हिंदुत्व आणि  उद्धव ठाकरे श्रीधर तिळवे नाईक 

दसऱ्याला दरवर्षी ठाकरे कुटुंबीय काय बोलते ह्याकडे लक्ष्य असते ह्यावर्षी काँग्रेसच्या युतीत असणारे ठाकरे काय बोलतात हा उत्सुकतेचा विषय होता राजकारणात विचार महत्वाचा कि संघटना महत्वाची हा एक पुरातन प्रश्न आहे आणि सत्ता नावाची मदनिका आली कि संघटना सिड्यूस होते आणि विचार अलंकारासारखे फेकले जातात आणि रतिउत्सव सुरु होतो हा अनुभव आहे त्यामुळेच राजकारणात शेवटी एखादी व्यक्ती प्रज्ञावंत किती आहे ह्यापेक्षा संघटना किती लोकांची आणि कशा लोकांची जमवते हेच महत्वाचे ठरते हे असे होणे वाईट आहे हे तर उघडच आहे पण असे होते ही वस्तुस्थिती ! बाळासाहेब ठाकरेंचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी राजकीय सत्तेऐवजी संघटनात्मक शक्तीच्या आधारे राजकारण केले कारण राजकीय सत्ता त्यांना कधी सिड्यूस करू शकली नाही गेली काही वर्षे महाराष्ट्रात स्वतःच्या ताकदीवर उभे असलेले दोनच नेते उरले होते शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे त्यातील बाळासाहेब गेले तरी शरद पवारांनी आपली शक्ती उद्धव ठाकरेंच्या मागे उभी केली 

उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवर व शरद पवारांच्यावर चर्चा केली नाही कारण त्यांना हा मेळावा स्ट्रीक्ट्ली शिवसेनेचा ठेवायचा होता जे स्वाभाविक आहे राजकारणात उपकार अल्पायु असतो पुढे दीर्घायु व्यवहार पुढे येतो तसा तो पुढे आल्याचेही हे लक्षण आहे 

मी काही वर्षांपूर्वी हिंदुत्वावर जी भाषणे इथे टाकली होती त्यात हिंदुत्वाचे चार चेहरे आहेत असं म्हंटल होतं आर्य समाजापासून सुरु झालेलं वैदिक हिंदुत्व ज्यात सावरकर येतात ब्राम्हणी हिंदुत्व ज्यात हेमाद्रीपासून लोकमान्य टिळकांच्यापर्यंत सर्व येतात वैष्णव हिंदुत्व ज्यात मुखर्जींचे हिंदुत्व येते व शाक्त  हिंदुत्व जे प्रबोधनकार ठाकरेंचे आहे  ज्याला फुल्यांच्या ब्राम्हणेतरवादाचा व  सत्यशोधक समाजाचा वारसा आहे खुद्द ठाकरे घराणे शाक्त आहे उद्धव ठाकरे हळूहळू आपल्या आजोबांच्या शाक्त हिंदुत्वाकडे वळायला लागलेत त्याच्या खुणा ह्या भाषणात होत्या प्रबोधनकारांच्या शाक्त हिंदुत्वाने भटगिरीला स्पष्ट व ठाम भाषेत नकार दिला आहे त्याचाच अनुवाद कोव्हिडच्या परिभाषेत उद्धव ठाकरेंनी केला व मोदींच्या कर्मकांडाची धज्जी उडवली "ह्यांना लसीऐवजी घंटा द्या" हे तर खास प्रबोधनकारी ठाकरे स्टाईल वाक्य होते प्रबोधनकार ठाकरे मंदिर ही भारतीयांची निर्मितीच न्हवे असं म्हणत त्यामुळे त्यांचे हिंदुत्व हे कधीच कर्मकांडी हिंदुत्व न्हवते उद्धव ठाकरेंनी त्याचा पुनरुच्चार केला खुद्द सावरकरांचे हिंदुत्वही कर्मकांडी हिंदुत्व न्हवे सांस्कृतिक राष्ट्रवाद हा सावरकरी आणि ठाकरी हिंदुत्ववादाचा पाया आहे साहजिकच ठाकरेंनी सावरकरांना नमन केले 

ह्या भाषणातील सर्वात महत्वाचा मुद्दा हा माझ्या मते जी एस टी चा आहे हा कायदा रद्द करावा ही ठाकरे ह्यांची मागणी योग्यच आहे आणि माझा तिला पाठिंबा आहे ह्या पद्धतीत केंद्रीय सत्तेच्या हातात आर्थिक सत्ता एकवटते आणि मग विरोधी पक्षाचे सरकार राज्यात असेल तर अर्थकारण राजकीय फायद्यासाठी वापरले जाऊ शकते महाराष्ट्र सरकारचे पैसे न देणे हे फेअर पॉलिटिक्स न्हवे प्रत्येक चांगल्या गोष्टीची भारतीय राजकारणी व जनता मातीच करते जी एस टी ची अशीच माती झालेली आहे हा कायदा औरंगजेबी मानसिकतेला मनमानी करू देणारा ठरत असेल तर तो रद्द करावा हेच उत्तम खरेतर राष्ट्रीय एकात्मतेसाठी हा एक छान कायदा होता पण काही कायद्यांची अंमलबजावणीत माती होते तसे ह्याचे झाले आहे असे ठाकरे ह्यांच्या भाषणावरून वाटले पैसेच येणार नसतील तर राज्ये चालणार कशी खरेतर भविष्यात भाजपवरही ही पाळी येऊ शकते आणि काँग्रेस फार फेअर राजकारण करते असा अनुभव नाही 

थोडक्यात काय हे भाषण महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होते हिंदुत्वाच्या न्हवे दोन्ही काँग्रेसनी त्यामुळे हुरळून जाऊ नये आणि ते हिंदुत्वाच्याच (भले मग ते प्रबोधनकारांचे शाक्त हिंदुत्व असेल) युतीत आहेत ह्याचे भान बाळगावे 

श्रीधर तिळवे नाईक 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट