ट्रोलिंग, दाबवणूक आणि इतिहास श्रीधर तिळवे नाईक
दाबवणूक ही ब्राम्हण्याची राजसत्तेवर वा व्यक्तीवर दाब टाकून इप्सित साध्य करण्याची वर्तनशैली आहे आणि तिने अनेकदा भारतीय इतिहासात महत्वाचा रोल पाडला आहे आपण सुरवातीलाच आणखी एक फरक लक्ष्यात घ्यायला हवा तो म्हणजे दबाव वैयक्तिक असतो पण दाबवणूक हा झुंडीचा कारभार असतो
दाबवणूकीचे दोन प्रकार असतात
१ दबावणूक ह्यात लक्ष्य व्यक्तीला शारीरिक दृष्ट्या डांबलेले नसते केवळ घेरलेले असते
२ डांबवणूक ह्यात लक्ष्य व्यक्तीला शारीरिक दृष्ट्या डांबलेले असते
ह्या दोन्ही प्रकाराचे दोन उपप्रकार होतात
१ सौम्य दबावणूक/डांबवणूक
२ जहाल दबावणूक/डांबवणूक
कैद जनतेला स्पष्ट दिसते डांबवणूक दिसत नाही
दाबवणूकीच्या पाच स्टेजेस पायऱ्या असतात
१ आरडाओरडा ह्यात फक्त आवाजाचा वापर होतो
२ आदळाआपट ह्यात आवाजाबरोबर वस्तूंची आदळाआपट केली जाते जेणेकरून समोरच्या व्यक्तीत भय निर्माण व्हावे
३ शरीरआपट ह्यात सौम्य रित्या समोरच्या व्यक्तीवर शारीरिक आक्रमण करून तिच्या तोंडाला काळे फासणे वस्त्रे फाडणे नग्न करणे असे प्रकार केले जातात
४ समूहहल्ला ह्यात व्यक्तीला रक्त वाहील अशा तऱ्हेने जखमा केल्या जातात
५ समूहखून ह्यात त्या व्यक्तीचा झुंडीने खून करण्यात येतो
शिवाजी महाराजांनी वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करावा हा सौम्य दबावणुकीचा प्रकार होता तर बाजीराव मस्तानी प्रकरणात बाजीरावावर जहाल दबावणूक आणली गेली होती काश्मीरच्या राजाने जेव्हा आपल्या जनतेला स्वधर्मात प्रवेश देण्याची व्यवस्था केली होती तेव्हा तत्कालीन वैदिक ब्राम्हणांनी यज्ञकुंडात उडी मारून जीव देऊ अशी जहाल दबावणूक आणली होती व ब्राम्हणांनी यज्ञकुंडात उडी मारून आत्महत्या केली तर सामूहिक ब्राम्हणहत्येचे पातक आपल्याला लागेल म्हणून राजाने माघार घेतली ही जहाल डांबवणूक होती व त्याला बळी पडून ह्या राजाने आपल्या प्रजेचे धर्मांतर थांबवले धर्मांतर विधी पार पाडायला आलेल्या सर्व काश्मिरी शैवागमी शैव ब्राम्हणांना राजवाड्यातून कायमचे हाकलले गेले व राजाची काश्मिरी प्रजा मुसलमानच राहिली पुढे ह्या शैव ब्राम्हणांपैकी अनेकजण वैदिक ब्राम्हण झाले अनेक काश्मिरी पंडितांना काश्मिरी शैवागम दर्शन म्हणजे काय तेही माहित नसते इतके ते आपल्या मुळापासून तुटून वैदिक बनले आहेत आणि हा जहाल दाबवणूकीचा परिणाम आहे
आपण आणखी एक फरक इथे लक्ष्यात घ्यायला हवा दबाव वैयक्तिक असतो पण दबावणूक व डांबवणूक हा झुंडीचा कारभार असतो आणि ह्या देशात ब्राम्हणांनी व अपवादात्मकवेळा क्षत्रियांनी आपले इप्सित साध्य करण्यासाठी तो वापरला आहे अलीकडच्या काळात रशिया व चीनमध्ये कम्युनिस्टांनी हा प्रकार व्यापक प्रकारे वापरला होता आणि अनेकांची मते बदलली होती स्तानिस्लावस्की ह्या नामवंत दिग्दर्शकाने ह्या दाबवणूकीला बळी पडून आपली दिग्दर्शनशैली बदलली होती तर मेयरहोल्डने आपली दिग्दर्शनशैली बदलायला नकार दिला म्हणून शेवटी त्याची हत्या करण्यात आली
अलीकडे अनेकदा संसद व सभासदनात लोकप्रतिनिधी आरडाओरडा व आदळआपट वापरत असतात हेही दाबवणूकीचे उदाहरण होय
चौथ्या नवतेत ह्या दाबवणूकीचे प्रकार डिजिटल झाले आणि एखाद्या व्यक्तीवर डिजिटल आरडाओरडा करून नामोहरण करण्याचे प्रयत्न सुरु झाले ज्याला आज आपण ट्रोलिंग म्हणतो
ज्वालाग्राही अनाकलनाच्या वा अपआकलनाच्या वाक्यांची संततधार लावून समोरच्याचा नामोहरण करण्याचे , त्याचे वैचारिक व भावनिक मूड ऑफ करण्याचे व शक्तीक्षय करण्याचे केलेले हेतुपूर्वक पाठलाग म्हणजे ट्रोलिंग होय
अनावश्यक शब्दबंबाळता , मुद्देभटकवणी , चकवाखेळ , जालीय अपप्रचार , झुंडीय तिटकारा , रेटून खोटे बोलणे , वाचकांच्यातील शक्य प्रतिक्रिया कुचकामी करणे , तर्क न देता मूर्ख ठरवणे , बायस व अफवा तयार करणे पसरवणे, ऑनलाईन हॅरॅसमेंट करणे ह्यासारख्या स्ट्रॅटेजीज त्यासाठी वापरल्या जातात कार्पोरेट जगतात ट्रोलिंग अनेकदा ऑफलाईन चालत असे विशेषतः प्रतिस्पर्धी कमोडिटीविरुद्ध साहित्याच्या व्यवहारातही ते अनेकदा ऑफलाईनच चालते अनेक नियतकालिक अनियतकालिकांचे संपादक ह्यात उत्साहाने भाग घेतात आणि अनेकदा आपला मूर्खपणा जगजाहीर करतात
सुरवातीपासून असले तरी ट्रोलिंग ऑनलाईन झाल्यावर त्याची अधिक चर्चा सुरु झाली
Why People Troll and How to Stop Them
ह्या लेखांत जॅक्सनने ट्रोलची व्याख्या Trolls
divert online discussions into
non-productive, off-topic venues. They pose as part of a community only
to disrupt it. Trolling is anti-social behavior.
अशी केली होती व टेक्निकबाबत तो म्हणाला होता ,
"Some of the techniques trolls use to accomplish their objectives are:
§ Pithy put-downs
§ Name-calling and insults
§
Ad
hominem attacks that
try to negate an opinion by alleging negatives about the person
supporting it
§ Impugning other’s motives
§ Emotional rants
§ Bullying and harassment
§ Completely off-topic posts
§ Posting inaccurate “facts”
१ जून २०१२ ला व्हाय वी ट्रोल ह्या नावाने मॅट होंनन ह्यांचा लेख आला होता
At the end of this post there is a comment form, where you can weigh in and tell me I am wrong. If you do that, however—even if you have a great point—you're probably a troll.
I know. You don't think you are a troll. You are simply assured
of your righteousness. You're just demonstrating your case. And you're
justifiably adamant about it.
Which is exactly what makes you a troll. (Hi!)
Look, there are two basic types of trolls. One is the person who
says or does something simply to get a rise out of people, or to fulfill some
horrible void in his or her soul. The kind of shithead who harasses women with breast
cancer.
But that kind of troll is thankfully pretty uncommon—like the
comic book villain who actually wants to destroy Earth. More common is the guy
who thinks he's flying the flag for truth and justice, and, in the process,
becomes a complete asshole. A misguided villain. Like Magneto.
अशी त्याची सुरवात होती त्याने ट्रोलरला मिसगाईड झालेला व्हिलन म्हंटलं होतं स्वतःच्या मताशी असहमत असणारी माणसे चूकच आहेत असं गृहीत धरणारी मानसिकता ही ट्रोलिंगची उगमस्थान आहे आपण चुकू शकतो आणि इतर बरोबर असू शकतात ही शक्यताच जेव्हा अहंकार नाकारतो तेव्हा त्या अहंकाराचे रूपांतर सैतानात होते ह्या सैतानाला ट्रोलर म्हणतात ही अहंकारी मानसिकता आपल्यात आहे का हेही डोळे उघडे ठेऊन प्रत्येकाने/प्रत्येकाला पाहावे लागते प्रत्येक ट्रोलरमध्ये जस्टिफिकेशनची अहंकारता जशी जशी वाढत जाते तशी तशी सैतानताही वाढत जाते
ट्रोलरचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे त्याचा वैज्ञानिक पद्धतीवर विश्वास नसतो त्यामुळे त्याच्या मतांच्याविरुद्ध तुम्ही खंडीभर पुरावा दिला तरी चिकाटीने तो तो पुरावा नाकारत राहतो अनेकदा त्याच्या श्रध्दांना तो सिद्धांत समजतो आणि सिद्धता मात्र देत नाही
तू चुकतोयस हे सांगण्याची खाज कुणात नसते ? पण ही खाज जेव्हा माझं सगळं बरोबर आणि तुझं सगळं चुकीचंच अशा अजेण्डात रूपांतरित होते तेव्हा ट्रोलिंगचा जन्म होतो हा अजेंडा जेव्हा सामूहिक बनतो तेव्हा सामूहिक ट्रोलिंगची सुरवात होते मग एक ग्रुप एक पक्ष एक देश ट्रोलिंग सुरु करतो
ट्रोलिंग हे फक्त भाजपमध्येच आहे असा गैरसमज बाळगण्याचे काहीही कारण नाही हृदयनाथ मंगेशकरांनी सावरकरांचे गाणे कम्पोज केले म्हणून ते कामावरून निघून जातील अशी व्यवस्था करणाऱ्या , त्यांना काढून टाकणाऱ्या लोकांची मानसिकता हीही अहंकारीच मानली पाहिजे
स्वाती चतुर्वेदी ह्यांनी आय एम अ ट्रोल (I Am A Troll: Inside the Secret World of the B.J.P.’s Digital Army),ह्या पुस्तकात भाजपच्या ट्रोलिंगची सखोल चर्चा केली भाजपच्या ब्राम्हणगिरीची व डिजिटल आर्मीची चांगलीच चिरफाड ह्या पुस्तकात आहे मुग्धा कर्णिक ह्यांनी त्याचा उत्कृष्ट मराठी अनुवाद केल्याने मराठीत ट्रोलिंगची चर्चा अधिक खोलवर सुरु झाली मात्र हळूहळू ट्रोलिंगवर उपाय प्रतिट्रोलिंग असा प्रकार सुरु झाला आणि दोन्हीकडून खोटेपणाचा ससेमिरा सुरु झाला
मला वैयक्तिक पातळीवर ऑफलाईन ट्रोलिंग खूप सहन करावे लागले तरी ऑनलाईन ट्रोलिंग सहन करावे लागले नाही कारण मी मुळातच माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना माझ्या पोस्टला लाईक देऊ नका व पोस्टवर कॉमेंट करू नका असे सांगितले आहे त्यामुळे जो पॉझिटिव्हबाबतच उदास आहे त्याला निगेटिव्हबाबत काय ट्रोल करणार ?
दुसरी गोष्ट मी ट्रोलर सुंघतो आणि अनफ्रेंड करतो कविता महाजन आणि गणेश ह्यांच्यात जे झाले त्याचा वास मला खूप आधी आला होता आणि मी गणेशजींना खूप आधीच अनफ्रेंड करून मोकळा झालो होतो वास्तविक गणेशजींनी मला वैयक्तिक कधीही त्रास दिला न्हवता पण कधीकधी वैयक्तिकपेक्षा सार्वजनिक पातळीवर काय होणार ह्याचा अंदाज घ्यावा लागतो मी गणेशजींना अनफ्रेंड केलं होतं त्यावेळी मला फोनवरून शहाणपण सांगणाऱ्यांनी जेव्हा त्यांची पाळी आली तेव्हा मग रुख बदलला
तिसरी गोष्ट मी अत्यंत त्रयस्थ राहून वैचारिक लेखन करतो कुणाची बाजू घेण्यासाठी वैचारिक लेखन करणे हे संन्यासी परंपरेला शोभत नाही असे माझे मत आहे भाजपचे सर्व वाईट किंवा सर्वच चांगले कम्युनिस्टांचे सोशॅलिस्टांचे सर्व वाईट किंवा सर्वच चांगले काँग्रेसचे सर्व वाईट किंवा सर्वच चांगले टिळकांचे सर्व वाईट किंवा सर्वच चांगले गांधींचे सर्व वाईट किंवा सर्वच चांगले असा विचार करणे मला जमत नाही प्रत्येक गोष्टीतील व व्यक्तीतील चांगल्याची पाठराखण , वाईटाची कानउघडणी व अध्यात्मिकतेची प्रशंसा ही माझी विचारशैली आहे आजच्या बाजू घेऊन बोलण्याच्या प्रबोधनकारी राजकीय सवयीत व धर्मवापसीच्या पोस्टमॉडर्न काळात ती आऊटडेटेड आहे पण केवळ एखादी गोष्ट आऊटडेटेड आहे म्हणून ती टाकणे योग्य न्हवे मला ती योग्य आहे असे वाटत असेल तर त्या गोष्टीच्या त्या शैलीच्या बाजूने उभे राहणे मला गरजेचे वाटते माझ्या दृष्टीने चौथ्या नवतेत सर्वबाजूवादच सर्वात महत्वाचा आहे कदाचित सर्वबाजूवादी असल्यानेही माझे ट्रोलिंग होत नसावे मला सर्वच माणसे चांगलीच दिसतात हा माझा स्वभावदोष आहे आणि माझे मित्र मला ह्याबाबत कायमच सावध करत असतात पण स्वभाव बदलणार कसा ?
ट्रोलिंगमुळे दंतकथांचा जोरदार प्रचार होतो व विज्ञानाची हत्या होते त्यामुळे माझा ट्रोलिंगला विरोध आहे पण हा विरोध फक्त भाजपच्या ट्रोलिंगला नाही तर सर्वच प्रकारच्या ट्रोलिंगला आहे भारतात अन्वेक्षकीय धारेत खंडनमंडन पद्धत बसते ट्रोलिंग बसत नाही ट्रोलिंग करणारे लोक भारतीय अन्वेक्षकीय परंपरेचा अपमान करतायत जर भारतीय असाल तर ट्रोलिंगचा त्याग कराल
श्रीधर तिळवे नाईक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा