलोनियल समीकरण प्रस्थापित करण्यात वैष्णववाद्यांना मिळालेले यश ही धार्मिक क्षेत्रातील एक क्रांतिकारक घटना आहे जी गीता मराठीत आणली म्हणून वैष्णव ब्राम्हणांनी ज्ञानेश्वरांना पिडले होते त्यांनीच आता सर्वांना गीता हा आपला धर्मग्रंथ आहे आणि तो प्रत्येक हिंदूने वाचला पाहिजे असे म्हणावे हा काळाचा महिमा म्हणावा नाहीतर काय ?
गांधींनी ह्यावर कुरुक्षेत्र हे मन व कुरुक्षेत्रावरचा संघर्ष हा मनातला संघर्ष असा सिम्बॉलिक अर्थ लावून गीता स्वीकारली होती मग श्रीकृष्ण व राम हेही सिम्बॉलिक समजायचे काय ? पुढे जाऊन हे सर्व सिम्बॉलिक म्हणजे काल्पनिकच आहे असे का समजायचे नाही ?
ह्याउलट बाबासाहेब आंबेडकरांनी गीता ही प्रतिक्रांती घडवण्यासाठी घडवलेली ग्रंथकृती आहे असे स्पष्ट म्हंटले होते बाबासाहेबांनी REVOLUTION AND COUNTERREVOLUTION ह्या अपुऱ्या ग्रंथात म्हंटलय “Gita is not a book of religion, nor a treatise on philosophy. What [it] does is to defend certain dogmas of religion on philosophical grounds.” अर्थात आंबेड्करांच्याकडे लक्ष्य द्यायला सध्या कुणालाच वेळ नाही जय भीम म्हंटल कि काम झालं असं वाटणाऱ्यांची संख्या वाढत चाललीये त्यामुळं गीताविश्लेषण कमी आणि गीतापूजन जास्त अशी सांप्रतची स्थिती आहे
अशा ह्या स्थितीत मोदी सरकारने कर्नाटकात सुरवातीला प्रयोग म्हणून गीता ही एका अर्थाने ऑफिशिअल करावी आणि त्याला विरोध होऊ नये हे आपण समजूनच घ्यावे
ह्याची सुरवात लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य लिहून केली होती हे आपण लक्ष्यात घ्यायला हवं .
मी मागेच म्हंटले आहे कि शैवांच्या गीता वेगळ्या आहेत उदा शिव गीता गणेश गीता ! अष्टावक्राची गीता जिच्यावर महाभारतात एक उपपर्व आहे ती पहिली उपनिषदीक गीता होय . भगवदगीता ही ह्यानंतर लिहिली गेलेली भागवत धर्माची गीता आहे जो वैष्णव धर्माचा मुख्य कणा आहे आणि जो वासुदेव धर्मातून उगवलेला आहे वासुदेव- भागवत - पंचरात्र व शेवटी वैष्णव असा हा प्रवास आहे मी मागेच म्हंटले आहे कि ब्राम्हण क्षत्रिय हे आर्यांच्यातील दोन उच्च वर्ण होते आणि विश ही सामान्य आर्य जनता होती आणि ह्या सामान्य जनतेने जन्माला घातलेला जो धर्म आहे तो वासुदेव ह्याच सामान्य जनतेतून गुप्त घराणे आलेले होते त्यामुळे त्यांचे वासुदेव धर्मावरचे प्रेम समजण्यासारखे आहे गुप्तांचा पाडाव करण्यासाठी पुढे गीता आणली गेली व ब्राम्हण क्षत्रियांची राजवट वैष्णव धर्मामार्फत सेट करण्यात आली बाबासाहेब म्हणतात तशी ही प्रतिक्रांती होती पण ती फक्त जैन बौद्ध धर्माविरुद्ध न्हवती तर शैव आणि वासुदेव धर्मांच्याविरुद्धही होती ह्या वासुदेव धर्माचा श्रीकृष्णाशी काडीचाही संबंध न्हवता असो
गीतारहस्य हे पंधरा प्रकरणात विभागलेले आहे ह्यातील (१) विषयप्रवेश , (२) कर्म जिज्ञासा , (३) कर्म योगशास्र, (४) अधिभौतिकसुखवाद, (५) सुखदुःखविवेक, ह्या पाच प्रकरणांचा सांगोपांग विचार आपण केला जिथे गीता पटली नाही वा गीतारहस्य पटले नाही तिथे टिळकांच्यावर टीका करून कर्मयोगाची दुसरी बाजूही मी सादर केली आणि टिळकांशी जिथे आपण सहमत आहोत तिथे सहमती दर्शवली आता आपणाला सहाव्या प्रकरणाकडे वळावयाचे आहे
टिळक ह्या प्रकरणाला आधिदैवतपक्ष व क्षेत्रक्षेत्रज्ञविचार असे नाव देतात ह्या प्रकरणात टिळक देवता म्हणजे मनोवृत्ती अशी अभिनव व्याख्या करतात माणसाच्या कर्मामागे केवळ अधिभौतिक सुखवादी कॅल्क्युलेशन्स नसतात तर ह्या मनोवृत्तीही असतात असे टिळक म्हणतात ह्या मनोवृत्तींना देवता म्हणण्याचे प्रयोजन लक्ष्यात येत नाही म्हणजे न्याय ही सुद्धा टिळकांच्यासाठी न्यायदेवता होते न्यायदेवतेप्रमाणे कारुण्य दया परोपकार कृतज्ञता कर्तव्यप्रेम धैर्य ह्याही टिळक देवता मानतात आणि अनेकदा ह्या देवतांची स्फुरणे लोभ मोह द्वेष मत्सर इत्यादिंच्यामुळे मनुष्य ऐकत नाही प्रश्न असा येतो कि कारुण्य दया परोपकार कृतज्ञता कर्तव्यप्रेम धैर्य देवता असतील तर लोभ मोह द्वेष मत्सर लोभ हेही देवच म्हणायला हवेत कारण ह्याही मनोवृत्तीच आहेत मनोदेवता ही टिळकांच्या मते श्रेष्ठ देवता होय आणि ती आपणाला काय करायचे ते सांगते म्हणजेच टिळक बाह्य भौतिक कारणांच्याकडून आता कर्माच्या मानसिक कारणांकडे आलेले दिसतात जिथे कर्माचे कारण सुखदुखविवेक नाही तर मनोवृत्ती आहेत ह्या मनोवृत्तींच्यात जेव्हा संघर्ष निर्माण होतो तेव्हा त्यांचा निर्णय मनोदेवता करते माणसे अनेकदा सुखदुःखापेक्षा आपल्या मनोवृत्तीला प्रमाण मानून कर्म करतात असे टिळक म्हणतात म्हणजे काय तर बाळाला दूध पाजायचे असेल तर आई काही पुढच्या पिढ्यांचा विचार करत नसते तर तिची दूध पाजण्याची स्वाभाविक वृत्ती धरून ती आपल्या बाळाला दूध पाजते असे टिळक म्हणतात
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १७५ श्रीधर तिळवे नाईक
मागील प्रकरणात आपण टिळक भौतिककडून मानसिककडे वळल्याचे पाहीले पुढे टिळक मनोदेवतेकडून सद्सद्विवेककडे सरकतात व तिलाही देवता म्हणतात व तीच श्रेष्ठ म्हणतात एखाद्या कर्मानंतर आपलं मन आपल्याला खातं कारण सद्सद्विवेकाची टोचणी म्हणून टिळक
१ कारुण्य दया परोपकार कृतज्ञता कर्तव्यप्रेम धैर्य ह्या मनोवृत्ती निर्देशक देवतांचा स्तर
२ मनोदेवता हा दुसरा स्तर
३ व पुढे सद्सद्विवेक देवता हा तिसरा स्तर
असे तीन देवता स्तर सुचवतात म्हणजेच विष्णू लक्ष्मी ह्यांच्याखेरीज टिळकांच्या देवतामंडळात ह्या नवीन देवतांची भर पडते
ही मांडणी धार्मिक माणसाची आहे हे स्पष्टच आहे प्रत्येक गोष्ट धर्माला भिडवण्याची हिंदुत्ववादी खोड ह्यातून दिसते आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या मांडणीचे प्रेरणास्थान ख्रिश्चन विचारवंतांची फिलॉसॉफी आहे
खुद्द भगवद्गीतेत खालील श्लोक आहे
मृत्यु: सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम् |
कीर्ति: श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृति: क्षमा || ३४|| अध्याय १०।।
ह्याचा अर्थ मी सर्व हरण करणारा मृत्यू असून भविष्यात येऊ घातलेल्या गोष्टींचे मूळ मीच आहे नारींच्यातील गोष्टीत मीच कीर्ती , वाक , संपत्ती , स्मृती , मेधा(उच्च बुद्धी ) ,धृती (स्त्रैण धैर्य )व क्षमा आहे
टिळकांच्या मते कीर्ती , वाक , संपत्ती , स्मृती , मेधा(उच्च बुद्धी ) ,धृती (स्त्रैण धैर्य )व क्षमा ह्या देवता आहेत मनःपूत हा शब्दाचा मूळ अर्थ मनाला शुद्ध वाटेल असा वा अशी असा आहे असे टिळक सांगतात जे बरोबर आहे मन ही जर आपण देवता मानली तर मनःपूत आचरण करणे योग्य होय
एव्हढी सगळी बडबड केल्यावर टिळक त्यांची लाडकी मनुस्मृती घेऊन येतातच सुदैवाने मनुस्मृतीत जे काही मोजके बरे श्लोक आहेत त्यातील हा एक
मनुस्मृती म्हणते
यत्कर्म कुर्वतोऽस्य स्यात्परितोषोऽन्तरात्मनः ।
तत्प्रयत्नेन कुर्वीत विपरीतं तु वर्जयेत् ।। अध्याय ४ मंत्र १६१।।
म्हणजे जे कर्म केल्याने माणसाच्या अंतरात्म्याला पारितोष प्राप्त होतो ते त्याने अवश्य करावे आणि जे कर्म केल्याने त्याला विपरीत गती प्राप्त होते ते त्याने वर्ज्य करावे
पण टिळक लागलीच ह्या श्लोकाने हवे तसे करण्याचे स्वातंत्र्य मिळेल ह्या भयाने
वेदः स्मृतिः सदाचारः स्वस्य च प्रियमात्मनः ।
एतच्चतुर्विधं प्राहुः साक्षाद् धर्मस्य लक्षणम् ॥ अध्याय २ मंत्र १२ ॥
हा श्लोक कोट करतात आणि वेद व स्मृती आणून ठेवतात ह्या श्लोकावर मी चर्चा फार पूर्वी केली आहे काही झालं तरी टिळकांना वेद आणि स्मृती आणि वर्णव्यवस्था सोडायची नाही हे पुन्हा इथे स्पष्ट होते
जे कर्म लोकांच्या हिताचे नाही व जे केल्याने आपणाला स्वतःचीच लाज वाटते ते करू नये असे भीष्म महाभारतात सांगतात (शांतिपर्व १६४ ६६)कालिदासाने सत्पुरुष अंतःकरणाचीच साक्ष प्रमाण मानतात असे कालिदासही म्हणतो (शाकुंतल १ २०) प्रश्न असा आहे कि अंतःकरणाची साक्ष काढायची कशी ह्याचे उत्तर मन एकाग्र करून धारणा करावयाची व मग ध्यान करावयाचे हे ध्यान अंतकरणात काय चाललंय ते सांगते ते ऐकावयाचे हे न करता माकडाप्रमाणे मनाचे ऐकणे हा मूर्खपणा आहे
सद्सद्विवेक व अंतःकरणाची साक्ष अशा दोन गोष्टींच्या सहाय्याने कर्म अकर्म निर्णय घेता येणे शक्य असे आपण म्हणू शकतो का ? मुख्य म्हणजे सदसदविवेक हा निरपेक्ष असतो का ?
टिळक सदसदविवेक हा सापेक्ष मानतात त्यांच्या मते रामोशी ज्याचे मीठ खाल्ले त्याची हत्या करणे पाप समजतात पण गोरे लोक ज्याचे मीठ खाल्ले असा मनुष्य समोर दुसऱ्या देशाच्या बाजूने लढावयास उभा ठाकला तर त्याला ठार मारणे योग्य समजतात तर मग ह्यात प्रमाण कुणाला प्रमाण मानावयाचे ? काही जमातीत मनुष्य हत्या पाप मानले जात नाही पण सुसंस्कृत देशात ते पाप आहे ब्रिटिश लोकांच्यात दुसरा विवाह करणे अविवेकी आहे तर हिंदूंच्यात ते योग्य मानले जाते अशावेळी सद्सदविवेक कुणाचा खरा मानावयाचा ?
टिळकांच्या मते इथेच क्षेत्रक्षेत्रज्ञविचार महत्वाचा ठरतो
श्रीधर तिळवे नाईक
गीता ,सांख्य आणि आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १७६
क्षेत्र म्हणजे शरीर क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा क्षेत्रक्षेत्रज्ञ विचार हा प्रथम सांख्यांनी केला आणि गीतेवर सांख्य तत्वज्ञानाचा इतका खोलवर परिणाम केला आहे कि गीता ही सांख्य म्हणावी इतकी सांख्य तत्वज्ञानाशी एकरूप झाली आहे
यूरोपात इंद्रियांच्याद्वारेच ज्ञान होते व जे इंद्रियांद्वारा ज्ञान होते तेच खरे ज्ञान असे मानणारे तत्वज्ञ आजही आहेत मी त्यांना इंद्रियप्रामाण्यवादी म्हणतो व त्यांची सुरवात फ्रान्सिस बेकन ह्या तत्वज्ञाने केली असे मानतो ह्याउलट देकार्तने इंद्रियांच्याऐवजी बुद्धीला ज्ञान होते व बुद्धीला होणारे ज्ञान हेच खरे असे प्रमेय मांडून इंद्रियप्रामाण्यवादाची सुरवात केली
टिळकांच्यामते इंद्रिय हे ज्ञानाचे पहिले साधन आहे आणि इंद्रियांच्याखेरीज ज्ञान होणे अशक्य आहे . माणसाला दोन प्रकारची इंद्रिये आहेत ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये असून हात, पाय, वाणी, उपस्थ, गुद ही पाच कर्मेंद्रिये आहेत. हालचाल हे ज्याचे स्वरूप आहे ते कर्म होय व कर्मेंद्रिये कर्म करतात सांख्यांच्यात मन हे अकरावे स्वतंत्र इंद्रिय उभयात्मक मानले गेले आहे मन हे इंद्रिय कर्मेंद्रियांबरोबर कर्मेंद्रियांप्रमाणे आणि ज्ञानेंद्रियांबरोबर ज्ञानेंद्रियांसारखे वागते.सांख्य विचारधारा असे मानते की, अहंकारामुळे प्रकृतीला बहुजिनसीपणा येण्यास सुरुवात झाली. म्हणजेच प्रथम त्या अहंकारापासून पाच सूक्ष्म ज्ञानेंद्रिये, पाच सूक्ष्म कर्मेंद्रिये आणि मन मिळून ११ भिन्न भिन्न शक्ती किंवा गुण मूळ प्रकृतीतच स्वतंत्रपणे एकदम निर्माण होऊन त्यांपासून पुढे स्थूल सेंद्रिय सृष्टी होत असते.
गीताही इंद्रिय पदार्थापेक्षा , मन इंद्रियांच्यापेक्षा श्रेष्ठ , बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ व आत्मा हा बुद्धीपेक्षा श्रेष्ठ असे म्हणते उदा
इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्य: परं मन: |
मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे: परतस्तु स: || ४२||अध्याय ३।।
शंकराचार्यही ११ इंद्रियांचा स्वीकार करतात आणि आत्मा मानतात
न्यायशास्त्र आत्मा स्वीकारते आणि ज्ञानाचा अंतिम कारक आत्मा आहे असे मानते न्यायशास्त्रानुसार आत्म्याचा मनाशी संयोग होतो, मनाचा इंद्रियाशी, इंद्रियाचा अर्थाशी म्हणजे आपापल्या विषयाशी संयोग होतो आणि त्यामुळे व्यक्तीला ज्ञान प्राप्त होते म्हणजेच प्रथम विषयाशी इंद्रियांचा इंद्रियांचा मनाशी आणि मनाचा आत्म्याशी संबंध होतो आणि मग आत्म्याला ज्ञान होते
सर्व प्रकारच्या जैव सृष्टीतील वनस्पतींना व प्राणिमात्रांना ज्ञानेंद्रिये असतात व आहेत पण मानव वगळता इतर योनींमध्ये काही ज्ञानेंद्रियांचा प्रभाव कमी आढळतो. त्याचप्रमाणे मानवप्राण्यांसह सर्व योनींमध्ये ज्ञानग्रहण क्षमतेमध्ये फार मोठी, दीर्घ व स्थूल-सूक्ष्म स्वरूपाची विविधता व तफावत दिसून येते. सर्व योनींना पडलेली आणखी एक मर्यादा म्हणजे ज्ञानेंद्रियांच्या क्षमता या ईश्वरदत्त/निसर्गदत्त आहेत, त्या मानवनिर्मित नाहीत मात्र त्या वाढवण्याचे तंत्र विकसित करता येते आणखी एक मर्यादा म्हणजे त्यांच्या क्षमता आणि त्यांची ज्ञानग्रहणाची क्षेत्रे वेगवेगळी आहेत. म्हणजे नाक हे कानांचे श्रवणकार्य करू शकत नाही आणि कान हे नाकाचे गंधग्रहणाचे कार्य करू शकत नाही.
टिळक म्हणतात ,"मानवी देह जर एक मोठा वस्तूनिर्मितीचा कारखाना मानला, तर जसा बाहेरचा माल (ज्ञान) आत आणण्यासाठी ज्ञानेंद्रियांचा उपयोग केला जातो, तसा आतील विचार, ज्ञान, भावभावना इत्यादींना अभिव्यक्त करण्यासाठी, म्हणजे एकाअर्थी आतला माल (ज्ञान) बाहेर पाठविण्यासाठी कर्मेंद्रिये उपयोगी पडतात. तसेच ‘मन’ या अकराव्या उभयात्मक इंद्रियाने घेतलेल्या विविध प्रकारच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी कर्मेंद्रियांचा त्याच्याकडून उपयोग केला जातो"
सृष्टीतील पंचभौतिक पदार्थांचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी त्याची पाच ज्ञानेंद्रिये उपयोगी पडतात, हे जसे खरे आहे त्याचप्रमाणे हेही खरे की, त्याची पाच कर्मेंद्रियेही त्याला जीवन जगण्यासाठी, तसेच आवश्यक असलेली विविध प्रकारची कर्मे करण्यासाठी उपयोगी पडतात.
मात्र टिळक मन व बुद्धी ह्यांना वेगळी कार्ये देतात त्यांच्या मते इंद्रियांनी आणलेल्या मालाचे पूर्ण विश्लेषण बुद्धी करते मन संकल्प आणि विकल्प ह्यांची मांडणी मनापुढे करत असते त्यांचा व्यवसाय तपासणे हे काम व्यवसायात्मक बुद्धी करते आणि कार्याकार्यनिर्णय घेते ह्या कार्याकार्य निर्णयाचा विस्तार म्हणजे व्याकरण करण्याचे काम मन करते ह्या बाबत अंतिम निर्णय घेण्याची प्रेरणा मन देते आणि कर्मेंद्रिये मनाचा आदेश मानून कर्म करतात
आज आपण मनाऐवजी मेंदू मानतो पण टिळकांच्या काळात मन केंद्रस्थानी होते हे लक्ष्यात घ्यायला हवे त्यामुळेच टिळक संकल्प ,वासना ,इच्छा ,स्मृती ,धृति ,श्रद्धा ,उत्साह ,कारुण्य ,कळकळ ,प्रेम ,दया ,कृतज्ञता , काम ,लज्जा , आनंद ,भीती ,राग ,संग ,द्वेष , लाभ ,मोद ,मोह ,मत्सर ,क्रोध हे मनाचे गुणधर्म मानतात आणि मन अनेकदा ह्यांच्या आधारे अनेकदा निर्णय घेते असे सांगतात म्हणजेच मन बुद्धीचे ऐकेलच असे नाही
श्रीधर तिळवे नाईक
सांख्यदर्शन व आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १७६
सांख्य दर्शनाची २५ तत्वे प्रसिद्ध आहेत
१ आत्मा (पुरुष) २ प्रकृती
३ अंतःकरण : ३ मन, ४ बुद्धि, ५ अहंकार
५ ज्ञानेन्द्रिये : ६ नासिका, ७ जिह्वा, ८ नेत्र, ९ त्वचा, १० कर्ण
५ कर्मेन्द्रिये : ११ पाद, १२ हस्त, १३ उपस्थ, १४ पायु, १५ वाक्
५ तन्मात्रा : १६ गन्ध, १७ रस, १८ रूप, १९ स्पर्श, २० शब्द
५ महाभूत : २१ पृथ्वी, २२ जल, २३ अग्नि, २४ वायु, २५ आकाश
आपल्याकडे अनेक आर्य ह्यात विकिपीडियाही येतो पुरुषाला आत्मा म्हणतात वस्तुस्थिती अशी आहे कि सांख्य आत्मा मानत नाही किंबहुना अनात्मवादाची सुरवात आर्यांच्यात चार्वाक व सांख्यानीच केली आणि हा विचार जैन बौद्धांनी पुढे अतिशय चांगल्या प्रकारे विकसित केला सांख्य मन, बुद्धि, अहंकार मानतात आत्मा नाही ह्यातील बुद्धी निर्णय घेते सांख्य ह्याला अध्यवसाय म्हणतात बुद्धीने केलेला निर्णय ही तिची वृत्ती आहे ह्यातील अहंकार काय करतो
सांख्यकारिका म्हणते
‘अभिमानोऽहङ्कारस्तस्माद् द्विविधः प्रवर्तते सर्गः |
एकादशश्च गणस्तन्मात्रः पञ्चकस्यैव ||’
‘सात्त्विक एकादशकः प्रवर्तते वैकृतादहङ्कारात् |
भूतादेस्तन्मात्रः स तामसस्तैजसादुभयम् ||’ (सां.का. २४ व २५)
म्हणजेच अहंकार किंवा अभिमान . दोन प्रकारचे सर्ग प्रवर्तित करतो
१. अकरा इंद्रियांचा सर्ग ज्यात पाच ज्ञानेंद्रिये – चक्षु, जिह्वा, रसना, श्रोत्र आणि नेत्र; पाच कर्मेंद्रिये – वाक्, पाणि, पाद, पायु आणि उपस्थ, आणि मन ह्यांचा समावेश होतो
२. पंच तन्मात्रांचा सर्ग ज्यात शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्यांचा समावेश होतो
आणि तन्मात्रांतूनच पंचमहाभूते जन्मतात म्हणजे एका अर्थाने
५ ज्ञानेन्द्रिये : ६ नासिका, ७ जिह्वा, ८ नेत्र, ९ त्वचा, १० कर्ण
५ कर्मेन्द्रिये : ११ पाद, १२ हस्त, १३ उपस्थ, १४ पायु, १५ वाक्
५ तन्मात्रा : १६ गन्ध, १७ रस, १८ रूप, १९ स्पर्श, २० शब्द
५ महाभूत : २१ पृथ्वी, २२ जल, २३ अग्नि, २४ वायु, २५ आकाश
ह्या वीस तत्वांची निर्मिती अहंकार करतो
सांख्यांच्या मते विश्व सेंद्रिय आणि निरिंद्रिय असे आहे आणि तन्मात्रा हेही ते गणतात मी सांख्य हे आर्यीकरण झालेले शैव दर्शनच मानतो सांख्यांचे तन्मात्र समजून घ्यायचे असेल तर आपल्याला पुन्हा शैवांच्या मूळ दर्शनाकडे जावे लागते अन्यथा तन्मात्र कळत नाही
शैवांची ११४ दर्शने आहेत त्यातील एक महंतदर्शन होय आपण महंत हा शब्द ऐकलेला असतो पण त्यामागे काय आहे हे आपणाला माहीत नसते
शैवांच्या महंतदर्शनात महंत , महत आणि मद ही तीन तत्वे फार महत्वाची शिवाचे देहस्वरूप रूप म्हणजे महंत हे महंत महतच्या साहाय्याने अनेक कामे करते जिला आपण बुद्धी म्हणतो ती महतचा एक भाग आहे बुद्धीतून विचार जन्मतो अशी आपली धारणा आहे पण महंतदर्शनात महतमधूनच बुद्धी जन्मते विचार , बुद्धी , प्रज्ञा आणि परमप्रज्ञा ह्यांनी महत सिद्ध होते आपल्याकडच्या आर्य लोकांची एक फार मोठी गैरसमजूत म्हणजे महत म्हणजे बुद्धी ! शैव संकल्पना समजूनसुद्धा घ्यायच्या नाहीत असं ठरवल्याने हे घोळ होतात
ह्या महतमधून मद निर्माण होतो जो प्रत्येक गोष्ट मंद व मांद्य करतो अहंकार आणि विकार हे मदाचे दोन भाग असतात अहंकार आहे ते टिकवू पाहतो तर विकार जे आहे त्याचा विस्तार करू पाहतो अहंकार आणि विकार चार प्रकारे वावरत असतात
१ अक्षस अक्षसमध्ये महत सतत ताजेतवाने असते
२ सत्वस सत्वसमध्ये महत क्रियाशील असते
३ सालस सालसमध्ये महत मंद होते
४ आळस आळसमध्ये महत मंद तर होतेच पण त्याबरोबर त्याला मांद्य चढते
अहंकार आणि विकार अनेकदा एकत्र येतात व त्यातून मीची निर्मिती होते म्हणजेच विभाजित झालेला मद जेव्हा पुन्हा जोडला जातो तेव्हा मी किंवा स्व किंवा अहम तयार होतात
सांख्य ह्या शैव संकल्पनांचे आर्यीकरण करून सात्विक राजस व तामस ह्या संकल्पना डेव्हलप करतात ते महतमधील बुद्धी स्वीकारतात तर मदमधील अहंकार !
महंत दर्शन
१ शिव
२ महंत
३ शक्ती
ह्या शक्तीपासून
अंतःकरणगण : हा दोन तत्वांनी बनतो महत मद
ज्ञानेन्द्रियगण : हा पाच तत्वांनी बनतो नासिका, जिह्वा, नेत्र, त्वचा, कर्ण
कर्मेन्द्रियगण : हा पाच तत्वांनी बनतो पाद, हस्त, उपस्थ, पायु, वाक्
मात्रागण :हा पाच तत्वांनी बनतो गन्ध, रस, रूप, स्पर्श, शब्द
महाभूतगण : हा पाच तत्वांनी बनतो पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश
असे पाच गण तयार होतात
महंत दर्शन ह्या पाचही गणांना स्वीकारते पण महाभूतांना मात्रागणांची निर्मिती न मानता स्वतंत्र मानते आणि विश्वाची विभागणी सगण व निर्गण अशी करते
शिव , महंत व शक्ती हे निर्गण तर
अंतःकरणगण : हा दोन तत्वांनी बनतो महत मद ज्ञानेन्द्रियगण : हा पाच तत्वांनी बनतो नासिका, जिह्वा, नेत्र, त्वचा, कर्ण कर्मेन्द्रियगण : हा पाच तत्वांनी बनतो पाद, हस्त, उपस्थ, पायु, वाक मात्रागण :हा पाच तत्वांनी बनतो गन्ध, रस, रूप, स्पर्श, शब्द महाभूतगण : हा पाच तत्वांनी बनतो पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश
हे सगण अशी ही विभागणी आहे
शैवांच्या ह्या सगण व निर्गण पासूनच पुढे सगुण व निर्गुण ह्या वैष्णव संकल्पना निघाल्या आहेत
टिळकांनी शैव मठ हे प्रामुख्याने शूद्र अतिशूद्र आदिवासींचे असल्याने त्यांना कधी भेटच दिली किंवा कधी कुठल्या शैवाचार्यांशी चर्चाही केलेली नाही त्यामुळे त्यांना हे न कळणे आपण समजून घ्यायला हवे पुढे २० व्या शतकात लिंगायत नकुलीश आचार्य सोडल्यास आगमिक शैव आचार्य शिल्लक न राहिल्याने आर्यांना हे सर्व समजून घेण्याची गरजच राहिली नाही उरलेसुरले अनार्यांचे मठ हिंदू धर्माच्या नावाने बळकावले गेल्याने आता शैव मठात शैव ग्रंथच शिल्लक उरलेले नाहीत अगदी नाथसंप्रदायाच्या मठातही वैदिक लोक घुसले आहेत आदित्यनाथ योगींचा गोरखनाथ मठ ह्याचे उत्तम उदाहरण आहे कोल्हापूरचा सिद्धगिरी कण्हेरी मठ हे दुसरे उदाहरण शंकराचे वैदिकीकरण इथेही झालेले दिसते त्यामुळे इथल्या ओबीसींच्या कामाच्या प्रदर्शन शिल्पात शैवांचा पुरोहित गुरव शिवलिंगपूजापाठ व शिवसाधना सोडून भलतेच काम करतांना दिसतो असो ही अवस्था काहीशी आठव्या नवव्या शतकातल्या बौध्दांच्यासारखी आहे ज्याप्रमाणे बौद्ध ग्रंथ नाहीसे केले गेले तसे विसाव्या शतकात अनेक शैव ग्रंथ कसलाही आवाज न करता नाहीसे केले गेलेत अपवाद ब्राम्हणांनी लिहिलेले हिंदुपूरक शैव ग्रंथ ! असो !
मद कामविकाराद्वारा पुन्हा नवीन शरीर जन्माला घालतो व हे शरीरही ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय ह्यांनी युक्तच असते ह्यांच्या मुळाशी मात्रा असतात मंत्र म्हणजे ह्या मात्रांच्या मुळाशी पोहचणारी ध्वनीउच्चारपद्धत हा ध्वनिउच्चार शब्दप्रधानच असेल ह्याची खात्री नाही मांत्रिकांनी महंतांना पूर्ण बाजूला केले त्यांना बदनाम केलं व ह्या मंत्रांच्या मुळाशी पोहचण्याऐवजी त्यांना सफल होण्याचे , काही प्राप्त करण्याचे गारूड जोडले आणि ह्याची सर्वोत्तम भरभराट वेदांच्यात झाली
शैव मात्रांचे
१ रुपमात्रा
२ ध्वनिमात्रा
३ स्पर्शमात्रा
४ रसमात्रा
५ गंधमात्रा
असे पाच प्रकार असतात शैवांच्या ध्वनिमात्रांचे नंतर शब्दमात्रात जे रूपांतर आर्यांनी केले त्यामागचा उद्देश शब्दप्रामाण्य वाढवणे हाच होता १ रुपत्व २ शब्दत्व ३ स्पर्शत्व ४ रसत्व ५ गंधत्व ही ह्या मात्रांचीच देन आहे असे शैव मानतात असो
शैवांचा आयुर्वेद ह्या मात्रांच्या आधारे उभा आहे योग्य मात्रा दिली कि पेशन्ट बरा होतो किंवा नाडीच्या ध्वनिमात्रा ऐकता वा स्पर्शता आल्या कि विकार कळतो आणि मग आजार कसा बरा करायचा तेही कळते औषधे ही प्रामुख्याने रसाच्या आधारे विशेषतः वनस्पती रसाच्या आधारे तयार केली जातात मात्र कधी कधी त्यात धातू व इतर अनेक गोष्टीही वापरल्या जातात शैवांचे एक रसेश्वरदर्शन म्हणूनही दर्शन आहे त्याच्या केंद्रस्थानी रसमात्रा आहेत मोक्ष मिळवण्याची मात्रा हीही एक पद्धत आहे तिच्यावर सविस्तर इतरत्र लिहिले आहे
ह्या मात्रांचे दोन प्रकार असतात
१ मळमात्रा
२ निर्मळमात्रा
मोक्ष प्राप्त झाला कि आपोआपच सर्व मात्रा निर्मळमात्रा होतात पण मोक्ष नसेल तर मात्रा मळमात्राच असतात त्या निर्मळ व्हाव्यात म्हणून जी साधना केली जाते तिला यात्रा म्हणतात यात्रा महतीक आणि प्रवासीक दोन्ही असतात आपल्याकडे यात्रा आता प्रामुख्याने प्रवासीक झाल्या आहेत महंतसाधक सतत यात्रा करतात त्याचे कारण त्यांची धडपड निर्मळमात्रांची प्राप्ती करणे हे असते ही प्राप्ती झाली कि महंतसाधक महंत बनतो महंत ह्या शब्दाचा एक अर्थ महतचा अंत करणारा असाही होतो महतचा अंत झाला कि मद आपोआपच नाहीसा होतो
सांख्य मात्रांना शुद्ध मानतात व ह्या शुद्ध निर्मळमात्रांना ते तन्मात्रा म्हणतात सांख्यांच्या मते १ रुपमात्रा २ शब्दमात्रा ३ स्पर्शमात्रा ४ रसमात्रा ५ गंधमात्रा ह्या तन्मात्रांपासून अनुक्रमे १ तेजस २ आकाश ३ वायू ४ जल ५ पृथ्वी अशी भुते तयार झाली शैव आधीच म्हंटल्याप्रमाणे दोघांना भिन्न मानतात
श्रीधर तिळवे नाईक
पिंड,लिंग आणि ब्रह्मांड आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १७७
मागील प्रकरणात आपण सांख्य दर्शन व शैवांचे महंत दर्शन यांची तुलना केली आता क्षेत्रक्षेत्रज्ञ विचार पाहायचा अशे
हा विचारही शैवांच्या पिंडब्रह्मांड विचारातून जन्मलेला आहे मात्र पिंड आणि लिंग ह्यांच्यात असलेला सूक्ष्म भेद अनेकदा आर्यांना कळत नसल्याने त्यांनी घोळ घातले लिंग म्हणजे पिंड असा अनेकांचा गैरसमज आहे शिवलिंगाला पिंड म्हंटले जाते म्हणून लिंग एकच आहे असाही काहीजणांचा गैरसमज आहे लिंग हे जन्मतः प्रत्येकाजवळ असते व त्याचे पुलिंग , स्त्रीलिंग व नंपुसकलिंग असे प्रकार होतात हे लिंग जेव्हा उन्नत होऊन मोक्षाविषयी विचार करू लागते तेव्हा ते पुन्हा आपल्या मूळ अस्तित्वाकडे वळते ज्याला आपण पिंड म्हणतो लिंग सहज दिसते पिंड कळायला मात्र स्वतःला तपासायला लागते अलीकडे पिंड म्हणजे काय ते जेनेटिक्समुळे आपणाला अधिकच कळायला लागले आहे पिंड कळत नाही म्हणून जो त्रास होतो त्याला पीडा म्हणतात आणि जो पिंड विसरून भटकतो त्याला पिंडक किंवा ग्रामीण भाषेत पिंडका म्हणतात अलीकडे हा शब्द दारुड्यांना आपण लावतो कारण दारू नको तितकी पिऊन जो पिंडभान विसरतो तोही पिंडकच होय त्याला पिंड विसरल्याने पीडा होते व ह्या पीडेपायी तो इतकी दारू पितो हाही एक अभिप्रेत अर्थ ज्याला स्वतःचा पिंड सापडतो त्याला शिवाची वा शक्तीची पिंडही सापडते ह्या शिवपिंड आणि शक्तिपिंडींना आपण स्थापन करतो ह्यापुढे ह्या दोघांचे सम्यक ऐक्य साधायला लागते त्यातून तयार होते महापिण्ड ह्या महपिंडीतून मोक्ष मिळाला कि तुम्ही ब्रह्मांडात विसर्जित होऊन आदीपिंडीत लय होता समजा मोक्ष मिळाला नाही कि मृत्यूनंतर तुमच्या नावाने ब्रह्मांडाला पिंडदान होते मूळ अर्थ माहित नसल्याने वैदिकांनी हा सगळा विधी बिघडवून टाकला पिंडदान हे पंचमहाभूतांपैकी एकाला दान केले जाते पण शक्यतो पाण्याला प्रीफरन्स जास्त कारण जीवन पाण्यापासून सुरु झाले आहे पिंड बनवताना गोळे बनवणे चूक आहे पिंड पिंडीच्या आकाराचेच हवेत शॉर्टकट शोधणाऱ्या ब्राम्हणांना थोडीही मेहनत करायची नसल्याने ते पिंडाच्या नावाने गोळे बनवतात पिंड अन्नाचा बनवता येतो तसा मृत व्यक्तीच्या राखेनेही मूळ प्रथा राखेची होती पण ती घट्ट एकत्रित ठेवणे अवघड जाई त्यामुळे शेतीचा शोध लागल्यानंतर भातासारखे अन्न आले
टिळक ह्या प्रकरणाच्या शेवटी पिंडी ते ब्रह्मांडी म्हणून समारोप करतात .
शैवांच्या मते मनुष्यपिंडाचे चार प्रकार होतात
१ अक्षस
२ सत्वस
३ सालस
४ आळस
अक्षसला अर्थ काम मोक्ष ह्या तिन्ही अक्षांचे अवधान असते
सत्वसला अर्थ काम मोक्ष ह्या तिन्ही अक्षांचे भान असते
सालसला अर्थ काम मोक्ष ह्या तिन्ही अक्षांची जाण असते
आळसला अर्थ काम मोक्ष ह्या तिन्ही अक्षांचे ना अवधान असते ना भान ना जाण
कपिल ह्यांनी ह्या कल्पना सात्विक राजस तापस अशा विकसित केल्या कारण शेवटी ते एका राजाचे पुत्र होते त्यांनी सालसला राजस असा शब्द दिला तरी सामान्य माणसांच्यात सालस शामळू हेच शब्द प्रचलित राहिले शेवटी सल असायला तुम्ही सालस असायला हवा त्यांनी आळसला तापस हा शब्द वापरला कारण आळस हा पिंड असणारा मनुष्य आळस दूर करण्यासाठी तप करू शकतो
दुर्देवाने सूरआर्यांनी ह्यांचे अर्थ पूर्ण बदलले आणि तापसी म्हणजे संतापणारा असा अर्थ केला त्यामुळे पुढे तापसी हा शब्द जाऊन पुढे तामसी हा शब्द आला तम म्हणजे अंधार हे सांगायला नकोच गीता ह्या शब्दांचे अर्थ पुढीलप्रमाणे करते
प्रवृत्तिंच निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये |
बन्धं मोक्षं च या वेत्तिबुद्धि: सा पार्थ सात्त्विकी || ३०||अध्याय १८ ।।
म्हणजे ज्याच्या बुद्धीला प्रवृत्ती काय व निवृत्ती काय कार्य काय व अकार्य काय भय काय आणि अभय काय बंध काय आणि मोक्ष काय ह्याचे आकलन असते त्याला सात्विक म्हणतात
जो सात्विक आहे तो ब्राम्हण अशीही एक ब्राम्हण ह्या शब्दाची व्याख्या आहे
यया धर्ममधर्मं च कार्यं चाकार्यमेव च |
अयथावत्प्रजानाति बुद्धि: सा पार्थ राजसी || ३१|||अध्याय १८ ।।
ज्या बुद्धीला धर्माधर्म म्हणजे काय कार्य अकार्य काय कळत नाही आणि जी चांगले आणि वाईट काय ह्यांच्यातील भेद आकळू शकत नाही ती बुद्धी राजस होय
ही व्याख्या क्षत्रियांना उद्देशून आहे क्षत्रियांना धर्माधर्म म्हणजे काय कार्य अकार्य काय कळत नाही आणि जी चांगले आणि वाईट काय ह्यांच्यातील भेद आकळू शकत नाही म्हणून त्यांनी सात्विक बुद्धी असलेल्या ब्राम्हणांच्या साहाय्याने व सल्ल्याने राज्य करावे हा तर्क ह्यातूनच आपोआप उदभवतो
अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता |
सर्वार्थान्विपरीतांश्च बुद्धि: सा पार्थ तामसी || ३२||अध्याय १८ ।।
जी बुद्धी अधर्मालाच धर्म समजते जी अज्ञानाच्या अंधारात बुडलेली असते जी सर्वार्थाने विपरीतलाच रीत समजून वागते ती तामसी होय आणि तामसी बुद्धी असलेला तामसी होय
ही व्याख्या प्रामुख्याने वैश्य शूद्र अतिशूद्र आणि आदिवासी ह्यांना ते पापयोनी असल्याने उद्देशून आहे
टिळकांच्या मताने प्रत्येकाने सात्विक बुद्धिसाठी धडपडावे नेहमी चांगले निवडणारी सात्विक बुद्धी आपल्याकडे कायमस्वरूपी असत नाही म्हणून आपण कधी राजस तर कधी तामस कधी सात्विक बुद्धीप्रमाणे वागत असतो
aa
श्रीधर तिळवे नाईक
कृती कशी होते आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १७८
सांख्य कर्मेंद्रियाची अटच हालचाल असणे अशी सांगतात कारण हालचाल हीच कर्माची मूळ असल्याचे मानतात अलीकडे विज्ञानात लोकोमोशन ही संकल्पना आहे तेही हालचालीत बसते गीता हीही हाच सांख्यांचा सिद्धांत स्वीकारते
माझ्या मते जेव्हा हेतू आणि हित अंतःकरणात ठेवून हालचाली केल्या जातात तेव्हा ती कृती असते मनुष्य हेतुसंबंध आणि हितसंबंध सांभाळतच कृती करत असतो अनेकदा हितसंबंध हे स्वहितसंबंधच जास्त असतात त्याखालोखाल कुळहितसंबंध व कुटुम्बाहितसंबंध येतात त्यानंतर आप्तवळहितसंबंध नंतर गणगोतहितसंबंध त्यानंतर गोतावळाहितसंबंध त्यानंतर स्वगणहितसंबंध येतात अपवादात्मकवेळा माणसाला बृहतगण महागणहितसंबंध व परगणहितसंबंध सांभाळायची वेळ येते अलीकड्च्या काळात राज्य हे गण व राष्ट्र हे बृहतगण व मित्रराष्ट्रसंघ हा महागण बनलेला आहे
कृतीमागे जो मनोव्यापार असतो तो कसा चालतो टिळकांच्या मते
१ ज्ञानेंद्रियांनी बाह्य पदार्थाचे ज्ञान होऊन त्या संस्काराची जुळवाजुळव किंवा तुलनेसाठी मांडणी करणे
२ही जुळवाजुळव झाल्यावर त्याच्या बरेंवाईटपणाचा सारासारविचार करून कोणती गोष्ट ग्राह्य कोणती गोष्ट अग्राह्य याचा निश्चय करणे
३ हा निश्चय झाल्यावर ग्राह्य वस्तू प्राप्त करून घेण्याची आणि अग्राह्य टाकून देण्याची प्रवृत्ती होणे
असे मनोव्यापाराचे तीन तुकडे होतात (१३२)
ह्या क्रिया एकामागून एक अशाच होतील असे नाही कधीकधी पहिला व्यापार झाल्यानंतर काही महिन्यांनी तिसरा व्यापार होऊ शकतो न्यायालयात प्रथम पक्षकार व वकील त्यांची बाजू मांडतात पुरावे सादर करतात मग न्यायाधीश दोन्ही बाजु ऐकून निर्णय देतात व त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी नाझेर किंवा पोलीस करतात त्याप्रमाणे हे मनोव्यापार आहेत टिळक वकील असल्याने ते ही पद्धत स्वीकारतात हे उघड आहे
सांख्य हे न्यायाधीशाचे काम बुद्धीला पक्षकारांचे व पोलिसांचे काम मनाला देतात वेदांती हेच करतात आपण शैवांच्या तत्वज्ञानात अंतःकरणाचे असलेले महत्व पूर्वीच पाहिले आहे अंतःकरणात महत (म्हणजे बुद्धी विचार प्रज्ञा परमप्रज्ञा) , मन आणि मद (अहंकार व विकार ) असतात
टिळक व गीता सांख्यांना स्वीकारतात म्हणजेच बुद्धीची सारासारविवेकशक्ती वजा केल्यावर जे उरते ते सांख्यांच्या , गीतेच्या व टिळकांच्या मते मन होय बुद्धीच्या व्यापारास टिळक संकल्प म्हणतात व संकल्पात विचार करणे चिंतन करणे मनन करणे ह्या सगळ्याचा समावेश करतात साहजिकच संकल्पना कन्सेप्ट्स ह्या बौद्धिक व्यापाराचा संकल्पाचा एक मुख्य भाग असतो असे टिळकांना सुचवायचे असावे संकल्प करण्यात निश्चय करणे हेही येते बुद्धीने केलेल्या निश्चयाचे रूपांतर निर्णयात होते व त्याची अंमलबजावणी मन करते म्हणजे काय तर मन कर्मेंद्रियांना आज्ञा देते व मनाने दिलेल्या आज्ञेनुसार कर्मेंद्रिये कृती करतात
मन कल्पना करते पण सारासार विचार करत नाही बुद्धी मनाच्या कल्पनांविषयी सारासार विचारही करते यथार्थ ज्ञान आत्म्याला करून देणे वस्तूंविषयी सारासार निर्णय करून तिच्या स्वरूपाविषयी योग्य काय ते आत्म्यास सांगणे हेही बुद्धीचे काम आहे ह्याशिवाय तर्काने कार्यकारणसंबंध पाहून अनुमान काढून ते अनुमान आत्म्याला सांगणे हेही बुद्धीचे काम आहे असे टिळक म्हणतात बुद्धीच्या ह्या कामाला संस्कृतमध्ये व्यवसाय हा शब्द आहे मन व्यापार करते तर बुद्धी व्यवसाय करते महाभारतात बुद्धी व्यावसायिक तर मन व्याकरणिक म्हणजे सतत विस्तार करणारे असं म्हंटल आहे (मभा शांतिपर्व २५१. ११) भगवद्गीता बुद्धी व्यावसायिक हे स्वीकारते उदा गीता म्हणते
भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् |
व्यवसायात्मिका बुद्धि: समाधौ न विधीयते || ४४|| अध्याय दुसरा ।।
निर्णयासाठी इच्छा व धैर्य हे गुण लागतात बुद्धीकडे हे गुण असत नाहीत त्यामुळे भलेभले विचारवंत कृती करायची वेळ आली कि शेळपटतात त्यामुळेच ज्या मनाकडे धैर्य व इच्छा आहे ते धेर्यशाली मन ही अनेकदा राजकारणी लोकांची ताकद बनते निर्णय घेण्याचे काम मनाला करावे लागते जे मन शेळपट असते ते दुसऱ्यांच्या मनाने निर्णय घेते असे लोक कायम आपल्या बॉसच्या आज्ञा पाळत असते बॉसची इच्छा म्हणजे मर्जी सांभाळणे ह्यातच ते इतिकर्तव्यता मानतात कारण धेर्याचा अभाव !
शैवांच्या मते बाह्य विषयाचे केलेले ग्रहण व चिंतन मनाचे चित्त करते मग हे चित्त बुद्धीकडे ते पाठवते म्हणजेच मनाचे चित्त हे एक भाग आहे चित्त बाह्यवर्ती आहे आपण जेव्हा एखाद्याचे चित्त ठिकाणावर नाही असे म्हणतो तेव्हा त्याचे बहिर्वर्ती मन ठिकाणावर नाही असे आपणास म्हणावयाचे असते मनाचा दुसरा भाग मानस हा अंतर्वर्ती आहे मानसकडे नीरक्षीरविवेक असतो म्हणजे काय बुद्धीने सांगितलेला निश्चय अहंकाराच्या आणि विकाराच्या आहारी न जाता तपासणे आणि अंमलात आणणे अनेकदा आपण चित्ताच्या आहारी जातो आणि चित्त अहंकार वा विकार ह्यांना शरण जाऊन कृती करते म्हणजेच बुद्धीचा निर्णय मनाच्या मानसमध्ये न येता अहंकार व विकार ह्यांच्याकडे जातो आणि चित्त हा मनाचा बाह्यवर्ती भाग त्याची अंमलबजावणी करतो अनेकदा बुद्धीच चित्तशरण असते आणि ह्यातूनच सवयींचा आणि व्यसनांचा जन्म होतो आपल्या कृती सवयजडित वा व्यसनजडित बनायला लागतात शैवांच्यात जेव्हा मानससरोवर कैलासाकाठी आहे म्हंटल जातं तेव्हा आपली बुद्धी मानस ठेवा असे सांगायचे असते अन्यथा कृती चित्तशरण अहंकारशरण विकारशरण होत जातात
श्रीधर तिळवे नाईक
कर्ता कोण आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १७९
मागील प्रकरणात आपण कृती कशी होते ते पाहिले टिळक कृती करणाऱ्याला क्षेत्रज्ञ म्हणतात क्षेत्र ह्या शब्दाचे तीन अर्थ टिळक सांगतात १ शेत २ मनुष्यदेह ३ कारखाना पहिला अभिधात्मक दुसरा लाक्षणिक आणि तिसरा व्यंजनात्मक आहे ह्या कारखान्याचे १ ज्ञानेंद्रिये व २ कर्मेंद्रिये दरवाजे असून मन बुद्धी अहंकार चेतना हे कामगार आहेत सदर कामगार जे व्यवहार करतात वा करवितात त्यांना व्यापार वा विकार किंवा धर्म म्हणतात टिळक क्षेत्राला कारखाना मन बुद्धी अहंकार ह्यांना कारखान्यातले कामगार व धर्माला व्यापार म्हणतात हे इंटरेस्टिंग आहे टिळक अर्वाचीन कारखाने स्वीकारत चालल्याचे ते लक्षणही आहे पुढचा प्रश्न टिळक विचारतात ह्या क्षेत्राचा मालक कोण कि हे क्षेत्र मालकाविना आहे ? टिळक ह्या प्रश्नाचे उत्तर आत्मा असे देतात टिळकांच्या मते आत्मा हा ह्या क्षेत्राचा मालक चालक आहे शेवटी मन बुद्धी अहंकार चेतना हे कामगार कोणासाठी काम करतात तर आत्मा ह्या मालकांसाठी ! हा मालकचालक एकीकरण करतो दिशाही देतो चेतना म्हणजे हालचालीचे व्यापार ते थांबले कि जडदेह काहीच करू शकत नाही मात्र चेतनाही जडाचाच व्यापार असते ती एकीकरण करू शकत नाही म्हणजेच
अनेकदा ती पालटत असते म्हणजेच कुणी एक स्थिर हवा जो ह्या व्यापाराला स्थिरि देतो तो जो स्थिरपणा देतो तो आत्मा ! ह्याविरोधातला युक्तिवाद म्हणजे मन बुद्धी अहंकार चेतना ह्यांच्या समुच्चयांचे मिळून जो संघात होतो तो मी म्हणजेच क्षेत्रज्ञ ! टिळकांना हे मान्य नाही ते म्हणतात लाकडावर लाकूड ठेवल्याने पेटी तयार होत नाही क्षेत्राचे व्यापार उगाच वेड्यासारखे होत नाहीत त्यांना हेतू व धोरण असते संघात म्हणजे नुसती जुळणी ! नुसते मणी एकत्र आणले म्हणजे होत नाही त्यासाठी त्या मण्यांना एका दोरात ओवावे लागते हा दोरा कोणता ? टिळकांच्या मते गीतेला संघात मान्य आहे पण संघात क्षेत्रातच येतो प्रश्न आहे ह्या संघाताला बनवतो कोण ? ह्याचे उत्तर संघातात हा गुण निर्माण होतो जसे दुधापासून दही बनते संघातात निर्माण होणारा गुण संघाताला मालक बनवतो हे टिळकांना मान्य नाही टिळकांच्या मते सर्व पदार्थ ज्ञेय ह्या कसोटीत पडले पाहिजे असे कोठे आहे ह्या कसोटीबाहेर कोणी असू शकतो म्हणजे ज्याला सर्व ज्ञात होते तो ज्ञाता ज्ञातालाच ज्ञात होत नाही हे स्वाभाविक आहे जे ज्ञेय आहे ते ज्ञाताला ज्ञात होते आणि ते पुरेसे आहे एका अर्थाने टिळक इथे स्पेन्सरसारखे अज्ञेयवादी होतात जो सर्व गोष्टींना जाणतो त्याला जाणणारा दुसरा कोठून येणार ? टिळकांच्या मते सांख्य ह्याला पुरुष म्हणतात वेदांती ह्याला क्षेत्रज्ञ म्हणतात ह्या क्षेत्रज्ञालाच आपण आत्मा म्हणतो मी आहे ह्याची जी नित्य प्रचिती आपणास येते ती प्रचिती ह्या आत्म्याचा पुरावा आहे
हा क्षेत्रक्षेत्रज्ञविचार ब्रह्मांडाला लागू केला कि क्षराक्षरविचार येतो म्हणजे पिंडाचा जसा मालक आत्मा आहे तसा ह्या ब्रह्मांडाचा मालक कोण ? श्रीकृष्ण स्वतःलाच ह्या ब्रह्मांडाचा मालक म्हणून प्रोजेक्ट करतो मीच ईश्वर असे सांगतो
कपिल कोण कणाद कोण श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १८०
मागील प्रकरणात आपण शैवांच्या महंत दर्शनाच्या
महत
मन
आणि मद
ह्या अंतःकरणत्रयाचा परिचय करून घेतला अंतःकरणत्रय हे शक्तीचे एक प्रकटीकरण असते शक्ती वेगवेगळे आकार धारण करत असते आपणाला ह्या आकाराचा दिसणारा भाग म्हणजे रूप होय आणि आपण जो आकार प्रत्यक्षात कल्पतो तो आरोप होय आरोपी म्हणजे ज्याच्यावर आरोप कल्पला गेला आहे तो ! आणि आरोपण म्हणजे रूपात रूपाबाहेरचा भाग घालून मूळ रूपाचा आकार बदलणे रूपाच्या वनस्पतीजन्य रुपाला आपण रोप म्हणतो व ते लावतो विरूप म्हणजे मूळ रुपाला विकारामुळे प्राप्त झालेले अवनत रूप स्वरूप म्हणजे स्वतःचे ऐहिक रूप तर आत्मरूप म्हणजे अतिऐहिक रूप तद्रूप म्हणजे स्वरुपाखेरीज अस्तित्वात असलेल्या दुसऱ्या रूपात विलीन होणे रूपाचे चार भाग होतात १ रचना २ द्रव्य ३ ऊर्जा ४ गती
शिव दर्शनात मह्तचे विचार भाव बुद्धी प्रज्ञा परमप्रज्ञा असे चार विभाग
मनाचे चित्त व मानस
आणि मदाचे अहंकार आणि विकार असे दोन भाग पाहिले
कपिलसांख्यशास्त्र व क्षराक्षरविचार ह्या पुढच्या प्रकरणात टिळक क्षराक्षरविचार अधिक खोलात तपासतात कारण टिळकांच्या मते आत्मा म्हणजे काय हे कळण्यासाठी हे आवश्यक आहे क्षर म्हणजे दृश्य सृष्टी तर अक्षर म्हणजे ह्या सृष्टीची मुलतत्वे किंवा मुलतत्व ! ह्यांचा विचार तीन शास्त्रांनी केला आहे असे टिळक म्हणतात १ सांख्य २ न्याय आणि ह्या दोघांच्यावर आधारित वेदान्तशास्त्र !
उपनिषदे आधी कि सांख्य दर्शन आधी हा भारतीय इतिहासातला एक मोठा वाद आहे ब्राम्हण उपनिषदे आधी मानतात कारण त्यांना ते सोयीचे आहे तर कपिल हा क्षत्रिय असल्याने क्षत्रिय सांख्यांना आधीचे मानू पाहतात टिळक ब्राम्हण असल्याने ते उपनिषदांना प्रथम मानतात कपिलांचा काल्पनिक इतिहास रचून त्यांना ब्राम्हण व नंतर विष्णूचा अवतार बनवण्याचाही प्रयत्न झाला आहे
टिळक कपिलांची तुलना डार्विन व लामार्क ह्यांच्याशी करतात त्यांच्या मते डाल्टन व कणाद ह्या दोघांनी मांडलेला परमाणू पुढे उत्क्रांती कशी झाली ते सांगू शकला नाही व पुढे कपिलांनी व लामार्क व डार्विन ह्यांनी उत्क्रांतीचे तत्व सांगून हे कोडे उलगडवले आश्चर्यकारकरीत्या टिळक इथे औलुक्याचा उल्लेख करतात जे अनपेक्षित आहे
औलुक्य हा शिवांचा एक असा शिष्य होता ज्याला मोक्षापेक्षा जगाचा कार्यकारणभाव जाणून घ्यायची इच्छा होती साहजिकच ज्ञान ही त्याची उत्सुकता आणि स्वभाव होता त्याला शिवांनी जो उपदेश दिला त्यातून औलुक्य दर्शन जन्मले औलुक्य म्हणजे घुबडाप्रमाणे बुद्धिमान असलेला व औलुक्य दर्शन म्हणजे बुद्धिमान लोकांचे दर्शन स्पंद स्पंदने आणि कण हे औलुक्य दर्शनाचे तीन आस्पेक्ट आहेत आणि हे जग ह्या तिघांच्यापासून जन्मले आहे
१०० व्या औलुक्याच्या काळात कणाद नावाचा एक आर्य औलुक्याकडे हे दर्शन शिकण्यासाठी आला तेव्हा त्याला प्रथम महेश्वराला प्रसन्न करून घे असं सांगण्यात आलं साहजिकच कणादाने शिवाची भक्ती सुरु केली त्याच्या ह्या भक्तीने शिव प्रसन्न झाले व त्यांनी औलुक्याला आज्ञा दिली कि कणादला माझं दर्शन शिकव ह्या आज्ञेनुसार प्रथमच एका आर्याला हे दर्शन शिकवण्यात आले कणादाने आर्यांच्यात येऊन ते दर्शन मांडले आणि ते वैशेषिक म्हणून प्रसिद्ध झाले सगळं जग कणांच्यापासून बनलेलं आहे हा ह्या दर्शनाचा मुख्य सिद्धांत जो अलीकडे विज्ञानाने मान्य केला आहे
टिळक सहसा शंकराचा उल्लेख करत नाहीत पण ह्या कथेसंदर्भात त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे हे दर्शन टिळकांना क्षराक्षर विचारासंदर्भात महत्वाचे वाटते वैशेषिकांच्यात ह्या शैव कणांचा आर्य परमाणू कधी झाला हे एक कोडे आहे टिळकांच्या मते सर्वच पदार्थ ज्यात माणूसही आला परमाणूंच्यापासून बनले आहेत आणि चैतन्यही परमाणूंच्या एकत्र येण्यातून निर्माण होते
एकदा हे स्पष्ट झाल्यावर टिळक मग पुन्हा सांख्य मतांकडे येतात सांख्य तत्वज्ञानाचा आर्यांवरचा एकेकाळी इतका प्रभाव होता कि सांख्य ह्या शब्दाचा अर्थच तत्वज्ञान असा झाला होता व आर्यांच्यात सांख्य विरुद्ध जैमिनी असा वाद सुरु होता जैमिनी पारंपरिक यज्ञप्रधान तत्वज्ञानाचा पुरस्कार करत होते तर सांख्य मोक्षाचा ! एका अर्थाने मोक्ष विरुद्ध धर्म असा हा वाद होता जैन आणि बौद्ध दर्शनांच्यानंतर मोक्ष नाकारणे कठीण झाले आणि जैमिनी पराभूत होऊ लागले जे थोडेफार जैमिनी दर्शनकार होते त्यांचा शेवटचा पराभव शंकराचार्यांनी केला आणि जैमिनी व यज्ञ भारतातून गायब होऊ लागले शंकराचार्यांनी प्रचलित केलेली पूजा आर्यांनीही स्वीकारली
सांख्य हा शब्द संख्या ह्या शब्दापासून आला आहे त्याचा अर्थ मोजणारे असा होतो वेदांत हाही सांख्यात येतो पुढे हिंदू धर्म निर्माण झाल्यावर ब्राम्हणांनी जाणीवपूर्वक वेदांत सांख्यापासून वेगळा केला कारण त्यांना कपिल हा क्षत्रिय असल्याने गुरु स्थानी नको होता आणि कपिलाचे ब्राम्हणीकरण करण्याचे प्रयत्न फसले होते गंमतीचा भाग असा कि ज्या ग्रंथाला टिळक सांख्यांचा ऑथेंटिक ग्रंथ मानतात त्या ग्रंथाचा कर्ता ईश्वरकृष्ण ह्या विषयीची माहिती आपणाला चिनी भाषेत असलेल्या बौद्ध ग्रंथावरून मिळते टिळक त्याचा कालखंड इसवीसन २५० ठरवतात ह्याही पुढचा भाग म्हणजे ईश्वरकृष्ण सांख्यकारिकेत अखेरीला हे मान्य करतो आहे कि त्याचा हा ग्रंथ षष्टितंत्र ह्या साठ प्रकरणाच्या विस्तृत ग्रंथाचे त्याने ७० आर्यात केलेले संक्षिप्तीकरण आहे षष्टितंत्र हा ग्रंथ शैवांच्या तंत्र साहित्याचा एक महत्वाचा भाग मानला जात होता आता जर सांख्य ग्रंथ हा मूळचा तंत्र म्हणून लिहिला गेला असेल तर तो शैव ग्रंथ आहे हे वेगळं सांगण्याची गरजच काय ? टिळक हे सांगत नाहीत म्हणून मी हे सांगतोय वस्तुस्थिती अशी आहे कि कपिल हा बळीचा भाऊ किंवा पुत्र होता म्हणजेच तो फुले म्हणतात त्या बळीच्या वंशातला होता आणि बळीवंश शंकराचा भक्त होता हे पदमपुराणात सांगितले आहेच ह्याचा स्पष्ट अर्थ असा आहे कि कपिलाचे सांख्य हे दर्शन मूळचे शैव आहे आणि पुढे कदाचित ईश्वरकृष्ण वा त्याच्या गुरूने वा त्याच्याही आधी कुणीतरी सांख्य कारिका वा त्याआधी दुसऱ्या ग्रंथाद्वारे त्याचे रूपांतर आर्य दर्शनात केले आहे ह्या शैव असलेल्या कपिलच्या सांख्य दर्शनाचा प्रभाव गौतम बुद्धावर पडला आहे हे खुद्द बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म ह्या ग्रंथात मान्य केले आहेच
आणि ह्याच सांख्य दर्शनाच्या खांद्यावर भगवदगीता उभी आहे म्हणूनच श्रीकृष्ण ऋषीमुनिंच्यात मी कपिल असे सांगतो मात्र टिळक म्हणतात तसे अंतिम सिद्धांत वेगळे आहेत एका अर्थाने सांख्य तत्वज्ञान वापरून आपला आर्यन अजेंडा राबवण्याचा हा प्रयत्न आहे सांख्यांना अवतार मान्य नाही विष्णू मान्य नाही वेदही मान्य नाही श्रीकृष्णाची सारी धडपड वेद मानणारा , विष्णूचा अवतार असणारा अवतारी पुरुष बनण्याची आहे
श्रीधर तिळवे नाईक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा