जम्मू कश्मीर बाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत सरकारचे अभिनंदन ! हे खरेतर काँग्रेसने करायला हवे होते पण त्यांनी मताच्या राजकारणासाठी हे टाळले . ह्या निर्णयामुळे बीजेपीने मुस्लिम मतदाराचा मोठा हिस्सा गमावला हे वास्तव पण हिंदूंच्या एकसंध मतदानाच्या जीवावर आपण पुढील इलेक्शन जिंकू असे कॅल्क्युलेशन असावे . काँग्रेसची मात्र काँग्रेस ही हिंदुविरोधी संघटना आहे ही प्रतिमा आधिकच गडद होईल .
श्रीधर तिळवे नाईक

काश्मीर प्रश्न सुटलेला नाही गेली कित्येक वर्षे वेगवेगळ्या आकर्षक कुलुपात तो बंद केलेला होता आता प्रथमच तो कसलीही राजकीय लाच न देता घेता संपूर्णपणे राष्ट्रवादाच्या चौकटीत उभा राहिला आहे जर काश्मिरी मुस्लिमांना भारतात राहायचे असेल तर काश्मीरमधील मुस्लिम निखळ भारतीय म्हणून आता सामील होतील नाहीतर वेगवेगळ्या मार्गांनी आपला प्रक्षोभ व्यक्त करत राहतील सर्व काही अचानक स्मूथली होईल असं गृहीत धरण्यात काहीही अर्थ नाही प्रत्येक समुदायापुढे एक कठीण पॉज उभा ठाकतो आणि त्याला निर्णय घ्यावा लागतो काश्मिरी मुस्लिमांच्यापुढे हा पॉज उभा ठाकला आहे

ह्या प्रश्नाला असलेली सर्वात दुःखद किनार हीच आहे कि काश्मिरी लोकांना स्वतंत्र राष्ट्रनिर्मितीचा कसलाही चान्स नाही त्यांना असे वाटते कि असा चान्स आहे पण आतंरराष्ट्रीय दबाव असे आहेत कि काश्मीर स्वतंत्र राष्ट्र म्हणून ठेवले जाणे शक्यच नाही काश्मीर स्वतंत्र असते तर एकतर काश्मीर हा अमेरिकेचा तळ झाला असता किंवा चीनचा !नाहीतर समजा भारताने स्वातंत्र्य दिले असते तर पाकिस्तानने काश्मीर बळकावलाच असता आणि पाकिस्तानची अवस्था बघता काश्मिरींचे काय भले झाले असते हा प्रश्नच आहे पाकिस्तानपेक्षा भारत हा कधीही चांगला चॉईस आहे आणि हे काश्मिरी लोकांना आपण कसे पटवून देतो ह्यावर भारताचे व भारत सरकारचे यश अवलंबून आहे

भारतापुढचा पेच असा आहे कि अमेरिका अफगाणिस्तानमधून सैन्य काढून घेतीये म्हणजे तिथे तालिबानचे राज्य अटळ आणि मग पाक आणि तालिबान एकत्र येणे अटळच ! चीनला चायनीज मुस्लिम कसे मॅनेज करायचे ह्याचा एक मार्ग सापडलाय जो कम्म्युनिस्ट आहे पण हा मार्ग अवलंबतांना त्यांना पाक तालिबान वैग्रे भानगडी स्वतःच्या घरात घ्यायच्या नाहीत त्यामुळे दुरून हात मिळवत आणि सिल्क रूटचा जुना कंट्रोल मिळवत त्यांना पाकिस्तान मॅनेज करायचा आहे कर्जाच्या सापळ्यात अडकवून हे त्यांनी साध्यही केले आहे ह्यात गोची भारताची आहे कारण पाकिस्तान अफगाणिस्तानी तालिबान आणि चीन हे एका रेषेत विरोधात उभे आहेत अशावेळी लडाख केंद्रशासित करून त्याचा कंट्रोल केंद्र सरकारने स्वतःकडेच घेतला ते बरंच झालं जम्मू आपल्या बाजूने आहे प्रश्न पुन्हा काश्मिरींचा आहे तिथे सर्वप्रकारचे आर्थिक बम्बार्डिंग करून एक पोकळ संपन्नता उपलब्ध करून दिली तर हा डाव आपल्या बाजूने पडेल असं भाजपला वाटतं हे अशक्य आहे असंही नाही पण मुस्लिम वृत्ती फक्त आर्थिक संपन्नतेने वश होईल ह्याची खात्री काय ? तिथे हिंदू लोकसंख्येची भरमार करणे हाही उपाय असू शकतो पण हा कसा अंमलात आणायचा हा प्रश्न आहे मुख्य म्हणजे काश्मिरी लोक ही हिंदू भरमार सहन करतील कि तालिबानी स्टाईलने प्रतिकार करतील  हाही एक प्रश्न आहे












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट