ज्ञानाच्या क्षेत्रात आता तीन प्रकारच्या धाडसाची गरज आहे करेजीसची गरज आहे
पहिले ज्या ज्ञानक्षेत्राविषयी आपल्याला ज्ञान नाही त्याविषयी आपल्याला ज्ञान नाही हे कबुल करण्याचे धाडस प्रथम स्वतःशी व नंतर लोकांच्यात
दुसरे ज्या क्षेत्रात आपण तज्ञ आहोत त्याविषयी स्पष्टपणे आपण तज्ञ आहोत अशी कबुली देण्याचे धाडस
तिसरे ज्या क्षेत्रात आपण तज्ञ आहोत त्या क्षेत्रात इतर कुणी तज्ञ नसेल आणि तो स्वतःला तज्ञ समजत असेल तर त्याला तू तज्ञ नाहीयेस असं ठणकावून सांगण्याचे धाडस
===============================================================
धर्म रोमँटिसिझम व अस्तित्ववाद
इझम ही संकल्पना धर्मांना चॅलेंज करायला जन्मली तेव्हा धर्म आधीच प्रस्थापित होते धर्माचा विश्वास आत्म्यावर होता आणि आहे त्यामुळेच तर हा आत्मा अमर असल्याने त्याला स्वर्ग आणि नरक प्राप्त होतो अस्तित्व स्वर्गात वा नरकात जात नाही आत्मा जातो अस्तित्व इथेच स्वर्ग वा नरक निर्माण करते रोमँटिसिझम आधी आला व्यक्तिगततेला वाव देण्यासाठी विज्ञानाच्या ऑब्जेक्टिव्ह ज्ञानापेक्षा सब्जेक्टिव्ह फीलिन्गला त्यांनी महत्व दिले अस्तित्ववाद हाही व्यक्तिगततेला वाव देतो पण त्याच्या समस्या ह्या तंत्रज्ञानप्रधान औद्योगिक समाजाच्या आहेत रोमँटिसिझमच्या समस्या वैज्ञानिक समाजातल्या होत्या त्यावेळी तंत्रज्ञान प्रचंड न्हवते आजही रोमँटिसिझमच्या प्रभावाखाली फीलींगच्या कविता लिहिणारे लोक ९० टक्के आहेत त्यांची संवेदनशीलता औद्योगिक झाली नसल्याने हे घडते विशेषतः जिथं औद्योगिकीकरण पोहचलेले नाही अशा प्रामुख्याने ग्रामीण भागात भारतात रोमँटिक भारत अस्तित्वात आहे आणि अस्तित्ववादी औद्योगिक भारतही आपण कुठे आहोत हे ज्याने त्याने ओळखावे
श्रीधर तिळवे नाईक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा