फ्रांस , मुस्लिम आणि सेक्युलॅरिझम श्रीधर तिळवे नाईक
कार्टून हे मध्ययुगीन हॅपनिंग असले तरी त्याला मुख्य भरभराट लाभली ती औद्योगिक आधुनिक काळात जेव्हा पारंपरिक छपाईकडून आधुनिक छपाईकडे माणसाची वाटचाल झाली १८५० नंतर कार्टून्स वाढत गेली व प्रत्येक मासिक व वर्तमानपत्राची शान झाली नेमका ह्याचवेळी सेक्युलॅरिझम आला आणि अधूनमधून कार्टुनिस्टांनी कोपरखळ्या मारायला सुरुवात केली ह्या काळात निर्देववाद अथेइझम एक आयडियालॉजी म्हणून समाजवादामुळे मार्क्सवादामुळे सेटल झाला साहजिकच नास्तिक कार्टुनिस्टांनी धर्माची टीका व टवाळी करण्यासाठी कार्टून वापरायला सुरवात केली
१८५० ते १९२० ह्या काळात
१ बहुदेववाद
२ एकदेववाद
३ निर्देववाद
ह्यांच्यात एक तुंबळ वैचारिक वाद सुरु झाला कारण धर्मप्रसारासाठी ख्रिश्चन पाद्रयांनी बहुदेववादावर घणाघाती टीका करायला सुरवात केली एकमेकाला समजून घेण्याऐवजी एकमेकांशी भांडणे धर्मप्रसारासाठी आवश्यक असल्याने ख्रिश्चन व मुस्लिम ह्या ज्युडायिक धर्मानी भारतीय बहुदेववाद काय आहे किंवा मोक्ष ही संकल्पना काय आहे किंवा धर्म आणि धम्म ह्यांच्यात काय फरक आहे हे समजून घेण्याऐवजी स्वतःच्या डोक्यातला धर्मच अंतिम म्हणायला सुरवात केली
प्रत्यक्षात जगात सुरवातीला प्रत्येक टोळीच्या श्रद्धा होत्या इस्राएलमध्ये ज्यूंची टोळी मातब्बर निघाली व तिने मोझेसच्या नेतृत्वाखाली तीची महाश्रद्धा संघटित केली आणि पहिला ज्युडायिक धर्म जन्मला धर्म ही संघटित महाश्रद्धा असते तिच्या केंद्रस्थानी धर्मग्रंथ असतात जसे वैदिक धर्माच्या केंद्रस्थानी वेद ब्राम्हणधर्माच्या केंद्रस्थानी वेद स्मृती आहेत ज्यूच्या केंद्रस्थानी ओल्ड टेस्टामेन्ट ख्रिश्चनच्या केंद्रस्थानी न्यू टेस्टामेन्ट आणि इस्लामच्या केंद्रस्थानी कुराण आहे आणि त्यांच्या केंद्रस्थानी एक देव आहे जो बोलतो आणि जो सगुण आहे तो सर्वत्र सर्वव्यापी आहे. भारतीय परंपरेत असे बोलणारे सगुण सर्वव्यापी एकदेव पाच १ शिव २ शक्ती ३ विष्णू ४ गणपती ५ कार्तिकेय
हा एकदेव ज्याच्याशी बोलतो संप्रेषण करतो तो प्रेषित ज्युडायिक धर्मात ह्या अर्थाने १ ऍडम २ अब्राहम ३ मोझेस ४ जिझस ५ मोहम्मद हे प्रेषित आहेत हा नियम जर भारतीय आर्य धर्मांना लावला तर वैदिक धर्माचे १ अंगिरस पारशी धर्माचे २ झरथ्रूष्ट ब्राम्हण धर्माचे ३ मनू वैष्णव धर्माचे ४ व्यास व हिंदू धर्माचे ५ आद्य शंकराचार्य प्रेषित ठरतील प्रेषितांना मोक्ष मिळाला नाही तरी चालतो
ह्याशिवाय दुसरी संकल्पना आहे सेंट , फकीर व संत भारतीय कितीही मोक्षाची टिमकी वाजवत असले तरी त्यांना संताने मोक्ष मिळवला कि नाही ह्यापेक्षा त्याने चमत्कार केले कि नाही हेच महत्वाचे वाटते त्यामुळेच साईबाबा हा सर्वाधिक चमत्कार करणारा संत आज सर्वाधिक लोकप्रिय आहे
ह्याशिवाय भारतीय धर्मात आणखी एक संकल्पना आहे ती अवतारांची जी ज्युडायिक धर्मात नाही ती आहे अवतार !ह्यातील विष्णूचे १ राम २ कृष्ण हे दोन अवतार सर्वाधिक लोकप्रिय आहेत अवतार काल्पनिक असतात किंवा होऊन गेलेल्या वीरपुरुषांचे वा वीरस्त्रीयांचे देव म्हणून झालेले ते उन्नयन असते पण त्यांच्यावर श्रद्धा असते
एकोणीसाव्या व विसाव्या शतकात ह्याची वैज्ञानिक दृष्टिकोनातून छानणी सुरु झाली आणि अनेक धार्मिक श्रद्धांची तर उडवली जाऊ लागली आणि अनेक कार्टूनिस्ट ह्यात भाग घेऊ लागले उत्तराधुनिक काळात तर जिझस व पाद्री ह्यांच्याविषयी इतके जोक्स बोकाळले कि बस्स ! भारतातही ही लाट पुढे पोहचली ह्यातील सर्वाधिक तर ही आम्हा शैव श्रद्धांचीच होती विशेषतः गणपती हा कार्टुनिस्ट लोकांचा आवडता देव होता आम्हाला कधीही ह्याविरोधात तक्रार करावीशी वाटली नाही पण गंभीर सश्रद्ध लोकांची त्यामुळे चांगलीच पंचाईत झाली ह्याच काळात तीन पुस्तके गाजली
१ व्हाय आय एम नॉट अ ख्रिश्चन हे बर्ट्रांड रसेलचे
२ व्हाय आय एम नॉट अ मुस्लिम हे एका पाकिस्तानी कम्युनिस्टांचं
३ व्हाय आय एम नॉट अ हिंदू हे कांचन इलय्याचं
अलीकडच्या काळात रिचर्ड डॉकिन्सचं गॉड डिल्युजन
ह्या निर्देववादी पुस्तकांनी ज्यांची जडणघडण झाली आहे त्यापैकी काही निर्देववादी कार्टुनिस्टांनि महंमद पैगम्बराची कार्टून्स काढली मला व्यक्तिशः हे आवडत नसले तरी फ्रेंच संविधान असे कार्टून काढण्याची अनुमती देते अशावेळी फ्रान्सचा निषेध करायचा कशासाठी ? त्यांचे संविधान आहे आणि त्या संविधानानुसार वागण्याचा त्यांना पूर्ण हक्क आहे भारतात मी कसं वागायचं हे भारतीय संविधान मला सांगेल उद्या एखादा फ्रेंच माणूस मला हे सांगायला लागला तर मी त्याला नम्रपणे हेच सांगेन कि माझे संविधान मला हे करण्याची अनुमती देते आणि मी हे संविधानाच्या चौकटीत राहून करतोय
१९२० नंतर भारताला गांधींच्या रूपाने नववैष्णववादी सेंट व नेहरूंच्या रूपाने नास्तिक परंपरेतला पंतप्रधान लाभला ह्या कॉम्बिनेशनमधून अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करणारा धेडगुजरा सेक्युलॅरिझम निर्माण झाला
हा धेडगुजरा सेक्युलॅरिझम निर्माण होत असतानाच ह्या सगळ्याला पहिला धत्तुरा लावला तो एडॉल्फ हिटलरने त्याने प्रोटेस्टंट धर्माचा प्रेषित मार्टिन ल्युथर ह्याचा ज्यूविरोधी अजेंडा इतक्या टोकाला जाऊन राबवला कि प्रबोधनाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या ह्या नवीन धर्माबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि मिशेल फुको ने पुन्हा प्रश्न निर्माण केला व्हॉट इज एन्लायटन्मेंट ? प्रबोधन म्हणजे काय ? उत्तराधुनिकतेच्या केंद्रस्थानी अनेक गोष्टी होत्या त्यातील धर्म , परंपरा व संस्कृती ह्या तीन महत्वाच्या होत्या कारण दुसरे महायुद्ध त्यातून निर्माण झाले होते इकडे पूर्वेला भारतात जिनाने असाच हैदोस घातला भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तान हे धर्माच्या आधारे पहिले नवीन राष्ट्र निर्माण झाले धर्मराष्ट्राची सुरवात भारतीय मुसलमानांनी केली ही परखड वस्तुस्थिती जी अद्यापही अनेक पुरोगाम्यांना पेलत नाही पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेऊन इस्राएलचे धर्माच्या आधारे राष्ट्र निर्माण झाले ही दोन्ही धर्मराष्ट्रे ज्युडायिक धर्मियांनी निर्माण केली हे लक्ष्यात घेण्याजोगे आहे ह्यांनंतर एकेक मुस्लिमबहुल देश हळूहळू धर्मराष्ट्र बनत गेला ज्यातील खोमेनींचे धर्मराष्ट्र सर्वाधिक गाजले कारण हे धर्मराष्ट्र इतर राष्ट्राच्या संविधानाचा आदर न करता फतवे काढत होते आणि फ्रान्समधल्या आजच्या संघर्षाचे मूळ ह्या खोमेनीवादी मुस्लिम मानसिकतेत आहे जिचे उगमस्थान जीनांची डायरेक्ट ऍक्शन थेरी आहे जीनांच्या डायरेक्ट ऍक्शन थेरीचा उत्तराधुनिक विकास म्हणजे हा उत्तराधुनिक टेररिझम खोमेनीवाद दुसऱ्या कुठल्याही राष्ट्राच्या संविधानापेक्षा शरियत सर्वोच्च मानतो साहजिकच तुम्ही कुठल्याही राष्ट्राचे नागरिक असा आणि कुठल्याही राष्ट्रात रहात असा आम्ही शरीयतनुसार तुमच्यावर कारवाई करू शकतो तो हक्क आम्हाला आमचे शरियत देते असा हा खोमेनीवादी पॅन इस्लामिक अजेंडा आहे ज्याला महात्मा गांधींनी खिलाफत चळवळीत पाठिंबा देऊन फार मोठी चूक केली होती ह्या पॅन इस्लामिक अजेंडाला खोमेनीवाद्यांना साहजिकच दुसऱ्या राष्ट्रातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कायद्याची काहीही पडलेली नाही
ह्या पॅनइस्लामिकला उत्तर देण्याचा प्रयत्न कम्युनिझमने केला रशियाने अफगाणिस्तानवर आक्रमण केले पण मूर्ख अमेरिकन भांडवलशाहीनं इस्लामच्या बाजूने उडी घेऊन सत्यानाश केला अफगाणिस्तानात कम्युनिझम येतो तर जगाच्या मॅपिंगमध्ये बराच फरक पडला असता अमेरिकन भांडवलदारांना पॅनइस्लामिझमपेक्षा कम्युनिझम अधिक डेंजरस वाटत असल्याने हा मूर्खपणा घडला आहे अफगाणिस्तानातल्या रशियन माघारीने पॅन इस्लामिक चळवळ अधिकच फोफावली कारण आत्मविश्वास वाढला वास्तविक हा विजय अमेरिकेचा होता इस्लामचा न्हवता पण तो जणू इस्लामचा विजय असल्याच्या थाटात सेलिब्रेट केला गेला आणि अफगाणिस्तानात तालिबान राजवट सेटल झाली आणि इस्लामिक धर्मराष्ट्र निर्माण झाले
ह्याची प्रतिक्रिया जगभर उमटणे अटळ आहे व होते ह्या युद्धातील सर्वात मोठा विरोधाभासी परिणाम पाश्चात्य डाव्यांच्यावर झाला त्यांना इस्लामिक राष्ट्रनिर्माण हे साम्राज्यशाहीच्या विरोधातील बंड आहे असे वाटू लागले आणि त्यांनी ह्या इस्लामिक राष्ट्रनिर्माणाला पाठिंबा द्यायला लागले ह्या उलट भारतात मुस्लिम धर्मराष्ट्राला उत्तर म्हणून हिंदू धर्मराष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु झाला त्याची प्राथमिक मांडणी आर्य समाज मग लोकमान्य टिळक मग सावरकर ह्यांनी फार पूर्वीच केली होते आणि तिला हिंदुत्ववादी म्हंटले जाऊ लागले होते ह्या इस्लामिक स्टेंटमुळे त्याचे पुनर्जीवन झाले आणि अलीकडे तर ह्या हिंदुत्वाला प्रचंड यश मिळाले आहे प्रश्न असा आहे कि भारताच्या पाऊलावर पाऊल ठेऊन ख्रिश्चन सेक्युलर राष्ट्रात सेक्युलॅरिझम जाऊन ख्रिस्चन राष्ट्राची संकल्पना मूळ धरणार का ? मुस्लिमांना ह्यातला धोका कळत नाही कारण एकदा का हिंदू वा ख्रिश्चन राष्ट्रे निर्माण झाली कि ह्या देशातील मुस्लिमांचे नागरिकत्व दुय्यम बनणे अटळ ! मस्ती जोपर्यंत दुसरा सहन करतो तोपर्यंत वर्क आऊट होते इस्लामबाबतचा जगाचा पेशन्स आता समाप्त होत चालला आहे किंबहुना काही ख्रिश्चन आता ह्या सगळ्या गोष्टींच्याकडे दुसरे क्रुसेड म्हणून पाहायला लागलेत आणि विश्वशांतीसाठी हे चांगले नाही युद्धांनी आजतागायत कधीही मानवजातीचे भले केलेले नाही
दुर्देवाने भारतीय मुस्लिमांना ह्यातील गुंतागुंत कळत नाहीये आपण फ्रान्सविरोधी मोर्चे काढले कि इस्लामची सेवा होते असा एक फार मोठा गैरसमज ह्या लोकांचा झाला आहे फ्रांस राष्ट्राचे संविधान विरुद्ध मुस्लिम धर्माचे शरियत असा हा उघड उघड सामना आहे फ्रेंच संविधान अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य देते आणि तुम्ही निषेधही ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळेच करू शकता तुम्ही जेव्हा मोर्चे काढता तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून अभिव्यक्तीस्वातंत्र्याविरूद्ध काढलेला मोर्चा असे त्याचे स्वरूप असते फ्रेंच मुस्लिमांना फ्रेंच अध्यक्षांच्याविरुद्ध मोर्चा काढण्याचा अधिकार फ्रेंच संविधानाने दिला आहे तुम्ही फ्रेंच मुस्लिमांना ह्यासाठी मदत करू शकता पण फ्रेंच संविधानाविरुद्ध जाऊन तुम्ही हत्या किंवा बॉम्बस्फोट घडवाल तर ते चालणार नाही तुम्हाला राष्ट्राचेही फायदे हवेत संविधानाचेही फायदे हवेत आणि धर्माचेही आणि शरियतचेही फायदे हवेत हे चालणार नाही जर तुम्हाला शरियत निवडायचे असेल तर तुम्हांला ज्या देशात शरियत हेच संविधान आहे अशा देशाची निवड करावी लागेल भारतीय मुस्लिम हे करणार नाहीत मग निवड काय उरते तर जिथे शरियत संविधान नाही अशा देशाची निवड ! तुम्ही भारत निवडता तेव्हा ह्या देशाचे संविधान निवडता आणि जेव्हा संविधान निवडता तेव्हा धर्म घरात ठेऊनच तुम्हाला जगावे लागेल आणि धर्मनिरपेक्षता हीच तत्वज्ञान म्हणून निवडावी लागेल भारतीय मुस्लिम हे जितक्या लवकर समजूत घेतील तितके त्यांच्यासाठी बरे ! तरीही अंधारातच खितपत पडायचे असेल तर तीही अनुमती आहेच !
श्रीधर तिळवे नाईक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा