आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १४६ TO
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १४६ गीतारहस्य ६ विषयप्रवेश
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १४६ कर्म
व गीतारहस्य ६ विषयप्रवेश
कर्माची अपरिहार्यता
सर्वच जाणतात कर्मविषयी
विचार करणे हेही
कर्मच फक्त ते
अंत:करणात (स्मृती
, मन , बुद्धी , अहम
, मस्तिष्क ह्या
पंचकरणांनी बनलेल्या ) घडते
इतकेच !
कर्माची ठेवणं
प्रक्रियात्मक असते
किंवा प्रतिक्रियात्मक असते
? कर्म अटळच असते
कि टळ असते
? ते स्वेच्छेने होते
कि अनिच्छेने ? हेतुगर्भ
असते कि हेतूमुक्त
असू शकते ? ते
असे मुद्दाम असते
कि स्वाभाविक असते
?
अंतःकरण बहुफोकल
असते आणि अंतःकरणाची
जाणीवही ! म्हणजे
मी जेव्हा काही
लिहीत असतो तेव्हा
माझी जाणीव लेखन
असते पण लेखन
करताना मला
जर कुणी विचारले
काय चाललंय तर
मी म्हणतो लेखन
चाललंय म्हणजेच
लेखन हा एक
फोकस आणि मी
लेखन करतोय हा
दुसरा फोकस आणि
समोरचा जेव्हा
विचारतो तेव्हा
त्याच्या प्रश्नाचे
उत्तर मी द्यायचे
कि नाही ह्याचा
विचार व सारासारनिर्णय हा तिसरा
फोकस असे आपले
बहुफोकल कर्म
चाललेले असते
कर्म घडत
असताना ते
स्वतःलाही घडवतही
असते कारण बुद्धी
कर्माला कारणही
पुरवत असते आणि
कर्म त्यामुळे सकारण
असते अकारण कर्म
बुद्धीच्या शून्य
सहभागावर अवलंबून
असते एरव्ही बुद्धी
शून्य सहभागाला तयार
नसते साहजिकच हे
कर्म कारण फळाची
अपेक्षा करते
आणि प्रत्येक कर्म
१ सुफलित
२ विफलित
३ कुफलित
४ निष्फलीत
५ अपफलित
अशा पाचपैकी
किमान एका दिशेने
फलित होत असते
आणि ह्यातूनच
१ सुफ़लता
२ विफलता ३
कुफलता ४
निष्फलता ५
अपफलता निर्माण
होत असते
स्मृती मन
बुद्धी अहम
ह्या गोष्टी
१ गुप्त
२ निद्रिस्त
३ सुप्त
४ प्रकट
५ जागृत
६ उन्नत
आणि
७ मुक्त
अशा सातपैकी
किमान एका स्थितीत
साक्षात होत
असतात आपल्याला स्वतःला
साक्षात दिसतात
ते त्यांचे साक्षात्कार
तर इतरांना दिसतात
ते आकार बुद्धी
कारण पुरवते तर
मन भूकतृष्णानिकडयुक्त आसक्ती अहम
पुरवतो आकांक्षा
! बुद्धीला फायदा
आणि मूल्यता तपासूनच
कारण तयार करावे
लागते कारण हेतू
प्राप्त झाल्याशिवाय
कर्म कामाला लागत
नाही प्रवाहित प्रक्रियत
नाही एखाद्या गोष्टीची
आपणाला भूक
आहे कि नाही
तिच्याविषयी आपल्याला
तृष्णा आहे
कि नाही आणि
त्या गोष्टीची आपल्या
शरीराला वा
मनाला आता ह्या
क्षणी निकड वाटते
कि नाही ह्याचा
ड्राइव्ह आवेग
तपासत मन कर्मात
आपला सहभाग नोंदवत
असते अंतिम निर्णय
अंतःकरणाचा असतो
आणि अंतःकरण ह्या
सगळ्यांचे नेटवर्क
असते मज्जासंस्था ज्यात
मेंदूही येतो
हे अंतःकरणाचे शरीर
असते आणि अंतःकरण
ही ह्या शरीराची
उंनिर्मिती असते
ज्ञान शक्य
आहे हे माणसाला
बालपणातच कधीतरी
कळलेलं असतं
मात्र ज्ञान खरं
कि खोटं हे
ठरवण्याची क्षमता
त्याला प्राप्त
होईलच असं नाही
ज्ञान खरं खोटं
ठरवण्याच्या पद्धती
त्याच्याजवळ अपसुख
किती अन संस्कृतीने
दिलेल्या किती
ह्याचे एक
स्पष्ट चित्र
हळहळू त्याच्या अंतकरणात
तयार होत जाते
संस्कृती कुठले
कर्म चांगले कुठले
कर्म वाईट ह्याच्या
धारणा त्याला पुरवते
ह्या धारणा तपासून
घेणे हे त्याच्या
अखत्यारीत असेलच
असे नाही अनेकदा
संस्कृतीने पुरवलेली
सत्ये तो आंधळेपणाने
स्वीकारतो श्रद्धा
आणि अंधश्रद्धा ह्यांचे
दोन प्रकार असतात
१ वैयक्तिक
अंधश्रद्धा
२ सामूहिक
कलेक्टिव्ह अंधश्रद्धा
ह्यातील सामूहिक
अंधश्रद्धा तर्कशास्त्रावर भारी पडायला
लागल्या कि
व्यक्तीची कर्मे
निष्फळतेकडे किंवा
कुफळतेकडे सरकायला
लागतात वर्ण
जात धर्म ह्या
सामूहिक अंधश्रद्धा
आहेत ज्या माणसाची
कर्मे नियंत्रित करू
पाहतात ह्या
अंधश्रद्धा कर्माची
हेतूशिलता व
कारणशीलता पूर्णपणे
आपल्या ताब्यात
घेतात आणि व्यक्ती
त्या अंधश्रद्धेला अपेक्षित
असलेली कर्मे
करायला लागते
जेव्हा
तुम्ही गुलाम
असता पारतंत्र्यात असता
तेव्हा तुमची
कर्मे तुमचे मालक
नियंत्रित करत
असतात साहजिकच कर्माच्या
फळाची अपेक्षा नेमकी
कशी निश्चित करायची
हा मूलभूत प्रश्न
असतो मालकांच्या अहंकारात
मुद्दामता आणि
उद्दामता दोन्ही
असू शकतात
फळाची अपेक्षा
न करता कर्म
कर हा मालकशाहीचा
सिद्धांतच असतो
कारण त्याशिवाय दास
अपेक्षित वेतन
न मागता काम
कसे करणार ? जगातले
सर्व शोषक गुलामांच्या
कर्मावर आणि
कर्माच्या फळावर
आपला अधिकार आपली
सत्ता गाजवतात आणि
मेंटेन करतात
भारतीय मालक
ह्याला अपवाद
नाहीत पुण्ययोनीतील ब्राम्हण
आणि क्षत्रिय हे
दोघेही मालक
हा सत्तेचा उद्योग
आखत असतात आणि
त्यांच्या आखणीला
धर्म म्हणतात भारतात
ह्या आखणीचे तीन
सम्राट आहेत
स्मृतिग्रस्त ब्राम्हण
झुंड , कर्माच्या फळाची
अपेक्षा न
करता कर्म करायला
सांगणाऱ्या राम
कृष्ण ह्यांना आदर्श
मानून राम व
कृष्णग्रस्त झालेले
क्षत्रिय आणि
ह्या दोघांना मालक
मानून त्यांच्या चरणी
शीर अर्पण करणारे
पापयोनीज व
अयोनिज वैश्य
शूद्र अतिशूद्र आणि
आदिवासी ह्या
सगळ्यांना गीतारहस्य
आवडणे अटळ आहे
युद्धात अर्जुनाने
मारायचे किंवा
मरायचे आणि
राज्य कुणी करायचे
तर युधिष्ठराने आणि
युधिष्ठराने कुणाचे
ऐकायचे तर
श्रीकृष्णाचे म्हणजे
शेवटी राज्य कुणाचे
तर श्रीकृष्णाचे म्हणजे
अर्जुन अंतिमतः
लढणार मारणार मरणार
तो श्रीकृष्णासाठी आणि
हे त्याने डोके
न वापरता करावे
म्हणून त्याला
तत्वज्ञान कोण
सांगणार तर
स्वतः श्रीकृष्णच ह्याला
म्हणतात गेम
करणे आणि ह्यामध्ये
अर्जुनाला आणि
भीमाला आपली
तरुण मुलं गमवावी
लागली आहेत आणि
हे सर्व त्या
धर्मासाठी आहे
जो वर्णव्यवस्था पाळतो
श्रीधर तिळवे
नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १४६ गीतारहस्य ६ विषयप्रवेश
वास्तविक हिंदुत्ववादाची पायाभरणी करण्यात आर्य समाजाच्या लाला ह्यांचा वाटा सिंहाचा होता
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १४६ गीतारहस्य ६ विषयप्रवेश
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १४७ कर्म
व गीतारहस्य ७ विषयप्रवेश
मानवी आयुष्यात
कर्माचा निर्णय
एकदा झाला
कि कर्माच्या
दिशेने पाऊल
पडते कर्मनिर्णय हा केवळ
आरंभ असतो
आणि हा कर्मनिर्णय जर का एखादी व्यवस्था
नियंत्रित करायला
लागली कि मानवी स्वातंत्र्याला जागाच
शिल्लक रहात
नाही जन्मदत्त
वर्णजातिव्यवस्थेत कर्मनिर्णयाचा अधिकारच हिसकावून
घेतला जातो
आणि कुणी
कुठले कर्म
करायचे ह्याचा
निर्णय जन्मदत्त
आधीच ठरवला
जातो हे अधिकार स्वतःकडे कोण ठेवतो आणि त्याला
हे अधिकार
कुणी दिले
ह्याची साधी
चौकशी करण्याचे
भानही अनेकदा
अनेकांना नसते
ही आत्मग्लानी असते तथाकथित
फायदेशीर फलदायक
कर्म करण्याचे
अधिकार स्वतःकडे
आणि स्वतःच्या
वंशजांकडे ठेवण्याचे
कारस्थान म्हणजे आप्तवाद व वंशवाद म्हणजे आप्तवंशवाद होय हा आप्तवंशवाद एकदा
का संस्कारात
रक्तखोल भिनला
कि सृजनशील
कर्मांची पैदास
आपोआपच थांबते
कारण सृजनशील
कर्म करण्याची
कसलीही जबाबदारी
आपल्यावर आहे ही जाणीव दुसऱ्या
तिसऱ्या पिढीतच
लोप पावायला
लागते आणि मग कर्माची कलेवरं
पिढ्यानपिढ्या राज्य
करायला लागतात
इतिहासाचे पाणीपुरी
अभिमान चटकदार
भेळ बनायला
लागतात आणि आपल्या पूर्वजांची महती
ही जणू आपली महान अचिव्हमेंट आहे अशा थाटात सांगितली जाते
आपण काय केलं ह्याचे भानही
शिल्लक उरत नाही पूर्वजांच्या कर्तृत्वाचे पोवाडे गाणे
हे कर्मकांड
बनते अनेकदा
वारसा कर्तृत्वशून्य आणि जुनाट
विचारांच्या हेकट
माणसाकडे जातो
आणि एकेकाळी
पळणारे कर्म
बाळ बनून
रांगायला लागते कर्तव्याचा मिल्खासिंगचा फुगेगिरी करणारा फुल्कासिंग होतो कर्तृत्वाची उषा फक्त पी टी करायला लागते पूर्वजांनी कर्तृत्व गाजवले
तुम्ही काय केले असा रोकडा
प्रश्न अशावेळी
विचारावा लागतो
कर्मनिर्णय फायदेशीर असेल तर आत्मवंशवादी आणि नुकसानदायक व शोषण असेल तर इतरवादी ही भूमिका दुट्टपी असते आणि तरीही त्याचे समर्थन परंपरेच्या नावाने केले जाते
टिळक जेव्हा गीतारहस्य निवडतात तेव्हा त्यांचा हा आप्तवंशवाद ऍक्टिव्ह असतो आपण आपले कोणते पूर्वज निवडतो त्यावरून आपल्या आजच्या कर्तृत्वाच्या सीमारेषा निश्चित होतात टिळक श्रीकृष्ण निवडतात तेव्हा ते वैष्णव धारा निवडतात आणि ही वैष्णव धारा हीच हिंदू धारा म्हणून गीता हा वैष्णव ग्रंथ तिच्यावर धर्मग्रंथ म्हणून लादतात अत्यंत हलक्या हाताने घडवून आणलेले हे धर्मांतर असते आणि गीता हे ह्या धर्मांतराचे मुख्य माध्यम असते
टिळकांची ही निवड कलोनियलिझमने ग्रासलेल्या मनाची निवड असते कारण गीता हा हिंदूंचा धर्म ठरवणारा नियम ब्रिटिशांनी निश्चित केलेला असतो ती ह्या देशातल्या बहुजनांची निवड नसते जो ग्रंथ बहुजनांच्या डोक्यावर लादता आला नाही तो ब्रिटिशांच्यामार्फत बहुजनांच्या डोक्यावर मारण्याची ही कृती असते
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १४७ कर्म
व गीतारहस्य ७ विषयप्रवेश
मानवी आयुष्यात
कर्माचा निर्णय
एकदा झाला
कि कर्माच्या
दिशेने पाऊल
पडते कर्मनिर्णय हा केवळ
आरंभ असतो
आणि हा कर्मनिर्णय जर का एखादी व्यवस्था
नियंत्रित करायला
लागली कि मानवी स्वातंत्र्याला जागाच
शिल्लक रहात
नाही जन्मदत्त
वर्णजातिव्यवस्थेत कर्मनिर्णयाचा अधिकारच हिसकावून
घेतला जातो
आणि कुणी
कुठले कर्म
करायचे ह्याचा
निर्णय जन्मदत्त
आधीच ठरवला
जातो हे अधिकार स्वतःकडे कोण ठेवतो आणि त्याला
हे अधिकार
कुणी दिले
ह्याची साधी
चौकशी करण्याचे
भानही अनेकदा
अनेकांना नसते
ही आत्मग्लानी असते तथाकथित
फायदेशीर फलदायक
कर्म करण्याचे
अधिकार स्वतःकडे
आणि स्वतःच्या
वंशजांकडे ठेवण्याचे
कारस्थान म्हणजे आप्तवाद व वंशवाद म्हणजे आप्तवंशवाद होय हा आप्तवंशवाद एकदा
का संस्कारात
रक्तखोल भिनला
कि सृजनशील
कर्मांची पैदास
आपोआपच थांबते
कारण सृजनशील
कर्म करण्याची
कसलीही जबाबदारी
आपल्यावर आहे ही जाणीव दुसऱ्या
तिसऱ्या पिढीतच
लोप पावायला
लागते आणि मग कर्माची कलेवरं
पिढ्यानपिढ्या राज्य
करायला लागतात
इतिहासाचे पाणीपुरी
अभिमान चटकदार
भेळ बनायला
लागतात आणि आपल्या पूर्वजांची महती
ही जणू आपली महान अचिव्हमेंट आहे अशा थाटात सांगितली जाते
आपण काय केलं ह्याचे भानही
शिल्लक उरत नाही पूर्वजांच्या कर्तृत्वाचे पोवाडे गाणे
हे कर्मकांड
बनते अनेकदा
वारसा कर्तृत्वशून्य आणि जुनाट
विचारांच्या हेकट
माणसाकडे जातो
आणि एकेकाळी
पळणारे कर्म
बाळ बनून
रांगायला लागते
मिल्खासिंगचा फुल्कासिंग होतो उषा फक्त पी टी करायला लागते पूर्वजांनी कर्तृत्व गाजवले
तुम्ही काय केले असा रोकडा
प्रश्न अशावेळी
विचारावा लागतो
कर्मनिर्णय फायदेशीर असेल तर आत्मवंशवादी आणि नुकसानदायक व शोषण असेल तर इतरवादी ही भूमिका दुट्टपी असते आणि तरीही त्याचे समर्थन परंपरेच्या नावाने केले जाते
कर्माचे कायदेशीर व बेकायदेशीर असे दोन प्रकार होतात शिवाय नैतिक पातळीवर नैतिक अनैतिक असे दोन प्रकार होतात आणि नैतिकता अनेकदा कायदेशीरच्या विरोधी म्हणून काम करते ह्याशिवाय मोक्षिक आणि अमोक्षिक असे दोन प्रकार होतात
यम १२
अकाल सुकामचर्य अअवकाश अपरिग्रह अचोर्य अहिंसा अव्यसन असंबंध अरंजन अस्तेय अप्रमाद वा सत्य अअहंकार व अनात्म
संयम नैतिक
नियम
विधिनियम
ह्यातील यम हे मोक्षिक असतात संयम नैतिक तर नियम संस्थात्मक आणि विधिनियम वैधिक म्हणजे कायदेशीर असतात दंडनीतीने ह्या चौंघांचेही रक्षण करावयाचे असते
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १४७ कर्मयोग
का ?
भारतात गीता
व्यासांनी लिहिली
कि आद्यशंकराचार्यांनी कि नंतर
आलेल्या कोणी
हा एक वादाचा विषय आहे माझे स्वतःचे मत ती आद्यशंकराचार्यांनी लिहिली
असे आहे महाभारताचा प्रभाव
लक्ष्यात घेऊन
वैष्णव आदी आर्य धर्मांना मान्य होईल असा एक देव तयार
करण्याची प्रक्रिया
पूर्ण होऊन
श्रीकृष्ण हा पूर्णावतार म्हणून
सेटल व्हायला
सुरवात झाली
होती अशावेळी
ह्या पूर्णावताराला एक संपूर्ण
तत्वज्ञान बहाल
करणे ही काळाची गरज होती
शंकराचार्यांनी भगवदगीता
लिहून ही गरज पूर्ण केली
आणि आत्ताची
भगवतगीता जन्मली
मुळात वैष्णवांना महाकाव्ये (महाभारत
रामायण) , भागवत
आणि विष्णुपुराण ही प्रस्थानत्रयी मान्य झाली
होती शन्कराचार्यानी आपल्या धर्मात
ती सामावून
घेतली ह्याशिवाय
वैदिकांची वेद , ब्राम्हणे आरण्यके व स्मृती वेदांताची उपनिषदे
, ब्रम्हसूत्रे आणि गीता आणि शैवांचे
शिव पार्वती
गणपती कार्तिकेय
व सूर्य
हे पंचायतन
ह्यांनाही सामावून
घेतले म्हणजेच
आजचा हिंदू
धर्म हा
१ वेद , ब्राम्हणे आरण्यके व स्मृती ही वैदिक त्रयी
२ उपनिषदे
, ब्रम्हसूत्रे आणि गीता ही वैदान्तिक
त्रयी
३ (महाभारत
रामायण) महाकाव्ये
, भागवत आणि विष्णुपुराण ही वैष्णव त्रयी
४ शिव , पार्वती , गणपती , कार्तिकेय
, सूर्य हे शैव पंचायतन
५ ब्रम्हदेव
सरस्वती विष्णू
लक्ष्मी हे चतुष्टक व इतर स्थान व इष्टदेवता
६ धर्म
अर्थ काम मोक्ष हे पुरुषार्थ
७ ब्रम्हचर्य ,गृहस्थ , वानप्रस्थ
व संन्यास
हे चार आश्रम
८ शंकराचार्य , रामानुजाचार्य , मध्वाचार्य , वल्लभाचार्य आणि निम्बकाचार्य ह्या
आचार्यांचा उपदेश
व कर्मयोग
,ज्ञानयोग , राजयोग
, भक्तीयोग हे मोक्षाचे मार्ग
९ वैष्णव
संत व त्यांचे साहित्य
१० वर्णजातिव्यवस्था
ह्या दहा व्यवस्थांच्या आधारे
चालतो ही एक गुंतागुंतीची व्यवस्था
आहे खरी पण ती अशीच
अस्तित्वात आहे हेही खरे !आर्यांसाठी ती सहज स्वाभाविक आहे आणि ते निरंतर ह्या
व्यवस्थेचा प्रचार
करत असतात
जीवनाच्या प्रत्येक
अंगाला स्पर्श
करण्याचा त्यांचा
प्रयत्न असतो ह्यातील कर्मयोग हा मोक्ष मिळवण्याचा एक मार्ग आहे ही व्यवस्था आद्यशंकराचार्यांनी आधीच्या
सर्व व्यवस्थांना व्यवस्थित प्लेसमेंट
देऊन निर्माण
केली आहे ह्या व्यवस्थेच्या प्रमुखपदी
शंकराचार्य असतात
आणि ते वर्णाने ब्राम्हणच असले
पाहिजे असा ह्या व्यवस्थेत नियम
आहे
शंकराचार्यांनी जैन बौद्ध जैमिनी मीमांसक
सांख्य अशा सर्वांना वादविवादातून हरवून
व वैदिक
, ब्राम्हण , वैष्णव
ह्या तिन्ही
आर्य धर्मांना
एकत्रित करून ही व्यवस्था स्थापित
केली आहे हिंदू हे नाव तिला नंतर मिळाले
आहे शंकराचार्य ह्या व्यवस्थेला वेदांत वा सनातन धर्म म्हणत
पण हा शब्द बाजूला पडून
शेवटी हिंदू
हा शब्दच
रूढ झाला
आहे
शंकराचार्य हे पूर्वेत शैव आचार्याकडून (बहुदा अभिनवगुप्ताकडून ) पराभूत झाल्याने
शैव मात्र
वाचले अर्थात
वैदिकांना हा शन्कराचार्यांचा पराभव
जिव्हारी लागत
असल्याने ते काश्मिरी शैवागम प्रत्याभिज्ञा दर्शनाच्या आचार्याने
काळी जादू
करून शंकराचार्यांना मारले असा प्रचार करत असतात
पराभव सहन न झालेल्या लोकांचा
त्रागा म्हणून
मी त्याकडे
पाहतो असो मुळात हा दोन शैवांच्यातला वाद होता आणि ह्यात
आर्यांच्यात विलीन
व्हायला निघालेला
शैव आर्यांना
नकार देणाऱ्या
शैवांकडून पराभूत
झाला एव्हढंच
टिळकांचा कर्मयोग
हा ह्या
आर्य व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर हिंदू धर्मातून उगम पावतो टिळकांच्या मते शंकराचार्यांचे गीतेवरचे
भाष्य हे गीतेवरचे पहिले भाष्य
होय ते हे भाष्य आद्य
शंकराचार्यांचे भाष्य
म्हणून गृहीत
धरतात माझ्या
मते गीता
शंकराचार्यांनी लिहिली
आणि आद्यशंकराचार्यांनंतर आलेल्या शंकराचार्याने त्यावर भाष्य
केले आणि आपल्या गुरूचा उपदेश
सविस्तर उलगडून
मांडला हे दुसरे शंकराचार्य हे गीता ही ज्ञानयोगाचा उपदेश करते
असे मानतात
आणि कर्मनिवृत्ती घेतल्याशिवाय मोक्ष
शक्य नाही
अशी मांडणी
करतात टिळकांच्या मते पुढील
आचार्य (रामानुजाचार्य वल्लभाचार्य निबंकाचार्य मध्वाचार्य )गीतेचा
मुख्यार्थ भक्तियोग
असल्याचे प्रतिपादन
करतात आणि कर्मनिवृत्ती घेतल्याशिवाय मोक्ष शक्य
नाही असे म्हणतात श्रीधर कवी हाही भक्तियोग मुख्य
मानूनच ह्यांची
री ओढतो
असे टिळक
म्हणतात
मराठीत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली
असून ती शंकराचार्यांना वाट पुसत जात असली
ती स्वतंत्र
असून तिच्यात
मात्र गीतेचा
मुख्य उपदेश
हा श्रीकृष्ण
अर्जुनाला तू योगी हो असे सांगत असल्याने ज्ञानेश्वरी गीता ही राजयोगाधिष्ठित आहे असे प्रतिपादन करत असल्याने इथेही कर्मनिवृत्ती आहेच असे टिळक म्हणतात
साहजिकच संपूर्ण
भारतभर कर्मनिवृत्ती फैलावली आणि जो तो भक्तियोगात तल्लीन झाला
आणि त्यामुळेच
भारत मुस्लिमांच्याकडून पराभूत झाला
ह्या गोष्टीकडे
मात्र टिळक
दुर्लक्ष्य करतात
ह्या कर्मनिवृत्तीला प्रथम शह दिला तो स्वामी
विवेकानंदांनी त्यांनी
चारी योगाची
चर्चा केली
तरी त्यांच्या
भाषणात सतत कर्मयोगाचे आवाहन
केले जात असे साहजिकच स्वामी
विवेकानंदांचा सखोल
परिणाम टिळकांच्यावर पडला विवेकानंद
निवृत्तीऐवजी प्रवृत्तीवर भर देत होते
टिळकांना ह्या
पार्श्वभूमीवर कर्मनिवृत्ती पटणे शक्यच
न्हवते कारण
त्यांना इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्याचा लढा चालवायचा होता आणि कर्मनिवृत्ती स्वीकारून
तो चालवणे
शक्यच न्हवता
साहजिकच आत्तापर्यंतचा हा कर्मनिवृत्तिपर उपदेश त्यांनी
नाकारला आणि गीता ही कर्मयोगाचे प्रतिपादन करते
अशी मांडणी
केली टिळकांची
ही कर्मप्रधान मांडणी ही माझ्या मते भारतातील
पहिली अशी विस्तृत व सांगोपांग
अशी मांडणी
आहे जिने
नंतरच्या अनेक
पिढ्यांना स्फुरण
दिले आहे टिळकांच्या आर्य
परंपरेच्या अभ्यासाची
सखोल जाणीव
तर ती देतेच पण भारतीय
परंपरेचा कर्म
ह्या गोष्टीचा
विचार किती
व्याप्त आहे ह्याचेही सखोल भान ती देतेच सध्याच्या
चिन्हसृष्टीच्या काळात
केवळ चिन्हगिरी
करण्यात रममाण
झालेल्या आणि पुन्हा एकदा प्रत्यक्ष
कर्माकडे तोंड
फिरवून डिजिटल
गुहेत भटकणाऱ्या
पिढीपुढे टिळकांचा
हा कर्मविचार
सादर करणे
हे माझे
कर्तव्य आहे असे मी मानतो
श्रीधर तिळवे
नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १४८ श्रीकृष्ण
कोण ?
गीतेबाबतचा दुसरा
महत्वाचा प्रश्न
आहे गीता
सांगणारा श्रीकृष्ण
व मूळचा
व्यासांचा श्रीकृष्ण
हे एकच आहेत का ह्या
प्रश्नाचे निर्विवाद
उत्तर व्यासांनी
निर्माण केलेला मूळ श्रीकृष्ण हा अथपासून इतिपर्यंत राजकारणी
होता हे आहे हा इन्सान
श्रीकृष्ण आहे पुढे भगवान श्रीकृष्ण
बनला मूळ श्रीकृष्णाने मुत्सद्दीपणाने एक स्वतंत्र
राज्य निर्माण
करून दाखवले
पण हे राज्य निर्माण करतांना
त्यावर स्वतःचा
हक्क सांगितला
नाही हे स्वतंत्र राज्य निर्माण
करण्याचे वेड भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील
नेत्यांना राष्ट्र
निर्माण करण्याच्या त्यांच्या वेड्या
ध्येयाशी मिळतेजुळते वाटले म्हणूनच
श्रीकृष्णाचा महिमा
विसाव्या शतकात
वाढीस लागला
आणि गीता
राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचा मुख्य
प्रेरणा ग्रंथ
बनला पुढे
महात्मा गांधींचा
उल्लेख स्वातंत्र्य चळवळीचा श्रीकृष्ण
म्हणून व्हायला
लागला तोही
गीतेचा प्रभाव
होता
महाभारतातील श्रीकृष्ण
हा वाढत
कसा गेला
? सुरवातीला वासुदेव
पंथ वाढत
गेला ज्याच्याशी श्रीकृष्णाचा काही
संबंधच न्हवता
हा संबंध
जुळवला तो जैन बौद्धांच्याकडून पराभूत
झालेल्या ब्राम्हणधर्मीयांनी !त्यांनी श्रीकृष्णाची स्थापना वासुदेव
म्हणून केली
आणि ह्या
श्रीकृष्ण वासुदेवाला व महाभारताची वाढती लोकप्रियतेला कॅश करण्यासाठी ब्राम्हणधर्माचा उपदेशक
म्हणून वापरायला
सुरवात केली
पुढे श्रीकृष्ण
वासुदेवाची मुख्य
वासुदेव म्हणून
पूजा व्हायला
लागली ब्राम्हणांनी त्याला विष्णूचा
अवतार म्हणून
स्वतःच्या देवसुर
धर्मात सामावून
घेतले आणि तो भगवान श्रीकृष्ण
झाला साधारण
आठव्या नवव्या
शतकात दोन अध्यायाची असलेली गीता
शंकराचार्यांनी विस्तृत
लिहिली आणि मनुष्य असलेले हे काल्पनिक पात्र भगवान
श्रीकृष्ण बनले
एका काल्पनिक
राजकीय पुढाऱ्यांचा हा सांस्कृतिक विकास केवळ
थक्क करणारा
आहे युरोपमध्ये काहीसा असाच
प्रवास झ्यूस
हेरॅक्लिसचा झाला
होता मात्र
ख्रिश्चनिटीच्या आगमनाने
तिथे महाकाव्यातले सगळे देव बनलेले नायक हद्दपार
झाले भारतात
असे घडले
नाही युरोपमध्ये रोमन कॅथॉलिकांनी नृशंसपणे बाकी
सर्व धर्म
व महाकाव्यातले देव मुळापासून उखडून टाकले भारतातही
तसा प्रयत्न
झाला व ब्राम्हणांनी जैन बौद्ध शैव ह्या
तिन्ही धम्मांना
मुळापासून उखडण्याचा
प्रयत्न केला
ह्या प्रयत्नांमुळे जैन धर्म
मर्यादित झाला
, बौद्धांना समूळ
नष्ट करण्यात
आले तर शैवांना नष्ट करता
येत नाही
म्हणून शिवाचे
दैवतीकरण घडवून
त्यांना भगवान
बनवून त्यासाठी
पुराणे लिलामृत
वैग्रे रचून
व शेवटी
आर्यांचा चौथा
धर्म म्हणून हिंदू धर्म निर्माण
करून शैवांना
सामावून घेण्याचा
प्रयत्न सुरु
झाला जो ब्रिटिश व काँग्रेस
व भाजप
राजवटीत काही
प्रमाणात यशस्वी
झाला ह्या
यशाला राम व कृष्ण व रामायण महाभारत हे सर्वाधिक जबाबदार आहेत
एकीकडे सत्य
असलेले शिव महावीर गौतम बुद्ध
ह्यांचे झालेले
दैवतीकरण तर त्याला शह म्हणून दुसरीकडे आर्यांनी घडवलेले राम कृष्ण ह्या
महाकाव्याच्या नायकांचे
दैवतीकरण ह्यातून
भारतीय संस्कृतीत
जी दैवतीकरणाची धुळवड उडाली
आहे तिची
मजल शेवटी
नटनट्यांची मंदिरे
बांधण्यापर्यंत गेली
आहे . टिळकांच्यासारखा एरव्ही प्रखर
बुद्धिवादी असलेला
नेताही श्रीकृष्णाला भगवान मानतो
व गीतेचा
उपदेश साक्षात
ईश्वराचा उपदेश
म्हणूनच सादर
करतो मग बाकींच्याविषयी काय बोलावे ?असो
कुठल्याही ग्रंथाचा
तात्पर्यार्थ काढायचा
असेल तर भारतीय परंपरेत सात कसोट्या दिल्या आहेत
१ आरंभात
काय म्हंटले
आहे
२ शेवटी
उपसंहारात काय म्हंटले आहे
३ त्या
ग्रंथात कशाचा
अभ्यास मांडला
आहे ते पहावे अभ्यास म्हणून
काय काय उद्धृत केले आहे ते पहावे
४ त्या
ग्रंथाची अपूर्वता
कशात आहे जर ग्रंथात अपूर्वता
नसेल तर तो ग्रंथ मान्यता
देण्याच्या लायकीचा
नाही असे समजावे अपूर्वता असेल
तर त्या
अपुर्वतेचा मागोवा
घेऊन तो पूर्वीच्या ग्रंथापेक्षा कुठे अपूर्व
आहे कुठे विशेष आहे ते नीट समजून घ्यावे
५ त्या
ग्रंथात ग्रंथकारास काय फळाची
अपेक्षा आहे वाचकावर कोणते मुद्दे
तो ठसवू
इच्छितो ते पहावे
६ अर्थवाद
म्हणजे ग्रंथकाराची भरताड सोडून
त्याच्या प्रतिपादनाचा मुख्य अर्थ
काय ते तपासणे अनेकदा ग्रंथकार
स्वयुक्तिवादासमर्थनार्थ काहीही
तर्कहीन बरळतो
तेव्हा ते काढून नेमके सत्व
शोधणे गरजेचे
असते
७ उपपत्ती
म्हणजे तर्कशास्त्रानुसार केलेली शिस्तशीर
मांडणी ग्रंथकाराची उपपत्ती नीट तपासणे त्याने कोणत्या
मुद्द्याचे खण्डन
केलंय कोणत्या
मुद्द्याचे मंडन
केलंय आणि त्यासाठी कोणते तर्क
दिलेत ते पाहणे व ते तर्क बरोबर आहेत
का त्याची
तपासणी करणे
ह्या सात कसोट्याच्या आधारे
ग्रंथ व त्याचा तात्पर्यार्थ तपासणे
भारतीय परंपरेत
आवश्यक मानले
आहे हिंदुत्ववादी लोक ग्रंथ
वाचत नसल्याने
त्यांना आपली
परंपरा माहीत
नसते ते फक्त परंपरा हंबरत
असतात
टिळक गीता
ह्या ग्रंथाचा
अभ्यास ह्या
पारंपरिक कसोट्या
लावून करतात
सांप्रदायिक मांडणीत
अडकलेला मनुष्य
व ग्रंथकार
संप्रदायाने आंधळा
झालेला असतो
त्यामुळे त्यांनी
काढलेले तात्पर्यार्थ हे स्वतःच्या
संप्रदायाच्या सोयीने
काढलेले असतात
आपल्या संप्रदायाची मतेच ग्रंथकार
मांडतो आहे अशी त्यात मखलाशी
असते ह्यातूनच
सांप्रदायिक अर्थान्तरे उद्भवतात आगाऊच
अर्थनोंदणी होते
पूर्वीच्या न्यायनिवाड्याची ओढाताण करणाऱ्या
वकिलांपेक्षा ह्या
सांप्रदायिक ग्रंथकाराची काही वेगळी
स्थिती असत नाही
टिळक ह्या
सांप्रदायिक अर्थनिर्णयनाच्या गदारोळात न सापडता गीतेचा अन्वयार्थ
लावू पाहतात
निदान त्यांचा
तसा दावा
आहे
महाभारत हे महाकाव्य प्रामुख्याने धर्मप्रधान महाकाव्य असल्याने
धर्म काय आणि अधर्म काय हा प्रश्न ह्या
महाकाव्यात वारंवार
निर्माण होतो
आहे महाभारतकाराची इच्छा एक संपूर्ण धर्म सांगणे
हीच आहे त्यामुळेच अनेक धार्मिक
संघर्षाचे प्रश्न
इथे निर्माण
होतात अगदी
शेवटीही भीष्माला
शरपंजिरी करून
वैष्णव धर्म
काय आणि राजाने हा धर्म
आपल्या राज्यात
कसा राबवावा ते सांगितले आहे त्यासाठी धार्मिक प्रसंगांची उदाहरणे दिली
आहेत श्रीकृष्ण
ह्या पात्राच्याद्वारे गीता ही मांडण्यात आली आहे आणि तिथेही एका विशिष्ट धार्मिक पेचप्रसंगाची निर्मिती व्यासांनी
केली आहे आणि त्याचे संक्षिप्त
उत्तर दिले
आहे पुढे
शंकराचार्यांनी गीता
लिहून ते व्यापक केले आहे आणि त्यातून वैष्णव
धर्माची एक परिपूर्ण मांडणी आपणाला
प्राप्त होते
महाभारत विशेषतः गीता ह्या अर्थाने
खरोखरच वैष्णवांचा धर्मग्रंथ आहे तो इतरांच्यावर लादणे
ही मात्र
चूक होती
व आहे
हा धार्मिक
पेचप्रसंग कशामुळे
उद्भवलाय तर काम आणि अर्थामुळे
! राज्याच्या वाटणीचा
प्रश्न हा मूलभूत प्रश्न आहे आणि ह्याबाबत धर्म
काय हा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर महाभारताने पांडवाच्या बाजूने
दिले गेलेले
आहे म्हणूनच
श्रीकृष्णासाठी हे धर्मयुद्ध आहे तत्वयुद्ध
आहे
टिळकांच्या मते गीता ह्या धर्मयुद्धाला अर्जुनाने उभे रहावे म्हणून केला
गेलेला उपदेश
आहे मी टिळकांच्या ह्या
मताशी सहमत
आहे
श्रीधर तिळवे
नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १४८ गीता
सांगण्याची गरज का ? श्रीधर तिळवे नाईक
तिसरा प्रश्न मुळात श्रीकृष्णाला गीता सांगण्याची गरज
का भासावी ? मुळात श्रीकृष्णाने काय सांगितले ते माहित नाही कारण आपण गीता म्हणून
जे काही वाचतो ते संजयने पाहिलेले व धृतराष्ट्राला सांगितलेले आणि आणि
धृतराष्ट्राने काय ऐकले ते व्यासांनी गणपतीला सांगितलेले आणि गणपतीने लिहिलेले म्हणजे
श्रीकृष्ण ते अर्जुन
संजय ते धृतराष्ट्र
व्यास ते गणपती
गणपती ते वाचक
अशी आठ पदरी ही साखळी आहे
१घटीत श्रीकृष्ण व अर्जुन ह्यांच्यातले
२ संजयचे त्या घटितांचे पाहणे व
ऐकणे
३ त्या पाहण्याऐकण्याचे
धृतराष्ट्राला निवेदन
४ व्यासाचे त्या निवेदनाचे श्रवण
५ त्या श्रवणाची स्मृती
६ त्या निवेदनाच्या स्मृतीच्या आधारे
गणपतीला निवेदन
७ गणपतीचे व्यासांच्या त्या निवेदनाचे
श्रवण
८ गणपतीच्या त्या श्रवणाचे गणपतीने
केलेले लेखन
असा प्रवास आहे हा प्रवास काल्पनिक असल्यानेच
तर्कयुक्त वाटतो १३ व्या अध्यायातील ५ व्या श्लोकात ब्रम्हसुत्रांचा
उल्लेख आल्याने गीता ब्रम्हसुत्रानंतरची आहे हे उघडच आहे
इथे श्रीकृष्ण गॉड अल्लाह ह्यांच्यासारख्या
सगुण ईश्वर आहे जो भक्तांशी बोलतो
एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे समोर सर्व आपलेच आप्त
गुरु व ज्येष्ठ पाहून अर्जुन व्याकुळ झाला होता आणि पांडवांची व स्वतः
श्रीकृष्णाची मदार अर्जुनाच्या पराक्रमावर होती जर मुख्य खेळाडूच गळला तर टीमच्या
विजयाचे चान्सेस शून्यवत होतात अर्जुनाची स्थिती नेमकी कशी झाली होती ह्याचे वर्णन
गीतेच्या पहिल्या अध्यायातच आले आहे
काय कर्तव्य करायचे ह्याविषयी अर्जुन मूढ झाला आहे
आणि अशावेळी त्याला ह्या मूढतेतून बाहेर काढण्यासाठी म्हणून श्रीकृष्णाने उपदेश
केला आहे हे सर्व जाणतात पण सुरवात अशी नाही अर्जुनाची सुरवातीला युद्धाची तयारी
असल्यानेच अर्जुनाने शंखनाद झाल्यावर योद्धांना पाहण्यासाठी माझा रथ
युद्धभूमीच्या मध्ये न्हे असे श्रीकृष्णाला सांगितले आहे कृष्णाने जणू त्याला
कुणाकुणाला मारायचे आहे ह्याची जाणीव करून देण्यासाठी योद्धयांची नावे घ्यायला
सुरवात केली आहे आणि ह्या नावांना ऐकून विषाद दाटून येऊन चलबिचल सुरु झाली
आहे
माझं स्वतःचं मत असं आहे कि आपण जे काही करायला चाललो
आहे ते चुकीचे आहे ह्याची जाणीव अर्जुनाला झालेली आहे पण एखाद्या सज्जन माणसाला
एखादे दुष्कृत्य करायला प्रवृत्त करावे तसे श्रीकृष्णाचे वागणे आहे ज्या गुरूकडून
आपण विद्या शिकलो त्याच गुरूला त्यानेच शिकवलेल्या विद्येने ठार मारायला सज्ज होणे
हे कुठल्याच नीतिमत्तेत बसत नाही पण आर्यांच्या नैतिकतेत हे बसते आणि आर्यांच्या
इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत कच आणि शुक्राचार्य हे महाभारतातील आणखी
एक उदाहरण नृशंसपणा हा आर्य संस्कृतीचा विशेष आहे गीता हा ह्या
नृशंसपणाचा आधार आहे एकीकडे काल्पनिक गुरूला अंगठा कापून देणारा
बहुजनसमाजातला मूर्ख एकलव्य आहे तर दुसरीकडे आपल्याच गुरूला आणि मेंटॉरला
(भीष्म ) कसे मारायचे ह्याचे प्लॅनींग करणारा अर्जुन ह्या दोघांच्यात कुणाची
निवड करायची ? एक मूर्ख आहे तर दुसरा क्रूर ! दोघेही सारखेच त्याज्य आहेत एकंदरच
शैवांनी आर्य लोकांच्या आदर्शाच्या नादाला लागू नये हेच बरे !
अर्जुनाच्या क्रूरपणाचे आणखी एक उदाहरण
कुरुक्षेत्रावरच आढळते जेव्हा कर्णाला मारता येईना तेव्हा संतापलेल्या युधिष्ठराने
तुझे गांडीव मला दे असे सांगितले तेव्हा अर्जुन चक्क आपल्या ह्या सख्ख्या भावालाच
ठार मारायला निघाला होता श्रीकृष्णाने अर्जुनाला अडवल्याने हा बंधुवध टळला आहे
तेव्हा अर्जुन फार सज्जन वैग्रे नाही किंबहुना महाभारत म्हणजे व्हिलन लोकांचा
सुळसुळाट आहे ज्यात कर्ण , भीष्म , विदुर , कुंती , पंडु अशी काही मोजकी
सज्जन माणसे पिचलेत ह्यात सर्वाधिक धूर्त व मुत्सुद्दी श्रीकृष्ण आहे व त्याच्या
कृष्णकारस्थानांमुळेच पांडवांनी हे युद्ध जिंकले आहे धर्म वैग्रे ही फक्त फोडणी
आहे
अर्जुनापुढे त्याचे नातेवाईक असल्याने त्याने हे
युद्ध करायचे नाकारले माझ्यामते ही योग्य कृती आहे श्रीकृष्ण नसता तर अर्जुनाने
फक्त दुर्योधन व दुःशासन ह्यांची हत्या करून हा प्रश्न निकालात काढला असता भीष्म व
द्रोण ह्यांच्याशी संरक्षणात्मक युद्ध करत त्यांना जिवंत ठेवत दुर्योधन व
दुःशासनाला त्याने मारले असते तर चालले असते हे त्याला शक्य होते पण त्याने
आपले डोके श्रीकृष्ण ह्या युद्धखोर माणसाकडे गहाण टाकले आणि भीष्म व द्रोण
ह्यांच्या हत्येचे पाप आपल्या डोक्यावर घेतले महाभारताच्या शेवटच्या
पर्वात मृत्यूनंतर ह्या पापाची शिक्षा श्रीकृष्णाला झालेली नाही ती
अर्जुनालाच झाली आहे हे लक्ष्यात घेण्याजोगे आहे
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १४८ गीता का ?
शैवांच्यात दर्शन
आणि अनुशासन
असे प्रत्येक
मोक्षप्राप्ती उपायाचे
दोन भाग आहेत आणि अनुशासन
हे मोक्ष
मिळवण्यासाठी अत्यावश्यक व सक्तीचे
आहे ह्या
अनुशासनाचा कणा आहेत सत्य ,अहिंसा
अचोर्य अपरिग्रह
व सुकामचर्य टिळक गीतारहस्यात मानवी
जीवनातील ह्या
मुख्य यमांची
शीलांची चर्चा
करतात कारण
गीता ह्यांच्या
संदर्भात उद्भवते
अर्जुनाचा मुख्य
प्रश्न समोर
सर्व आप्तजन
गुरुजन ज्येष्ठजन
असतांना मी त्यांना का मारावे
त्यापेक्षा मी संन्यास का घेऊ नये हा आहे भारतीय संस्कृतीत श्रीकृष्णाने ह्याचे एक राजकारणी म्हणून दिलेले
उत्तर स्पष्टपणे
हिंसा आवश्यक
आहे आणि क्षत्रियाने ती केली पाहिजे असे आहे आणि अर्जुनाला
हे उत्तर
पटल्याने त्याने
ते स्वीकारले
आहे भगवान
बनलेल्या
नाईक
नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १४९ कर्मजिज्ञासा
अर्जुन व हॅम्लेट श्रीधर तिळवे नाईक
विषयप्रवेश ह्या पहिल्या प्रकरणात
टिळकांनी जी मांडणी केली तिचे संदर्भ घेत आपण तिचा प्रतिवाद केला व स्वतःची समांतर
मांडणीही केली टिळकांच्या हिंदुत्ववादाचा समग्र प्रतिकार करायचा असेल
तर टिळकांना संपूर्ण समजून घेऊन तो करणे आवश्यक आहे हे एक अवघड काम
आहे महाराष्ट्रात एकतर खाडिलकरांच्यापासून सदानंद मोरेंच्यापर्यंत टिळकांची
भलावण करणारी मांडणी समोर येते किंवा टिळकांना ब्राम्हणवादी व ब्राम्हणधर्मवादी
म्हणून निकालात काढण्याची घाई करणारी मीमांसा तरी समोर येते ही दोन्ही टोके
आहेत
ज्या हिंदुत्ववादाशी युद्ध असल्याचा दावा पुरोगामी
लोक करतात ते हिंदुत्ववाद्यांच्या ह्या आद्य सम्राटाला त्याच्या मांडणीला समजून
घेण्याचा साधा प्रयत्न सुद्धा करत नाहीत हिंदुत्ववाद हा काहीतरी डम्बो टाईप
लोकांचा खेळ आहे अशी ह्या लोकांची समजूत आहे तर डाव्या लोकांना टिळक डावीकडे
कललेले असल्याने फाजील आस्था वाटते कम्युनिस्टांना कोणीतरी हे सांगणे
आवश्यक आहे कि हिटलर हा सुद्धा डावीकडे कललेला होता त्यामुळे डावीकडे कलणे
ही कसोटी असू शकत नाही टिळक हिटलर न्हवते ते कट्टर लोकशाहीवादी होते आणि
कामगारवर्गाबद्दल त्यांना आस्था होती ही वस्तुस्थिती पण हिंदुत्ववाद्यांना
कामगारवर्गाबद्दल आस्था नसते असं कुणी सांगितलं ? ह्या आस्थेला मर्यादा आहेत पण
अशी आस्था असलेले टिळक हे पहिले हिंदुत्ववादी आहेत हे लक्ष्यात घ्यायला हवे त्यावर
सविस्तर पुढे लिहीनच
टिळकांचे तत्वज्ञान काय होते हे समजून घ्यायचे असेल
तर गीतारहस्याचा अभ्यास अटळ आहे टिळक म्हणजे केवळ राजकीय भाषणे न्हवेत टिळक म्हणजे
नवब्राह्मणवादाची सुस्पष्ट मांडणी ! ह्या मांडणीच्या केंद्रस्थानी श्रीकृष्ण व
गीता आहे म्हणूनच त्या संदर्भात टिळक काय म्हणतात ते महत्वाचे ठरते रानडे गांधी
गीतेत नसलेल्या गोष्टी गीतेत आहेत अशी खोटी भलावण करून गीतेची
मांडणी करतात दुष्ट ग्रंथातील सुष्ट गोष्टी निवडून आपण दुष्टपणाला
प्रोत्साहन देतो ह्याची गांधी विनोबा भावे ह्यांना जाणीव नाही त्यामुळेच विनोबा
भावे मनुस्मृतीमधील वचने निवडून मनुशासनम नावाचा वचनग्रंथ सादर करतात
बहुजनसमाजाला काय वाटेल ह्याची पर्वा न करता !टिळक असे करत नाहीत ते गीतेचा छुपा
ब्राम्हणक्षत्रियकेंद्री वैष्णववादी अजेंडा स्पष्टपणे सादर करतात
वारंवार गीतारहस्य ह्या ग्रंथात मनुस्मृती क्वोट करतात कारण त्यांचा
मनुस्मृतीवर विश्वास आहे आणि ते ही गोष्ट लपवत नाहीत ते हा ब्राम्हणक्षत्रियकेंद्री
वैष्णव अजेंडा नवीन काळाला सुटेबल बनवतात एकदा हे लक्ष्यात आल्यावर
गीतारहस्यमधील दुसऱ्या प्रकरणाकडे वळायला हरकत नसावी ह्या प्रकरणाचे नाव आहे कर्म
जिज्ञासा ! अर्जुनाची जी किंकर्तव्यमूढ अशी जी अवस्था आहे त्याला धरून टिळक
त्यांची मांडणी करतात
माझ्या मते कर्म निर्णयापूर्वी व कधीकधी
कर्मनिर्णय घेतल्यावर कर्मापूर्वी कर्माविषयी कायमच सहा गोष्टी
घडतात
१ कर्मस्पष्टता कर्म काय करावयाचे त्याची
स्पष्टता
२ कर्ममूढता कर्म काय करायचे हेच न कळणे
३ कर्मसंशयता आपण जे कर्म करावयास निघालो आहोत
त्याविषयी संशय असणे
४ कर्मग्लानी आपल्या कर्माचे संभाव्य परिणामाची
कल्पना करून ग्लानी येणे
आणि एकाचवेळी ह्यातील अनेक गोष्टी घडल्याने
दाटलेला
५ कर्मकोलाहल
अर्जूनात कर्मापूर्वीचा कर्मकोलाहल (action
chaos )दाटला आहे माणसे अशावेळी ज्ञानहताश होतात अर्जुन असा ज्ञानहताश झाला
आहे
अशावेळी ज्ञान उपदेश देणाऱ्याने विवेक बाळगावा लागतो
मूळ श्रीकृष्णाने हा विवेक दाखवला होता दोष नंतर गीता रचणाऱ्यांचा आहे मूळ
श्रीकृष्णाला मोक्षाशी काही देणेघेणे नाही तो अथपासून इतिपर्यंत राजकारणी मनुष्य
आहे आणि तो मला आवडतो पण हा जो परमेश्वर बनवलेला जो श्रीकृष्ण आहे तो मला कधीच
आवडला नाही हे सौती व शंकराचार्यांचे कर्म आहे (गीतेचा छन्द महाभारताशी विसंगत आहे
)ज्याने संपूर्ण हिंदुस्थानाचा सत्यानाश केला आहे
ह्या युद्धाचे बीजच मुळात श्रीकृष्णाने टाकले आहे
भावाभावांच्या भांडणात ह्याला कलमडायचे काहीच कारण न्हवते इंद्रप्रस्थ नगरी उभी
केल्यानंतर सभेचा अध्यक्ष कोण ह्या प्रश्नाचे निर्विवाद उत्तर भीष्म असेच होते पण
ते डावलून श्रीकृष्णाला मान देणे हे वादाला निमंत्रण देणारे होते श्रीकृष्णाने
आपले आसन सोडलेले नाही उलट त्याला विरोध करणाऱ्या शिशुपालाचा त्याने वध केला आहे
आणि हा वध झाल्यांनतर श्रीकृष्णाला कसलाही पश्चाताप झालेला दिसत नाही भारतीय आर्य
क्षत्रियांची ही निर्दयी मानसिकता थेट रामायण महाभारतापासून दिसते रामायणातील
रामही सुग्रीव व वाली ह्या भावांच्या भांडणात असाच कलमडतो व अधर्म करून वालीची
हत्या करतो आणखी कोणी असता तर दोघांच्यातल गैरसमज दूर केले असते आणि मदत मागितली
असती पण राम हे करत नाही कारण आर्यांची युद्धखोर वृत्ती रामातही भिनलेली
होती पुढे रावण बिभीषण ह्या भावांच्यातही रामामुळे अशीच भांडणे होतात सुंद
उपसुंद ह्या भावांच्यातही अशीच सुंदोपसुंदी विष्णुमुळे झालेली दिसते ही भावाभावांची
भांडणे लावणे हे आर्य राजकारणाचे वैशिष्ट्य आहे ह्याउलट गणपती व
स्कंद ह्यांचे अंडरस्टँडिंग बघण्यासारखे आहे एक ज्ञानयोगी तर दुसरा कर्मयोगी
दोघांनाही एकमेकाची ताकद माहीत आहे
क्षत्रियांनी दयुत ,जुगार खेळला पाहिजे हाही आर्य
राजकारणातला एक भंपक नियम श्रीकृष्ण ह्याला विरोध करत नाही
पत्नीला पणाला लावणारा युधिष्ठर म्हणे सर्वाधिक धर्मनिष्ठ माणूस !
ह्याला प्रतिवाद म्हणून युधिष्ठराने तत्कालीन धर्म पाळला असे म्हणता येते पण मग
त्यामुळे धर्म सनातन नसतो तर तात्कालिक असतो हे सिद्ध होते आज आपण पत्नी पणाला लावणाऱ्या
माणसाला असभ्यच म्हणू .
टिळकांच्यामते अर्जुनावर जो प्रसंग आला तो मुळीच
अपूर्व नाही ते असाच प्रसंग हॅम्लेटवर आल्याचे सांगतात व हॅम्लेटला
श्रीकृष्णासारखा मार्गदर्शक न भेटल्याने त्याची शोकांतिका झाली असे सांगतात
संन्यासी व कर्मपरायण अन्यायसहनकरू लोकांच्यापुढे कर्मक्रायसिस उभे रहात
नाहीत ते उभे राहतात कर्त्या कार्यकर्ता लोकांच्यापुढे ज्यांना अन्याय सहन
करायचा नसतो . आपल्या वडिलांचा खून करणाऱ्या काकांचे काय करायचे हा नैतिक पेच
हॅम्लेटपुढे उभा ठाकलाय असे टिळकांना वाटते मला असं वाटत नाही काकांना ठार
मारायचं हे त्याच्या डोक्यात पक्के आहे प्रॉब्लेम खुनात सामील
असणाऱ्या आईचं काय करायचं हा आहे हॅम्लेटमध्ये वडिलांची हत्या
झालीये द्रोण किंवा भीष्म ह्यांनी अशी हत्या केलेली नाही उलट अर्जुनाला शिक्षण
दिलंय आणि प्रेमही त्यामुळे त्यांची हत्या करणे हा अधर्मच दुर्योधनाने अशी
पितृहत्या केलेली नाही इतकेच कशाला राज्यही बळकावलेले नाही युधिष्ठर ते जुगारात
हरलेला आहे दुर्योधनाने द्रौपदीचे वस्त्रहरण (ह्या पापात पांडवांचाही समान वाटा
आहे ) व पांडवांची हत्या करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याचा सूड
घेण्याचा हक्क अर्जुनाला नक्कीच आहे पण अर्जुन दुर्योधनाबाबत गोंधळलेलाच नाही
त्यामुळे त्याबाबत त्याचा हॅम्लेट झालेलाच नाही अर्जुनाचा नैतिक पेच हा
भीष्म आणि द्रोण कृपाचार्य ह्यांच्याबाबत आहे
श्रीकृष्ण हा पेच जसा आहे तसा समजून घेत नाही उलट
त्याला युद्ध हवे असल्याने तो हा पेच युद्धाच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न
करतो गीता ह्या प्रयत्नाचा युक्तिवाद आहे
श्रीधर तिळवे नाईक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा