र
पोस्ट्स
ऑगस्ट, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जम्मू कश्मीर बाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत सरकारचे अभिनंदन ! हे खरेतर काँग्रेसने करायला हवे होते पण त्यांनी मताच्या राजकारणासाठी हे टाळले . ह्या निर्णयामुळे बीजेपीने मुस्लिम मतदाराचा मोठा हिस्सा गमावला हे वास्तव पण हिंदूंच्या एकसंध मतदानाच्या जीवावर आपण पुढील इलेक्शन जिंकू असे कॅल्क्युलेशन असावे . काँग्रेसची मात्र काँग्रेस ही हिंदुविरोधी संघटना आहे ही प्रतिमा आधिकच गडद होईल . श्रीधर तिळवे नाईक काश्मीर प्रश्न सुटलेला नाही गेली कित्येक वर्षे वेगवेगळ्या आकर्षक कुलुपात तो बंद केलेला होता आता प्रथमच तो कसलीही राजकीय लाच न देता घेता संपूर्णपणे राष्ट्रवादाच्या चौकटीत उभा राहिला आहे जर काश्मिरी मुस्लिमांना भारतात राहायचे असेल तर काश्मीरमधील मुस्लिम निखळ भारतीय म्हणून आता सामील होतील नाहीतर वेगवेगळ्या मार्गांनी आपला प्रक्षोभ व्यक्त करत राहतील सर्व काही अचानक स्मूथली होईल असं गृहीत धरण्यात काहीही अर्थ नाही प्रत्येक समुदायापुढे एक कठीण पॉज उभा ठाकतो आणि त्याला निर्णय घ्यावा लागतो काश्मिरी मुस्लिमांच्यापुढे हा पॉज उभा ठाकला आहे ह्या प्रश्नाला असलेली सर्वात दुःखद किनार हीच आहे कि काश्मिर...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मी टीव्हीच्या बातम्या व शो फारसे पहात नाही पाहीलेच तर महेश म्हात्रे मंदार फणसे प्रसन्न जोशी संजय आवटे राजीव खांडेकर वैग्रे मराठी लोकांच्या पलीकडे माझी मजल कधी गेली नाही जात नाही त्यामुळे रवीशकुमार मला फारसा माहीत नाही आणि अर्णब गोस्वामीही !दोघांनाही मी जास्तीत जास्त तीसचाळीसवेळा पाहिलं असेल पत्रकारांचे मूल्यमापन कसे करतात ह्याचीही मला कल्पना नाही मात्र एक गोष्ट मला जाणवते ती म्हणजे सचोटी ! रवीशकुमार हा एक अस्सल पत्रकार आहे ह्याविषयी कधी शंका येत नाही लोकशाहीत माध्यमांचा रोल काय हे त्याला नीट कळलंय असं वाटतंय . मात्र हिंदुत्ववादाची पाळंमुळं त्याला नीट सापडलेत असं मला कधी वाटलं नाही . त्याला पारितोषिक मिळाल्याने तो महान असं मानणाऱ्यातला मी नाही पण ज्या तडफेने तो भाजप सरकार विरोधात लढला ती तडफ काबिलेतारीफ आहे . तिला दाद मिळाली हे बरं झालं . श्रीधर तिळवे नाईक